आंघोळ - सकाळी की रात्री?

Submitted by टवणे सर on 13 May, 2019 - 00:13

भारतीय संस्कृतीत सकाळी उठल्याबरोबर पहिले आंघोळ आयुष्याचे अविभाज्य अंग आहे. आंघोळ केल्याशिवाय सहसा लोक बाहेर कामाला पडत नाहीत. अनेक जण चहासुद्धा घेत नाहीत. लहानपणापासून सकाळी उठल्याबरोबर आंघोळ हे इतके डोक्यात पक्के बसले होते की इतर संस्कृती/प्रदेशात दुसरी कुठली पद्धत असेल असे मनातदेखील कधी आले नाही.
मग इंग्रजी/इतर भाषातील साहित्य वाचताना असे दिसून येऊ लागले की बर्‍याच प्रदेशात - विशेष करून युरोपात व त्यामुळे पुढे अमेरिकेत - आंघोळ रात्री झोपायला जाण्यापुर्वी करतात. काही चरित्रे/कादंबर्‍यात वाचनात आले की थंडीच्या दिवसात आंघोळ साप्ताहिक कार्यक्रम असे, तोसुद्धा थोड्याफार लाकडं जाळून केलेल्या आगीत बाथमध्ये पाणी गरम करून ४/५ भाउ/बहिणी एकामागोमाग एक आंघोळी उरकत. आग/उब महाग असणे हे मुख्य कारण! आंतर्जालावर शोध घेतल्यावर दिसले की भारतीयांना सकाळी आंघोळ न करणे जितके विचित्र वाटते तितकेच अनेक पाश्चिमात्यांना रात्री झोपायला जाताना आंघोळ न करता, दिवसभरच्या अंगावर साचलेल्या मळ/घाणीला तसेच ठेवून झोपायला जाणे.

तर धागा काढण्याचा उद्देश हा की आंघोळ झोपायला जाण्यापुर्वी रात्री करावी की सकाळी उठल्यावर?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सीरियसली?
सकाळीच अंघोळ करून झोपी जावे, अशाने दोन्ही संस्कृतींचा संगम साधता येईल.

रात्रभर झोपुन शरीर जडावलेले असते,स्नायू शिथिल असतात ,काहींचे हॅँगओव्हर असतात अशावेळी आंघोळ केल्याने फ्रेश वाटणे साहजिक आहे. मी फक्त उन्हाळ्यत दोन वेळा आंघोळ करतो,बाकीच्या हंगामात फक्त सकाळी.

प्रत्येकाची दिनचर्या, कामाचे स्वरूप, झोपेच्या सवयी, व्यायामाच्या सवयी इत्यादी बाबींवर ते अवलंबून आहे. ह्या लेखात कधी अंघोळ करावी व त्याचे काय फायदे आहेत याची विस्तृत चर्चा केली आहे:

https://timesofindia.indiatimes.com/life-style/health-fitness/photo-stor...

शेतात राबणारे मजूर,
रोजंदारी कामगार,
गवण्डी -हेल्पर- लमाणी वगैरे
अनेक कष्टकरी जमाती संध्याकाळी घरी जावून तर कधी कामाच्या ठिकाणीच आंघोळ करताना आढळतात.
काम तसे नियम हेच खरे.
परदेश स्वदेश काही संबद्ध नसावा

सकाळी आणि रात्री झोपायच्या आधी दोन्ही वेळा करावी. पाणी उपलब्ध असेल तर. उन्हाळ्यात तर रात्री मस्ट. म्हणजे कमी फॅन पुरतो व एसी
लागतच नाही. तिथे बचत होते. पाणी जास्त लाग ले तरी.

व्यवसायाच्या तिथले वास जायला हवे असतील तर आंघोळ करून स्वच्छ व्हावे हे बरे. प्लस दिवसाचा घाम, कीटा णू, हवेतले प्रदुषण व दिवस भरातला जनसंपर्क धुवून फ्रेश होण्यासाठी आवश्यक आहे रात्री स्नान.

इतक्या वर्शांत मी कधीच कामाला पारोशी आलेली नाही.

आत्ताच ट्विटर वर डिबेट चालू आहे कि शावर करताना पाय पावले व लेग्ज धुतात का ? असा प्रश्न कसा काय पडू शकतो असा मी शावर घेताना विचार करत होते.

लै मोठा विषय आहे. अंघोळ पहाटेच करावी. तीसुद्धा गरम पाण्याने. पाणी फार गरम असू नये. फार थंड देखील चालतं नाही. गरम असल्यास सरळ डोक्यावरून घेऊ नये याउलट गार असल्यास डायरेक्ट डोक्यावर पाणी घ्यावे. वात पित्त कफाचा त्रास पाहून आंघोळीचे वेगळे नियम आहेत ते पाळावे. कफाचा त्रास असणाऱ्यांनी गरम पाण्याशिवाय अंघोळ करू नये. दिवसातून एकदाच करावी. असे चिक्कार नियम आहेत. Proud

