महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्याने मराठी क्रमांक शिकवताना ते दहा दोन(१२) , दहा आठ(१८), तीस दोन(३२) असे शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यार्थ्यांना क्रमांकातील जोडाक्षरे जमत नाहीत म्हणुन हे सोपे केले आहे असे त्यांचे म्हणने आहे.
हा निर्णय घेताना भाषातज्ञांना, पालकांना व शिक्षकांना विश्वासात घेतले होते का? त्यांचे मत विचारले होते का?
काही सर्वेक्षण केले होते का? त्याचा सँपल साईझ किती?
या प्रयोगाचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर काय परिणाम होणार त्याची जबाबदारी कुणाची?
मोडी लिपीला कालबाह्य करण्यापासून सुरु झालेला हा प्रवास, मराठी भाषाच नको इथे जाऊन संपायला किती अवधी लागेल?
मराठी शाळांची अवस्था आधीच दयनीय आहे. नवीन शाळेला परवानगी नाही. त्यात हे दिवे लावले जात आहेत.
हे असे निर्णय घेणारे कोण असतात? त्यांच्या वर बसलेले त्यांना जाब विचारत नाहीत का?
https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-balbharti-made-changes-in-ma...
https://abpmajha.abplive.in/mumbai/balbharati-changes-numeracy-for-secon...
https://m.maharashtratimes
https://m.maharashtratimes.com/editorial/article/chapter-of-the-issue-of...
बदल मागे घेणार अशी लोकसत्तेची
"बदल मागे घेणार?" अशी लोकसत्तेची बातमी आहे. तीतही बरेच विनोद आहेत.
"इयत्ता दुसरीप्रमाणेच पहिलीच्या पुस्तकातही बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे बदल करण्यास डॉ. नारळीकर यांनी विरोध केला तर काय करायचे, अशी भीती काही अधिकाऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे या बदलांबाबत त्यांना कल्पना देऊ नये, अशी तंबीही काही अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. काही अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येत असल्याची चर्चा समिती सदस्य आणि बालभारतीत गुरुवारी रंगली होती"
हिंदी माध्यमाच्या
हिंदी माध्यमाच्या पुस्तकांतही असा बदल केला आहे. हे पहिलीचं पुस्तक पान ५८ पहा.
अमित,
अमित,
माहीत नसताना बोलणं विनोदी असतं, हे पुन्हा सांगतो. मी कोणाशी याबद्दल बोललो, कोणी माहिती दिली याची तुला शून्य माहिती आहे. त्यावर तू बोलू नयेस, हे उत्तम. हे याच बाबतीत नव्हे, तर एरवीही तू करतोस. तसं करू नकोस, ही विनंती.
भरत,
निर्णय मागे घेण्याचा कोणताही अधिकृत निर्णय काल संध्याकाळपर्यंत झाला नव्हता. लोकसत्तेनी बातमी कुठून दिली माहीत नाही.
*
गीता महाशब्दे यांच्या लेखातले काही उल्लेख आणि 'अधिकार्यांवर लक्ष' वगैरे वाचल्यास नारळीकरांनी आपल्याला मिळणारा पाठिंबा पूर्णपणे गृहीत धरला, हे कळतं.
बदल मागे घेणार? अशी दुरुस्ती
बदल मागे घेणार? अशी दुरुस्ती वरच्या पोस्टमध्ये केली आहे.
------
महाशब्देंच्या लेखातले शेवटचे वाक्य भारी आहे - एकतर 'बालभारती'चा आपल्याच शिकवण्यावर विश्वास नाही, किंवा दुसरीचे पाठ्यपुस्तक लिहिणाऱ्यांना पहिलीत काय शिकविले आहे हे माहीत नाही.
------------------
नारळीकर २०१३ पर्यंत गणित विषय समितीच्या सदस्य होत्या. त्याचं नाव दुसर्या क्रमांकावर दिसतंय. नव्या समितीतले बाकीचे सगळे सदस्य नवे आहेत. एका जुन्या सदस्याला कार्यगटात घेतलंय.
