महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्याने मराठी क्रमांक शिकवताना ते दहा दोन(१२) , दहा आठ(१८), तीस दोन(३२) असे शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यार्थ्यांना क्रमांकातील जोडाक्षरे जमत नाहीत म्हणुन हे सोपे केले आहे असे त्यांचे म्हणने आहे.
हा निर्णय घेताना भाषातज्ञांना, पालकांना व शिक्षकांना विश्वासात घेतले होते का? त्यांचे मत विचारले होते का?
काही सर्वेक्षण केले होते का? त्याचा सँपल साईझ किती?
या प्रयोगाचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर काय परिणाम होणार त्याची जबाबदारी कुणाची?
मोडी लिपीला कालबाह्य करण्यापासून सुरु झालेला हा प्रवास, मराठी भाषाच नको इथे जाऊन संपायला किती अवधी लागेल?
मराठी शाळांची अवस्था आधीच दयनीय आहे. नवीन शाळेला परवानगी नाही. त्यात हे दिवे लावले जात आहेत.
हे असे निर्णय घेणारे कोण असतात? त्यांच्या वर बसलेले त्यांना जाब विचारत नाहीत का?
https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-balbharti-made-changes-in-ma...
https://abpmajha.abplive.in/mumbai/balbharati-changes-numeracy-for-secon...
फारच चंपट वाटेल असे आकडे
फारच चंपट वाटेल असे आकडे शिकायला
त्यापेक्षा इंग्लिश मधलेच शिकवा
Kahihi.... As ks vatel ...
Kahihi.... As ks vatel ... Murkhpna ahe
मराठी भाषा आपण घरी शिकतो
मराठी भाषा आपण घरी शिकतो त्यामुळे ती शाळेत शिकवली नाही गेली तरी जास्त काय फरक नाही पडणार. एसटी वरील पाटी वाचण्याइतप मराठी आली तरी पुष्कळ आहे. मराठीच्या बदल्यात इंग्लिश स्पिकिंग कोर्स सुरू केले तर त्याचा जास्त फायदा होईल असे मला वाटते. नाहीतरी इंग्रजी भाषेला वाघिणीचे दूध बोलून गौरवण्यात आलंय.
नाहीतरी सगळे आपापल्या पोरांना
नाहीतरी सगळे आपापल्या पोरांना इंग्रजी मिडीयम मधेच घालतात आजकाल.
बिनडोकपणा आहे खरंच.
बिनडोकपणा आहे खरंच.
सगळीच जोड अक्षरे (माफ करा
सगळीच जोड अक्षरे (माफ करा अकसरे) बंद करून टाका
पाहिजेच कशाला तो वयाप
अकलेचे अठरा विश्व दारिद्र्य
अकलेचे अठरा विश्व दारिद्र्य

आगा गा! मला आत्ता शिर्षक कळाले.
थँक्यू आशुचँप
आगा गा! मला आत्ता शिर्षक
आगा गा! मला आत्ता शिर्षक कळाले.
Submitted by शाली on 18 June, 2019 - 20:01
>>
म्हणजे तुम्ही जुन्या बालभारतीतले दिसता. आता सवय करुन घ्या अशा लिखाणाची. आता नव्या बालभारतीचा जमाना येणार.
ट्विटरवर फारच गंमत चालू आहे.
नव्या युगाच्या बालभारतीचे नवे नाते खालीलप्रमाणे:
बाबा - आई पती
मावशी - वडील मेव्हणी
आजोबा - बाप बाप
आजी - बाप बाप बायको
दाजी - बहीण पती
मेहुणा - बायको भाऊ
साभार ट्विटर.
>>हे असे निर्णय घेणारे कोण
>>हे असे निर्णय घेणारे कोण असतात? ते कुठे व कितपत शिकलेले असतात? त्यांच्या वर बसलेले त्यांना जाब विचारत नाहीत का?
अगदी खरय!
त्यांनी नाही विचारला तरी आपण विचारला पाहिजे
फडणविसनी आधी स्वतःचे आडनाव
फडणविसनी आधी स्वतःचे आडनाव 'फडण दोन शून्य'असे करावे.
