Submitted by गजानन on 10 April, 2014 - 04:59
मराठी पाठ्यपुस्तकातील धड्यांची चर्चा करण्यासाठी एक धागा जुन्या मायबोलीत होता.
आता इथल्या दुसर्या एका बाफावर अशी चर्चा सुरू झाली आणि त्या धाग्याची आठवण झाली, म्हणून हा धागा काढला.
जुन्या धाग्यावरही बरीच चर्चा आहे. तीही जरूर वाचा.
जुन्या धाग्याचा दुवा: http://www.maayboli.com/hitguj/messages/46/4554.html
तर ती चर्चा इथे चालू ठेवू.
इथे प्रताधिकाराचा भंग होईल असा मजकूर (कॉपी पेस्ट / चित्रे) प्रतिसादात देऊ नका.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
'वेड लागलेलं घर' लेखिका -
'वेड लागलेलं घर' लेखिका - ईरावती कर्वे
'वेड लागलेलं घर' लेखिका -
'वेड लागलेलं घर' लेखिका - इरावती कर्वे>>+१
परिपूर्ति या पुस्तकात आहे हा लेख. अकरावीच्या मराठीच्या पुस्तकात होता ना?
आठवत नाही पण मला थोडे धडे
आठवत नाही पण मला थोडे धडे कविता आठवतात, कणा , प्रेमाचा गुलकंद या कविता अजून एक कविता नाव नाही आठवत नव्या मनूचा नव्या दमाचा शूर शिपाई आहे , कोण मला वठणीवर अनु शकतो ते मी पाहे आणि बालपणीचा काळ सुखाचा हा धडा
गजानन , रश्मी धन्यवाद. किशोर
गजानन , रश्मी धन्यवाद. किशोर बघती आहे.
पण प्रयत्न करते.
गजानन , लेकीचे मराठी "अरे आजोबा, तु कसा आहेस ? मी चांगला आहे. मॉमी आला नाही ऑफिसात. आजी कसा आहे? कॅटीच पिल्लू गेला? तु चुडिदार पाठेविले ते मला आवडते. छान आहे. "
असे आहे.
मराठी पाठ्यपुस्तकातील.... ही
मराठी पाठ्यपुस्तकातील.... ही लिंक प्रथमच वाचली.त्यातील प्रतिसादांनी जुन्या - शाळेच्या आठवणींना उजाळा दिला
मनापासून धन्यवाद!
त्यातच माझ्या मराठी च्या शिक्षकांनी ओपिनियन बुकवर केलेली कमेंटही आठवली----
आठवणी रम्य असतात
आठवणी दाहक असतात
साथ सुटते कालप्रवाहात
आठवणी साठून राहातात
माँ मै तो इंसान बनूंगा.......
माँ मै तो इंसान बनूंगा........एक मनस्वी भावलेली कविता
राजा नही किसान बनूंगा
देह नहीं मै प्राण बनूंगा
शांती नही तूफान बनूंगा
जिसे कालभी मिटा न पाये
मै वो अमिट निशान बनूंगा.....माँ मै तो इंसान बनूंगा
ताईच्या पुस्तकातली
ताईच्या पुस्तकातली
या झोपडीत माझ्या...
ती कवितासुध्दा
" ओ रातके मुसाफिर .....
मीनाकुमारीच्या गाण्यची चाल लावीत आम्ही भावंड म्हणायचो
आजही आठवत
राजास जी महाली
सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली
या झोपडीत माझ्या....
जाता तया महाला
मज्जाव शब्द आला
भीती न या वयाला.....
भा. रा. तांबेची
भा. रा. तांबेची
जन पळभर म्हणतील हाय हाय
मी जाता राहील कार्य काय
सूर्य तळपतील
चंद्र झळकतील
वाऱ्याने या नद्या वाहतील
कुणा काळजी कि न उमटतील
पून्हा तटावर हे पाय
सखेसोयरे डोळे पुसतील
पून्हा आपल्या कामी लागतील
उठतील बसतील हसून खिदळतील
मी जाता त्यांचे काय जाय.....