-----------
अगदी पहिल्या बातमीत या बदलां बद्दल शिक्षकांना शाळा सुरू होऊन पुस्तकं हाती आल्यावरच कळलं असं म्हटलंय. हे अविश्वसनीय वाटायला हवं. पण गेल्या दोन तीन वर्षांपासून अभ्यासक्रमातल्या बदलांबद्दल शिक्षकांची शिबिरे हा प्रकार चटावरच्या श्राद्धा सारखाही केला जात नाही, असं प्रसारमाध्यमातल्या बातम्यांमधून आणि प्रत्यक्ष कानावर आलंय. शिक्षक प्रशिक्ष णाची सोय टीव्हीद्वारे (तेही गुजरातच्या कोण त्यातरी वाहिनीवरून) किंवा इंटरनेटमार्फत केल्याचे प्रकार घडलेत.
बरीच उलट सुलट चर्चा यावर
बरीच उलट सुलट चर्चा यावर अद्यापही सुरु आहे. बदलाला बहुतेकजणांचा विरोधच आहे असे जाणवते. इथे सुद्धा धाग्याचा विषय नवीन पद्धतीला विरोध करण्यासाठीच आहे असे दिसून येते. त्यामुळे रोष पत्करण्याचा धोका घेऊन माझे मत मांडत आहे कि जे निर्णयाच्या पूर्ण बाजूने नसले तरीही बदल करायला हवा याकडे झुकणारे आहे. मी सुवर्णमध्य साधायचा प्रयत्न करत आहे असे म्हणायला हरकत नाही.
१. जे पूर्वापार चालत आले आहे ते योग्यच आहे असे म्हणण्याकडे बहुतेकांचा कल असतो. कारण, केवळ आपल्याला त्याची सवय झालेली असते म्हणून. पण बदलत्या काळानुसार ते योग्य आहे कि नाही हे प्रश्नांकित करायलाच हवे (आणि हे व्यापक अर्थाने) असे माझे मत आहे.
२. इतकी वर्षे केवळ सवय झाल्याने आपल्याला ते योग्य वाटते. पण मुलांच्या दृष्टीने काही अंक लिहायला बोलायला समजायला आणि म्हणून शिकायला खरेच अवघड आहेत. ते सोपे करण्यासाठी नवीन पद्धतीत "वीस एक" "पन्नास सहा" "तीस दोन" असे सुचवण्यात आले आहे. मला वाटते हे उलट केले तर अधिक सोपे होईल. किंबहुना सध्याची पारंपारिक पद्धती तशीच आहे असे वाटते. फक्त काळाच्या ओघात अपभ्रंशीत झाली असावी म्हणून अवघड झाली आहे. उदाहरणार्थ...
२३ : तीन वीस : (याचेच तेवीस झाले आहे)
६७: सात साठ: (याचेच सदूसष्ट झालेय)
५३: तीन पन्नास: (याचे तीनपन्न -> त्रेपन झाले)
५६: सहा पन्नास: (सहापन्न -> छपन्न झाले)
९७: सात नव्वद: (याचेच सत्त्याण्णव झाले)
३२: दोन तीस: (दोन साठी बे शब्द पूर्वी प्रचलित आला. बहुतेक गुजराती शब्द आहे. त्यातून "बे तीस" -> बत्तीस)
७८: आठ सत्तर: (याचेच अठ्ठ्याहतर झाले)
फक्त शेवटी ९ असणाऱ्यांना हा नियम लागू पडत नाही असे दिसते. उदाहरणार्थ...
३९: एक उणे चाळीस चे अपभ्रंश होऊन एकूणचाळीस झाले. आता, ३१ ते ३८ पर्यंत सुरु असलेला नियम इथेच का तोडला? पुढच्या ४० या अंकाशी संबंध का जोडला? त्याचे कारण जसे वर एका प्रतिसादात सांगितले आहे "एक उणे <पुढचा नंबर>" असे कोणीतरी पूर्वी म्हणायला सुरु केले असावे (कारण तात्कालिक असेल). पण ते केवळ सवयीने अजूनही तसेच प्रचलित आहे. त्याला आजवर कोणीही प्रश्नांकित केलेले नाही. हीच कथा ६९, ५९, ७९ इत्यादींची. या ऐवजी इथे नियमाला धरून नौतीस (३९), नौसाठ(५९) म्हटले तर ते जास्त योग्य होणार नाही का.