कधीही करा पण शनिवार रविवारी आंघोळीवरून पोरांच्या मागे लागू नका. आणि बाईक वरून कामाला गेलात तर हापिसात गेल्यावर परत करा आणि रोज डिओ मारायला विसरू नका.
पुढचा धागा भारतीय लोक रोज संडासला जातात आणि पाश्चिमात्य एक दिवसा आड यावर काढा. मग पाण्याने धुवावे का टॉयलेट रोल यावर.
बरेच दिवसांनी कुरु ची आठवण आली. Biggrin

(बहुतेक राजा मंगळवेढेकरांची ) महाराष्ट्राच्या लोककथा मधे एक कथा वाचली होती. दुष्काळ ग्रस्त शेतकरी गार्‍हाणं घेऊन कैलासावर शंकराकडे जातो. नंदीबैल दारावर राखण करत असतो आणि श्री व सौ शंकर महालात सारीपाट खेळत असतात. नंदीबैल शेतकर्याची वर्दी देऊन तो येण्याच कारण सांगतो. तेव्हा शंकर निरोप देतात की ` रोज एक वेळ जेवा. तिन्ही त्रिकाळ स्नान करून माझी पूजा करा. ' आणि विचारतात, कि कळलं का. त्यावर नंदीबैल मान डोलावतो. पण दाराशी येऊन निरोप सांगेपर्यत नंदीबैल थोडा घोळ घालतो. नंतर पाऊस पडून प्रजा सुखी होते. आणि विमानातून शंकर आढावा घ्यायला जातना प्रजा तिन्ही त्रि़काळ जेवत असून एक वेळ स्नान आणि पूजा करते आहे हे दिसत. तेव्हा नंदी च्या निरोपातल्या गोंधळाचा उलगडा होतो. आणि तेव्हा पासून `नंदीबैलाप्रमाणे मान हलवणे फेमस झाले. अशी काहीशी कथा आहे. Proud

आंघोळ झोपायला जाण्यापुर्वी रात्री करावी की सकाळी उठल्यावर?>>>>>> आपल्यावर आहे हो.कधीही करावी किंवा करू नये.दुसर्‍या पर्यायाचा त्रास इतरांना होईल इतकेच.

अंघोळ हा विषय व्यक्तिसापेक्ष राहू ध्या
हे चांगले हे वाईट असे टोकाचे मतभेद नसावेत
कामाचे स्वरूप,हवामान,आणि स्वतः चे मत ह्या वर अंघोळ कधी करावी हे अवलंबून आहे

युरोपाम्रविकेत तर काय २४ तास भरपूर पाणी. मग काय मनाला येइल तेव्हा करावी अंघो ळ. आणि ते भाकरी एवढे मोठ्ठाल्ले शावर. आणि टब आणि जकु झ झी. ढिगानी बाथ प्रॉडक्ट्स. टब बाथ असेल तर सोबत आवडीचे संगीत व शांपेन. मग काय बाई. मज्जा आहे.

वासाचा त्रास दुसर्‍यांना होऊ नये असे वाटत असेल तर सकाळी, आणि आपल्याला (व घरच्याना) होऊ नये असे वाटत असेल तर रात्री.. हाकानाका..

लोकांना फारच कुचेष्टेचा विषय वाटला. मी मात्र सिरियसली काढला आहे धागा. अगदी न्यूयॉर्क टाइम्समध्येसुद्धा आहे यावर आर्टिकल:
https://www.nytimes.com/2017/12/22/well/showering-morning-night.html

बाकी बीओ/डिओ वर पूर्वी इथेच चर्चा झाली आहे. अनेकांनी आपले अनुभव लिहिले होते.

आपल्या इथल्या उष्ण प्रदेशात तिन्ही त्रिकाळ स्नान सांगितले आहे. पण चाकरमानी ह्या तुलनेने नव्या जमातीस हे शक्य नाही. शिवाय पाण्याचे दुर्भिक्ष्य आहेच. तेव्हा परिस्थिती पाहून आंघोळीच्या वेळा ठरवाव्या. जेवल्यानंतर लगेच मात्र (धार्मिक कार्य सोडून) शक्यतो आंघोळ करू नये. सचैल स्नान शक्य नसले तरी कळकट राहू नये. बाह्य शुची महत्त्वाची असली तरी अंतर्बाह्य शौच अधिक महत्त्वाचे आहे. नाही निर्मळ मन, तेथे काय करील साबण. नेहेमी आनंदी आणि उत्साही राहावे. म्हणजे चेहरा सतेज दिसतो. वागण्यातला बुरसेपणा टाळावा. टापटीप असावे.

