भाग २
https://www.maayboli.com/node/70182
माझा पाय त्या लिबलिबितात खोलवर रुतत चालला होता. कुठलीतरी अमानवीय, अभद्र शक्ती मला तिच्या जाळ्यात ओढतेय, असा मला भास होत होता.
...आणि पुढच्याच क्षणी रामरावाने मला बाहेर ओढले.
मी माझ्या पायाकडे बघितले. पांढरट, लालसर, ओली अशी काहीतरीच घाण माझ्या पोटरीपर्यंत आली होती.
तिकडे बघताच मला भडभडून आलं. मी सरळ बाथरूमकडे पळालो, आणि नळ चालू केला. मी पायावर पाणी सोडलं, आणि खसाखस पाय धुतले. शेजारीच एक दगड पडला होता, तो घेऊन खसाखसा कातडी लाल होईस्तोवर पाय घासला.
मला माझी कातडी अक्षरशः काढून टाकावीशी वाटत होती. त्या अभद्राचा, अमानुषचा अंशही माझ्या अंगावर नको होता.
...मात्र थोड्याच वेळात पायाची प्रचंड आग झाल्यावर मला माझ्या वेडेपणाची जाणीव झाली.
ते नळातून वाहून जात होतं, मात्र तिथे क्षणभर थांबण्याची माझी इच्छा नव्हती.
बाहेर मात्र प्रचंड दुर्गंधी सुटली होती.
"साहेब तुम्ही तर पळालात, पण तुमच्याबरोबर इथून एक मांजरीसारखी मोठी घूसबी पळाली बघा. दात विचकतच पळाली." नामदेव म्हणाला.
घुशी जमीन पोखरून भुसभुशीत करतात असं मी ऐकलं होतं. आताशा माझ्या डोक्यात प्रकाश पडला. म्हणजे ही घूस जमीन पोखरत आली, आणि इथे अडकून पडली. वर येण्याच्या प्रयत्नात ती लाकडाला धडका देत होती, त्यामुळे ते लाकूड सैल झालं. आवाजही त्याचाच...
पण हे खरोखर होतं की मी फक्त माझ्या मनाच्या समाधानासाठी असं म्हणत होतो?
"पण सगळ्या घरात दगडी फरशी आणि इथे लाकूड कसं?" रामराव म्हणाला.
"राम्या, केस पांढरी होऊनही तुला रीत कळली नाही येड्या. अरं, हे वाड्यावाले असंच कुठंतरी चीजवस्तू पुरून ठेवत आसायचे." नामदेव म्हणाला.
"म्हणजे इथंबी धन असलं?" रामरावाचे डोळे लकाकले.
"येडा की खुळा तू, ही घाण बघितली का? कोण या घाणीत हात घालल धनाच्या नावानं?" नामदेव चिडून म्हणाला.
माझ्या डोक्यात हळूहळू प्रकाश पडू लागला. काहीही झालं तरी मला या घाणीत, या दुर्गंधीत राहणं शक्य नव्हतं. काहीही करून ही घाण मला इथून काढायची होती.
"रामराव, नामदेवराव जरा माझं ऐका. मी तुम्हाला इथे का बोलवलं? तुम्हा दोघांनाच मला का बोलवावं वाटलं? कारण या अभद्रात काहीतरी दैवी योजना दिसतेय. हिम्मत आणि नशीब, दोघांची साथ लाभली, तर रंकाचा राजा बनतो."
मी क्षणभर थांबलो, दोघांच्याही मनावर माझ्या बोलण्याचा काही परिणाम होतोय का, ते मी बघत होतो. दोघांचही माझ्याकडेच पूर्ण लक्ष होतं.
"मी आहे एकटा, अजून ना बायको ना पोरं. तसंही यात जे काही सापडलं, त्याचा मला हव्यास नाही. पण त्या विधात्याने तुम्हाला इथवर आणलं, कारण तुमच्या नशिबाचा अंधार त्याला दूर करायचा होता.
