Submitted by पुरंदरे शशांक on 3 June, 2019 - 04:38
नाममय वाणी
दिस उगवला कोठे
आवलीस उमगेना
येरवाळी तुकाराम
खुद्द पावले दुकाना
आज एकांत सोडोनी
कैसे ठाकले दुकानी
भाग्य उजळले माझे
धावे मोहर्या घेवोनी
दुकानात गर्दी बहु
स्वये तुकोबा देखोनी
जन लोटले अपार
काय घ्यावे विसरोनी
टाकोनिया घरदार
आवलीही तेथ ठाके
काय सांगावे जी यांचे
नको उधारीचे खाते
देती गूळ, धान्य कोणा
मीठ, तेल ते सकळ
वाचे चाले नामघोष
जै जै विठ्ठल विठ्ठल
हाती येता कोणा काही
विसरोनी भवताल
जन गर्जताती थोर
जै जै विठ्ठल सकळ
"वाणी" नाममय होता
देई जना नामसार
देव ह्रदी , नाम मुखी
नाम हाचि अवतार
............................................
ह्र्
आवली... तुकोबांची पत्नी, जिजाई
येरवाळी... सकाळीच
धावे मोहर्या घेवोन... दृष्ट काढायला मीठ मोहर्या घेऊन आवली दुकानात आली.
भवताल.... सभोवताल
वाणी.... तुकाराम वाणी / तुकोबांची वाणी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुकोबांच्या दुकानदारीचा सुरेख
तुकोबांच्या दुकानदारीचा सुरेख वापर कवितेत केलाय. हे प्रथमच असावे बहुधा.
"वाणी" नाममय होता>>> छान कोटी साधली आहे.
__/\__
सुरेख काव्यरचना. पु.ले.शु!
सुरेख काव्यरचना. पु.ले.शु!
सुंदर _/\_
सुंदर _/\_
__/\__
__/\__
"वाणी" नाममय होता>>> छान कोटी साधली आहे.>>> +१
सहीये !
सुरेख!!
सुरेख!!
सुरेख काव्य.....
सुरेख काव्य.....
अतिशय आवडलं..
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद...
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद...
सुरेखच...
सुरेखच...
सुरेख काव्य. पु ले शु
सुरेख काव्य.
पु ले शु
वाह वा .... अप्रतिम
वाह वा ....
अप्रतिम