तो काळच जबरदस्त होता. स्वप्नवत वाटणारा काळ!
भारत स्वतंत्र होऊन जवळपास २० वर्ष उलटून गेली होती. एका पिढीने हालअपेष्टा सोसल्या होत्या, आणि येणारी तरुणाई नव्या भारताचं सोनेरी स्वप्न बघत होती!
आणि त्या सोनेरी स्वप्नाला मुलामा चढवला चंदेरी दुनियेने!
१९६० ते १९८०, हा काळच वेगळा होता.
तिकडे भारतीय चित्रपटसृष्टीचा पहिला सुपरस्टार रसिकांच्या मनावर मोहिनी घालत होता. संपूर्ण हिंदी भाषिक राज्यांत त्याचा बोलबाला होता. तो तरुणाईला स्वप्न दाखवण्यात पटाईत होता. तरुणींना भुरळ घालण्यात तरबेज होता.
राजेश खन्ना!
मात्र दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत याची गंधवार्ताही नव्हती, कारण त्यांचे स्वतःचे म्हणावे असे सुपरस्टार होते!
नव्हे देव होते!
तमिळनाडूत शिवाजी गणेशन!
कर्नाटकात राजकुमार!
...आणि आंध्रात नंदमुरी तारक रामाराव...उर्फ...
NTR ...
तुलनेचा विषय नाही, पण या सर्वांमद्ये सगळ्यात जास्त देवत्व मिळालं असेल, तर NTR यांनाच...
रामापासून रावणापर्यंत, कृष्णापासून दुर्योधनापर्यंत सगळ्या भूमिका साकारत हा माणूस देवच बनून गेला होता. याचे चित्रपट बघण्यासाठी थेटरात जाताना लोक चपला बाहेर काढून ठेवत असत. याची पडद्यावर एंट्री झाल्यावर लोकांकडून पडद्यावर पुष्पवर्षाव झालाच म्हणून समजा. लोकप्रियतेचं एव्हरेस्ट गाठणं म्हणजे काय, हे NTR यांच्याकडे पाहूनच लक्षात येईल.
...आणि अशाच शिखरावर असताना ते सरळ जमिनीवर उतरले, आणि सामान्य माणसांमध्ये मिसळले.
...सहा महिन्यात नवा पक्ष स्थापन करून ते आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले...(त्यांनी नवा पक्ष का स्थापन केला याची मोठीच रंजक कथा आहे. नक्की वाचा)
मात्र यानंतर NTR यांच्या लोकप्रियतेला एक काळीकुट्ट किनार लाभली, दुसरं लग्न, फॅमिलीमध्ये आलेला तणाव आणि चंद्राबाबू नायडू यांनी दिलेला धोका, यातच NTR १९९६ साली निर्वतले.
आणि नंदमुरी परिवाराची खरी सूत्रे गेली चंद्राबाबूंकडे... वास्तविक पाहता त्यांचा मोठा मुलगा नंदमुरी हरिकृष्ण हाच त्यांच्या तेलगू देसम पक्षाचा खरा वारसदार होता. NTR यांनी जेव्हा संपूर्ण आंध्र पिंजून काढला, तेव्हा हरिकृष्णने तब्बल ७५,००० किमी गाडी चालवली होती. पण NTR यांच्या दुसऱ्या लग्नामुळे हरिकृष्ण दुरावले गेले. त्यांनी चंद्राबाबूंची साथ दिली, आणि चंद्राबाबू तेलगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा बनले.
हरिकृष्ण ना राजकारणात मोठी उंची गाठू शकले, ना अभिनयात.
आणि इतिहासाची चाके पुन्हा फिरलीत... हरिकृष्ण यांनीही दोन लग्ने केलीत.
आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीपासून झालेला मुलाने आपल्या आजोबांचंच रूप उचललं होतं. मात्र हा विपरीत परिस्थितीत जन्माला आला होता. हरिकृष्ण फॅमिलीपासून बरेच दुरावले होते. धाकटा भाऊ बाळकृष्णच परिवारात वर्चस्व वाढलं होतं आणि फिल्म इंडस्ट्रीतसुद्धा.
