रात्रीस खेळ चाले-२ : नवीन

Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04

रात्रीक ख्योळ चालल्यान

आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

r1.jpg

.

Annaa1.jpgआण्णा - हरी नाईक
Mai2.jpgमाई - इंदु हरी नाईक
Chhaya1_0.jpgछाया - छाया हरी नाईक
Madhav1.jpgमाधव - माधव हरी नाईक
Datta1.jpgदत्ता - दत्ता हरी नाईक
Sarita2.jpgसरिता - सरिता दत्ता नाईक
Pandu1.jpgपांडु
Wachchhi1.jpgवच्छी - वत्सलाबाई
Bhivari1.jpgभिवरी
Shevanta1.jpgशेवंता - पाटणकरीण
Patankar1.jpgपाटणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल ( म्हणजे शनीवारी ) अभिराम विहीरीवर अंघोळ करतांना दत्ताला काहीबाही विचारतो, पण दत्ता उत्तर देत नाही. अभिराम सारखे विचारतो की दत्तादादा तू रागवलायस का? मी काय केले. पण दत्ता बोलत नाही. अभिराम घरात आल्यावर माई त्याची दृष्ट काढतात. सरीता अंगारा लावते, हे बघुन अभिरामला काहीच कळत नाही. आणी कोणी सांगत पण नाही. मग तो रागावुन वर खोलीत जाऊन माधवाला पत्र लिहीतो, अण्णोबाला ते सापडते. अण्णा अभिरामला झापतात. मग अण्णोबा, रघु - टगु बरोबर बसलेले असतांना अभिरामबद्दल सांगतात. तर टगु ( नेने वकील ) अण्णोबाला सांगतो की अभिरामला बाहेर ठेव, नाहीतर तो तुझ्या डोक्यावर मसाला वाटेल. ( बरोबर आहे, शिकलेला अभिराम रघु टगुची कारस्थाने ओळखणार नाही का ? ) मग टगु हळुच रघुकडे बघुन हसतो. मग टल्ली झालेले अण्णोबा बहुतेक अभिरामला हॉस्टेलला ठेवतात. इकडे माई देवासमोर स्फुंदत असतांना सगळे देव पाटावर अंग टाकुन आडवे होतात. Sleeping kitten

रश्मी.. धन्यवाद.. सगळा पट डोळ्यासमोर उभा केल्याबद्दल..! Bw

समर्पक विशेषणे वापरुन चार चांद लावले की.. टगु Biggrin
इकडे माई देवासमोर स्फुंदत असतांना सगळे देव पाटावर अंग टाकुन आडवे होतात. Biggrin Biggrin Biggrin

पहिल्या राखेच्या मध्ये ते सगळे देव चकचकीत मस्त नवीन दिसायचे या राखेच्या मध्ये देव कालवंडले बहुदा माईच्या अश्रूंमध्ये मिठाचं प्रमाण जास्त असल्याने तो अभिषेक या देवांना मानवाला नाही आणि ते कालवंडले.

पहिल्या राखेच्या मध्ये ते सगळे देव चकचकीत मस्त नवीन दिसायचे या राखेच्या मध्ये देव कालवंडले बहुदा माईच्या अश्रूंमध्ये मिठाचं प्रमाण जास्त असल्याने तो अभिषेक या देवांना मानवाला नाही आणि ते कालवंडले.>> असेल असेल.. तसाही माईने या भागात रडायचा कहरच केला आहे म्हणा..! Proud

अभिराम देवस्की प्रकरण सरिताने उघड केले तेव्हा वाटले होते आता माई पदर खोचून हातात कोयतो घेऊन त्या वच्चीला चांगलाच धडा शिकवणार पण हाय रे किस्मत तिथे जाऊन माईंनी संतवाणी सुरु केली.

रघु - टगु >>>>>>> Rofl

हि कोण रश्मी? माधवने मारलेली मान्जर?

आभिरामची शाळा सुरु होणार म्हणुन राखेचा-२ मधुन डच्चु मिळालेला दिसतोय.. यावेळीही माईने चांगलंच रडुन दाखवलं.. नेहमीचंच रडागाणं बघुन देवही झोपले..!!

सूलु ते मांजराचे पिल्लु मस्त आहे. Proud म्हणून ती इमोजी टाकली. >>>>>>> अच्छा, अस आहे का? मस्तच आहे ते मान्जर.

राखेचा-२ च्या टायटल साँग मधे जे काळं मांजर आहे ते सिरिअल मधे कुठेच दिसलं नाही. >>>>>>>>> बहुधा माधवनेच मारली असेल.

आली.. ती काळी मांजर आली.. कालच्या भागात आण्णाला चांगलंच टरकवलं तिने. (परवाच्या भागात देवघरात माईने जे रडगाणं लावलेलं होतं तेव्हा देव आडवे झालेले दिसले ते बहुतेक माउनेच केलेले असावेत..!)

