पूर्वी आणि आता...

Submitted by अतुल. on 8 July, 2019 - 10:28

गेल्या पंचवीस तीस वर्षात काळ झपाट्याने बदलला. माझ्या पिढीने एक संक्रमण पाहिले. माहितीतंत्रज्ञानाने देशात घडवलेली क्रांती पाहिली. वैचारिक, सामाजिक, आर्थिक व इतर अनेक स्तरांवर बदल घडून आले. राहणीमान विचारसरणी दृष्टीकोन. खूप सारे बदलले. आजच्या काळात आपण सहज मागे पाहिले तर हा बदल ठळकपणे दिसून येतो. त्यांचेच हे छोटे संकलन...
.
(अर्थात सर्वांनाच हे सगळे बदल जाणवतीलच असे नाही. पण ही मला व माझ्यासारख्या अनेकांना जाणवलेली काही निरीक्षणे)
.
पूर्वी: येत्या रविवारी ना, आपल्याकडे मुंबईचा मामा येणार आहे. मुंबईची मिठाई घेऊन.
आता: आपण ना ह्या विकएंडला ना, गावाकडे जाऊ. मस्त चुलीवरचे जेवण खाऊ.
.
पूर्वी: सर, बँकेमध्ये दाखवायला तुमचे शिफारसपत्र द्याल का. कर्ज हवे होते.
आता: सर नमस्कार, बँकेने आपल्यासाठी कर्ज मंजूर केले आहे. हवे आहे का.
.
पूर्वी: फोन हवा असेल तर वाट पहावी लागेल. सहा महिने वेटिंग आहे.
आता: सहा नंबर आहेत माझे. थांबा थोडा वेळ. कुठला देऊ तेच कळत नाही.
.
पूर्वी: बघा बघा माझे नाव आले आहे वर्तमानपत्रात. सांगा आपल्या सर्व कार्यकर्त्यांना.
आता: कार्यकर्तेहो लक्ष ठेवा. माझे नाव कुठे सोशल मीडियात वगैरे आलेले तर नाही ना.
.
पूर्वी: आई आपल्याला कारने कधी जायला मिळेल गं.
आता: आई कंटाळा आलाय कारचा. एकदा तरी एसटीने जाऊया ना.
.
पूर्वी: अभ्यास करायलाच हवा. पप्पा भडकले तर काही खरे नाही.
आता: अभ्यास कर म्हणून सांगू का नको ह्याला. वस्सकन ओरडतो.
.
पूर्वी: जरा अभ्यासाचे पुस्तक वाच. बघेल तेंव्हा सारखी गोष्टीची पुस्तके डोळ्यासमोर.
आता: जरा वाच गोष्टीची पुस्तके कादंबऱ्या तरी निदान. बघेल तेंव्हा फोन डोळ्यासमोर.
.
पूर्वी: जोडीदार बिझी आहे. मित्रमैत्रीणींना वेळ नाही. शेजारीपाजारी गावी गेलेत. फारच बोअर आयुष्य.
आता: फेसबुकवर नवीन काही नाही. व्हाट्सपवर कुणाचा मेसेज नाही. मायबोलीवर कुणाचा प्रतिसाद नाही. फारच बोअर आयुष्य.
.
पूर्वी: शिक्षक आहेत ते. समाजाची सेवा करतात. अभ्यास केला नाही तर छडी मारायचा त्यांना पूर्ण अधिकारच आहे.
आता: शिक्षक आहेत ते. भरपूर पगार घेतात. अभ्यास करून घेणे त्यांची जबाबदारी. छडीने मारणे हा गुन्हाच आहे.
.
आणि सगळ्यात हद्द म्हणजे...
.
पूर्वी: ने मजसी ने परत मातृभूमीला. सागरा प्राण तळमळला. (धन्य ते सगळे स्वातंत्र्यसैनिक)
आता: ने मजसी ने परत युरोप-अमेरिकेला. ऑनसाईट साठी प्राण तळमळला. (धन धना धन इंजिनिअर्स)
.
Happy Happy Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> त्यात भरलं आभाळ पावसाळी... हि आशाताईंचीच लावणी आहे, महानोरांच्या शब्दांत. लावणीत पुढे पिवळ्या पंखाच्या पक्षाचा उल्लेख आहे;
'श्रावणाचं ऊन मला झेपेना' म्हणते आहे ना ती? श्रावणात ऊनपावसाचा खेळ चालतो - जसं 'क्षणात येते सरसर शिरवे' तसंच अवचित पडणार्‍या लख्ख पिवळ्या उबदार उन्हासारखा हा कोण पाहुणा (पक्षी : उन्हाच्या पिवळ्या पंखाचा कोणं हे नवीन पाखरू) - असा प्रश्न तिला पडला आहे.

>>असा प्रश्न तिला पडला आहे.<<
बरोबर, पण ती पिवळ्या पक्षाची उपमा कोणाकरता वापरली आहे, हा प्रश्न उरतो. पक्षी, पालवी कि प्रियकर.. रेंज खूप मोठि आहे...

प्रियकर (किंबहुना लावणी असल्यामुळे 'कस्टमर') Happy
म्हणजे 'राया मला पावसात नेऊ नका' यातलं 'राया' आपल्यालाच उद्देशून आहे असं आड्यन्समधल्या प्रत्येकाला वाटायला लावणं हेच लावणीतलं स्किल ना?

पण 'राया हे आपल्याला उद्देशून नसेल तर आपण तिला पावसात न्यायला एलिजिबल आहे' - असा विचार नाही का करणार अ‍ॅडियोन्समधलं पब्लिक? Wink

रात्री बेरात्री अचानकच कुठूनसे आरडाओरडा भांडण सुरु असल्यासारखे आवाज आल्यावर

पूर्वी (अनेक प्रश्न) : अरे बापरे! कसला आवाज? कुणाची भांडणं? कुठून येतोय हा आवाज? कोण लोक आहेत? कोणत्या गल्लीतून? कोणत्या घरात?
आता (एकच प्रश्न) : कुणाच्या मोबाईल मधून एव्हढा मोठा आवाज?
Lol

Pages