तर एकंदर मला वाटते आहे तीच पद्धती फक्त काळाच्या ओघात झालेला अपभ्रंश टाळून आणि काही चुका दुरुस्त करून अवलंबली तर मुलांनाही सोपे जाईल परंपरावाद्यांना सुद्धा ठीक वाटेल. (आता इथे सहा-पन्नास म्हणायला शिकलेल्या मुलाला जुन्या काळातले पुस्तक वाचताना छप्पन चा अर्थ पट्कन कळणार नाही हे खरे असले तरी उच्चारसाधर्म्यामुळे कळायला फार अवघडही जाणार नाही. त्यामुळे ती सुद्धा अडचण नाही)
३. अंकांच्या बाबत मला स्वत:ला अजून एक अवघड वाटणारी गोष्ट म्हणजे हजार, लाख, कोटीचे विभागीकरण.
१, ००० (थाउजंड)
१, ०००, ००० (मिलियन)
१, ०००, ०००, ००० (बिलियन)
असे सरळसाधे तीन तीन अंकांचे ग्रुप न करता आपल्याकडे...
१, ००० (हजार)
१, ००, ००० (लाख)
१, ००, ००, ००० (कोटी)
असा काहीतरी विचित्र प्रकार करून ठेवला आहे. तीन-दोन-दोन असे काहीसे. इथे सुद्धा विद्यार्थ्यांचा प्रचंड गोंधळ होतो. आताच्या पाठ्यपुस्तकांत तर एखादा मोठा अंक देऊन तो भारतीय पद्धतीप्रमाणे आणि इंग्लिश पद्धतीने अशा दोन पद्धतीने कसा लिहायचा हे विद्यार्थ्यांना विचारले जाते. अरे कशासाठी हा अट्टाहास? मुलांच्या बुद्धीला जितके कष्ट पडतील व जितका खुराक मिळेल तितके चांगले हे जरी खरे असले तरी केवळ परंपरा आहे म्हणून त्यांना कष्ट द्यायचे व ते शिकवायचा अट्टाहास करणे अयोग्य वाटते.
धोतर सोडून पॅंट घालायला सुरवात केली कारण ती घालणे अधिक सोयीचे. सुटसुटीत आहे पट्कन घालता येते म्हणून. जे साधे सोपे अधिक सोयीचे आहे ते स्वीकारले जाते. सांस्कृतिक आक्रमण, गळचेपी, ऱ्हास वगैरे वगैरे अर्थ त्यातून निघत जातात. चालायचेच. कालाय तस्मै नमः
चर्चा वाचली. चांगली आहे.
चर्चा वाचली. चांगली आहे.
अजित पवारांचा फडणदोनशुन्य आणि पन्नासदोनकुळे वाला विधानसभेतला विडेओ पाहिला. मजेशीर आहे.
सहा पन्नास ६५०?
सहा पन्नास ६५०?
शंभरच्या पुढे गंमत आहे, ज्याचा विचार बदलवाल्या लोकांनी केलेला नाही.
५६,०५६ लिहा अक्षरांत.
५६,०५६ लिहा अक्षरांत. >>>
५६,०५६ लिहा अक्षरांत. >>> पन्नास सहा हजार पन्नास सहा
Fifty Six Thousand Fifty Six
१. जे पूर्वापार चालत आले आहे
१. जे पूर्वापार चालत आले आहे ते योग्यच आहे असे म्हणण्याकडे बहुतेकांचा कल असतो. कारण, केवळ आपल्याला त्याची सवय झालेली असते म्हणून. पण बदलत्या काळानुसार ते योग्य आहे कि नाही हे प्रश्नांकित करायलाच हवे (आणि हे व्यापक अर्थाने) असे माझे मत आहे.
>>
भाषेचे व्याकरण व शब्द हे नैसर्गिकपणे त्या त्या भाषिकांनी बदलावे. त्यात त्या भाषिकांचा संमतीने व बहुमताने सहभाव हवा. हे आपोआप होताना काही वर्षांचा काळ जातो. अचानक तुघलकी निर्णयाने एका दिवसात होत नाही. सरकारने अचानक कोणताही अभ्यास न करता लादू नये.
२. इतकी वर्षे केवळ सवय झाल्याने आपल्याला ते योग्य वाटते. पण मुलांच्या दृष्टीने काही अंक लिहायला बोलायला समजायला आणि म्हणून शिकायला खरेच अवघड आहेत.
>>
या आधी १९४७ बद्द्ला प्रश्न विचारला होता त्याचे उत्तर द्या. मा. खा. अजित पवार यांनी जो फोन नंबर सांगीतला त्याचे उत्तर द्या. वरच्या प्रतिसादात भरत यांनी जी संख्या सांगीतली त्याचे उत्तर द्या.
