मूगडाळीच्या चकल्या

Submitted by डॅफोडिल्स on 15 October, 2009 - 05:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मूगडाळ १ वाटी
मैदा ३ वाट्या
पांढरे तिळ, ओवा, जिरं आवडी प्रमाणे
लाल मिर्ची पावडर, मिठ चवीप्रमाणे
तळण्यासाठी तेल

क्रमवार पाककृती: 

कुकरच्या एका डब्यात मूगडाळ साधारण वरणाला पाणि घालतो तितके पाणि घालून लावावी.
व कुकरच्या दुसर्‍या डब्यात ३ वाट्या मैदा (सुका) अजिबात पाणि न घालता घट्ट झाकण लाउन ठेवावा. (तलम मलमलच्या कापडात पुरचुंडी बांधून मैदा ठेवला तरी चालतो.)
नेहमीप्रमाणे वरणभाताचा कुकर लावतो तेव्ढ्या वेळ कुकर ठेवावा.
कुकर थंड झाल्यावर मूगडाळ घोटून घ्यावी.
मैदा चाळून घ्यावा. म्हणजे वाफेने गुठळ्या झाल्या असल्यास निघून जातात आणि हलका होतो.
मैद्यात चवीप्रमाणे मीठ, तिखट, ओवा, पांढरे तिळ, आवडत असल्यास खरबरित वाटलेले जिरे टाकावे व दोन चमचे गरम तेलाचे मोहन घालून नंतर मुगाच्या शिजवलेले वरण टाकून पिठ घट्ट्सर भिजवून घ्यावे.

सोर्‍याला तेलाचा हात लाऊन पिठ भरून साधारण दोन किंवा तिन वेढ्यांच्या एकसारख्या चकल्या कराव्या व तळाव्यात.

chakli.jpg

अधिक टिपा: 

चकली तळताना तेल चांगले तापवून मग मंद आचेवर चकल्या तळाव्यात.
एक्दम प्रखर आचेवर चकल्या तळल्याने त्या लवकर तळल्या जाउन नंतर थंड झाल्यावर मउ पडतात.
पिठात तेलाचे मोहन जास्त झाले तर चकल्या तेलात तळताना हसतात. विरघळतात.:)
पिठ भिजवताना हळद वापरू नये. चकली तळल्यावर काळी दिसते.

माहितीचा स्रोत: 
जुन्या मायबोलीवरचे माझे पोस्ट. :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणत्याही प्रश्नाचं उत्तर असं देता येईल
१. करुन पाहा, मग कळेल (हे 'त्या' भाषेतलं उत्तर )
२. करणार्‍यावर अवलंबून आहे (वस्तुनिष्ठ उत्तर)
Proud

मिलिंदा मग तु करून बघच. Happy
हो चांगल्या होतात कणकेच्या. मैद्या ऐवजी तांदळाचे पिठ पण वापरू शकतोस.

३ वाट्या मैदा आहे, १-१ वाटी कणीक, मैदा आणि तांदूळ पीठ वापरली, तर कशा होतील? Proud

jokes apart मस्त कृती आहे डॅफो. करून पाहीन. कणीक प्रीफर करेन Happy
टीप्ससाठी खास धन्यवाद!

डॅफो, आज आणलीस नव्या माबोत Happy बरं झालं. मी कालच जुन्यात जाऊन पाहिली.
खूप छान होतात या चकल्या. हलक्या होतात( खूप खाल्ल्या जातात Wink ) मी बरेचदा या पद्धतीने करते.

डॅफोच्या ह्या जुन्या माबोच्या फेमस चकल्या. चांगल्या होतात.
कणीकेच्या बाबतीत तेल ज्यास्त पितात(माझा अनुभव्),चवीला लागतात छान पण. कणीकेच्या व्यवस्थित तळल्या नाही गेल्या तर नरम पडतात.

चकल्या सोप्या वाटत आहेत.भाजणी नाही म्हणून चकली नाही असे एक छान कारण होते माझ्या कडे.आता ते उरले नाही. एकच शंका मैदा वाफवून घेतल्याने काय होते?

करुन बघितल्या कणिक वापरुन. छान झाल्या होत्या, शेवटपर्यंत मस्त कुरकुरीत राह्यल्या होत्या. पण मनु म्हणाली तसं तेल जास्त प्यायल्या होत्या असे वाटले. कारणं कदाचित अशी असतील -
१. मी प्रमाण वेगळं घेतले होते. (१.५ कणिक, १ तांदळाची पिठी, ०.५ बेसन, १ मूग डाळ, १ उडीद डाळ)
२. पीठ बहुतेक थोडे जास्त सैल झालं होतं,
३. मोहन घातलं नसतं तरी चाललं असतं (मी असं एका मासिकात वाचलं).

आईने ह्या वेळी अशाच केल्या होत्या पण तळुन झाल्यावर चुरा झाला चकल्यांचा. असं का??>> बहुतेक मोहन जास्त झाल्यामुळे त्या हसून हसून विरघळून गेल्या असाव्यात Happy

कोणी बेक करून केल्या आहेत काय ? तळण्याऐवजी बेक केल्या तर काय फरक पडतो तसेच काय सेटिंग ठेवावे बेक करण्यासाठी ?
मैद्याऐवजी कणिक वापरून आणि बेक केल्या तर तेल जास्ती पिणार नाही आणि जास्ती health conscious होतील.

छान

मैदा पण कुकर मध्ये वाफवण्याचा फंडा समजला नाही. Uhoh काही खास कारण??

साध्या भाजणीच्या चकल्या मागे ट्राय केल्या त्या फसल्या. आता ह्या करून बघाव्यात काय? हसणार तर नाहीत ना? Wink

Pages