आपल्या सर्वांचे आंतरजालावरील जिव्हाळ्याचे ठिकाण म्हणजे मायबोली!
येथे आपण कित्येक लेखकांनी लिहीलेल्या कथा, कविता, गझल, लेख आणि बर्याच प्रकारचे लिखाण वाचत असतो.
काही लेखक आपल्याला त्यांच्या लिखाणातुन हसवतात, तर काहींचे लिखाण वाचुन डोळ्यांत टचकन पाणी येते.
काही जण अनुभव मांडतात, ते वाचताना आपणही ते क्षण जगतो.
काहींच्या रहस्य आणि भयकथांमध्ये आपण हरवुन जातो आणि थरार अनुभवतो.
कधीतरी असे लिखाण वाचण्यात येते की ते आपल्याला विचार करण्यास भाग पाडते, आपण अन्तर्मुख होतो.
असे वैविध्यपुर्ण लेखन करणारे लेखक येथे नेमाने येत असतात. आपल्याला ते त्यांच्या लिखाणामधुन आणि प्रतिसादांमधुन कळत जातात.
तर अशा गुणी माबोकर लेखकांचे चाहते आणि वाचक ह्या नात्याने, तुम्हाला कोणत्या माबो लेखकाला/लेखिकेला प्रत्यक्ष भेटायला व त्यांना ऐकायला आवडेल?
चला तर मग करा सुरुवात!
विशेष सुचना:
एकदा सगळी नावे आली की आपण भेट आयोजित करुया.
गटग करु शकतो किंवा तुनळी वर live podcasts करता येइल.
कोणत्या माबोकरांना भेटायला आवडेल यासाठी वेगळा धागा आहे.
ईथे फक्त लेखक आणि लेखिकांची नावे लिहा
किल्ली, शीर्षक बदल.
किल्ली, शीर्षक बदल.
तुम्हाला मायबोलीवरच्या कोणत्या आयडीला प्रत्यक्षात भेटायला आवडेल असं कर
मी एकट्यानेच एका
मी एकट्यानेच एका उन्हाळ्याच्या सुट्टीत एक हस्तलिखित तयार केलेलं आणि त्यावर लेखक आणि कवी- हर्षद पेंडसे असे लिहिलेले आणि त्यावरून घरचा आहेर मिळालेला>> >>>

मी पण एक वही थातुरमातुर चारोळ्यानी भरली होती. तेव्हा चारोळ्या इन होत्या. प्रेमचारोळ्या जास्तकरुन
सस्मित ताई, तुम्ही म्हणताय
सस्मित ताई, तुम्ही म्हणताय तसा धागा आहे ऑलरेडी
किल्ली त्या धाग्याची लिंक
किल्ली त्या धाग्याची लिंक मिळेल का?
एक वाचक म्हणून मला आवडणार्या
एक वाचक म्हणून मला आवडणार्या अनेक मायबोलीकर लेखकांना प्रत्यक्ष भेटायला मिळाले आहे .
त्या व्यतिरिक्त ज्यांना भेटायला आवडेल अशा मंडळीत हाब, भारतीताई, चैतन्य रासकर, स्वप्ना राज ई. लोकांचा समावेश असेल.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/42290
माझा आवडता आयडी
डोक्यात मायबोली, ऐसी अक्शरे
डोक्यात मायबोली, ऐसी अक्शरे,मिपा ,उपक्रम या वरील नेटकर्यांच्या आयडींचे फार गोंधळ झालेत त्यामुळे काही सुधरत नाही. स्मरणपटलावर आयड्या वेगाने आदळतात व काळाच्या ओघात विस्मरणात जातात. त्या त्यावेळी त्यांचे लेखन अतिशय अपील झालेले असते.
एका महान लेखकाला भेटलीये...
एका महान लेखकाला भेटलीये... आता परत कुणाला भेटावंस वाटत नाही..
काय?? आपण भेटलो होतो? कधी?
