संस्कृत आणि तमिळसंबंधी काही प्रश्न!

Submitted by केअशु on 10 June, 2019 - 09:59

१. भारतात संस्कृत ही भाषा साधारण कधी आली?या विषयाची बहुतांश 'मान्यताप्राप्त इतिहास संशोधन संस्थांनी' मान्य केलेली थेअरी कोणती?

२. संस्कृत भारतात येण्याआधी संपूर्ण भारतात द्रविड कुळातल्या भाषाच बोलल्या जात होत्या का?की अजून कोणते कुळ होते?कोणत्या प्रदेशात?

३. संस्कृत ही नियमबद्ध,ठरवून घडवल्यासारखी भाषा आहे.संस्कृत ही सुरुवातीला सर्वांसाठी नव्हती.मग जर ती केवळ विद्वानांसाठी असेल; म्हणजेच छोट्या जनसमुहाची ज्ञानवर्धनाची चर्चा करण्याची भाषा असेल तर त्याच संस्कृतचा भारताच्या जवळपास सर्व भाषांवर इतका प्रभाव का बरं पडावा?बहुजनांचा,कष्टकर्‍यांचा संस्कृतशी कितीसा संबंध हा त्या काळी येत असावा?

४. की कोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी म्हटल्याप्रमाणे संस्कृत ही इथल्याच देशी भाषांवर 'संस्कार करून बनवली गेली' म्हणून तिला संस्कृत असे नाव दिले गेले हे खरे आहे?

५. भारतातल्या बर्‍याच भाषांवर संस्कृतचा चांगला प्रभाव आहे.पण सर्वात कमी प्रभाव आहे तो तमिळ भाषेवर. इतका की जर तमिळ लोकांनी 'ठरवलं तर' ते एक ही संस्कृत शब्द न वापरता केवळ १००% तमिळ शब्द वापरुन संवाद साधू शकतात.सध्याचा तमिळ भाषिक प्रदेश बघितला तर तो साधारण बाकीच्या राज्यांइतपतच आहे. मग हा एवढाच प्रदेश संस्कृतला प्रखर विरोध कसा काय करू शकला? त्या काळी आणि अजूनही तामिळनाडूने संस्कृतचा प्रभाव कसा काय रोखला असावा? शेजारचे कन्नड,तेलुगू ,मल्याळम या भाषा बोलले जाणारे प्रदेश संस्कृतच्या आक्रमणाला जितके शरण गेले तितके तमिळभाषिक शरण गेले नाहीत.ही केवळ आधुनिक काळची म्हणजे द्रविड पक्ष आल्यानंतरची गोष्ट नाहीये तर शेकडो वर्षांपासून तमिळ भाषिक विशेषत: ब्राह्मणेतर हे संस्कृतला विरोध करत आलेले आहेत.आता आधुनिक काळात जरी तमिळ भाषेतल्या आधीपासून असलेल्या संस्कृत शब्दांना पूर्वीइतका विरोध होत नसला तरी अजून नव्याने येणार्‍या संस्कृत शब्दांना टाळण्याचे प्रयत्न मात्र आवर्जून होतायत.हा इतका कट्टरपणा कशामुळे येत असेल?शेजारच्या अन्य दक्षिणी राज्यांनी मात्र संस्कृतपुढे नांगी टाकण्याचे कारण काय?