अवांतर मुक्तपिठीय : एका आयुर्वेदिक पुस्तकात इंग्लिश लोकं फायबर कमी खात असल्याने बहुतेकांना मलावरोध असतो आणि आठवड्यातून दोनतीन वेळाच शौचाला जातात असे वाचले होते. तसेच अतिथंडीमुळे आंघोळही आठवड्यातून एकदोनदाच करतात हेही ! ( त्याच पुस्तकात की अजून कुठे हे आठवत नाही ) युकेत गेल्यावर घरं शोधताना बेडरुम्स कितीही असल्या तरी बाथरुम एक किंवा डोक्यावरुन पाणी दीडच हे बघून फार वैताग आला होता आणि ह्या वरच्या माहितीत नक्कीच तथ्य आहे असे वाटले होते Proud

भारताबाहेर बरेच जणं मुलांना संध्याकाळी आंघोळ घालून सकाळी शाळेत आंघोळीविना पाठवतात हे पाहिले आहे. थंडी फार असते आणि सकाळी लवकर आवरते ही दोन कारणं त्यामागे ऐकली होती. पण सकाळी आंघोळ केल्याने झोप उडते, ताजेतवाने वाटते आणि गरम पाण्याने आंघोळ केल्याने अंगात ऊब येऊन थंडीही खरंतर कमी वाजते असा आमचा अनुभव असल्याने मुलाला कायम सकाळी आंघोळ घालूनच बाहेर पाठवले.
भारतात ( कोरड्या हवेच्या ठिकाणी ) उन्हाळ्याच्या दिवसांत संध्याकाळी घरी घामाघूम होऊन येत असल्यास दोनदा आंघोळ योग्य वाटते. थंडीत, पावसाळ्यात एकदा पुरे. घरी आल्यावर हात पाय चेहेरा नीट धुतला तरी पुरे. पाणीटंचाई तीव्र आहे आणि जनसंख्या प्रचंड आहे. थोडे सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून पाणी वाचवलेले बरे ( फक्त आंघोळीसाठीच नाही. इतर ठिकाणीही )
हे खरंतर संस्कृतीशी रिलेटेड नसून स्थळकाळसापेक्ष आहे. मुंबईत गर्दीत चेंगरुन सतत प्रवास होत असेल तर दरवेळी घरी येऊन आंघोळ करावीशी वाटेल आणि करावीही.

सकाळी की संध्याकाळी पेक्षा खाण्याआधी आंघोळ करावी की खाण्यानंतर हा मुद्दा आरोग्याच्या दृष्टीने जास्त योग्य आहे ( भरपेट खाल्ल्यावर आंघोळ करु नये. आंघोळ करुन मग खावे म्हणे )

धागा वाचून यात एवढी चर्चा करण्यासारखं काय आहे असं वाटतंय. अगदी न्यूयॉर्क टाईम्समध्ये आर्टिकल असलं तरीही. वर बर्‍याच जणांनी म्हटल्याप्रमाणे आपल्या सवयींशी, भोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेऊन जे जमेल ते करावं. दिवसातून किमान एकदा तरी अंघोळ करावीच. शास्त्र असतं ते.

रुग्णाला रात्री झोप येत नसेल तर डॉक्टर, झोपण्याआधी गरम दूध पिण्याचा आणि आंघोळ करण्याचा सल्ला देतात हे माहित आहे.

भरत, आज फिरकी मोडमध्ये आहेत Lol

नाव वाचून हा धागा खरंच ऋन्मेषचा वाटला. आंघोळ ही इतकी वैयक्तिक बाब आहे की व्यक्ती, स्थळ, काळ, प्रसंग, त्या क्षणाची मानसिकता, भावभावना, पाण्याची, वेळेची उपलब्धता या वाट्टेल त्या गोष्टींमुळे बदलू शकते.
वर कोणी तरी म्हणाल्या प्रमाणे आम्ही पुणेकर पाणी आणि वेळेची उपलब्धता असल्यामुळे दोनदा आंघोळ करतोच करतो. कधी मनमर्जी असेल तीन वेळा सुद्धा.

मी आज नोटिस केले, की टवणे यांचे प्रोफाइल पिक दवणे यांचे आहे Lol

तेव्हा धागा योग्यच आहे.

मुद्दा अंग घोळण्याचा.

अंगाला भस्म फासले की वर्षानुवर्षे आंघोळ न केलेली चालते. डायरेक्ट कुंभ टु कुंभ करावी. नाय तर जुम्मे के जुम्मे.

वरतून गाणे म्हणावे.

"आज ही हम ने बदले है कपडे... आज ही हम नहाये हुए है"

मला असले धागे आवडतात. मायबोली म्हणजे टाईमपास ची जागा आहे.
मी दर दिवसाआड अंघोळ करतो. देवपूजा रोज करतो आणि त्यांना रोज अंघोळ घालतो मात्र.

ते शेवटाला! >> धागा शेवटाला नेण्याचा उद्देश असेल Lol

प्रस्तुत धागा लेखकाने स्वतः काय करतो हे नमूद न करता धागा काढल्याबद्दल निषेध. Wink

on lighter note,

एकदा एक राजकिय नेता म्हणाला "this morning, I woke up at night" जर त्याने त्यानंतर उठल्यावर अंघोळ केली असेल तर ती सकाळी केली कि रात्री?

आजुन एक

ईराण मध्ये एका माणसाने ६० वर्ष अंघोळ केली नाही. कदाचित दिवसा करावी का रात्री अंघोळ करावी याचा विचार करत असेल.
https://www.dailymail.co.uk/news/article-2539704/The-worlds-ineligible-b...

Pages