Submitted by मी_अनामिक on 3 July, 2019 - 12:24
संपव तु वटवृक्षाच अस्तित्व माझं
तरीही लहानस बीज होईन म्हणतो...
गाड मातीत मला क्रूरतेने
होऊन अंकुर इवलसं उगवीन म्हणतो...
कर आभाळाचे घाव तू
पोलादी छातीवर झेलीन म्हणतो...
घेऊनी त्यांनाच पदाखाली
तयावर उभा राहीन म्हणतो...
उधळले कैक हजार डाव जरी तू
आणिक एक खेळीन म्हणतो...
पडेन कितीदा मोजणार नाही
नेटानं पुन्हा उभा राहीन म्हणतो...
काट्या-कुट्यांच खाच-खळग्यांच घेणं नाही
त्याच पथावर अविरत चालीन म्हणतो...
असशील तू विधीलिखित जरी
तुलाच आव्हान देईन म्हणतो...
लढायला जमेल का तुला माझ्याशी
नियते, तुलाही आस्मान दावीन म्हणतो...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जबरदस्त लिहिलीये कविता..पु.का
जबरदस्त लिहिलीये कविता..पु.का.शु!
धन्यवाद... मन्याजी....
धन्यवाद... मन्याजी....
छान...
छान...
ज्जे बात! वाहवा
ज्जे बात!
वाहवा
मस्तच!
मस्तच!
नीरू जी, हर्पेन जी, प्रांजली
निरू जी, हर्पेन जी, प्रांजली प्रानम जी,.....
सर्वांना मनापासून धन्यवाद........
मस्त
मस्त
छान
छान
आतापर्यंत कितीदातरी खाली
आतापर्यंत कितीदातरी खाली कोसळलो मी
पण हे असं काही वाचलं कि पुन्हा पुन्हा उसळलो मी
.... आईची आन , सुप्परडुप्पर लिखाण
बोलले तो रामण्णा का बाण