काय?? आपण भेटलो होतो? कधी? कुठे? केव्हा? माफ करा पण मला आठवत नाही आपण भेटल्याचं. आणि असं महान वैगरे माझ्या नावाआधी जोडून मला लाजवू नका : लाजणारी बाहुली :
बोकलत >>
बोकलत >>
बादवे
बादवे
ऐसा क्या हुआ था उस वक्त --
जे आता परत कुणाला भेटावंस वाटत नाही.. #मी२#
बोकलत
बेफिकीर
बेफिकीर
दाद
कवठीचाफा
कौतुक शिरोडकर
विशाल कुलकर्णी
चैतन्य रासकर
ऋन्मेष
फार एंड
मुग्धमानसी
किल्ली
मी बेफिकीरना भेटलो आहे,
मी बेफिकीरना भेटलो आहे, त्यांच्या घरी सुद्धा जाऊन आलो आहे
मी त्यांच्या लिखाणासाठी माबोवर आलेलो त्यामुळे मजा वाटली
या व्यतिरिक्त ट्रेकिंग वर लिहिणारे सगळे दिगग्ज तर एकत्र भेटत असतोच नेहमी, माबोबाहेर आमचा एक ग्रुप आहे त्यात अलमोस्ट रोज गप्पाटप्पा होतात त्यात जिप्सी, यो रॉक्स असे आहेत
अन्य साहसी लोकांत हार्पेन च्या घरी जाणं झालं आहे, केदार जाधव आणि अन्य हौशी सायकलपटू माबोवर राईड ला गेलो होतो
मार्गी पण लांबून येऊन भेटला होता आणि अजूनही संपर्कात आहे
भेटावे वाटते आशा लेखक लोकांत
स्वप्ना राज - तिचे पंने फार सुरेख असतात, ती एरवी पण अशीच खोलवर बघत असेल का असे कुतूहल आहे
रुन्मेष - हाच आयडी तुमचा अभिषेक असेल तर त्याला भेटून पाठीत धपाटा हाणायचा आहे, एकेकाळी इतकं सुंदर कातील लिहिणारा हा आपला माकड का करून घेत आहे असे विचारायचं आहे
शाली याना नुसते भेटायचे नाही तर त्यांच्या घरी जायचं आहे आणि जमल्यास हरिश्चंद्रगडाला जायचं आहे त्यांच्या सोबत
टण्या ला भेटून त्याला वारी चा पुढचा भाग लिहिण्यासाठी काय करावं लागेल हे विचारायचं आहे
स्पार्टाकस लाही भेटायचं होत खूप, भारी होता
याखेरीज नंदिनी - यांची शब्द ही कथा अजूनही मनात घर करून आहे
मला तर हेडिंग " कोणत्या माबो
मला तर हेडिंग " कोणत्या माबो लेखक/ लेखिकेबरोबर डेटवर जायला आवडेल"? असं असावं असा भास झाला.
बोकलत द महान माझे आवडते लेखक
बोकलत द महान माझे आवडते लेखक आहेत. त्यांना भेटून हे नेमकं काय रसायन आहे हे पहायचं आहे.
किल्ली, हायझेनबर्ग आणि ऋन्मेष
किल्ली, हायझेनबर्ग आणि ऋन्मेष हे माझे प्रेरणास्थान असल्यामुळे त्या तिघांना भेटायला आवडेल। माबो वर आणखी दर्जेदार धागे कसे काढता येतील याच्यावर चर्चा करायला आवडेल।
बादवे
बादवे
ऐसा क्या हुआ था उस वक्त --
जे आता परत कुणाला भेटावंस वाटत नाही.. #मी२#>> तु तुझ्या कामाशी काम ठेव मुर्ख माणसा.. Very cheap thinking #shame on u
अरे वा! मला भेटायला उत्सुक
अरे वा! मला भेटायला उत्सुक एवढे लोक्स आहेत? ते मोरपिस वालं की काय ते तसं फिलींग आलं एकदम! बाकी माझ्या घरचेही मला भेटायला फारसे काही उत्सुक नसतात म्हणे...
धन्यवाद जनहो! भेटायचा योग आला की भेटू नक्की!
मला शाली, हायझेन्बर्ग, रॉबिनहूड, भरत, फारेन्ण्ड या आयडींना भेटायचेय. बाकी अनेक आहेत ज्यांना मी भेटलेय आधीच.
स्वत: आधी सुधरा श्रद्धा बै
स्वत: आधी सुधरा श्रद्धा बै
सोशल साइट आहे ही
तुमची पर्सनल मेसेंजर सिस्टिम नाही जे प्रत्येक धाग्यावर रंग उधाळणे सुरुय ते दिसते सुज्ञ लोकांना
हे म्हणजे त्या मांजरा सारखी गत झाली की डोळे मिटून दूध प्यायचे
आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी घडली असेल काही बाहि तर असा गिल्ट येणार मनात कळले का ! मग असे फुकाचे वाग्बाण व्यर्थ समजावे आणि जमल्यास आपले वर्तन सुधारावे... मुर्ख बये !
