Submitted by किल्ली on 10 May, 2019 - 05:57
तुला पाहते रे..
शितु, सुभा, गादा (गायत्री दातार उर्फ आपलं ई बाळ) आणि ह्या सीरीयल मधील समस्त महान लोकांची कामं पाहुन त्यांची मेहनत सार्थकी ठरवण्यासाठी हा धागा..
आओ ना फिर
उडाओ ना फिर
हा धागा , पिसं काढणार्यांना समर्पित!!!
पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!
ह्या आधीची चर्चा इथे आहे:
२. https://www.maayboli.com/node/68143
३. https://www.maayboli.com/node/68936
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नुसती हाताला गोळी लागली तर
नुसती हाताला गोळी लागली तर विक्या कोसळला. आमचे बॉलिवूड, साऊथ कडचे हिरो बघा किती वेळ हाणामार्या करतात गोळी लागूनही!
स्वतःवर खुनी हल्ला झालाय, नवर्यावर झालाय,तो झेंडेने केलाय..कश्शाकश्शानेही ईबाळाच्या चेहर्यावरचे भाव बदलले नाहीत..आश्चर्य..दुख..संताप..धक्का बसणे..रडणे..काहीच नव्हतं तिच्या चेहर्यावर..>>>>>>>>>>>>>>>> मक्खोबा च आहे नुसती.
पार्श्वभूमीवर जे संगीत वाजतं
पार्श्वभूमीवर जे संगीत वाजतं त्यातही भाव असतात पण मठ्ठी मात्र तशीच. :" डोळे फिरवणारी भावली
नवीन सिरियलचा प्रोमो आला का?
नवीन सिरियलचा प्रोमो आला का?
आमचे बॉलिवूड, साऊथ कडचे हिरो
आमचे बॉलिवूड, साऊथ कडचे हिरो बघा किती वेळ हाणामार्या करतात गोळी लागूनही>>>>
एक साऊथ इंडियन सिरीयल ची क्लिप फिरत होती
त्यात हीरॉईन ला गोळी लागते, कपाळावर, बरोबर टिकली लावतात तिकडे,
मग हिरो टॅक्सी बोलावतो त्यात तिला घालतो, मग ती खुणा करून घटनास्थळी पडलेला गजरा आणायला सांगते, हिरो कडून माळून घेते,
प्रसंगाची स्मृती कायम राहावी म्हणून सेल्फी पण काढते
सौथ च्या हिरॉइन्स पण इतक्या मजबूत असतात, नाहीतर आमचे हिरो.... मराठी माणूस म्हणूनच मागे राहतो
सासूबाई नावाची काहीतरी सीरियल
सासूबाई नावाची काहीतरी सीरियल येणारे बहुतेक
एक साऊथ इंडियन सिरीयल ची
एक साऊथ इंडियन सिरीयल ची क्लिप फिरत होती
त्यात हीरॉईन ला गोळी लागते, कपाळावर, बरोबर टिकली लावतात तिकडे,
मग हिरो टॅक्सी बोलावतो त्यात तिला घालतो, मग ती खुणा करून घटनास्थळी पडलेला गजरा आणायला सांगते, हिरो कडून माळून घेते,
प्रसंगाची स्मृती कायम राहावी म्हणून सेल्फी पण काढते>>>>>>>>>>>>>>>>>>>> अरारारा
सासूबाई नावाची काहीतरी सीरियल
सासूबाई नावाची काहीतरी सीरियल येणारे बहुतेक
नवीन Submitted by किल्ली on 3 July, 2019 - 13:44 >>>>>
अग्गबाई सासूबाई !!!! निवेदिता सराफ, सासूबाई जिचे लग्न होणार आहे आणि आपली जानूताई तिंची सून. प्रोमो पाहिला.
https://abpmajha.abplive.in/tv_and_theatre/tejashree-pradhan-to-portray-...
फारच वेगळे वळण घेते आहे
फारच वेगळे वळण घेते आहे सिरीयल..... आणि आपला विक्रांत कधी बरा होणार, कधी ते किलर स्माईल देणार आणि कधी "इशा....." असं तिच्या डोळ्यात पहात प्रेमभराने म्हणणार...!!!!
एकुण माहौल बघता ईबाळ माफ करेल
एकुण माहौल बघता ईबाळ माफ करेल विक्याला असं वाटतयं.
झेण्डेने विसला किडनॅप केलय.
झेण्डेने विसला किडनॅप केलय.