रामकृष्ण ही आले गेले
त्याविन जग का ओसची मुझसे
कुणी सदोदीत सुतक धरीले
मग काय अडकले मजशिवाय.....
मला वाटते दुसरीच्या पुस्तकात
मला वाटते दुसरीच्या पुस्तकात "मज म्हणसि दूर जाऊ..." अशी काहीशी कविता होती. कुणाला माहिती आहे का.
मै गोताखोर मुझे गहरे जाना
मै गोताखोर मुझे गहरे जाना होगा
तुम तटपर बैठ भँवर की बाते किया करो.....
खेतों में खलिहानो में
जंगल में मैदानोमे
ये सब मिलकर आती हैं....
इंग्लिश पाठ्यपुस्तकातील
आॅफियस अॅन युरिडाइस.....प्रेमी युगल
मंकीज पाॅ..... सस्पेंस स्टोरी
आणि एका म्हाताऱ्या ची ज्याची मुलं त्याला मेलेला समजून इस्टेटीच्वा वाटणी साठी भांडत असतात,तेव्हा तो उठतो आणि मुलांना सांगतो कि मी आता लग्न करायच ठरवलं आहे ... .
एका विधवेच्या शेजारी राहाणारे कायम तिच्या बद्दल चुकीचा समज करत असतात मग कालांतराने त्यांना आपली चूक समजते
तिच्या घरी सतत येणारी माणसे तिच्या नवऱ्याच्या विम्यासंबंधी चौकशी साठी येत असतात, अन् तिच्या खिड़की ची काच तर स्वच्छच असते पण त्या शेजाऱ्यांच्याच खराब खिड़की मधून त्यांना तीच नेहमी अस्वच्छ वाटत असते.....
हे सगळ त्यांना नंतर कळते
अजून बरचं काही आठवताहेत......
१. कातरवेळ की सांजवेळ या
१. कातरवेळ की सांजवेळ या नावाने एक धडा होता. नवीन लग्न झालेली मुलगी पहिल्यांदा माहेरी येते तेव्हा तिच्या मनाची उलघाल.
२. रेडिओची गोष्ट की असेच काहीतरी नाव.
बहुदा बोटीवर काम करणारा तरुण चुकून लागलेल्या रेडिओ स्टेशनवर येणारा मोर्स कोड (की कुठलातरी कोड) ऐकून जमलेल्या मंडळीना सांगत असतो. त्याबरोबर त्याच्या आयुष्यातील बदलणाऱ्या घटना.
मला या दोन्ही गोष्टी अभ्यासक्रमात नव्हत्या. त्यामुळे इयत्ता सांगता येणार नाही. माझ्या एका ताईकडे मी जाऊन वाचत बसायचे. बहुतेक तिच्या बी. ए. च्या अभ्यासक्रमातल्या या गोष्टी आहेत.
कोणाला लेखक किंवा कुठल्या पुस्तकातल्या आहेत हे माहीत आहे का?
कातरवेळ अकरावी ला होती.. आणि
कातरवेळ अकरावी ला होती.. आणि रेडिओची गोष्ट नववी ला पण तो धडा वगळलेला होता. तरी वाचायला आवडायचा.
पीनी,
पीनी,
१. कातरवेळ ही अरविंद गोखले यांची कथा आम्हाला अकरावीच्या मराठीच्या पुस्तकात होती. फार सुंदर कथा.
२. रेडिओची गोष्ट ही दि. बा. मोकाशी यांची कथा आमच्या नववीच्या मराठीच्या पुस्तकात होती. पण आदल्या वर्षी मूल्यशिक्षण नावाचा एक जादा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केल्यामुळे सगळ्याच विषयांमधले काही टक्के भाग काढून टाकले होते. पण पुस्तकं तीच असल्याने पुस्तकात ते भाग होते १-२ वर्षं तरी. नंतर सुधारित आवृत्ती काढली असेल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तर, आमच्या पुस्तकात ही रेडिओची गोष्ट होती पण अभ्यासक्रमात नव्हती. छान होती ही पण.