फडण दोन शून्य च का? फडण दहा
फडण दोन शून्य च का? फडण दहा दहा का नको? याचाही "अभ्यास" नव्या बालभारतीने केलाच असेल.
अक्कल पाहिजेच असं नाही, ती
अक्कल पाहिजेच असं नाही, ती विकत मिळते ती घेता येते.
------
मुले कॉलेजमध्ये विज्ञान ,गणित इतर विषय पूर्ण इंग्रजीत शिकणारच आहेत, तर हे मराठीचं इंग्रजीकरण करण्याची काय गरज?
भारतातील इतर भाषांचं काय? कानडीत तर जोडाक्षरे भयंकर.
हिंदी अंक - उन्यासी ,पंचानबे, ब्यानबे वगैरे पाहा. पण गरीब निरक्षर जनता काय बोलते? अस्सी को एक कम, सो को पाच कम, नब्बे और दो।
बाकी काय बोलणार?
गरीब निरक्षर जनता काय बोलते?
गरीब निरक्षर जनता काय बोलते?
>>
मग बालभारतीची गरज काय? शाळा शिकण्याचीच गरज काय मग?
मग नुसते निरक्षरासारखे बोलायचेच कशाला, वागुयाही तसेच ना?
सोळावे वरीस धोक्याचे, बारा
सोळावे वरीस धोक्याचे, बारा गावचं पाणी, सतराशे साठ भानगडी, छत्तीस गुण, तुझ्यासारखे छप्पन्न मिळतील,एकवीस तोफा, चौदावे रत्न- या सगळ्यांचं काय ?
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्याने मराठी क्रमांक शिकवताना ते दहा दोन(१२) , दहा आठ(१८), तीस दोन(३२) असे शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.
<<
हा निर्णय बालभारतीने प्रायोगिक तत्वावर घेतला आहे. सध्या इयत्ता दुसरीचा अभ्यासक्रम बदललेला असल्याने फक्त त्याच इयत्त्तेच्या मुलांना या टाईपने जोडक्षरे शिकवणार आहेत असे कालच वाचले.
अरे जाने दो - शुद्ध मराठी
अरे जाने दो - शुद्ध मराठी शिकून कोणाचं भलं होतंय। माझा पूर्ण सपोर्ट हिंग्लिश आणि हिंदीमिश्रित मराठी ला आहे।
मराठीचा अट्टाहास हा मूर्खपणा आहे - हा धागा वाचा।
https://www.maayboli.com/node/66523
मूरखपणाची हदद आहे. जोडअकशअर
मूरखपणाची हदद आहे. जोडअकशअर पहिलीत जमत नसतील, तया नअनतर आली नाहीत तर शाळेत शिकशक गोटया खेळतात का?
बरे, मग ते पाढे नव्याने रचणार
बरे, मग ते पाढे नव्याने रचणार का?
तिना पाची दहा पाच
तीन सक दहा आठ
असे होणार का?
कुण्या जर्मनाने दहा पर्यंत
कुण्या जर्मनाने दहा पर्यंत मराठी आकडे शिकून पुढचे आकडे जर्मन पद्धतीने म्हटल्या सारखे वाटते आहे ते.
शैक्षणिक अभ्यासक्रमात
शैक्षणिक अभ्यासक्रमात केलेल्या बदलाचा इफेकटिव्हनेस मोजणे हा फार मोठ्या कालावधीचा प्रोजेक्ट आहे,
त्यामुळे दुसरीत असे आकडे शिकवून मुलांना गणितात गती येते काय हे कळायला किमान 8 वर्षे जावी लागतील ( नववी पर्यंत शाळा तशीही ढकलतेच मुलांना पुढे)
आणि ही गणितातील गती वाढताना नॉर्मल जगात त्यांची काय गोची होईल तेही पाहायला हवे.
हे टीपीकल बोकील स्टाईल सोल्युशन वाटते
एखाद्या गोष्टीवर आकर्षक उपाय शोधायचा , पण ती एक गोष्ट सॉर्ट आउट करताना पूर्ण सिस्टम वर काय प्रभाव पडेल हा कडे दुर्लक्ष करायचे.
