गेल्या पंचवीस तीस वर्षात काळ झपाट्याने बदलला. माझ्या पिढीने एक संक्रमण पाहिले. माहितीतंत्रज्ञानाने देशात घडवलेली क्रांती पाहिली. वैचारिक, सामाजिक, आर्थिक व इतर अनेक स्तरांवर बदल घडून आले. राहणीमान विचारसरणी दृष्टीकोन. खूप सारे बदलले. आजच्या काळात आपण सहज मागे पाहिले तर हा बदल ठळकपणे दिसून येतो. त्यांचेच हे छोटे संकलन...
.
(अर्थात सर्वांनाच हे सगळे बदल जाणवतीलच असे नाही. पण ही मला व माझ्यासारख्या अनेकांना जाणवलेली काही निरीक्षणे)
.
पूर्वी: येत्या रविवारी ना, आपल्याकडे मुंबईचा मामा येणार आहे. मुंबईची मिठाई घेऊन.
आता: आपण ना ह्या विकएंडला ना, गावाकडे जाऊ. मस्त चुलीवरचे जेवण खाऊ.
.
पूर्वी: सर, बँकेमध्ये दाखवायला तुमचे शिफारसपत्र द्याल का. कर्ज हवे होते.
आता: सर नमस्कार, बँकेने आपल्यासाठी कर्ज मंजूर केले आहे. हवे आहे का.
.
पूर्वी: फोन हवा असेल तर वाट पहावी लागेल. सहा महिने वेटिंग आहे.
आता: सहा नंबर आहेत माझे. थांबा थोडा वेळ. कुठला देऊ तेच कळत नाही.
.
पूर्वी: बघा बघा माझे नाव आले आहे वर्तमानपत्रात. सांगा आपल्या सर्व कार्यकर्त्यांना.
आता: कार्यकर्तेहो लक्ष ठेवा. माझे नाव कुठे सोशल मीडियात वगैरे आलेले तर नाही ना.
.
पूर्वी: आई आपल्याला कारने कधी जायला मिळेल गं.
आता: आई कंटाळा आलाय कारचा. एकदा तरी एसटीने जाऊया ना.
.
पूर्वी: अभ्यास करायलाच हवा. पप्पा भडकले तर काही खरे नाही.
आता: अभ्यास कर म्हणून सांगू का नको ह्याला. वस्सकन ओरडतो.
.
पूर्वी: जरा अभ्यासाचे पुस्तक वाच. बघेल तेंव्हा सारखी गोष्टीची पुस्तके डोळ्यासमोर.
आता: जरा वाच गोष्टीची पुस्तके कादंबऱ्या तरी निदान. बघेल तेंव्हा फोन डोळ्यासमोर.
.
पूर्वी: जोडीदार बिझी आहे. मित्रमैत्रीणींना वेळ नाही. शेजारीपाजारी गावी गेलेत. फारच बोअर आयुष्य.
आता: फेसबुकवर नवीन काही नाही. व्हाट्सपवर कुणाचा मेसेज नाही. मायबोलीवर कुणाचा प्रतिसाद नाही. फारच बोअर आयुष्य.
.
पूर्वी: शिक्षक आहेत ते. समाजाची सेवा करतात. अभ्यास केला नाही तर छडी मारायचा त्यांना पूर्ण अधिकारच आहे.
आता: शिक्षक आहेत ते. भरपूर पगार घेतात. अभ्यास करून घेणे त्यांची जबाबदारी. छडीने मारणे हा गुन्हाच आहे.
.
आणि सगळ्यात हद्द म्हणजे...
.
पूर्वी: ने मजसी ने परत मातृभूमीला. सागरा प्राण तळमळला. (धन्य ते सगळे स्वातंत्र्यसैनिक)
आता: ने मजसी ने परत युरोप-अमेरिकेला. ऑनसाईट साठी प्राण तळमळला. (धन धना धन इंजिनिअर्स)
.
पूर्वी आणि आता...