तसाच त्याच पुस्तकातला 'हे माझ्या पर्वता' हा शि. म. परांजपे यांचा धडाही अभ्यासक्रमात नव्हता. १-२ कविताही अशा असतील, लक्षात नाही कुठल्या ते.
मै गोताखोर माझी आवडती कविता
मै गोताखोर माझी आवडती कविता होती.
प्रिया तेंडुलकर यांचा एक धडा होता नाव आठवत नाही.....त्या नव्यानेच जाहीरात क्षेत्रात येतात, दिग्दर्शक त्यांना चांगली साडी आणायला सांगतो, त्या भरपुर साड्या घेऊन सेटवर पोहोचतात. दिग्दर्शक एक साडी निवडतो आणि नंन्तर कळते की ती जाहीरत रंगीत न्हवती... असं काहीस त्यांच्या अनुभवाबद्दल त्यात लिहल होत.
मनावर कोरलेल्या काही कथा.
मनावर कोरलेल्या काही कथा. दोनांचेच नाव आठवते
१) मराठी पुस्तकातील एक कथा ज्यात पुरलेल्या मृतदेहांवरचे दागिने चोरून गुजराण करणाऱ्या धिप्पाड माणसाची गोष्ट होती. शेवटी तो स्वतःच्या हाताची बोटे मृतदेहाचे तोंड बंद झाल्याने व लांडग्यांच्या कळपाने त्याच वेळी हल्ला केल्याने गमावतो. हा धडा नववीला होता.
2) आणि बुद्ध हसला.
3) हिंदी पुस्तकातील धोब्याची कथा, ज्यात तो धोबी आजारामुळे मरतानादेखील त्याच्या भावाला आठवणीने लेखकाचे कपडे नेऊन द्यायला सांगतो, आणि त्या धोब्यावर चोरीचा संशय घेतला म्हणून लेखकाचे डोळे पाणावतात.
4) इंग्रजी पुस्तकातील "द वूडन ब्रिज हॉटेल". ज्याची मालकीण एक चेटकीण असते व येणाऱ्या पाहुण्यांना गाढव (अक्षरशः) बनवून विकत असते.
मी- माझा बरोबर. हे धडे मलाही
मी- माझा बरोबर. हे धडे मलाही होते. १) बहुतेक कोल्ह्यांनी हल्ला केला होता.
२) आणि बुद्ध हसला हे पोखरण येथील अणुबॉम्ब चाचणी यशस्वी झाली त्याचा कोडवर्ड होता. असा फोन इंदिरा जींना गेला.
४) ती मालकिण धान्य पेरते, लगेच ते वाढते,कापणी मळणी.
खूप रंजक धडा होता तो.
प्रिया तेंडुलकर यांचा एक धडा
प्रिया तेंडुलकर यांचा एक धडा होता नाव आठवत नाही.....त्या नव्यानेच जाहीरात क्षेत्रात येतात, दिग्दर्शक त्यांना चांगली साडी आणायला सांगतो, त्या भरपुर साड्या घेऊन सेटवर पोहोचतात. दिग्दर्शक एक साडी निवडतो आणि नंन्तर कळते की ती जाहीरत रंगीत न्हवती... <<< हो आठवला. त्यात बहुतेक अजून एक किस्सा होता - त्यांना एका साबणाची जाहिरात करायची होती. पण काही केल्या जाहिरातीत ठळकपणे दिसायला हवा असा फेस त्या साबणाचा होईनाच. शेवटी प्रयत्न करून करून थकल्यावर त्या कंपनीच्या टीमने प्रतिस्पर्धी कंपनीचा साबण आणून त्याचा फेस केला आणि जाहिरात शूट केली.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मराठी पुस्तकातील एक कथा ज्यात
मराठी पुस्तकातील एक कथा ज्यात पुरलेल्या मृतदेहांवरचे दागिने चोरून गुजराण करणाऱ्या धिप्पाड माणसाची गोष्ट होती. शेवटी तो स्वतःच्या हाताची बोटे मृतदेहाचे तोंड बंद झाल्याने व लांडग्यांच्या कळपाने त्याच वेळी हल्ला केल्याने गमावतो. हा धडा नववीला होता >>>>> स्मशानातील सोनं - अण्णाभाऊ साठे
पुरलेल्या मृतदेहांवरचे दागिने
पुरलेल्या मृतदेहांवरचे दागिने चोरणाऱ्याची गोष्ट- स्मशानातले सोने. लेखक बहुतेक अण्णा भाऊ साठे. शेवटी त्याची बोटे तुटतात.