फक्त काळाच्या ओघात अपभ्रंशीत झाली असावी म्हणून अवघड झाली आहे. उदाहरणार्थ...
>>
तसे होताना कोणाला काहीही अडचन आली नाही, काहीही कठीण वाटले नाही, त्या भाषेच्या जोरावर बरीच चांगली कामे इतिहासात केलेली आहेत. आताच काय अडचण आली याचे तुम्ही सर्वेक्षण, पुरावे वगैरे दिलेले नाहीत. ते द्या व मग बोला.
३. अंकांच्या बाबत मला स्वत:ला अजून एक अवघड वाटणारी गोष्ट म्हणजे हजार, लाख, कोटीचे विभागीकरण.
>>
अमेरिकेचे सगळेच बरोबर नसते. त्यांची तीन तीन संख्याचा गट करण्याची पद्धत मलातरी चुकीचे वाटते. आपली पद्धत जास्त सोपी आहे. या मुद्द्यावरही डेटा, सर्वेक्षण, गणितज्ञ यांचे मत लागेल. तुम्ही तुमचे वयक्तीक मत दिले. संशोधन व अभ्यास कुठे आहे?
तरी केवळ परंपरा आहे म्हणून त्यांना कष्ट द्यायचे व ते शिकवायचा अट्टाहास करणे अयोग्य वाटते.
>>
सर्वेक्षण, पुरावे, डेटाअ द्या की या जुन्या पद्धतीमुळे मुलांना समजत नाही. गणितज्ञ व भाषातज्ञ यांचे सहमतीचे मत द्या . मग बदलू.
धोतर सोडून पॅंट घालायला सुरवात केली कारण ती घालणे अधिक सोयीचे. सुटसुटीत आहे पट्कन घालता येते म्हणून. जे साधे सोपे अधिक सोयीचे आहे ते स्वीकारले जाते.
>>
धोतर सोडुन पॅंट सक्तीच्या या एकाच दिवसात घेतलेल्या तुघलकी निर्णयाची शासकीय अधिकृत प्रत सादर करावी.
ही वयक्तिक निवड आहे . समाजाने स्वतःहून स्विकारलेली. तीही अनेक वर्षांच्या अंतराने टप्प्याटप्प्याने. एका दिवसात लादलेली नाही. इथे समाजाने स्वतः ठरवले काय सोपे काय अवघड. लादलेले नाही. उद्या भारतीय हवामानात धोतरच कसे चांगले हे शास्त्रीयदृष्ट्या समजले की परत धोतराकडे वळतील. दक्षीणेत अजुनही त्याचे पारंपारीत कपडे घालतात. अगदी संसदेतही.
पन्नास सहा हजार पन्नास सहा
पन्नास सहा हजार पन्नास सहा
Submitted by अश्विनी के on 21 June, 2019 - 12:16
>>
अच्छा म्हणजे ५०६०००५०६ का? की ५०६५०६ ?
५०६ म्हणजे नेहमीचं पाचशे सहा
५०६ म्हणजे नेहमीचं पाचशे सहा होईल ना?
६५० -> सहाशे पन्नास
६५० -> सहाशे पन्नास
६५६ -> सहाशे सहापन्नास
सहाशे छप्पन आहे सध्या. फक्त सहापन्नास ऐवजी अपभ्रंशीत छप्पन म्हटले जाते. सवय नसल्याने सहाशे सहापन्नास ऐकायला विचित्र वाटते.
(इंग्लिशमध्ये सुद्धा सिक्स हंड्रेड फिफ्टी सिक्स असेच म्हणतात. तेच ५६ साठी सिकफिक वगैरे म्हणत असते तर मात्र सहाशे छप्पन प्रमाणे सिक्स हंड्रेड सिकफिक असे काहीसे झाले असते).
५६,०५६: सहापन्नास हजार सहापन्नास
छप्पन म्हणायचंच नाहिये ना!
नवीन प्रमाणे सहापन्नास नाही, पन्नास सहा
फक्त सहापन्नास ऐवजी अपभ्रंशीत
फक्त सहापन्नास ऐवजी अपभ्रंशीत छप्पन म्हटले जाते.