Submitted by अतुल. on 8 July, 2019 - 10:28
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पूर्वी: ने मजसी ने परत
पूर्वी: ने मजसी ने परत मातृभूमीला. सागरा प्राण तळमळला. (धन्य ते सगळे स्वातंत्र्यसैनिक)
आता: ने मजसी ने परत युरोप-अमेरिकेला. ऑनसाईट साठी प्राण तळमळला. (धन धना धन इंजिनिअर्स)
>> बाकी छान आहे , पण याची गरज नव्हती . २० ३० वर्षापूर्वीही लोकाना जावसच वाटत असेल कदाचित , पण शक्य नसेल
एकदम खरी निरीक्षणं
एकदम खरी निरीक्षणं
जबरदस्त निरिक्षण
जबरदस्त निरिक्षण
"पूर्वी: जोडीदार बिझी आहे.
"पूर्वी: जोडीदार बिझी आहे. मित्रमैत्रीणींना वेळ नाही. शेजारीपाजारी गावी गेलेत. फारच बोअर आयुष्य.
आता: फेसबुकवर नवीन काही नाही. व्हाट्सपवर कुणाचा मेसेज नाही. मायबोलीवर कुणाचा प्रतिसाद नाही. फारच बोअर आयुष्य."
म्हणजे एकंदरीत बोअर आयुष्य हेच खरं
(No subject)
मस्त
मस्त
फारच धाडसी आहात ब्वा तुम्ही.
फारच धाडसी आहात ब्वा तुम्ही.
मस्त!
मस्त!
पुर्वी मुलांना खेळताना ओढत
पुर्वी मुलांना खेळताना ओढत घरी आणलं जायचं.
आता बाबा रे कधीतरी बाहेर खेळायला जा. असं घरातले विनवतात.
पुर्वीशेजारपाजारी राहणार्या
पुर्वीशेजारपाजारी राहणार्या लोकांच्या घराची दारं सताड उघडी असायची.
एकमेकांच्या घरी ये-जा असायची.
आताआपल्या शेजारी कोण राहतंय त्यांची नाव माहीती नसतात.
पूर्वी - बाहेरचं खाणं
पूर्वी - बाहेरचं खाणं monthend किंवा खास कारणाने
आता - जाहिरात बघा - रेस्टॉरंट जैसा खाना घरमें(कॉलर टाईट आई)
आणि रेस्टॉरंट मधे पाटी - घरगुती चवीचं भोजन मिळेल
पटतायत गोष्टी
पटतायत गोष्टी
पुर्वी मुलांना खेळताना ओढत घरी आणलं जायचं.
आता बाबा रे कधीतरी बाहेर खेळायला जा. असं घरातले विनवतात.
पुर्वीशेजारपाजारी राहणार्या लोकांच्या घराची दारं सताड उघडी असायची.
एकमेकांच्या घरी ये-जा असायची.
आताआपल्या शेजारी कोण राहतंय त्यांची नाव माहीती नसतात.>>+९९
पूर्वी - बाहेरचं खाणं monthend किंवा खास कारणाने
आता - जाहिरात बघा - रेस्टॉरंट जैसा खाना घरमें(कॉलर टाईट आई)
आणि रेस्टॉरंट मधे पाटी - घरगुती चवीचं भोजन मिळेल>>+९९
प्रतिसादकर्तेहो धन्यवाद.
प्रतिसादकर्तेहो धन्यवाद.
>> २० ३० वर्षापूर्वीही लोकाना जावसच वाटत असेल
३० वर्षापूर्वी मोठ्या शहरांत परदेशांत जाणे तसे बरेचसे कॉमन होते. पण ग्रामीण व निमशहरी भागात कल्पनेच्याही पलीकडे होते. आयटी मुळे आज मात्र खूपजण जाऊन आलेत.
मला काही मजेशीर गोष्टी आठवतात. उदाहरणार्थ, "ब्रिटीश" ह्या शब्दाचे फार वेगळे चित्र तेंव्हा मनात असायचे. ते मुख्यत्वे इतिहासाच्या व तत्सम पुस्तकांतून मिळालेल्या माहितीवरून बनलेले. पहिल्यांदा जेंव्हा ब्रिटीश कंपनीशी सलग्न असलेली एक भारतीय कंपनीमध्ये नोकरीस लागलो तेंव्हा खूप आश्चर्य वाटले होते. "जे ब्रिटीश आपले शत्रू होते व ज्यांच्यामुळे अनेक भारतीयांनी स्वातंत्र्यलढ्यात देशासाठी हौतात्म्य पत्करले, त्यांच्याशी हे भारतीय उद्योगपती कसा काय व्यवसाय करू शकतात? नैतिकतेला धरून आहे का हे?" वगैरे वगैरे विचार तेंव्हा मनात आले होते आज हे आठवले कि गम्मत वाटते. आजचे ब्रिटीश शंभरेक वर्षांपूर्वीच्या ब्रिटिशांपेक्षा खूप वेगळे आहेत हे कळायला वेळ लागला. फ्रांस इटली व युरोपातल्या इतरही देशांबद्दलही असेच म्हणता येईल.
