Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04
रात्रीक ख्योळ चालल्यान
आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.
.
आण्णा - हरी नाईक
माई - इंदु हरी नाईक
छाया - छाया हरी नाईक
माधव - माधव हरी नाईक
दत्ता - दत्ता हरी नाईक
सरिता - सरिता दत्ता नाईक
पांडु
वच्छी - वत्सलाबाई
भिवरी
शेवंता - पाटणकरीण
पाटणकर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला बघुन अंगावर वसकला गं बाई
मला बघुन अंगावर वसकला गं बाई हो..>>>>> शेवटच्या ओळीवर अशक्य हसले.
वच्छी परत पहिल्या सारखी झाली.
वच्छी परत पहिल्या सारखी झाली.
वच्छी काय सुधरण्यातली नाही.
वच्छी काय सुधरण्यातली नाही. कालचा एपिसोड आबा नायकांवर होता. बहुदा त्यांचा कलम लागायची वेळ झाली.
बहुदा त्यांचा कलम लागायची वेळ
बहुदा त्यांचा कलम लागायची वेळ झाली.>>
काहीही म्हणा या serialमध्ली
काहीही म्हणा या serialमध्ली भूत funny वाटतात
(No subject)
काय त्या बिचाऱ्या निष्पाप
काय त्या बिचाऱ्या निष्पाप लहानग्या अभिरामला हाताशी धरून अघोरी कामं करते ती वच्छी . फाडफाड कानामागे द्यावं वाटत होतं तिला . माईने कधीही तिच्या कुटुंबाचं वाईट चिंतल नाही तिच्या मुलासोबत असं काही करायची लाज वाटायला हवी. संताप !! संताप !!
आता वच्छीच्या घोवाचो नंबर असा
आता वच्छीच्या घोवाचो नंबर असा वाटता.
वच्छी जेव्हा आण्णाच्या कुटुंबाचं वाईट बघते तेव्हा तिचंच वाईट होतं.
आता आण्णाचा निर्वंश व्हावा म्हणते तर तिचा नवरा जाईल.
मुलगा आधीच गेलाय
पण काही हि म्हणा राघूकाका
पण काही हि म्हणा राघूकाका पेक्षा वच्छी चा जंतर मंतर बाबा सॉलिड पॉवरफुल आहे. तो काहीतरी पटकन उच्चरतो आणि रस्त्याने चालणाऱ्या सरिता च्या पोटात दुखते. हा पण तो जेव्हा वच्छी कडे जादूटोणा करतो आणि अभिरामला बोलावतो ते फक्त को-इंसिडेन्ट होते तो त्याची पुस्तके न्यायला येतो (कैरी एपिसोडमध्ये आबा दफ्तरातील्या दोन पुस्तके काढायला लावतात).
सगळंच को-इंसिडेन्ट आहेत. पण
सगळंच को-इंसिडेन्ट आहेत. पण लोक त्याचा संबंध जादु मंतरशी लावतात.
होय सस्मित ...
होय सस्मित ...
कालच्या भागात आण्णाच्या शेतात
कालच्या भागात आण्णाच्या शेतात छायाने तिच्या पंटरला घाबरवला.. किती बोरिंग होतं ते सर्व.
आज तिचं बिंग आण्णासमोर फुटतं की काय ते बघायचं
कालचा भाग कोकणातली 'रजनी
कालचा भाग कोकणातली 'रजनी अण्णा' दत्ता भाऊ (तवॊ) आणि सरिता (हॉट प्यान) यांच्या लव स्टोरीवर खर्चिला पण आपले अभिराम भाऊ एपिसोड संपता संपता घाबरवून गेले कि हो. त्या सासू सुनेचा बंदोबस्त करायची वेळ आली आहे.
अण्णा मावळतीची जमीन
अण्णा मावळतीची जमीन शेवंताच्या नावावर करायला निघालेत.
मावळतीची जमीन शेवंताच्या
मावळतीची जमीन शेवंताच्या नावावर न करता पाटणकाराच्या नावावर करणार. ती निर्वंशबाई का देवीची जागा असल्याने निर्वंशबाई/देवी पाटणकराचा घास घेणार. आण्णांना रान मोकळे.