यातून कितीही धन निघू दे, मला त्याची लालसा नाही. पण हे सगळं लवकर साफ करा. इथे काही सापडलं याचा पुरावाही राहता कामा नये, नाहीतर जे काही मिळेल ते सरकारजमा होईल."
रामरावाचे डोळे चमकतच होते, धनाची लालसा त्याच्या डोक्यावर स्वारच झाली होती. मात्र आता त्याला नामदेवही सामील झालेला.
"बघ नाम्या, साहेबांचं डोकं. एवढ्या कमी वयात एवढं शहाणपण, ही वृत्ती, देवमाणूस. अरे आयुष्यभर जरी या खेड्यात राबला ना, तरी मरताना लंगोटीशिवाय काही उरणार नाही. जरा तुबी डोकं चालवं."
"राम्या, लई मोठा माणूस आहे साहेब. साहेब, करतो आम्ही सगळं. देवाबरोबर तुमचीही कृपा झाली."
"लवकर, लवकर आटपा मग. मी जरा वर पडतो."
मला त्याजागी थांबण्याची अजिबात इच्छा नव्हती. मी वर गेलो, आणि कॉटवर पडलो.
मात्र त्या दोघांमध्ये माणसाच्या जागी आता राक्षस संचारला होता. एके क्षणापूर्वी त्या कामाला ठाम नकार असणारा नामदेव हे काम जोमाने करत होता.
...अक्षरश: हाताने त्यांनी ती घाण उपसली, आणि बाहेर नेऊन टाकली. भर पावसात ती घाणही अदृश्य झाली.
ही धनाची लालसा होती, की त्या अभद्राचा प्रभाव?
"साहेब, साहेब..." मोठ्याने आवाज आला.
मी अनिच्छेने उठलो आणि खाली आलो.
त्यांना खरोखर काहीतरी मिळालं होतं...
नाम्याचा अंदाज खोटा नव्हता...
सगळं उपसून काढल्यावर त्यांना एक अतिशय मोठ्या तलम वस्त्रात गुंडाळलेली गाठोडं मिळालं.
ते गाठोडं बघून दोघांनाही हर्षवायू व्हायचा बाकी होता.
दोघांच्याही डोळ्यात एक विचित्र झाक होती. एक वेडसरपणाची, वासनेची झाक...
गाठोडं प्रचंड जड होतं.
"नाम्या, लै ऐवज असलं..." रामराव म्हणाले.
नामदेव गाठोडं उघडू लागला, पण मीच त्याला अडवलं.
'इथे नको, मला लालसा व्हायची. तुम्ही हे बाहेर घेऊन जा. पण नामदेव, त्याआधी ही खाच नीट करा. पुरावा नको."
नामदेवाची आयुधे कायम त्याच्यासोबत राहत. अर्ध्या तासात त्याने सफाईदारपणे त्या खाचेत लाकूड बसवलं, आजूबाजूला कसलातरी गिलावा केला, आणि ती जागा पहिल्यासारखी केली.
...आणि दोघेही पाठीला पाय लावून पळाले.
अचानक हा वाडा प्रसन्न वाटू लागला. एक अदृश्य अरिष्ट या वाड्यावरून गेल्यासारखं वाटलं. पावसाची रिपरिप थांबली होती, वाऱ्याची साद बंद झाली होती.
...त्या अभद्राची छाया या वाड्यावरून दूर झाली होती.
------------------------------------
रामराव आणि नामदेव ते गाठोडं घेऊन पळाले. तळेगाव वाड्यापासून जरा दूर होतं.
"राम्या, थांब जरा, धाप लागलिया."
"नाम्या, आता तुझ्या घरीच जाऊन हे खोलू."
"आर येडा का तू, घरच्यांना काही कळलं तर त्यांच्या मागण्या आधी सुरू होतील. जरा आपली मजा करू आधी, मग सांगू तिकडं," नाम्या डोळा बारीक करत म्हणाला.
"मग कुठे खोलायच हे?"