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

शक्तिराम
_/\_

त्याबद्दलच संभ्रम आहे.केतकरांचा मुद्दा पहा. Happy

मला तरी तसे वाटत नाही. मराठीचेच घ्यायचं तर शब्दांचे/ क्रियापदांचे मुळ धातू संस्कृत मधूनच आलेले दिसतात. कठिणातून सोप्याकडे असा प्रत्येक गोष्टीचा प्रवास सुरू असतो. उगमाशी कठीण वाटत नाही कारण ते बाळबोध रुप असतं. पुढे पुढे सुलभीकरण होत जाते.‌ संस्कृत ज्ञानभाषा असल्यानं अनेक व्याकरणतज्ञ, पारंगत ऋषिमुनींनी तिचे नियम/ व्याकरण मेहनत घेऊन बिनचूक बनवले असावेत.‌
लेखन वाचन याच्याशी संबंध नसणारी जनसंख्या फार मोठी होती, त्यांच्या बोलीभाषा या पुढे आल्या. दळणवळण / देवाणघेवाण कमी असल्याने व ठराविक प्रदेशातच स्थिर झाल्याने प्रांतवार, जाती जमातींच्या स्वत:च्या भाषा विकसित झाल्या असाव्यात.
तमिळ वेगळी का आहे हे जाणून घ्यायला आवडेल.

इतर भाषांवर संस्कार करून संस्कृत बनवली आणि मग पुढे संस्कृतचा इतर भाषांवर प्रभाव पडला, असेही होऊ शकते की.

चांगला विषय केअशु. यावर जाणकारांची मते वाचायला आवडेल.

केअशु हे प्रश्न एखाद्या विद्वान संस्कृत प्रकांडपंडितांना विचारावयास हवेत. संस्कृतापासून प्राकृत जन्मली हे खरे असावे असे मला वाटते.

वाचलं पण पटलं नाही. अडगुलं मडगुलं हे महाराष्ट्रात स्थाईक झालेल्या तमिळी किंवा तिकडे स्थाईक झालेल्या मराठी यांपैकी कोणीतरी भाषांतर केलेले असू शकते. मराठी, हिंदी, गुजराथी या बऱ्याच समान व लिपी सारखी असलेल्या भाषा आहेत. म्हणून महाराष्ट्र हा उत्तरेशी जास्त संबंधित वाटतो. तामिळनाडू व महाराष्ट्र यामध्ये कर्नाटक आहे.

प्रश्न चांगले आहेत. कोणा भाषातज्ञांकडून उत्तर मिळालेतर बरे.
> शेजारच्या अन्य दक्षिणी राज्यांनी मात्र संस्कृतपुढे नांगी टाकण्याचे कारण काय? > नांगी टाकलीय म्हणजे नक्की काय केलंय?

मला संस्कृत ही जावा, पर्ल वगैरेसारखी कोडींग भाषा वाटते. ती येणार्यांना, वापरणार्यांना तिचं फार्फार महत्व वाटत, पण बाकी सर्वसामान्यांना, रोजच्या व्यवहारात तिची गरज पडत नाही, तिच्यावाचून काही अडत नाही. बाकी "संस्कृत ही विद्वानांची भाषा, ज्ञानवर्धनाची चर्चा करण्यासाठीची भाषा, संस्कृतचा भारताच्या जवळपास सर्व भाषांवर बराच प्रभाव आहे इ इ" सर्व केवळ प्रपोगंडा असावा.....

संस्कृत भाषेवर श्रीमती सुषमा स्वराज्य यांचे एक अप्रतिम भाषण युट्युबवर आहे, जिज्ञासूनी ते भाषण अवश्य पाहावे/ऐकावे असे सुचवेन.

शक्तिराम

<अडगुलं मडगुलं हे महाराष्ट्रात स्थाईक झालेल्या तमिळी किंवा तिकडे स्थाईक झालेल्या मराठी यांपैकी कोणीतरी भाषांतर केलेले असू शकते. >

समजलं नाही. अडगुलं मडगुलं या शब्दाबद्दल म्हणताय की पुस्तकाबद्दल? शब्दाबद्दल म्हणत असाल तर महाराष्ट्रात त्याकाळी किती तमिळ लोक असतील.उलट पाहता म्हणजे शिवाजी महाराजांसोबत तामिळनाडूत गेलेल्या लोलांकडून हा शब्द आला म्हणावं तर केवळ हा एकच शब्द नव्हे तर मराठीत चिक्कार तमिळ शब्द आहेत. खैरेंची पुस्तके वाचून पहा.

