मोबाईल कुठला घ्यावा ? - २

Submitted by योकु on 23 July, 2018 - 13:53

मोबाईल कुठला घ्यावा ?
याच्या चर्चेकरता हा दुसरा धागा. चलो हो जाओ शुरू... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>बॅटरीचा प्रॉब्लेम आहे म्हणून सांगितले.>>

फोन बंद झालाय

१)
ज्या फोनची बॅट्री काढता येते त्याचे टर्मिनल पॅाइंट्स आणि फोनमध्ये जिथे टेकतात ते असे सहा साफ करायचे. ( क्लिनिंग लिक्विड चा एक थेंब बाजुला घेऊन छोटासा कापडाचा तुकडा त्याने दमट करून चिमट्याने टेकवायचा, कोरडा करायचा. )

२) बॅटरी काढता न येणारे-
बॅट्री न निघणाऱ्या फोनचे पावर बटण दाबून धरायचे दहापंधरा सेकंद. फोन उघडतो.
---
नंतर सेटिंग्जमध्ये जाऊन>> स्टोरेज>>स्कॅन>>कॅश क्लीन कयायचे. काहीफोनमध्ये हे असते, वेगळे अॅप घ्यावे लागत नाही. साताठ दिवसांनी हे नेहमी करायचे. किंवा फोन बंद करून दोन मिनिटांनी चालू करायचा.
// अॅप्स सुरू / बंद करणे,
वेबसाइटीतल्या जाहिराती चुकून चालू/बंद केल्याने कॅश फार जमा होत फोन स्लो होतो आणि नंतर बंद होतो.

Srd, धन्यवाद!
खरंच यापूर्वीच मी इथे विचारायला हवे होते.

मोटो ई ५ प्लस आता ओनलाईन ७८०० रुपयांवर आला. घेतला. ( Moto e5 plus )
बेस्ट सिनिअर सिटिझन फोन आहे.
(( 5000 mAh battery, fast charging
Memory card slot,
OTG ,USB 2 ,micro USB ,
FM Radio with one touch recording,
32 +3 GB , only 5.5 GB USED/32 GB
Stock Android, Orio 8.0
Sim 1 : 4G LTE, SIM 2 : 4G LTE yes
1440x720 display ,18:9 full display
Camera back 12mp flash, camera bump 0.4 mm, and selfie 5 mp ,with flash.
Plastic body , good for GPS and mobile range.
Front one speaker.
Video recording : 1920; 1200; 640 full hd/hd/vga options available.
Finger print scanner:- yes.
Compass - NO
Processor : reliable chip Qualcom 430 , ok for multitasking but not good enough for high end games.
Earphone wire? - Yes, in the box.
Authorised service centres : Motorola/Lenovo - yes.

पावर ब्यांक सुचवा. मोटो जी ५ प्लस. फोनचा खच्चून वापर असतो. वेळच्या वेळी चार्जिंग केलं जात नाही. किती mAh घ्यावी यात निर्णय होत नाही. अमेझॉन वगैरे शक्यतो नको. दुकानात जाऊन बघून घेणार.

एम आय ची २०००० एम ए एच ची पाहा. १५००/१७०० पर्यंत असावी.
सॅमसंग ची पण एक २५००० एम ए एच आहे.

कोणतीही पॉबॅ फास्ट चार्ज सपोर्ट करते का ते एकदा चेकून घेणे.

योकुने क्वोरा डिस्कशन लिंक दिलेली पाहिली. पहिला प्रतिसाद टेस्ट केला, बरोबर आहे.
माझ्याकडे TP ची छोटीशी विट्टीएवढी पावर बँक आहे(२००रु) दीड वर्षं . 4200 एमेच आहे त्याने 1000,1200,1800,2200 एमेच ब्याटरीवाले फोन्स त्यांच्या चार्जरच्या स्पीडनेच चार्ज होतात. आज 4000एमेच ब्याटरीवाला लेनोवो के६नोट चार्ज करून पाहिला, चार्जिंग होत नव्हते.
क्वोरावर चुकीची मते खोडली जातात, विरोधी मत नोंदवले जाते, आपले लेखन अशुध झाल्यास संपादन करायचे नोटिफिकेशन येते. राजकीय ,सामाजिक चर्चा मी पाहात नाही.

कुणी नोकीयाबद्द्ल का बोलत नाहीत इथे? रिसेंट फोन्स फार सुरेख आलेत त्यांचे.
मुख्य म्हणजे सगळे नोकिया फोन्स अ‍ॅन्ड्रॉईड वन या ऑएस चे आहेत. यावर कुठलेही वेगळी स्किन नसते. जे अ‍ॅन्ड्रॉईड गुगल नी काढलं ते जसंच्या तसं मिळतं पर्यायानी स्गळ्या अपडेट्स ही रिलीज झाल्याबरोबर मिळतात.
एकच गोष्ट म्हणजे यात फास्ट चार्ज काही देत नाहीत नोकियावाले...