"जरा इचार करावा लागलं." नामदेव विचारात पडला.
"जनार्दनाच्या म्हाताऱ्याची झोपडी?" रामराव हळूच म्हणाला.
"ये राम्या, येड्या, नालायक, बुद्धी भ्रष्ट झाली का तुझी. त्या चेटक्याच्या घरात जायला सांगतोस तू?"नामदेव जोरात ओरडला.
"हळू बोल, आता अशी वेळ आहे, की थोडा आवाज झाला, तर सगळं गाव बाहेर येईल. त्या आंधळ्या म्हाताऱ्याला काय दिसतय? सदानकदा खाटेवर कण्हत आसतो, दारही सताड उघड असतं. जरा डोक्याने काम घे." रामराव चिडून म्हणाला.
निरुत्तर होऊन नामदेवाने जरा नाखुषीनेच संमती दिली.
तळेगावातून करडी नदी वाहत होती. करडीवर छोटासा पूल होता. करडीने जुन तळेगाव आणि नवं तळेगाव असे दोन भाग केले होते.
नव्या तळेगावात बरीचशी लोकवस्ती होती. जुन्या तळेगावात मात्र वाडा आणि थोडी फार जुनी घरे सोडता काही वस्ती नव्हती. जनार्दनाची झोपडीही वाड्यापासून जवळजवळ अर्धा किलोमीटरवर होती.
जनार्दनाच्या बापाविषयी तळेगावात बऱ्याच आख्यायिका होत्या. छोट्या करणी, नजरबंदी अशा गोष्टींमध्ये तो प्रसिद्ध होता.
एकदा एका खविसाच्या डोळ्यात डोळे घातल्याने त्याचे डोळे कायमचे बंद झाले होते असे लोक म्हणत. कितीही प्रयत्न करून तो ते उघडू शकत नव्हता.
गाठोडं उचलून नामदेव आणि रामराव धापा टाकत झोपडीजवळ पोहोचले.
पुन्हा एकदा वादळी वारा सुटला होता.
हं...हं...हं हं हं...
वाऱ्याचा नाद विचित्र आवाज करत होता.
दोघेही जाम टरकले.
दोन्हीही झोपडीच्या दारासमोर आले.
रामराव झोपडीच दार लोटणार, तेवढ्यात...
...वादळी वाऱ्याने दार सताड उघडलं गेलं...
...आणि दोघेही भीतीने पांढरेफटक पडले!!!
जनार्दनाचा म्हातारा डोळे सताड उघडून उघडाबंब दारात उभा होता!!!
Mi first
Mi first
Kya bat hai... Jabardast
Kya bat hai... Jabardast
KY bdl kela kalal nhi
KY bdl kela kalal nhi
लेखक महोदय, भर मध्यरात्री
लेखक महोदय, भर मध्यरात्री अंगावर काटा आणलात...
खूप भीतीदायक लिहिलंय. मागच्या भागापर्यंत धारपांचा प्रभाव जाणवत होता, पण इथे खास तुझी शैली बघायला मिळाली.
(बाय द वे, तुझी शैली बदललेली वाटतेय आधीपेक्षा. ही अजून चांगली वाटतेय.)
मागच्या भागात म्हटलं होतं, तू ट्रोल्सला कसं हँडल करतोय ते मला आवडतंय. हो मागचे काही भाग टिपिकल भयकथेसारखे वाटत होते, पण कुठल्याही कथेशी तंतोतंत समानता नव्हती. छान गुंफलाय हा भाग.
दणदणीत आहे हा भाग।
दणदणीत आहे हा भाग।
हिम्मत आणि नशीब, दोघांची साथ लाभली, तर राजाचा रंक बनतो
:- इथे रंकाचा राजा पाहिजे ना? उलट?
खूप छान..नेहमीप्रमाणे मस्त
खूप छान..नेहमीप्रमाणे मस्त लिहिलय.
अज्ञा...जबरदस्त लिहीलंय.पुढचा
अज्ञा...जबरदस्त लिहीलंय.पुढचा भाग कधी?