>> म्हणजे एकंदरीत बोअर आयुष्य हेच खरं Wink Happy
कालागणिक व्याख्या मात्र बदलत गेली
>> Submitted by मन्या ऽ on 9 July, 2019 - 11:38
>> Submitted by प्राचीन on 9 July, 2019 - 12:13
+१११
पूर्वी - वधु परीक्षा व्हायची
पूर्वी - वधु परीक्षा व्हायची
आता - वर निवडला जातो
पूर्वी - 'आमच्या वेळी' असं
पूर्वी - 'आमच्या वेळी' असं नव्हतं म्हणणारे म्हातारे असत (बदल सावकाश घडत होते)
आता - 'आमच्या वेळी' असं नव्हतं हे तरूण / मध्यमवयीन देखिल म्हणू शकतात ( इतक्या लवकर सगळं काही बदलतंय)
शेवटचे 'सगळ्यात हद्द' म्हणून लिहिलेले अस्थानी वाटले.
पूर्वी, प्राण तळमळला, मातृभूमीला ने म्हणणारे त्याआधी तिकडे गेलेच होते ना. आताचेही तिकडे गेलेले अधूनमधून तळमळत असतातच की.
'हे विश्वची माझे घर' असे 'पूर्वी' च लिहीले गेले होते. जागतिकीकरणापासून 'आता' (खेड्यात राहूनही) सुटका नाहीच.
इथं अजुन सोनेखरेदीबद्दल कुणीच
इथं अजुन सोनेखरेदीबद्दल कुणीच कसं नाही लिहिलं?
"आमच्या काळी सोनं किती स्वस्त होतं!" असं म्हणणारी लोकंपण नाहियेत का आताच्या काळात?
First the problem was You
First the problem was You vote for any party the EVM vote goes to BJP.
Now vote for any party the elected MLA goes to the BJP
सही पकडे हैं..
सही पकडे हैं..
First the problem was You
First the problem was You vote for any party the EVM vote goes to BJP.
Now vote for any party the elected MLA goes to the BJP >
First the problem was You
First the problem was You vote for any party the EVM vote goes to BJP.
Now vote for any party the elected MLA goes to the BJP>>
आज दुपारी सहज गुणगुत होतो...
आज दुपारी सहज गुणगुत होतो... असेल कोठे रुतला काटा... हे बाबूजींच्या आवाजातले ऐकलेय तेंव्हापासून मूळ गाण्यापेक्षा तेच डोक्यात बसले आहे आणि गुणगुणता गुणगुणता वाईच सेंटी झालो. हे गाणे किती सुरेख वाटते त्यांच्या आवाजात ऐकायला. तेव्हा त्यांची लहानपणी कानावर पडणारी भक्तिगीते भावगीते सगळे काही आठवले.
पण त्याच वेळी एक गोष्ट अचानक मनात आली आणि माझे मलाच हसायला आले. हे गाणे मी लहान असताना गुणगुणले असते "अहो सजना, दूर व्हा, जाऊ द्या, सोडा जाऊ द्या..."वाह काय नजाकत आहे सुरांत. पण लहानपणी? आणि घरात? आणि लावणी? गुणगुणायची?
वडिलांनी अर्धा तास चांगलेच सुनावले असते. इतकेच काय त्यानंतर कित्येक दिवस मला ऐकावे लागले असते. आईने "काय गं बाई कशी वळणं लागणार ह्या मुलांना" म्हणून कपाळावर हात मारून घेतला असता. "त्यापेक्षा पुस्तकातील कविता म्हण. आयुष्याचे कल्याण होईल.." म्हणून झापले असते
लेख पण मस्त आहे..
लेख पण मस्त आहे..
छान निरिक्षणं !
छान निरीक्षणं !
पूर्वी : बहुतेक मुलं 'ढ' /साधारण.
आता: प्रत्येक मूल गिफ्टेड (?) .
>>>>पूर्वी : बहुतेक मुलं 'ढ'
>>>>पूर्वी : बहुतेक मुलं 'ढ' /साधारण.