सरिता (हॉट प्यान) ????
सरिता (हॉट प्यान) ????
prajkta wadaye
prajkta wadaye
सरिता खरेच छान काम करते. एवढी
सरिता खरेच छान काम करते. एवढी मॉड असुनही खेडवळ स्त्रीचा अभिनय चोख करते. वच्छी, सरिता, आबा, दत्ता, चोंगट्या, पांडु, नेने, रघुकाका ही पात्रे अस्सल वाटतत.
मला एक कळत नाही की या
मला एक कळत नाही की या बायकांना मोठेपणा घ्यायची काय हौस असते? कालच्या भागात ती सरीता शाळेतल्या मुलांना विचारते की अभिराम कुठे आहे? तर ते म्हणतात की तो मावळतीच्या जमिनीकडे गेलाय. ते ऐकुन ती एकटीच तिकडे जाते. अरे तुझा घोव कुठे परदेशी गेलाय काय भवाने? त्या दत्ताला बरोबर नेला असता तर हिचे काही बिघडले असते का? पण नाही, किती गं बाई मी हुशार, किती गं बाई मी धाडसी !!
बहुतेक अलबत्या गलबत्या नाटक पाहीलेले दिसतेय हिने. आता ही तिथे कोकलत गेली, मग त्या दोन हडळणींनी तिला धरले. अर्थात पांडु व सरीता दोघे हुशार असल्याने जय सरीताचाच होईल.
रश्मी..
रश्मी..
आणि हो.. सेम पिंच बरंका
खूप लांबड लावलीय निर्वशी
खूप लांबड लावलीय निर्वशी प्रकरणात , बाकीच्या सीरियलची लागण होउ देउ नका या चांगल्या सीरियल ला
पण काही म्हणा आजचा भाग पूर्ण
पण काही म्हणा आजचा भाग पूर्ण सरिता रॉक्स, आणि शेवटी माई. किती छान आणि balanced समजावलं त्यांनी शोभाला, दत्ताला पण बोलू दिलं नाही, अर्थात त्या 'हडळणींना काही फरक पडणार नाहीच म्हणा. पण मला आज सरिता आणि माई लय आवडल्या.
हो... माईन तां कमाल केल्यान.
हो... माईन तां कमाल केल्यान. काय झाप-झाप-झापल्यान त्या वच्छीक अन तिकां सुनेक.
कालचो भागात माका माईचो बोलणा लय आवाडल्यान.
मला तर माईच्या तोंडून संतवाणी
मला तर माईच्या तोंडून संतवाणी ऐकू आली. पण छान समजावले तिने. शेवटी सगळेच भडक डोक्याचे असून कसे चालेले. आणि सरिता रिअली रॉक्स !!!!
या सिरीयल ची एक खासियत आहे
या सिरीयल ची एक खासियत आहे यात कोणी पर्टिक्युलर एक व्यक्ती हिरो किंवा हेरॉईन नाहीत. तर सिरियलची सगळेच कलाकार व्यक्तिमत्वाचे एक एक कंगोरे घेऊन आहेत. मागे माधव लग्न प्रकरणात नेने वकील किती स्वार्थी आहे हे दाखवले. तो अण्णांनी दिलेला हार त्या सासू सासर्यांपासून घेऊन परस्पर आपल्या बायकोकरवी स्वतःच्या तिजोरीत ठेवून घेतला होता.
हो.. अगदी बरोबर आहे.
हो.. अगदी बरोबर आहे.
आ माधवचे लग्न कधी झाले?
आ माधवचे लग्न कधी झाले?
माझो आजचो भाग बघूचा रवलंय गो
माझो आजचो भाग बघूचा रवलंय गो बाय माजे. कोणी तरी अपडेट्स देईल काय?
माझो पन रवलो..
माझो पन रवलो..
सांधण व्हॅली बघुक गेलतां म्हनुन बघुचा रवला..
माधवचे लग्न कधी झाले?
माधवचे लग्न कधी झाले?
झाल नाही .. ठरलं होतं ते
Pages