सर्जिकल स्ट्राईक

Submitted by खुशी२२२२ on 30 April, 2019 - 03:06

हुतात्म्यांच्या नातेवाईकांचा तळतळाट,
शांत झाला पाहून 'जैश'चा नायनाट.

का पाकिस्तान हे नेहमी विसरतो ?
इथे एकासाठी देश पेटून उठतो.

त्यांना म्हणावं भारताला कमी समजण्याची चूक जेव्हा केली ,
तुमच्या अस्ताला तेव्हाच सुरुवात झाली .

ओल्या डोळ्यांमध्ये आता आनंद फुलत आहे ,
पाप्या तुझी घटका आता भरत आहे .

घाबरू नका हि तर नांदी फक्त अस्ताची ,
तुमच्यासाठी आजपासून प्रत्येक रात्र वैऱ्याची .

चाळीसाशी तीनशे , असले जरि हे व्यस्त प्रमाण ,
नवनिर्मित सक्षम भारताच्या शक्तीचे हे प्रमाण

आज भारतमाता खूप सुखी आहे ,
प्रत्येक सुपुत्रावर तिची कृपादृष्टी राहे !!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users