मस्तच लिहिलय....भीतीदायक .
मस्तच लिहिलय....भीतीदायक .
छान झालीये कथा,
छान झालीये कथा,
नेहमीच्या पायवाटेने न जाता ते अभद्र सहज पणे वाड्याबाहेर टाकून वेगळ्याच नव्या संकटाची चाहूल दिल्याबद्दल धन्यवाद
@उर्मिला - धन्यवाद!
@उर्मिला - धन्यवाद!
थँक्स.
धन्यवाद
थँक्स. बघूयात पुढे काय होतं ते.

@महाश्वेता -
@मन्याS -
@कटप्पा - बदल केला आहे. तुम्हाला मागच्या काही भागातला शब्द आणि शब्द वाचलेला वाटत होता. ते आता सापडलं असेल तर लिंक द्या प्लीज.
@ श्रद्धा - थँक्स श्रद्धा!
@सिद्धी - थँक्स
@ आदू -
मस्त चाललेय..
मस्त चाललेय..
खूप छान लिहिली कथा.. सगळं
खूप छान लिहिली कथा.. सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं. आणि भयप्रद गूढ वातावरण कायम ठेवलत.. आवडला हा भाग.
सगळे भाग एकदम वाचले. चांगली
सगळे भाग एकदम वाचले. चांगली जमली आहे भट्टी.
वाटतोय आणि आहे यात फरक आहे ना
वाटतोय आणि आहे यात फरक आहे ना?
Hows the taste of your own medicine brother
1. I'm not your bro...
1. I'm not your bro...
2. Thanks for telling me that movie is your Movie
3. I give links related to the movie. Now give me links related to my story.
Thanks for proving you are a troller.
गोष्ट खूपच रंगत चालली आहे.
गोष्ट खूपच रंगत चालली आहे. पुढचा भाग लवकर टाका.
अज्ञातवासी, मुळात मी या
अज्ञातवासी, मुळात मी या भागावर चांगली कंमेंट टाकली होती, तुम्ही विषय मागच्या धाग्यातील कंमेंट वर नेला।
तुम्हाला मी ट्रोल करावे असे तुमच्या साहित्यात काय आहे?
तुमची हांजी हांजी करणारे ते चार पाच आयडी तुमच्या प्रत्येक साहित्याला क्या बात है, मस्त लिहिलंय वगैरे लिहीत राहतील, चांगले फीडबॅक देणारे लोक तुम्हाला प्रतिसाद देणे बंद करतील हळू हळू।
माझ्यासाठी प्रत्येक धागा स्वतंत्र असतो ।चांगले लिहिताय, अजून उत्तम लिहा, पुढील लेखनाला शुभेच्छा।
कटप्पा - तीन वर्षात कोण खरा
कटप्पा - तीन वर्षात कोण खऱ्या तळमळीने सांगतोय आणि कोण ट्रोलर ही समजण्याची अक्कल आलीये मला. शिकवण्याची गरज नाही.
आणि संबंध कुणी आणला????
Hows the taste of your own medicine brother
हे वाक्य कोणत्या अनुषंगाने आलं तेही कळतंय मला. उगाच मी किती शाहजूक म्हणून गळे काढू नका...
आणि ज्यांना प्रतिसाद द्यायचाय ते देतीलच. तुम्ही लोड घ्यायची गरज नाही. आणि चांगले लिहिताय, शुभेच्छा वगैरे मानभावीपणाची तर नाहीच नाही.
लिंका द्या शब्द आणि शब्द वाचलेल्याच्या, जशा मी दिल्या होत्या!!!
उत्सुकता वाढतेय!
उत्सुकता वाढतेय!