>>
सद्ध्याची मराठी भाषा ही "सद्ध्याची" अधिकृत मुख्य भाषा आहे. जुन्या पुर्वजाच्या तुलनेती ती कदाचीत अपभ्रंशीत असेलही. पण सद्ध्याची प्रचलीत ही अधिकृत असल्याने तिला अपभ्रंशीत म्हणने योग्य नाही.
सवय नसल्याने सहाशे सहापन्नास ऐकायला विचित्र वाटते.
>>
आम्ही सहापन्नासची सवय करण्यापेक्षा नव्या बालभारतीने नीट मन लावून "छप्पन्न" शिकवले तर ते जास्त योग्य राहील. नै का?
(इंग्लिशमध्ये सुद्धा सिक्स हंड्रेड फिफ्टी सिक्स असेच म्हणतात.
>>
मग आपण मराठी टाकुन इंग्लिशच का नै वापरुया? गरज काय मराठीचा टप्पा घेण्याची?
आणि तसेही एकदा इंग्लिश घेतली (भाषा) की मग आपली बालभारती त्यातील अनेक कैच्याकै स्पेलिंग्जही सुधारेलच
इंग्लीश मधल्या सर्व कैच्याकै
इंग्लीश मधल्या सर्व कैच्याकै स्पेलिंग्ज ची यादी करुन ती इंग्लीश माध्यमातल्या दुसरीतल्या मुलांना विचारायला हवी. ज्या स्पेलिंग्ज ते चुकीची सांगतील ती सर्व लगेच सुधारीत करुन नव्या बालभारतीने इंग्लिश माध्यमातही हा बदल त्वरीत एका दिवसाच्या निर्णयाने आणावा.
पन्नास म्हणजे ५० केव्हा आणि
पन्नास म्हणजे ५० केव्हा आणि ५x केव्हा, हे मुलांना कसं सांगाल?
सहापन्नास हजार सहा पन्नास ५६
सहापन्नास हजार सहा पन्नास ५६,०५६ यात आधी उजवीकडून डावीकडे, मग उजवीकडे, मग पुन्हा उजवीकडून डावीकडे अशी वळणं आहेत. हे सोपं आहे म्हणताय?
"या निर्णयाने मराठी सोपी होईल
"या निर्णयाने मराठी सोपी होईल" असे मत असणा-यांनी एकदा जर्मन भाषेकडे बघावे. जर त्यांच्या सारख्या प्रगत देशाल असे करण्याची गरज पडली नाही तर आम्हाला का पडावी? आम्ही समर्थ आहोत अशी जोडाक्षर व क्लिष्ट शब्द उच्चारायला.
ईंग्लिशमधेही असेच असते म्हणुन तुम्हाला मराठीतही तसेच हवे, तर
जर्मनमधेही असेच असते म्हणुन आम्हालाही जुनेच हवे!
>> सहापन्नास हजार सहा पन्नास
>> सहापन्नास हजार सहा पन्नास ५६,०५६ यात आधी उजवीकडून डावीकडे, मग उजवीकडे, मग पुन्हा उजवीकडून डावीकडे अशी वळणं आहेत. हे सोपं आहे म्हणताय?
इंग्लिश आणि इतर ज्या ज्या भाषांत नियमाचे सातत्य पाळले गेलेय तिथे तसेच म्हटले जाते.
६९ ला एकुणसत्तर म्हणायचे असेल तर त्याच नियमानुसार ६८ ला बेऊनसत्तर असे का म्हटले गेले नाही?
किंवा ६८ ला अडूसष्ठ म्हणायचे तर ६९ ला नऊसष्ठ का म्हटले गेले नाही?
म्हणण्याच्या नियमात सातत्य नसल्याने मुलांचा गोंधळ होतो इतकाच माझा मुद्दा आहे.
६९ ला एकुणसत्तर म्हणायचे असेल
६९ ला एकुणसत्तर म्हणायचे असेल तर त्याच नियमानुसार ६८ ला बेऊनसत्तर असे का म्हटले गेले नाही?
किंवा ६८ ला अडूसष्ठ म्हणायचे तर ६९ ला नऊसष्ठ का म्हटले गेले नाही?
म्हणण्याच्या नियमात सातत्य नसल्याने मुलांचा गोंधळ होतो इतकाच माझा मुद्दा आहे.