आता: प्रत्येक मूल गिफ्टेड (?) .>>> हाहाहा
हे मात्र अगदी अगदी. पूर्वी
हे मात्र अगदी अगदी. पूर्वी वर्गात मुलांचे वर्गीकरण केले जायचे. काही हुशार काही ढ वगैरे. त्यावरून मुलांची वर्गात बसण्याची ठिकाणे पण ठरलेली असंत.
मी एकदा माझ्या मुलाला विचारले कि "वर्गात तू कुठे बसतोस? आपण नेहमी पहिल्या तीन बाकांवरच बसायचे लक्षात ठेव. मागे बसायचे नाही" माझी तीच मानसिकता. पण ती जुनी झालीये आणि अयोग्य सुद्धा आहे हे मला तेंव्हा कळलं जेंव्हा मुलगा म्हणाला, "पप्पा, तसे नसते. टीचर सांगतात तसे बसावे लागते. त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येक बाकावर कधी न कधी बसावे लागते'
थोडं अवांतर. असेल कोठे रुतला.
थोडं अवांतर. असेल कोठे रुतला... वाचल्यावर बैठकिच्या लावण्यांची प्लेलिस्ट ऐकायला बसलो. त्यात भरलं आभाळ पावसाळी... हि आशाताईंचीच लावणी आहे, महानोरांच्या शब्दांत. लावणीत पुढे पिवळ्या पंखाच्या पक्षाचा उल्लेख आहे; कोणाला यात दडलेला अर्थ, संदर्भ माहित आहे का?..
>> पिवळ्या पंखाचा पक्षी नाव
>> पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना
Interesting! मला नक्की अर्थ माहित नाही पण महानोरांची कविता आहे, म्हणजे पिवळ्या पंखाचा पक्षी हा सामान्यतः आढळत नाही. दिसलाच तर उत्सुकता ताणवतो. तेंव्हा समोरच्या व्यक्तीला उदेश्यून हा समोर बसलेला (अनामिक) पाहुणा कोण, ज्याची ओळख करून घ्यायची (नर्तकीला) इच्छा आहे. असा अर्थ असू शकतो. ("कुण्या गावाचं आलं पाखरू" मध्ये सुद्धा समोरच्या व्यक्तीला पक्षाची उपमा आहे). किंवा पिवळ्या पंखाचा पक्षी म्हणजे"अनामिक हुरहूर" असाही शर्थ असू शकतो. नक्की कसली हुरहूर आहे (पिवळ्या पंखाचा पक्षी) ते तिला कळत नाही आहे. महानोरांच्या कवितेत थेट अर्थ न निघणारे व वाचकाने हवा तो अर्थ काढावा असे शब्द असतात. मधु कांबीकर यानी पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. यामुळे रसिकांचा अजूनच गोंधळ उडतो. कदाचित दिग्दर्शकाला सुद्धा तोच परिणाम साधून काव्याला न्याय द्यायचा असेल.
तुम्ही म्हणतांय तसा काहिसा
तुम्ही म्हणतांय तसा काहिसा गर्भितार्थ असण्याची शक्यता असु शकते. त्याचबरोबर तिला तो पक्षी ओळखता येत नाहि, मायग्रेटरी बर्ड असु शकतो का? (इथल्या गोल्डफिंच सारखा) जो तिथे फक्त श्रावणात बघायला मिळतो...
हो, हि उपमा सुद्धा चपखल लागू
हो, हि उपमा सुद्धा चपखल लागू पडते. "बाहेरून आलेला पाहुणा" हे जेंव्हा महानोर लिहितात तेंव्हा त्यांच्या मनात मायग्रेटरी बर्ड न यावा तरच नवल.
बाय द वे, हा एक लेख सापडला त्यात असे म्हटले आहे कि आशाजीनी स्वत:च महानोरांना विचारले होते कि यातल्या पिवळ्या पंखाच्या पक्षाचे नाव काय. तेंव्हा ते केवळ नुसतेच हसले होते: http://prahaar.in/pivalya-pankhacha-pakshi-n-d-mahanor/
आजोळ कोणतं तुझं? या
आजोळ कोणतं तुझं? या प्रश्नावरची प्रतिक्रिया...
पूर्वी: किती आपुलकीने विचारत आहेत ना
आता: हा काय mother's maiden name ची माहिती काढत आहे कि काय?
Pages