सध्याच्या नोकियामध्ये गॅलरी क्लाऊडमध्ये असते, ऑफलाईन उपलब्ध नसते असं काहीतरी मी वाचलं होतं. कितपत तथ्य आहे त्यात?

गुगल फोटोज हे डिवाईस + क्लाऊड असं आहे. तुम्हाला ठरवता येतं किती फोटोज डिवाईस वर हवेत ते किंवा क्लाऊडवर बॅकअप करणं बंदही करता येतं. क्लाऊड फोटो स्टोरेज अनलिमिटेड आहे अ‍ॅन्ड्रॉईड वन डिवायसेस करता.

१) नोकीयाबद्द्ल का बोलत नाहीत इथे?
- मी वर दिलेला मोटो घेण्याअगोदर नोकिया 3.1 प्लसचा विचार करत होतो. दोघांची दुकानातली किंमत दहा हजार रु आहे. ब्याटरी नो'ची 3550 फास्ट चा नाही. मेटल back cover चा सिग्नल प्लास्टिकपेक्षा कमी येतो. रेडिओ रेकॉर्डिंग नाही. कंम्पस आहे ,मोटोला नाही. पणपण नोकियाने 32 पैकी 14 जिबी अगोदरच भरली आहे हे वाईट आहे. दोन अपग्रेड देणारेत पण गुगलवाले फारसे टेक्निकल बदल करत नाहीत, वरवर करतात . सिक्यु अपडेट्सना फारसे महत्त्व नाही कारण ,apps वाल्यांनी बरीच परमिशन्स अगोदरच घेतलेली असतात. अ‍ॅन्ड्रॉईड वन ला फारसा अर्थ नाही. मोटो ई५प्लसही स्टॉक androidआहे, कोणतीही स्किन नाही.

२)
क्लाऊड फोटो स्टोरेज अनलिमिटेड आहे अ‍ॅन्ड्रॉईड वन डिवायसेस करता.
- हे फक्त 'हाई क्वालटी' फोटोसाठी आहे, म्हणजे मेमरीमधले ३/५/७ एमबीज'चे फोटो फक्त १४० -१८०केबी एवढे कम्प्रेस केलेले अनलिमिटेड स्टोरिजमध्ये जातात.
'हाई रेझलुशन'चे फोटो आहे त्या एमबींचे ठेवता येतात (एका जीमेल अकाउंटला १५ जीबी)आणि ते मोजले जातात. अर्थात पुढे कधी प्रिंट्स काढायची झाल्यास हेच वापरावे लागतील.

मोटो जी ७ कसा आहे?

फुल एचडी प्लस सहा इंची स्क्रिनसाठी 3000 एमेच ब्याटरी कमी पडेल.
Camera bump - मोटो जी सिअरिजमध्ये हा उंचवटा मोठा वर आलेला आहे. चरे पडू शकतात.
परदेशातही वापरता येइल अशा फ्रि बँडस आहेत.
Android 9 pie वरच्या (कोणत्याही)फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंग गुगलनेच बंद केले आहे. हे इंम्पॉर्टंट असेल तर ओरिओ ओएस घेणे.
युएसबी सी पोर्ट आहे - ओटिजी चालणार नाही. पेनड्राईववर फाईल ट्रान्सफर करण्यात अडचण येईल/दुसरे डिवाइस वापरावे लागेल. ( युएसबी सी - युएसबी बी केबल जेव्हा मिळतील तेव्हा काही उपाय निघेल.)

सध्या मोबाईलमधील camera चे मेगापिक्सेलसचा आकडा मोठा दाखवण्याची खटपट सुरू आहे. 48 megapixel camera! गुगलच्या पिक्सेल 3/3ए मध्ये 12megapixelचाच क्याम्रा आहे. त्यात पिक्सेलची साईज 1.4micron आहे. ती कमी करून 0.8 micron केल्याने 48 झाले. पब्लिक खुश.
दुसरा एक बदल म्हणजे अधिकाधिक RAM देणे.

कुणी प्रोसेसर बघता का नाही फोन घेताना?
मोटोची चर्चा चालुये, नोकियाची आहे, पण त्यांनी दिलेले प्रोसेसर किती outdated आहेत हे तरी बघा.

Asus Zenfone max pro १ घेतला दोन दिवसापूर्वी, फ्लिकार्ट वरून, बॅटरी जबरदस्त आहे तशी ती नवीन फोनची असणारच पण चांगला वाटतोय. जास्त वापर नाही म्हणून जास्त महाग नाही घेतला. त्याआधी एचटीसी वापरला साडेचार वर्ष. तो अचानक पूर्ण बंद पडला. आता एचटीसीचा फारसा बोलबाला नाही.