वा वा क्या बात है. एकदम मस्त
वा वा क्या बात है. एकदम मस्त पकड घेतली आहे कथेने, पुढील भागाची प्रतीक्षा
तुम्ही जी लिंक दिली त्याचा
तुम्ही जी लिंक दिली त्याचा त्या चित्रपटाशी काहीही संबंध नव्हता। मी पण कोणत्याही भयकथेची लिंक देऊ शकतो।
ट्रोलिंग ते आहे जे तुम्ही माझ्या धाग्यावर केलेत, चित्रपट न पाहता पहिला प्रतिसाद हा की दाक्षिणात्य चित्रपटाची कॉपी वाटतोय। तुमच्या प्रतिसादाला काहीही अर्थ नव्हता, तुमच्या प्रतिसादामुळे लोक पण बोलायला लागले की हो हा कॉपी वाटतोय। नंतर तुम्ही हा नवीन शोध लावला की एका इंग्रजी चित्रपटाची कॉपी दाक्षिणात्य चित्रपट आणि त्याची कॉपी हा मराठी चित्रपट- त्याला म्हणतात ट्रोल करणे। नंतर म्हणे मी पाहिलाच नाहीय चित्रपट। सगळ्यात मोठा ट्रोलर तुम्ही आहात आणि तुमचा कंपू जो भांडायला आणि फ्रस्ट्रेशन काढायला वाटच बघत असतो।
चांगले लिहिताय, शुभेच्छा वगैरे मानभावीपणाची तर नाहीच नाही.
-- म्हणजे, चांगले लिहिलंय तर सांगायला नको का, आम्ही वाचक म्हणून? फक्त मोजक्या लोकांनी प्रतिसाद द्यायचे का।
तो चित्रपट तुमचा होता का????
तो चित्रपट तुमचा होता का????
लिंका दिल्या मी, समानता वाटली म्हणून.
लिंक द्या... CUT'APPA'
आणि नका ना देऊ प्रतिसाद. गरज नाहीये.
कटप्पा सरळ सांगतो, चांगल्या माणसाने दोन कानाखाली वाजवून सांगितल्या ना, ऐकेन. पण एखादा कायमच वाकड्यात शिरत असेल तर मला ना त्याची किंमत आहे ना त्याच्या मतांची.
ओके? माझ्याकडून संपलं. काय आहे, उद्या माझ्या धाग्यावर प्रतिसाद जास्त होत आहेत, म्हणून मी इतकं बोलतोय असंही इथले काही अहितचिंतक बोलून दात काढायला कमी करणार नाही.
बाय!!!!!!!
अज्ञातवासी, कटप्पा तुम्ही
अज्ञातवासी, कटप्पा तुम्ही भांडण्यासाठीचा वेगळा धागा का नाही काढत ? इथे या कथेबद्दल तेव्हडे बोलू
तो चित्रपट तुमचा होता का????
तो चित्रपट तुमचा होता का????
- पण तो धागा माझा होता.:)
तुम्ही तो धागा भरकटवलात, हॅक केलात। तुमचा धागा मी भरकटवण्याचा प्रयत्न ही नाही केला, माझी पहिली कमेंट वाचा इथे। स्वतःचा धागा देखील तुम्ही भरकटवला आहे।
अज्ञातवासी, कटप्पा तुम्ही
अज्ञातवासी, कटप्पा तुम्ही भांडण्यासाठीचा वेगळा धागा का नाही काढत ? -- +१११
आधीच्या दोन्ही भागांपेक्षा हा
आधीच्या दोन्ही भागांपेक्षा हा भाग जबरदस्त झालाय.
पुभाप्र.
आधीच्या दोन्ही भागांपेक्षा हा
.
भारीच! पुढे... ...
भारीच!
पुढे... ...
चांगली चालु आहे कथा. पुभाटा.
चांगली चालु आहे कथा. पुभाटा.
तुम्ही दोघे छान भांडता, एक
तुम्ही दोघे छान भांडता, एक भांडण कसे करावे यावर धागा काढा आणि तिथे होऊन जाऊ दे.
आम्हाला स्टोरीत इंटरेस्ट आहे. कृपया छोटे भाग नका टाकू आणि पुढील भाग लवकर टंका.
Pages