वीक्ष्य - सोशल साइट
वीक्ष्य - सोशल साइट आहे हे एकदम मान्य, तिचा वापर कसा असावा हे ज्याने त्याने ठरवावे हे ही खरे. पण आपल्यासारख्या सुज्ञ मानसाकडुन असल्या भाषेची अपेक्षा नव्हती
ड्यु आयडीच्या आडाने बरेच जण काही बाही लिहीतात, मनातील रागाचा निचरा होऊ देतात , मी ही असे केलेय, पण त्यातला फोलपणा माझ्या लक्षात आलाय, म्हणुन मी ते सगळे थांबवले . तुम्ही तसेच वागा असे नाही बोलु शकत पण शांत डोक्याने राग थोडा बाजुला ठेऊन विचार करा. तुम्ही असे नाही आहात असे अजुनही वाटते, म्हणुन हे लिहीलेय क्रुपया गैरसमज नसावा . तुमच्या खास तुमच्या शैलीतील चांगल्या लिखाणा च्या प्रतीक्शेत ___/||\___
सॉरी समाधि
सॉरी समाधि
इग्नोर करा ते
मलाही ह्या धाग्यावर अजिबात धूळवड नकोय त्यामुळे माझ्याकडून पूर्णविराम !___/||\___
इथे एका स्त्री आयडीवर होणारी
इथे एका स्त्री आयडीवर होणारी चिखलफेक बघून, चारित्र्यहननाचा प्रकारही असूनही बाकीच्या स्त्रीवादी आय डीना त्याविषयी काहीही बोलावसं वाटत नाही, हे बघून वाईट तर वाटतंय, पण हीच शोकांतिका आहे. अशा प्रवृत्ती, त्यांचे कंपू, त्यावर फिदीफिदी दात काढून हसणारे लोक खूपदा इथेच बघितलेत. जनावराने माणूस म्हणून चढवलेला मुखवटाही इथेच दिसतो.
असो, आपली लढाई आपणच लढायची असते, पण अशी जनावरे अजूनही मायबोलीवर आहेतच त्यांना जमेल तितका विरोधच करेनच.
बादवे
बादवे
ऐसा क्या हुआ था उस वक्त --
जे आता परत कुणाला भेटावंस वाटत नाही.. #मी२#
>>
अशी कॉमेंट करणे हे एखाद्याच्या जखमेवरील खपली काढण्यासारखे आहे. जरी मेडीया आभासी असला तरी तो वापरणारी माणसं जिवंत हाडामाणसाचे आहेत.
महाश्वेता जी एकदम बरोबर
महाश्वेता जी एकदम बरोबर बोललात बघा.
धाग्याविषयी म्हणायचं झालं तर
धाग्याविषयी म्हणायचं झालं तर आता कुणाच्याही लिखाणावरून भाळून त्यामागचा माणूस जाणून न घेता त्याला भेटायची चूक करणार नाही.
आभासी जगतातले सुंदर, गोंडस रंगवलेले चेहरे जवळून बघताना फारच विद्रुप भासतात.
मी तर बोले एक चाले एक त्याचे
मी तर बोले एक चाले एक त्याचे पाहू नये मुख या तुकारामांच्या उक्तीचा अनुभव घेतला आहे. फार सोज्वळ प्रतिमा निर्माण करणारे प्रत्यक्षात फार किळसवाणे असतात.
हायझेनबर्ग
हायझेनबर्ग
चैतन्य रासकर
बेफिकीर
जव्हेरगंज
र|हुल
मयुरी चवाथे-शिंदे
कवठीचाफा
कौतुक शिरोडकर
विशाल कुलकर्णी
फुल
शाली सरांची लेखनशैली खुप
शाली सरांची लेखनशैली खुप आवडते. त्यांना भेटायला आवडेल.
@ mahashweta ji... +11111
@ mahashweta ji... +11111
इथे एका स्त्री आयडीवर होणारी चिखलफेक बघून, चारित्र्यहननाचा प्रकारही असूनही बाकीच्या स्त्रीवादी आय डीना त्याविषयी काहीही बोलावसं वाटत नाही, हे बघून वाईट तर वाटतंय, पण हीच शोकांतिका आहे. अशा प्रवृत्ती, त्यांचे कंपू, त्यावर फिदीफिदी दात काढून हसणारे लोक खूपदा इथेच बघितलेत. जनावराने माणूस म्हणून चढवलेला मुखवटाही इथेच दिसतो.
असो, आपली लढाई आपणच लढायची असते, पण अशी जनावरे अजूनही मायबोलीवर आहेतच त्यांना जमेल तितका विरोधच करेनच..... Aavdla pratisad
मी बऱ्याच जणांना भेटलोय
मी बऱ्याच जणांना भेटलोय अलरेदी.
सस्मित , बोकलत, अज्ञातवासी, आनंद, VB , द्वादशांगुला, मामी यांना भेटायला आवडेल.
तसेच - भन्नाट भास्कर, ऋन्मेष , अर्चना सरकार या तिघांना एकत्र भेटायला आवडेल.
Pages