(बाळकृष्ण म्हणजे मिथुन चक्रवर्तीच! त्याचा धांगडधिंगा पिटातल्या प्रेक्षकांना आवडत असे, मात्र NTR यांच्या अभिनयापासून आणि प्रसिद्धीपासून तो कोसो दूर होता.)
आजोबांची डिट्टो कॉपी असलेल्या या मुलाचं नावही आजोबाच्या नावावर ठेवलं होतं. NTR Jr ... उर्फ तारक!
आणि या मुलाने आजोबांच्याच चित्रपटातून डेब्यू केला. बालकलाकार म्हणून.
ज्येष्ठ दिग्दर्शक गुणशेखर यांनी त्याच्यातला कलाकार बरोबर हेरला. त्याच्यामध्ये त्यांना NTR यांचा भास झाला, आणि १९९६ साली या तारक पुन्हा चित्रपटांत आला. आजोबांना ज्या भूमिकेने देवत्व मिळवून दिले, तीच प्रमुख भूमिका त्याने सर्वात प्रथम साकारली. रामाची!
चित्रपट तर यशस्वी ठरलाच, परंतु सर्वोत्कृष्ट बालचित्रपट म्हणून या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.
गुणशेखर यांनीच त्याच्यातला स्पार्क ओळखला, आणि त्याला SS राजामौली यांच्याकडे पाठवलं. याला बघताच त्यांनी त्याला आपल्या स्टूडेंट नंबर वन साठी साइन केलं.
पण त्यांच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे हा प्रोजेक्टही खूप वेळेपर्यंत थांबला, आणि Ninnu Choodalani मधून याने पदार्पण केलं. वयाच्या १७ व्या वर्षीच. मात्र याच प्रदार्पण तसं दुर्लक्षितच राहिलं.
त्यानंतर मात्र हा स्टूडेंट नंबर वन झाला आणि इतिहास घडवला!
हा चित्रपट सुपरहिट ठरलाच, परंतु नंदमुरी परिवारात नवाच सुपरस्टार उदयास आल्याचे लोकांना खात्री पटली. राजामौली आणि हा, दोन्हीही आता टॉप लीगमध्ये पोहोचले.
त्याचे पुढचेही चित्रपट यशस्वी ठरलेच, पण त्यांना स्टूडेंट नंबर वनसारखी कामगिरी करता आली नाही.
पुन्हा राजामौळी आणि त्याची जोडी जमली, आणि simhadri सुपरहिट ठरला.
त्यांनतर याने बऱ्याच चित्रपटांत काम केलं, पण एव्हरेज सक्सेसच्या पुढे हातात काही लागलं नाही.
त्यातच त्याला टॉप दिग्दर्शक पुरी जगन्नाथने साइन केलं, 'आंध्रवाला' साठी.
आंध्रवालाने जबरदस्त हाईप क्रिएट केली, ओव्हर बजेट असलेला आंध्रवाला जबरदस्त पडला. आणि इथून त्याने ओळीने फ्लॉप द्यायला सुरुवात केली.
त्यातच त्याचं वजन वाढायला लागलं. बेढब ज्युनियर NTR ची जोकर म्हणून संभावना होऊ लागली. नाचतानाही त्याची होणारी दमछाक दिसायला लागली.
टॉप लीगमधूनही तो खाली पडला. बाळकृष्ण अजूनही ऍक्टिव्ह होताच, आणि त्याने याच्याशी मुद्दाम पंगा घ्यायला सुरुवात केली होती. त्याचे चित्रपट जबरदस्त कमाई करत होते. हरीकृष्ण त्यात राजकारणात ऍक्टिव्ह होण्याचे प्रयत्न करत होतेच, पण तेही अपयशी ठरले. सावत्र भाऊ कल्याण रामही यथातथाच होता.
हा मात्र निराशेच्या गर्तेत बुडत गेला...
त्यातच याची महेश बाबूशी भेट झाली, महेश बाबूनेच याला वजन कमी करण्याचा सल्ला दिला.
आणि संकट मोचक राजमौली यावेळीही त्याच्या मदतीस धावून आला. आणि याने यावेळी आजोबांनाही सोबतीला घेतले. आजोबांनाही त्याच्या चित्रपटात काम करायला लावलं...
आणि एनटीआर मॅजिक काय असतं हे लोकांना कळलं...