<मराठी, हिंदी, गुजराथी या बऱ्याच समान व लिपी सारखी असलेल्या भाषा आहेत. म्हणून महाराष्ट्र हा उत्तरेशी जास्त संबंधित वाटतो.>

लिपी समान हा धागा पकडला तर तुमच्या माहितीसाठी उर्दू वगळता सर्व भारतीय भाषांची आई ही 'ब्राह्मी लिपी' आहे.अगदी महाराष्ट्रापासून दूर असलेल्या तमिळ लिपीची सुद्धा!
चारही द.भारतीय लिप्यांमधे तमिळ लिपी ही सर्वात सोपी आहे.

<तामिळनाडू व महाराष्ट्र यामध्ये कर्नाटक आहे.>

मराठीने केला कानडी भ्रतार! मराठीत संस्कृतनंतर सर्वाधिक शब्द हे कन्नड आहेत.तमिळचा भोवतालच्या भाषांवर कमालीचा प्रभाव आहे.त्यामुळे थेट नसला तरी तमिळचा मराठीशी अप्रतक्षपणे संबंध आहेच!

आपली तर देवनागरी आहे ना. त्यांची कशी वेटोळी जिलेबी सारखी. माझा ब्राह्मी लिपीविषयी अभ्यास नाही.‌ मी कन्नड शिकायचा प्रयत्न केला होता पण शक्य झाले नाही. रामायण महाभारत काळात संस्कृतच बोलली जात होती का?

अॅमी

नांगीच टाकलीय.कारण सक्षम अशी द्रविड भाषा असूनही संस्कृत शब्द स्विकारलेच की द.भारतीयांनी.
जवळपास शून्य टक्के इंग्रज असणार्‍या महाराष्ट्रात केंद्राच्या एखाद्या कायद्याची मराठी प्रत मिळते का? उदा. आयकर, gst, insolvency code......

हा तसाच प्रकार आहे.

लिंक बद्दल धन्यवाद. बौद्धांनी पाली भाषेचा अंगिकार केला होता. अर्धमागधी ही भाषा सुध्दा महत्वाची होती.
संस्कृत मध्ये समास व संधी जास्त असल्याने जोडाक्षरांसारखे शब्द बनतात ते बोजड व उच्चार करायला अवघड वाटतात. एकवचन, द्विवचन, अनेकवचन आणखीच बुचकळ्यात टाकतात. कमी शब्दांत जास्त आशय सांगितला जातो. इतरांना तिचं अध्ययन करण्याची बंदी केली गेल्यामुळे कदाचित प्राकृत भाषांमध्ये दर्जेदार साहित्यनिर्मिती होऊ लागली व संस्कृत मागे पडली. असं मला वाटतं.
संस्कृत शिकणे फार कठीण आहे असाही समज पसरवला गेला असेल कदाचित किंवा शिकवणारांची कमी असेल.

मला वाटतं व्यवहारात सोपे पडतील ते शब्द आणि भाषेचा काही भाग आपोआप स्विकारला जातो. पेहेराव सुध्दा धोतर मागे पडून लेंगा, पायजमा, पॅंट असा बदल झाला आहे. बौध्द धर्म इतर देशांत गेला पण पाली भाषा गेली का? बांगलादेश ची भाषा बंगालीच आहे ना. आता आपल्या कडे शेकडो शब्द दुसऱ्या भाषेतून जसेच्या तसे आले आहेत.
अवांतराबद्दल क्षमस्व.

एक आठवलं लहानपणी आम्ही विटीदांडू खेळताना वकट, रेंड,मुंडे, नाल, आर, वैद झकु१ ,...झकु २ असे दांडू मोजायचो. मोठेपणी हे तेलगु का कन्नड भाषेत एक दोन-तीन असे अंक आहे हे समजले. पण आमच्या तालुक्यात आजूबाजूला या भाषा बोलणारे लोक नाहीत तर हे कसं याचे नवल वाटायचं.