दशावतार, बारा गावचं पाणी,
दशावतार, बारा गावचं पाणी, दुष्काळात तेरावा महिना, चौदावे रत्न, सोळा सोमवार, सतराशे विघ्न , सत्तावीस नक्षत्र, छत्तीस गुण, छप्पन भोग, साठी बुद्धी नाठी- हे सगळं पण डिलीट करणार का?
फडणवीसांनी एका फटक्यात भाजप समर्थकांनाच विरोधक बनवलंय!
यात आकडे केवळ गणितासाठी हा
यात आकडे केवळ गणितासाठी हा कन्सेप्टच चुकीचा आहे,
आकडे भाषेचा अविभाज्य भाग आहे,
आणि ही पद्धत इतर जनतेच्या अंगवळणी पडेपर्यंत (करण त्यांना कोणी शिकवणार नाहीये नवी पद्धत) बाकी जनतेनी या नव्या लॉट ला कसे ऍडजस्ट व्हावे?
परत हे शिक्षण SSC ला होणार
CBSC मध्ये मराठी शिकणारे मुल कोणत्या फॉरमॅट मध्ये शिकणार?
म्हणजे 9 वर्षाची 2 मुले एकच आकडा 2 प्रकारे वाचणार.
आनंद आहे !!
मिस्सिंग भरत,
त्यांचे मुलांच्या गणित शिकण्याशी संबंधित अनुभव वाचायला आवडतील
हा प्रस्ताव ज्या थोर
हा प्रस्ताव ज्या थोर दांपत्याच्या आग्रहाला बळी पडून मंजुरीपर्यंत पोहोचला आहे, ते दांपत्य हल्ली हिंदुराष्ट्राची स्वप्नं बघतं.
या प्रस्तावाला पूर्वी अनेकांनी विरोध केला आहे. ज्ञानरचनावादासंबंधी चर्चा होत असतानाही असंख्य शिक्षकांनी विरोधच केला होता. हा सगळा विरोध, त्या सगळ्या चर्चा यांच्याकडे दुर्लक्ष करून या दांपत्याच्या मोठ्या आडनावाला भुलून आणि सध्याच्या सरकारी विचारसरणीला असलेला पाठिंबा लक्षात घेऊन हा अतिशय बुद्धिमान निर्णय घेण्यात आला आहे.
फ्रेंचांची आकदे मोजण्याची पद्धतही प्रस्तावित पद्धतीप्रमाणेच आहे. सदर दांपत्य त्या देशात वास्तव्यास होते, त्याचा काही परिणाम या प्रस्तावावर झाला आहे का, हे बघणं रोचक ठरेल.
हा बावळटपणा आपल्याला थांबवता
हा बावळटपणा आपल्याला थांबवता येईल का?
प्रतिसाद देणार्यापैकी कोण
प्रतिसाद देणार्यापैकी कोण कोणाची मुले मराठी माध्यमात आहेत, पाय वर करा बरे.
विरोधी पक्ष असून नसल्यासारखे
विरोधी पक्ष असून नसल्यासारखे आहेत. ते हा मुद्दा उचलताना दिसत नाहीत. विरोधी पक्षनेतेच मंत्री झाले आहेत.
भाजप समर्थकांकडूनच सोशल मीडियावर आदळाआपट सुरू आहे. पण तिचा काही परिणाम होईल का माहीत नाही. जोरदार outrage चालू आहे इतकं दिसतंय.
मुलं मराठी माध्यमात नसली तरी
मुलं मराठी माध्यमात नसली तरी मराठी सेकंड थर्ड लँग्वेज म्हणून घेणारी असतीलच की.
सदर दांपत्य फ्रांस मध्ये
हिंदीत पण केलं आहे का बीस एक,
हिंदीत पण केलं आहे का बीस एक, नब्बे चार वगैरे?
तुमचे सात दहा रुपये वारले !
तुमचे सात दहा रुपये वारले !
- इति धनंजय माने
Pages