रात्रीस खेळ चाले-२ : नवीन

Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04

रात्रीक ख्योळ चालल्यान

आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

r1.jpg

.

Annaa1.jpgआण्णा - हरी नाईक
Mai2.jpgमाई - इंदु हरी नाईक
Chhaya1_0.jpgछाया - छाया हरी नाईक
Madhav1.jpgमाधव - माधव हरी नाईक
Datta1.jpgदत्ता - दत्ता हरी नाईक
Sarita2.jpgसरिता - सरिता दत्ता नाईक
Pandu1.jpgपांडु
Wachchhi1.jpgवच्छी - वत्सलाबाई
Bhivari1.jpgभिवरी
Shevanta1.jpgशेवंता - पाटणकरीण
Patankar1.jpgपाटणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माका पण लिहुचा होता कालच्या भागाचो वृत्तांत पण आमची पण मालवणीची बोंब आसा, इथून पुढे चुकत माकत लिव्हित जाईन. असो छान वाटते मालवणी बोलायला, आजकाल तर घरी बोलताना पण मालवणी शब्द तोंडात येतात.

अहो DJ, तुमचं मालवणी सुरेख आसा. तुमच्याकडूनच शिकतंय आता मी. राखेचा संपेपर्यंत जमुक लागलं माका...

कालचो भागात वच्छी आन पाटणाकरणीचो घरी होळीची सोंगं येतां. एक-एक सोंग बघुक काशी लय एक्साईट व्हयां. काशी त्या सोंगावांगडा पाटणकरणीचो घरी जातंय. मगे सोंगं गेल्यावं पाटणकरीण आंघोळ करुक न्हाणीत जातलो ते पाहुक काशी तिक्यां घरामागे जाउक खिडकीतुन तिका पाहुक गेल्यां Uhoh तां बघुक पाटणकरीणने आंघोळ झटपट उरकल्यां. आजचो भागात ती पाटणकरावांगडा पोलिसात जातलंय.

काहीही असो या मालिकेच्या कथेत उशिरा म्हणजे शिमगा झाल्यावर दोन महिन्यानी का होईना कोकणच्या मातीतील अस्सल गावरहाटी व संस्कॄति- परम्परा यांचे इतके यथार्थ अन जिवन्त चित्रण यापूर्वी कुणीही केलेले नव्हते , हॅट्स ऑफ टू राजू सावन्त & प्रह्लाद कुरतडकर !

ती खेळे -नमनातील सोंगांची गवळण अन गाणी ऐकून खरोखर इथून उठावं अन तळकोकणात जिथेकुठे दशावतार सुरु असेल त्या मांडवात जावून बसावं असं तीव्रतेने वाटलं !

राखेचा २ टॉप क्लास आहे !

काशी चं फारच वाईट वाटतं पण... त्याला पोरं हिणवतात, अण्णा ठोकतात, घरी डाग देतात... एव्हडं करून काही बरा होत नाहीच तो.
त्याने शेवंताला आंघोळ करताना पाहणे हे अण्णांना कळले की बहुदा प्रलय होणार...! काशी आणि कं बहुतेक आता गाडले जातील.
मालिकेतील सर्वच पात्रांनी ऊत्तम अभिनय केला आहे, सगळे तर्क कुतर्क बाजूला ठेवून घटना खरेच घडल्या असाव्यात ईतके सगळे छान जमून आले आहे. आणि चित्रीकरण देखिल ऊत्तम आहे..
राखेचा २ हे पहिल्या भागापेक्षा छान रंगलय..

माका का कोण जाणे पण त्या काशीची दया येतंच नाही तो पण खुळा म्हणता म्हणता चांगलाच वाह्यात निघाला आता काय अण्णा सोडत नाही त्याला.

काशी मेलो. Uhoh
आण्णान काशीचो गेम केल्यान. सगळ्या गावान काशीक लाथा-बुक्क्या-दगड मारुक जीव घेतल्यान. काशीन वच्छीचो मांडीवर जीव सोडलो असान. मरुचो टायमाक पन काशी म्हणतां- 'आण्णा नाईक असंय मी.. गोळ्यो घालीन' Uhoh

काशी गेल्यान म्हणाक वच्छीक येड लागलाव. माई-सरिता सुतक पाळताहा पन आण्णा, छाया, दत्ता ते पाळुक नसान.