कालचा भाग एस.टी. ने खाऊन टाकला. सावंतवाडी बस स्थानकात दत्ता, सरिता, छाया अभिरामाला सोडायला आलेले होते. दत्ता, सरिता आणि अभिरामसोबत एस.टी. तुन ५ मिनिटांचा प्रवास करायला मिळाला.. छान वाटले. एस.टी. चा ड्रायव्हर, कंडक्टर आणि प्रवासी देखिल हुबेहुब वाटले. फक्त एस.टी. बस ला गावाचा बोर्ड नव्हता त्यावरुन ही 'प्रासंगिक करारा'वर घेतली आहे हे लक्षात आले.

बाकी सावंतवाडी बस स्टँड वर छायाच्या डायलॉग वेळी क्लोज आणि डिस्टन्स शॉट्स मधे २ वेगवेगळ्या एस.टी. बस समोर चित्रीकरण झाले हे उठुन दिसत होते. ही चुक दिग्दर्शकाच्या कशी बरे लक्षात आली नसेल..? Uhoh

Pandu and abhi parting scene, dattabhau puts some money in laddu ka dabba soooooo sweet. In fact now it will be easy for madhav and abhi to be in touch and meet.

अभिरामला घालवण्याचा सीन आवडला मला.
आण्णा खुप स्वार्थी माणुस आहे.
माई जरा म्हणुन आवाज चढवत नाही.
अभिराम पळुन येणार आसा.

अरे काय वेड्याचा बाजार होता कालचा एपि.....

तो दत्तु शिडी घेऊन वर चढला तर मला वटलं कौल काढुन घरात शिरेल, पण कसंल काय.... नुसताच बघत होता वरुन.

बरं येवढा उपद्व्याप करण्यापेक्षा सरळ दरवाजा तोडुन टाकायला ना धडका मारुन.....

पण काही म्हणा बारका अभिराम मला जामचं आवडतो, जाऊन गालगुच्चे घ्यावेसे वाटतात त्याचे. शेवटच्या सीनमध्ये मात्र दत्ताने त्याच्या डोळ्यातली अगतिकता मस्तंच रंगवली.

का?

अण्णोबाचे प्रताप बघुन छोटा अभिराम घरी येतो आणी परत बोर्डिंगलाच राहीन असे म्हणतो. कारण आधी सरीता त्याला सांगते की पाटणकरीण खूप हुशार आहे, ती अण्णांना सांगुन अभिरामचे बोर्डिगला जाणे थांबवेल. म्हणून अभिराम पाटणकरीण कडे जातो, तिथे त्याला अण्णोबाचे पायताण ( आणी पाटणकरीण शहाणपणाच्या बाबतीत अण्णोबाच्या वरताण ) दिसतात, म्हणून आणी आवाज ऐकुन तो दाराच्या फटीतुन बघतो तर अण्णोबा आणी पाटणकरीण गाणे म्हणत असतात. ते पाहुन छोटा अभिराम संतापुन घरी येतो.

कालचा एपी छान होता. अभि चे पत्र आवडले. आणि पाटणकरणीचे आणि अण्णांचे प्रेमचाळे चक्क सरिताच्या नजरेस पडले. काल तिची ओटभरणी होती.

अण्णोबा टल्ली झाले की त्यांना दर वेळेस नवीन भूत दिसते. सध्या काशीची बारी आहे. आणी आता घरात झील येतलां हे ऐकुन अण्णोबांची झोप पण उडालीय. नाईकांक पाण्यापासुन भय असां हे माहीत असूनही अण्णोबा शेवंताबरोबर जलविहाराला गेलेत. यमुनाजळी खेळु कन्हैय्या च्या चालीवर जलविहार करु शेवंता असे म्हणत ते तयार झालेत.

ह्या माका वाटलं की आता अण्णा मरतंय पाण्यात बुडून कसलं काय ह्यो गडी उद्या घरी हाजीर व्हणार. लय बेरकी पात्र हाय ह्यो. एवढी भुतं छळून छळून थकली पण ह्याला काय बी फरक पडाक नाय.

पाटणाकरीण आण्णाच्या वाड्यातुन बाहेर पडत असताना आण्णा डुलत-डुलत घरात शिरत होता तेव्हा त्याल पाटणाकरीण म्हणाअली "येते" तर आण्णा तिला कस्पटासमान लेखुन म्हणतो 'चल.. नीघ..!' Uhoh आण्णाचं हे रात-गयी-बात-गयी वागणं ना मला झेपलं ना पाटणाकरीणला.. नक्कीच ती आण्णाला धडा शिकवेल असं वाटतंय... तो पाण्यात पडला याच्या मागे ती असु शकेल असं मला वाटतंय..!

नाही डिजे, अण्णोबा तर हसत होते की . आणी नीट निरखुन पाहीले का? पाटणकर जेव्हा येतो, तेव्हा अण्णा अचानक कुठे गायब झाले अशा गोंधळलेल्या नजरेने पाटणकरीण नदीकडे बघतांना दाखवलीय. पाटणकरला पाहुन अण्णांनीच नदीत उडी मारली असेल. त्यातुन पाय पाणवेलीत अडकल्यावर अण्णांना वाटले असेल की काशीच ओढतोय खाली.Zombie

अण्णाच्या क्रौर्याची परिसीमा दाखवत आहेत सध्या ... पित्रुपक्षातला भाग अति वाटतोय . इतका खुनशी मनुष्य असू शकत नाही कुणी !

Pages