मूगडाळ १ वाटी
मैदा ३ वाट्या
पांढरे तिळ, ओवा, जिरं आवडी प्रमाणे
लाल मिर्ची पावडर, मिठ चवीप्रमाणे
तळण्यासाठी तेल
कुकरच्या एका डब्यात मूगडाळ साधारण वरणाला पाणि घालतो तितके पाणि घालून लावावी.
व कुकरच्या दुसर्या डब्यात ३ वाट्या मैदा (सुका) अजिबात पाणि न घालता घट्ट झाकण लाउन ठेवावा. (तलम मलमलच्या कापडात पुरचुंडी बांधून मैदा ठेवला तरी चालतो.)
नेहमीप्रमाणे वरणभाताचा कुकर लावतो तेव्ढ्या वेळ कुकर ठेवावा.
कुकर थंड झाल्यावर मूगडाळ घोटून घ्यावी.
मैदा चाळून घ्यावा. म्हणजे वाफेने गुठळ्या झाल्या असल्यास निघून जातात आणि हलका होतो.
मैद्यात चवीप्रमाणे मीठ, तिखट, ओवा, पांढरे तिळ, आवडत असल्यास खरबरित वाटलेले जिरे टाकावे व दोन चमचे गरम तेलाचे मोहन घालून नंतर मुगाच्या शिजवलेले वरण टाकून पिठ घट्ट्सर भिजवून घ्यावे.
सोर्याला तेलाचा हात लाऊन पिठ भरून साधारण दोन किंवा तिन वेढ्यांच्या एकसारख्या चकल्या कराव्या व तळाव्यात.
चकली तळताना तेल चांगले तापवून मग मंद आचेवर चकल्या तळाव्यात.
एक्दम प्रखर आचेवर चकल्या तळल्याने त्या लवकर तळल्या जाउन नंतर थंड झाल्यावर मउ पडतात.
पिठात तेलाचे मोहन जास्त झाले तर चकल्या तेलात तळताना हसतात. विरघळतात.:)
पिठ भिजवताना हळद वापरू नये. चकली तळल्यावर काळी दिसते.
करुन पाहीन
करुन पाहीन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खायला येईन ग डॅफो
खायला येईन ग डॅफो![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हे जास्त चांगलं!
हे जास्त चांगलं!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
डॅफो, ह्यात मैद्याऐवजी कणिक
डॅफो, ह्यात मैद्याऐवजी कणिक वापरली तरी चकल्या तितक्याच चांगल्या होतात का?
कोणत्याही प्रश्नाचं उत्तर असं
कोणत्याही प्रश्नाचं उत्तर असं देता येईल
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
१. करुन पाहा, मग कळेल (हे 'त्या' भाषेतलं उत्तर )
२. करणार्यावर अवलंबून आहे (वस्तुनिष्ठ उत्तर)
कणकेच्या जास्त चांगल्या
कणकेच्या जास्त चांगल्या व्हायला पाहिजेत (असं माझं मत..
)
मिलिंदा, <<१. करुन पाहा, मग
मिलिंदा, <<१. करुन पाहा, मग कळेल (हे 'त्या' भाषेतलं उत्तर )>> बरं बरं!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मिलिंदा मग तु करून बघच. हो
मिलिंदा मग तु करून बघच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हो चांगल्या होतात कणकेच्या. मैद्या ऐवजी तांदळाचे पिठ पण वापरू शकतोस.
३ वाट्या मैदा आहे, १-१ वाटी
३ वाट्या मैदा आहे, १-१ वाटी कणीक, मैदा आणि तांदूळ पीठ वापरली, तर कशा होतील?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
jokes apart मस्त कृती आहे डॅफो. करून पाहीन. कणीक प्रीफर करेन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
टीप्ससाठी खास धन्यवाद!
डॅफो, आज आणलीस नव्या माबोत
डॅफो, आज आणलीस नव्या माबोत
बरं झालं. मी कालच जुन्यात जाऊन पाहिली.
) मी बरेचदा या पद्धतीने करते.
खूप छान होतात या चकल्या. हलक्या होतात( खूप खाल्ल्या जातात
तुझीच आठवण आली लालू म्हणून
तुझीच आठवण आली लालू म्हणून इथे नव्याने टाकल्या. मलाही जुन्या माबोवर सापडत नव्ह्त्या.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तय रेसिपी!!
मस्तय रेसिपी!!