आजचो भागाक वच्छी आण्णाचो वाड्यावर जाउची असां. तिका तिचो झील - काशी आण्णाचो वाड्यार जातलंय असां दिसतां. त्येका मागोमाग वच्छी तिकडे जातली अन तिक्या मागं आण्णा उभो र्‍हातंला. वच्छीचो ह्यो रुप बघुक काळीज तुटताहा. Uhoh

काशी मारहाण प्रकरण फारच हिंसक होते. lynch mob जमावाने एखाद्याला त्याच्या कृतीसाठी असे मारणे खूपच भयंकर. खूप वाईट वाटले तेव्हा. तो जंतर मंतर बाबा नाव नाही आठवत त्या जमावाला भडकवायचे काम करत होता. आणि बेरकी नेने वकील आणि ताक प्यायलेले आण्णा ते लपून बघत होते. खूप राग आला. बिचारा काशी .
वच्छी आणि तिच्या सुनेची अवस्था बघवत नाही वच्छी तर वेडसर झाली आहे. काल सुनेने त्या बायकांनी फुटी चहा आणि पेज आणली होती त्यांना चांगलच सुनावले.

काल काशीने अण्णांना घाबरवले. >>> काशी कुठे दिसला काल? मला तर तातु दिसला फक्त.

(शेवटच्या एपिला मी झोपले तेव्हा आला असेल कदाचित... Proud

पांढरे डोळेवाल्यांच्या यादीत अजुन एकाची भर पडली.. काशीला प्रमोशन मिळाले.. आण्णाला घाबरविण्याचा रोल मिळाला. वच्छीचं डिमोशन झाले Proud

काल भिवरी , तातू आणि काशी अशी डोळे पांढरी मृत लोक अण्णांना घाबरावयाला आली होती. आण्णा पलंगावर कूस बदलतात आणि बाजूला काशी झोपलेला हसून बघत होता.

काल माईक मॉप रडुक मिळाल्यान. काशीक आठवुक-आठवुक तोंड जमुक तेवढा वाकडा करुक रडल्यान.

काशीचो खुन प्रकरणात पोलिस पाटणकरणीक तिक्या घोवांगडा चौकीत नेतला. नेने वकील तिका मदत करुचा म्हणुन चौकीत ईलंय.

कालचा माई आणि काशीच्या बापाशीचा सीन माका लय आवडला. येकदम काळजाक भिडलो.

बाकी माईनं काल वाईच जास्तीच पावडर थापलेली व्हती नाय? Proud

माका एक कळत नाय त्या पांडुक काय सिद्धी बिद्धी हा काय? परवाच्या भागात अभिराम त्येका विचारतो काशी कसो मेलो तर हा त्येका सविस्तर घटना सांगतो त्या ठिकाणी हजर नसूनही त्याला कसं कळतं? आज पुभा मध्येपण तो माईक सांगतो की काशी माका बंदूक देऊन गेल्या नि कोणाला सोडुचो नाय म्हणून.

आगो सान्वी, पांडुक समद्याचं सम्दं म्हाईत रवतां. समद्यांचो स्क्रिप्ट तांच लिवतां ना..? मगे.. त्याक सम्दं कळुचाच व्हयो ना..? खुळो दिसलां तरी महिन्याक लाखभर रुप्पय कमवित असतंय बघ पांडु..! Proud

काशी खपलो...! पुढील क्र. बहुदा चोंगट्या चा.. (अण्णांनी स्वतः काशी ला बंदूक दिल्याचा एकमेव साक्षीदार!)
पण आता हे अण्णा आणि मुडदे कं पुराण जरा रटाळ होतय.. जरा माधवा कडची खबर व माधवराव येऊ देत.
तसेच छाया चा हीरो प्रकरण पण गायबलाय.. ते ही येऊंदेत..

Pages