Submitted by atuldpatil on 21 June, 2019 - 12:52
>>
कारण ती भाषा आहे. भाषा अशीच विकसीत होत असते. सर्व लोकांना वापरायला सोपे जावे म्हणुन खास इंजिनिअर / युएक्स डिझायनर लोकांनी मुद्दमहुन बनवलेले उत्पादन नाही.
आज हे संखेच्ये जोडाक्षर काढली तरी उद्या इतर अनेक बाबतीत मराठी जोडाक्षर आहेत ती पण काढणार का? असे कुठपर्यंत करणार? कोणाच्या संमतीने?
६९ ला एकुणसत्तर म्हणायचे असेल
६९ ला एकुणसत्तर म्हणायचे असेल तर त्याच नियमानुसार ६८ ला बेऊनसत्तर असे का म्हटले गेले नाही?
किंवा ६८ ला अडूसष्ठ म्हणायचे तर ६९ ला नऊसष्ठ का म्हटले गेले नाही?
Submitted by atuldpatil on 21 June, 2019 - 12:52
>>
अ ला अ चा का म्हणायचे? ईंग्लीश मधे तर ए फॉर अॅपल म्हणतात.
क ला क च का म्हणायचे...
Fifty-six thousand fifty six.
Fifty-six thousand fifty six. डावीकडून उजवीकडे. कुठेही वळण नाही.
मराठीतल्या प्रचलित पद्धतीत आणि तुम्ही म्हणताय, त्यात काही फरक नाही. उलट तुम्ही जोडशब्द वापरताय , जो जोडशब्द आहे हे कळायचा मार्ग नाही.
माझ्यामते संख्यानामे शिकायला पर्याय नाही. कठीण होत असेल, तर जास्त वेळ द्यावा.
>> Fifty-six thousand fifty
>> Fifty-six thousand fifty six. डावीकडून उजवीकडे. कुठेही वळण नाही.
कारण ५६ साठी पन्नास-सहा सारखा शब्द त्यांच्याकडे आधीपासूनच आहे म्हणून. सध्या पन्नास-सहा असेच सुचवले आहे. त्यानुसार वळणे येणार नाहीत: पन्नास-सहा हजार पन्नास-सहा
पण मराठीमध्ये आधी एकम स्थानिक अंकाचा उच्चार करण्याची परंपरा आहे (जसे मी प्रतिसादात लिहिले आहे: ५६: सहा पन्नास: याचे सहापन्न -> छप्पन्न झाले.. वगैरे) म्हणून मी म्हणालो होतो कि पन्नास-सहा ऐवजी सहा-पन्नास असेच राहू द्यावे (छप्पन म्हणण्या मागचा नियम तोच आहे).
हे पाहता:
५६०५६ छप्पन हजार छप्पन... यात सुद्धा वळणे आहेतच. फक्त छप्पन ऐवजी सहा-पन्नास लिहिले तर ती ठळक होतात इतकेच.
छप्पन ५६ हे डोक्यात फिट बसले
छप्पन ५६ हे डोक्यात फिट बसले की वळणे गायब होतात.
बरेच जणांचे बरेच मुद्दे पटले
बरेच जणांचे बरेच मुद्दे पटले.
चिनुक्स, अमितव, अजूनही गावांत "वीस अन सात झालं" असं सांगितल्यावर २७ ( सत्त्तावीस) रुपये आपण काढून देतोच ना? आपण सत्तावीस म्हणायचं आणि समोरच्यानं वीस अन सात म्हणायचं किंवा तीसाला तीन कमी म्हणयचं स्वातंत्र्य होतं आणि आहेच. पाठ्यपुस्तकात आलं काय नाही आलं काय?
भाषा तज्ञाना विचारून हा निर्णय घ्ययला हवा होता अगदी पट्लं. पण दुर्दैवाने तज्ञाना विचारतोय कोण? शेवटी आपल्याला पटंतं तेच मराठी प्रत्येक जण बोलतोय.. पुस्तकात आनि पानि नाही, प्रत्यक्शात आहे, व्यवहारात आहे, साहित्यात आहे. काय फरक पडलाय?
गणिताच्या बाबतीत भाषेचं सौंदर्य वगरे बघणं गौण आहे. पण संख्यावाचन बरोबर शिकवणं हे महत्वाचेच आहे हे ही पटलेय. एका मुलाखतीत मन्गला ताई म्हणाल्या की मोठ्या सन्ख्या वाचताना उदा - तीस हजार दोनशे पंचवीस किंवा तीस हजार दोनशे वीस पाच असे म्हणा ते मला नीटसे पटले नाही.. पण पटले नाही म्हणून लोकं म्हणायची थोडीच थांबलीत? व्यवहार असेही चालुच रहाणारेत!