आणि आपला विक्रांत कधी बरा होणार, कधी ते किलर स्माईल देणार आणि कधी "इशा....." असं तिच्या डोळ्यात पहात प्रेमभराने म्हणणार...!!! >>>>>>> +++++++++११११११११११
एकुण माहौल बघता ईबाळ माफ करेल विक्याला असं वाटतयं.>>>>>>>> पण विसने नन्दूचा खून निर्घुणरित्या केला आहे. तसच ह्याआधीही त्याच्याकडून निष्पाप माणसान्ना मारल गेलेल आहे ( राजेश आणि त्याची फॅमिल,दादासाहेब, जालिन्दरचा माणूस) अश्या माणसाला कस काय कुणी माफ करु शकत? मग नन्दूच्या बदल्याच काय होईल?
आता सहनशक्ती संपत चालली आहे.
आता सहनशक्ती संपत चालली आहे. चार दिवसांनी सीरेल बघते आहे आत्ता. कहर डायलॉग्स ऐकतेय "विक्रांत सरांना त्यांच्या <चुकीचा> पश्चाताप होतो आहे म्हणे
शिवाय राजनंदिनीवर अन्याय (?) पक्षी जीव घेणं एवढंच - केल्याचाही त्यांना पश्चाताप होतोय ऐकून कानांना धन्य वाटलं
तसं बघितलं तर ईबाळ बदला
तसं बघितलं तर ईबाळ बदला म्हणजे काय तर विक्याला आयुष्यातून उठवणं किंवा मारून टाकणं ह्यापैकी एक करणं अपेक्षित होतं. तशी काहीच हालचाल नाहीये तिच्याकडून. जयडूला सगळे आधिकार दिले म्हणता म्हणता तो आता ऑफिसला जाताना, काम करताना दिसत नाही.
विक्याचे अपराध माहीत असूनही सगळे विक्याची कोण काळजी करत आहेत, सगळा सावळा गोंधळ.
प्राजक्ता....बरोबर आहे !
प्राजक्ता....बरोबर आहे !
मलाही आईसाहेब इतक्या चिंतेत पडलेल्या पाहून नवलच वाटलं..पण मग वाटलं..की ओव्हर द पिरियड, माणूस विसरतो; अॅडाप्ट होतो.
असं काहीसं दाखवायचं असेल...उगाच आता गढे मुर्दे उकरण्या पेक्षा जे समोर आहे ( व चांगलं आहे! ) त्याचाच स्वीकार करावा......
ईबाबा जेव्हा ईशाला विसने
ईबाबा जेव्हा ईशाला विसने तिच्यासाठी काय काय केल हे सान्गत होते तेव्हा पहिल्या एपिसोडपासून दाखवत होते. विसने जे काही केल ते तिला प्रेमात पाडून लग्न करण्यासाठी आखलेला प्लॅन होता. विसने खोटया प्रेमाच्या जाळयात अडकवल होत तिला हे ईआईबाबान्ना आणि ईशालाही का कळत नाही? विस हा गजा पाटील आहे हे तर सोयीस्करपणे विसरुनच गेले निमकर.
तेच ना.. काहीही दाखवतात. आता
तेच ना.. काहीही दाखवतात. आता प्लीज एका खुनी माणसाला मन मोठं करून माफ वगैरे केलं दाखवू नका. ई आई आणी ईबाबा काय ग्यान देत सुटलेत :रागः
आला आला विस शुध्दीवर आला.
आला आला विस शुध्दीवर आला.
आता ईशा मी नन्दू आहे यानन्तर मी प्रेगनन्ट आहे ह्याची जाहिरात करणार आहे वाटत सगळीकडे. जयदीपला सान्गून टाकल.
तुपारे आणि जिवलगामध्ये सेम Track चालू आहे. दोन्हिमध्ये हिरोला किडनॅप केलय, शेवटी नायिका त्यान्ना वाचवतील आणि माफ करतील अस दाखवतील वाटत.
जयदीपला सान्गून टाकल.>>
जयदीपला सान्गून टाकल.>> इथपर्यंत ठीक होतं.. जालिंदर ला सुद्धा कळलं ...
इथपर्यंत ठीक होतं.. जालिंदर
इथपर्यंत ठीक होतं.. जालिंदर ला सुद्धा कळलं >>>>>>>>> ते जयदीपनेच सान्गितल त्याला.
आजचे झेण्डेचे डायलॉग्ज कहर होते. कॉलेजमध्ये सगळया मुलान्ना शाहरुख, आमिर खान, अक्षयकुमार आवडायचे, मला मात्र तु आवडायचा. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही वै वै. अक्षरक्षः बायकोसारखा वागत होता तो विसशी.