यमदोंगा साठी त्याला तब्बल 20 किलो वजन कमी करण्यास सांगितले. आणि या चित्रपटातून एक नवाच तारा प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटात एनटीआर मध्ये आमूलाग्र बदल घडला...
आणि या चित्रपटाने इतिहास रचला...
या चित्रपटात कोण नव्हतं?
Jr. NTR
Priyamani
Mamta Mohandas
Mohan Babu
Khushboo
आणि साक्षात NTR.
यमदोंगा त्यावर्षीचा सगळ्यात हिट चित्रपट ठरला. तेलगू चित्रपटसृष्टीतला सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये तो नावाजला गेला. आणि ज्युनिअर एनटीआर याला फिल्मफेअर अवॉर्डने सुद्धा गौरविण्यात आले. आणि इथून त्याने मागे वळून बघितले नाही एनटीआर जोकर म्हणून संभावना करणाऱ्या लोकांनी सुद्धा त्याचा डान्स बघून तोंडात बोटे घातली यात त्याची अपार मेहनत होती, आणि इथूनच त्यांच्या यशाचा खरा प्रवास सुरु झाला.
यानंतरही त्याने अनेक अपयश बघितले, मात्र आता त्याला टॉप लीग मधून हटवण्याची कुणाची ताकत नव्हती.
बादशहा चित्रपटाने त्याचा झेंडा सातासमुद्रापलीकडे रोवला. रजनीकांत इतकीच लोकप्रियता लाभलेला हिरो म्हणून त्याच जपानमध्ये कौतुक करण्यात आलं.
पुरी जगन्नाथ बरोबर आंध्रावाला सोबत त्याच्या काही कटू आठवणी होत्या, पण तरीही त्याने पुरी जगन्नाथ बरोबर पुन्हा काम केलं, आणि टेम्परसारखा सुपर डुपर हिट चित्रपट दिला....
सुकुमारने त्याला एका वेगळ्या चित्रपटासाठी साइन केलं, आणि नाना प्रेमाथो तू सुपर डुपर हिट ठरला....
जनता गॅरेज मध्ये तो आणि मोहनलाल एकत्र आले, आणि जनता गॅरेज त्या वर्षीचा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला. फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा त्याने आपल्या नावावर केला....
त्याच्या आजोबांनंतर तीन भूमिका साकारणारा तो तेलगू चित्रपटसृष्टीतला एकमेव अभिनेता ठरला. आजोबांनंतर रावणाचा रोल घेणारा तो एकमेव अभिनेता ठरला. सावत्र भाऊ कल्याण रामच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाने त्याचेच अनेक रेकॉर्ड मोडले. जय लव कुश!
यानंतर हा शब्दांचा मास्टर त्रीविक्रम यांच्याबरोबर पहिल्यांदा काम करण्यास सज्ज झाला. यातच नंदमुरी हरिकृष्णा यांचे अपघाती निधन झाले. ढसाढसा रडणारा एनटीआर दहा दिवसात सेटवर पुन्हा हजर झाला... अरविंदा समेथा वीरा राघवा सुपरहिट ठरला.
आता राजामौली त्याला पुन्हा एकदा घेऊन चित्रपट बनवतोय. त्यासाठी याच्यावर जवळजवळ तीनशे कोटींचा डाव खेळलाय...
तेलगूमधल्या सगळ्यात जास्त हिट शोचा रेकॉर्ड याच्याच नावावर आहे...
जीवघेण्या अपघातातून सावरून पुन्हा नव्या जोमाने कामाला लागणारा हाच...
बाळकृष्णाच्या चाली समजणार पण कधीही प्रत्युत्तर न देणारा एनटीआर हाच...
प्रभास ने बाहुबलीत काम केलं नसतं तर कोणी केलं असतं याला राजमौलिंच उत्तर होतं तारक...
तुझ्यापेक्षा bhallaldewa कोणी चांगला साकारला असता तेव्हा राणाचं उत्तर होतं तारक...
तेलगू चित्रपट सृष्टीतला सगळ्यात जास्त मेहनत करणारा अभिनेता कोण तर महेश बाबूच उत्तर होतं तारक...
मात्र आता हा शांतपणे पुढच्या चित्रपटाची तयारी करतोय...
... आजोबांचा आशीर्वाद घेऊन....
आज त्याचा वाढदिवस!!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाघा!!!