इथे आहे बघ -
इथे आहे बघ - http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=103383&post=427463#P...
मी या पद्धतीने केलेल्या माझ्या इथल्या मैत्रिणींना आवडल्या, मी ही लिन्क त्यांना दिली होती.
डॅफोच्या ह्या जुन्या माबोच्या
डॅफोच्या ह्या जुन्या माबोच्या फेमस चकल्या. चांगल्या होतात.
कणीकेच्या बाबतीत तेल ज्यास्त पितात(माझा अनुभव्),चवीला लागतात छान पण. कणीकेच्या व्यवस्थित तळल्या नाही गेल्या तर नरम पडतात.
चकल्या सोप्या वाटत आहेत.भाजणी
चकल्या सोप्या वाटत आहेत.भाजणी नाही म्हणून चकली नाही असे एक छान कारण होते माझ्या कडे.आता ते उरले नाही. एकच शंका मैदा वाफवून घेतल्याने काय होते?
मैदा वाफवून घेतल्यामुळे तो
मैदा वाफवून घेतल्यामुळे तो हलका होतो. चकली एक्दम खुस्कुशित होते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
करुन बघितल्या कणिक वापरुन.
करुन बघितल्या कणिक वापरुन. छान झाल्या होत्या, शेवटपर्यंत मस्त कुरकुरीत राह्यल्या होत्या. पण मनु म्हणाली तसं तेल जास्त प्यायल्या होत्या असे वाटले. कारणं कदाचित अशी असतील -
१. मी प्रमाण वेगळं घेतले होते. (१.५ कणिक, १ तांदळाची पिठी, ०.५ बेसन, १ मूग डाळ, १ उडीद डाळ)
२. पीठ बहुतेक थोडे जास्त सैल झालं होतं,
३. मोहन घातलं नसतं तरी चाललं असतं (मी असं एका मासिकात वाचलं).
चकलि एकदम छान होते खर तेल खुप
चकलि एकदम छान होते खर तेल खुप लागते.
आईने ह्या वेळी अशाच केल्या
आईने ह्या वेळी अशाच केल्या होत्या पण तळुन झाल्यावर चुरा झाला चकल्यांचा. असं का??
आईने ह्या वेळी अशाच केल्या
आईने ह्या वेळी अशाच केल्या होत्या पण तळुन झाल्यावर चुरा झाला चकल्यांचा. असं का??>> बहुतेक मोहन जास्त झाल्यामुळे त्या हसून हसून विरघळून गेल्या असाव्यात![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गीतांजली पिठ खुप सैलसर भिजवलं
गीतांजली पिठ खुप सैलसर भिजवलं होतंस का ?
बी म्हणतोय ते बरोबर आहे. मोहन खुप जास्त झालं असेल.
योडी
पुन्हा करायच्यात यंदा.. खरं
पुन्हा करायच्यात यंदा..
खरं तर अधूनमधून कधीही होत असतात.
कोणी बेक करून केल्या आहेत काय
कोणी बेक करून केल्या आहेत काय ? तळण्याऐवजी बेक केल्या तर काय फरक पडतो तसेच काय सेटिंग ठेवावे बेक करण्यासाठी ?
मैद्याऐवजी कणिक वापरून आणि बेक केल्या तर तेल जास्ती पिणार नाही आणि जास्ती health conscious होतील.
छान
छान
डॅफोडिल्स, लवकरच ट्राय करेन.
डॅफोडिल्स, लवकरच ट्राय करेन. मस्त रेसिपी आहे.
एकच प्रश्न कणिक घेऊ की मैदा?
मैदा !
मैदा !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काय सुरेख दिसतायंत चकल्या
काय सुरेख दिसतायंत चकल्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्स डॅफो. काही बिघडल नाही तर
धन्स डॅफो. काही बिघडल नाही तर फोटो नक्की टाकते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
डॅफो, या शिजवलेल्या वरणाच्या
डॅफो, या शिजवलेल्या वरणाच्या आहेत तर टिकतील का? प्रवासात घेवुन गेलं तर खराब तर होणार नाहीत?
मैदा पण कुकर मध्ये वाफवण्याचा
मैदा पण कुकर मध्ये वाफवण्याचा फंडा समजला नाही.
काही खास कारण??
साध्या भाजणीच्या चकल्या मागे ट्राय केल्या त्या फसल्या. आता ह्या करून बघाव्यात काय? हसणार तर नाहीत ना?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
Pages