चिनुक्स, नारळीकर आणि त्यांच्या पत्नीबद्दल तू जे आरोप करतो आहेस ते मात्र मला बरोबर वाटले नाही. तुझ्या समिती नेमून सत्य समोर आणण्याचा मताशी मी सहमत आहे.
आनंद आहे...
आनंद आहे...
जोडाक्षरे सर्व भाषेत आहेत,
जोडाक्षरे सर्व भाषेत आहेत,
मराठीत मास्क हे जोडाक्षर आहे,
इंग्रजीतही mask मध्ये s आणि k व्यंजने एकत्र आहेत , त्यांचा उच्चार एकत्रच होतो, लिहायची पद्धत भिन्न आहे
हा सगळा प्रकार वाचून मला
हा सगळा प्रकार वाचून मला जॉर्ज ऑरवेलच्या 1984 मधली न्यूस्पीक भाषा आठवली
<<
बरोबर.
८) मराठीतून आकडे सोपे करुन लिहिल्याबद्दल सोशल मिडीयावर 'बालभारती'ची अक्क्ल काढणाऱ्यांपैकी खरोखर किती जणांची मुलं मराठी मिडीयमच्या शाळेत शिकतात ?
<<
मुद्दा नीट समजून घ्या मित्रहो.
आमची उद्दिष्टे काय आहेत?
एक देश, एक भाषा, एक वेष, एक विचार, एक नेता, एकाला च अक्कल बाकी सग्ळे बिण्डोक.
आता तुमच्यात ऐपत नसेल, स्टेट बोर्डाच्याच षाळेत मुलाला शिकवण्याइतपत कमाई असेल, तर मग अम्ही जी काञ तुमच्या विविधतेने नटलेल्या परंपरांची माय मावशी भेट घडवतो आहोत, ती गुपचूप सहन करा, आम्हाला बहुमत आहे.
आमची मुलं सीबीएसी अन आयसीएसी मधे शिकतात, युजी-पीजीला शक्यतो युरोप अमेरिकेत जातात, युक्नो, भारी एज्युकेशन अस्तं तिकडे.
हे बदल फक्त बाल भारतीत आहेत. कसाले पिट्पिट करून र्हाय्लए बा? घाल की पोर्याईले सीबीएसीत? आसं बी हिनदी हिनदू हिनदऊसतान करायन्चा हे का नई?
तेव्हा एन्जॉय द सोडोमी
तुम्ही त्याला मतदान करून बोलावून घेतलेत, अन नंतरच्या निवडणूकीत इव्हीएम वापरू दिलेत.
आता तुमच्या असल्या वांझ चर्चांनी काही शष्प होणार नाहिये. (या शष्प्ला जोडाकशर विरहित छान शब्द उपलब्ध आहेच)
तेव्हा भजे करा, मजे करा!
-पकोडेवाले.
माझ्या एका लाडक्या पन्नास सहा
माझ्या एका लाडक्या पन्नास सहा प्रेमी चुलत बहिणीशी झालेल्या चर्चेत तिने मला झापले, की तू यात राजकारण आणू नकोस. हा शैक्षणिक निर्णय आहे.
म्हट्लं वा!
हा निर्णय कुणी घेतला? कुण्या शिक्षणतज्ञांच्या अत्युच्च्य समितीने? की सर्वमताने सर्व शिक्षक विद्यार्थीगणाने?
शेवटी चर्चा हे असंच करीत राहिलो तर मला आमच्या कुटुंबातूनच नव्हे तर ज्ञातीसमूहातून वाळीत टाकण्यात येईल इथवर येऊन थांबली.
तर हां.
हे वाळीत घालणे नामक प्रकार लवकरच पुन्हा एकदा सुरू होईल; हे विश्वाने, भविष्यकाळाने अन चिनुक्स यांनी लक्षात घ्यावे.
आता हा देश
उत्तुंग शिखरांचा प्रदेश म्हणून मिरवणार नाही.
टेकड्यांचा प्रदेश म्हणूनच याची नोंद होईल
जागतिक नकाशावर
भविष्याच्या.
Pages