प्रिया तेंडुलकरांच्या 'पंचतारांकित' या पुस्तकातला हा धडा अकरावीच्या पुस्तकात होता. 'मॉडेलिंग आणि मी'. मस्त होता.
छान धागा आहे.
छान धागा आहे.
बालभारतीच्या साईटवर फक्त २००६-२०१९ चे १ ली ते आठवीपर्यन्तचीच पुस्तेक आहेत डाउललोडसाठी. १९९० पासूनची, नववीपासूनची १२ वी पर्यन्तची कुमारभारतीची पुस्तके कुठे मिळतील?
अरे गजानन प्रिया तेंडुलकर
अरे गजानन प्रिया तेंडुलकर यांच्या धड्याचे नाव होते "मी आणी माँडेलींग "
हो, बरोबर.
हो, बरोबर.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सातवीत असताना भामरे नावाच्या
सातवीत असताना भामरे नावाच्या बाई होत्या आम्हाला...हिंदी शिकवायच्या...
त्यांनी सूरज लाने जाना है..ह्या कवितेला एक प्यार का नगामा है ह्या गाण्याची चाल लावली होती.. ती कविता अजूनही लक्षात आहे माझ्या
धड्याच्या बाबतीत मला सुंदर,लाल चिखल,उपास, स्मशानातीलं सोनं, रेडिओची गोष्ट हे धडे आठवतायेत..
दहावीला होते अभ्यासक्रमात..
तसेच सहावीला "ठोकळ्याच चित्र " लेखक बहुतेक यदुनाथ थत्ते...
भामरे बाई सहावीला मराठीच्या कविता शिकवायच्या
तुतारी, मी फूल तृणातील इवले, न मजसी ने परत त्यांनी लावून दिलेल्या चालीमुळे अजूनही लक्षात आहेत..
काहीली म्हणुन एक वळवाच्या
काहीली म्हणुन एक वळवाच्या पावसाचा धडा होता. अतिशय चित्रदर्शी असल्याचे स्मरते.
आमच्या वेळी 'रेडिओची गोष्ट '
आमच्या वेळी 'रेडिओची गोष्ट ' वगळल होत परीक्षेसाठी. पण तो धडा छान होता.
खंड्या, व शंकर पाटील यांचा
खंड्या, व शंकर पाटील यांचा वळिव हे धडे अजूनही लक्षात आहेत...खरंच आपला काळ खुप चांगला होता. आजकालच्या मुलांना त्यांच्या मागच्या इयत्तेतील धडे माहिती आहेत की नाही
"ओंध चा राजा " किती जणांना
"ओंध चा राजा " किती जणांना आठवतो
" सर्व गणिते बरोबर येत नाहीत काही चुकतात "
"आता मी राजा राहिलो नाही पण बाप आहे पोरांनी येऊन भेटावे असं वाटतं "
ही वाक्य अजूनही लक्षात आहेत .
औंधाचा राजा.
औंधाचा राजा.
तू टाकीत जा..
कायम आठवणी मध्ये राहणाऱ्या धड्यांपैकी हा एक धडा. बहुतेक चैत्रबन मधून घेतलेला होता
बहुतेक चैत्रबन मधून घेतलेला
बहुतेक चैत्रबन मधून घेतलेला होता <<< नाही, 'मंतरलेले दिवस' मधून.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हो. थँक्स
हो.
थँक्स
Pages