सांगणं पण किती पुस्तकी/नाटकी
सांगणं पण किती पुस्तकी/नाटकी
अंश वाढत आहे, अंकुर वाढत आहे, तुझ्या पोटात माझं बाळ,
आरारारारारारा किती पाल्हाळ
खूप दिवसांनी इबेबी च भोकाड
खूप दिवसांनी इबेबी च भोकाड पाहायला मिळालं
आजचे झेण्डेचे डायलॉग्ज कहर
आजचे झेण्डेचे डायलॉग्ज कहर होते. कॉलेजमध्ये सगळया मुलान्ना शाहरुख, आमिर खान, अक्षयकुमार आवडायचे, मला मात्र तु आवडायचा. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही वै वै. अक्षरक्षः बायकोसारखा वागत होता तो विसशी. >>> एकदम दोस्ताना वाटला
खुप दिवसांनी ईबेबीच भोकाड
मी बघितलाय दोस्ताना सीन. विस विलासला काही भावच देत नव्हता.आणि
झेंडे एकतर्फी प्रेमात फडफडत होता.
खुप दिवसांनी ईबेबीच भोकाड बघायला मिळालं>> और दिलको बहोत सुकून मिला।
लाल अनारकली, गोल्डन पर्स,
लाल अनारकली, गोल्डन पर्स, गोल्डन सॅंडल आणि रडणारी इबेबी , सरांचं अपहरण झालं आई म्हणत टाहो फोडणार ईबाळ, जालिंदर झेंडे ला माणुसकी ठेव असं सांगतोय तो क्षण.. सगळंच कसं जमतं ह्यांना.. एका एपिसोड मध्ये एवढे सिक्सर नका मारू रे.. हसून वाट लागतेय
आजचे झेण्डेचे डायलॉग्ज कहर
आजचे झेण्डेचे डायलॉग्ज कहर होते. कॉलेजमध्ये सगळया मुलान्ना शाहरुख, आमिर खान, अक्षयकुमार आवडायचे, मला मात्र तु आवडायचा. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही वै वै. अक्षरक्षः बायकोसारखा वागत होता तो विसशी.>>>>
पोस्ट वाचल्यापासून सतत खो खो हसते आहे मी..
न रहावून प्रतिसाद लिहिला...
अगदी अगदी. सर्व पोस्टींना
अगदी अगदी. सर्व पोस्टींना मम. लैच भोकाड पसरले.
कालच्या भागात झेंडे ने
कालच्या भागात झेंडे ने whiteboard वर 'पुर्नजन्म' असे लिहिले होते
मी बघितलाय दोस्ताना सीन. विस
मी बघितलाय दोस्ताना सीन. विस विलासला काही भावच देत नव्हता.आणि
झेंडे एकतर्फी प्रेमात फडफडत होता. >>>>>>>>> अगदी अगदी झेण्डेचा काव्या ( जिवलगा) झाला होता.
अंश वाढत आहे, अंकुर वाढत आहे, तुझ्या पोटात माझं बाळ, >>>>>>> +++++++++++ १११११११११११ गजा पाटलाच्या तोण्डी अशी भाषा शोभत नाही.
लाल अनारकली, गोल्डन पर्स, गोल्डन सॅंडल >>>>>>>> ईथे नवर्याच अपहरण झालय, हाताला गोळी लागलीये, इथे मात्र बायको नटूनथटून फिरतेय.
कालच्या भागात झेंडे ने whiteboard वर 'पुर्नजन्म' असे लिहिले होते >>>>>>>>
ईथे नवर्याच अपहरण झालय,
ईथे नवर्याच अपहरण झालय, हाताला गोळी लागलीये, इथे मात्र बायको नटूनथटून फिरतेय. >> ते तर सोडाचं, स्वत:च्या घरात पण तीए पाहुण्यासारखी तयार होऊन बसलेली काल. ती जानू निदान घरात असताना योग्य अवतारात असायची.
हे whiteboard प्रकरण काय आहे?
हे whiteboard प्रकरण काय आहे??
हे whiteboard प्रकरण काय आहे?
हे whiteboard प्रकरण काय आहे?? >>>>>>>> झेण्डे ईशाला नन्दूबद्दल कस माहितीय त्याच अॅनालिसिस करतो whiteboard वर. उदा. जालिन्दरकडून १५%, सर्जेराव, परान्जपे ह्यान्च्याकडून १०% अस.
विसचा माज अजूनही गेला नाहीये. जालिन्दरने मला जेलमध्ये पाठवून तुला काय मिळाल विचारल्यावर विस म्हणतो, ' मी आज साहेबाच्या खुर्चीवर बसलोय . आणि आज तु माझ्यासमोर उभा आहेस. ' नक्की आहे तरी काय ह्याच्या मनात?
Pages