कुणी नोकीयाबद्द्ल का बोलत नाहीत इथे? रिसेंट फोन्स फार सुरेख आलेत त्यांचे>>> हेच सांगायला आणि विचारायला आलो होतो.
घरातल्या एका सिनियर सिटिझन साठी ५.१ प्लस घेतला होता मागच्या ओक्टोबर मधे. आधी मायक्रोमॅक्स वापरत होते, ५.१ प्लस चा अनुभव चांगला आहे आतापर्यंतचा.
आता अजून एका सिनियर सिटीझन साठी घ्यायचा आहे. २.२ येतोय, specs वरुन तरी चांगला वाटतोय. बेसिक नोकिया १०० वरुन २.२ अशी उडी असल्याने (मुख्यतः व्हॉट्स अप आणि कॅमेरा यासाठी) हा पर्याय चांगला वाटतोय.
https://www.flipkart.com/nokia-2-2-steel-32-gb/p/itmfh54wfz4bqthk?pid=MO...

मोटोची चर्चा चालुये, नोकियाची आहे, पण त्यांनी दिलेले प्रोसेसर किती outdated आहेत हे तरी बघा.

होय, मिडियाटेक p18, p20, p22 इत्यादी वापरून किंमत कमी ठेवण्याचा प्रयत्न केलाय. नोकिया नाव व लायसन फी घेते एच एम डी ग्लोबल कंपनीकडून. पण आता नवीन 3.2, 4.2 वगैरेमध्ये नवीन काही नाही फक्त प्रसेसर क्वालकामचा 429, 435 टाकला. हे रिलाअबल आहेत पण शाओमि रेडमी 7s साडेदहा हजारात मोठी ब्याटरी, क्वालकाम 675 देते आहे.
थोडक्यात या एच एम डी ग्लोबल वाल्या नोकियाला गाशा गुंडाळावा लागेल असं वाटतय.
----------
सर्विस सेंटर :- हा महत्त्वाचा मुद्दा घ्या. Asus Zenfone कुणासाठी घेऊन देणे तर पुढे काय?
-------
नोकिया 8.1 सत्तावीस हजारावरून कुठे खाली आला पाहा.
---------

नोकिया २.२ घ्यायला हरकत नाही. फुल android one - 9 आहे. यामध्ये 16/2 आणि 32/3 असे दोन पर्याय आहेत. 32/3 शक्यतो घ्या.
एक शंका - 32 मधली किती मेमरी फ्री आहे ते पाहा. आताण लॉन्च झालाय, जरा थांबा.

महाश्वेता, एका प्रतिसादात मोबाईलचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मांडलास.
रेडमी नोट 7s मध्ये Snapdragon ६६० आहे. 7pro मध्ये ६७५. त्यापेक्षाही मस्त म्हणजे रियलमी 3 प्रो मध्ये 710 आहे आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट विथ फास्ट चार्जर मात्र इथे फक्त ब्रँडच्या नावावर काहीही फोन उचलताय असं दिसतंय.
Snapdragon 425, 430, 429, 439, 450, 625, 626, 630, 632 आणि 636 सुद्धा हे सगळे आऊटडेटेड प्रोसेसर झाले आहेत.
माझी यादी
१०,००० च्या खाली - मेडियटेक p70, p60 आणि बाकीचे कॉन्फिग चांगले असतील तर p22.
याव्यतिरिक्त मीडियाटेकचा एकही प्रोसेसर चांगला नाही. स्नॅपड्रॅगनचा 660 शिवाय एखाद्या प्रोसेसर दहा हजाराच्या आता मिळत असेल, तर घेऊन उपयोग नाही.
१०००० ते १८००० - या रेंजमध्ये फक्त स्नॅपड्रॅगन 675 आणि 710. मिडियटेकचा p70 कॉन्फिग चांगले असतील तरच...
वीस हजाराच्या पुढे - स्नॅपड्रॅगन 730, 730जी किंवा 855 नसेल, तर मोबाईल घेण्याचा विचार सुद्धा करू नये.

माझी फोनची यादी:
दहा हजाराच्या खाली - रियल मी 3, रेडमी नोट सेवन, रियल मी यु वन, रियल मी सी टू, इनफिनिक्स हॉट सेवन प्रो
दहा ते पंधरा हजार - रेडमी नोट सेवन एस, रेडमी नोट सेवन प्रो, रियल मी थ्री प्रो.
वीस हजाराच्या पुढे - अजून लॉन्च झाले नाहीत, पण लवकरच येणारे, रियल मी एक्स, रियल मी एक्स प्रो, रेडमी के ट्वेंटी, रेडमी के ट्वेंटी प्रो, आसुस 6z.

वन प्लस सेवन आणि वन प्लस सेवन प्रो ओव्हरप्राईजड आहेत हे माझं वैयक्तिक मत!

रियलमी'ची ओएस 'कलर ओएस' ,
वन प्लस'ची ओक्सिजन ओएस,

रेडमी'ची गुगल अन्ड्राईड. जाहिराती बंद करता येतात म्हणे रेडमि 7एस मध्ये. मग छानच. कॉल रेकॉर्डिंग हँडसेटमध्येच आहे हे कामाचे.
बाकी सिनिअर सिटिजननी प्रसेसरचा बाऊ करण्याची गरज नाही. सरळ स्टॉक अन्ड्राईड फोन घेणे.

Pages