१. आपल्या जवळचा मित्र आणि तारणहार असलेल्या राजामौळी बरोबर!
२.वीरा राघवा - शिकार करून आलेला वाघ...
३. शांत आणि विचारी, असाच रियल लाईफ मध्ये सुद्धा!
४. स्मार्ट मास्टरमाइंड!!!
५. Sr NTR आणि Jr NTR
तुझ्या Fav star वर धागा काढला
तुझ्या Fav star वर धागा काढला finally
nepotism overloaded !
nepotism overloaded !
Nice info
Nice info
@shraddha - धन्यवाद, हो
@shraddha - धन्यवाद, हो वाढदिवसाचा मुहूर्त साधून काढायचा होता. लेजेन्ड्स बॉंर्ण इन मे असं म्हणावं काय?
@ चरप्स - हो आहेच घराणेशाही, आणि मुळात तेलगू चित्रपटसृष्टीत ९० टक्के स्टार घराणेशाहीतूनच आलेत. पण यामुळे ntr jr ला सगळं घराणेशाहीमुळेच मिळालं असं अजिबात नाही. त्यात त्याची मेहनत आहेच...
@urmila - थँक्स!
मला आवडतात याचे चित्रपट.
मला आवडतात याचे चित्रपट. एखादा फोटो का नाही टाकला लेखात?
छान लिहिलय.
@शालिदा - हेच माझ्या डोक्यात
@शालिदा - हेच माझ्या डोक्यात आलं, आणि पटकन चार फोटो टाकलेत....
@अज्ञातवासी >> Wht about oct
@अज्ञातवासी >>
Wht about oct
अज्ञा! एवढा Research.बापरे!
अज्ञा! एवढा Research.बापरे!
Jr NTR चे मी आजपर्यत दोनच मुवी पुर्ण पाहिलेत; जनता गराज आणि जय लव कुश. Now Waiting for the List...
@ मन्या S - थांकू... आणि
@ मन्या S - थांकू... आणि रिसर्च वगैरे नाही, पण खूप वाचलंय तेलगू चित्रपटसृष्टीविषयी...
तसा BBA ला असताना एक सँपल रिसर्च पेपर तयार केला होता, अल्लू अर्जुन, JR NTR आणि राम चरण यांचं कंपारिजन, तेव्हापासूनच ज्युनियर NTR आवडायला लागला.
आणि लिस्ट तेलगू चित्रपटांच्या धाग्यावर! होप तुला आतातरी JR NTR आवडेल!!!
Finger crossed.. त्याचे मुवीज
Finger crossed..
त्याचे मुवीज आणि काम चांगलं आहे ना मग नक्की आवडेल.
त्याच्या दोनच मुवी पुर्ण पाहिल्यात तेही story खुप चांगली होती म्हणुन..,
बाकीच्या बघेल जमेल तसं तुझी लिस्ट आल्यावर
92 मध्ये NTR गेले तर मग 96
92 मध्ये NTR गेले तर मग 96 मध्ये सिनेमात काम कोणी केलं? माझा काहीतरी गोंधळ होतो आहे.
@जिज्ञासा - NTR जानेवारी
@जिज्ञासा - NTR जानेवारी १९९६ मध्ये गेले. थँक्स! टाइपो सुधारला आहे.
Jr Ntr ने १९९१ साली आलेल्या ब्रम्हर्षी विश्वामित्र या NTR यांच्या चित्रपटात बालकलाकार म्हणून छोटीशी भूमिका साकारली. तो याचा डेब्यु म्हटलाय!
१९९६ साली आलेल्या रामायण चित्रपटात याने पुन्हा रामाची भूमिका साकारली, ही त्याची पहीली प्रमुख भूमिका, पण बालकलाकार म्हणूनच!
२००१ साली आलेल्या Ninnu Choodalani मधून याने खऱ्या अर्थाने पदार्पण केलं...
बरिच माहिती मिळाली sr. Nd jr
बरिच माहिती मिळाली sr. Nd jr. Ntr बद्दल ..
लेख चांगलाय .
लेख चांगलाय .
सिनियर NTR चा फोटो टाकायला हवाय
धन्यवाद मेघा.
धन्यवाद मेघा.
धन्यवाद जाई, फोटो टाकलाय...