न्यु झीलंडमधल्या ख्राइस्ट चर्च इथे झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याबद्दल आपण सगळ्यांनी ऐकलंच असेल. जगातला कोणताही देश अतिरेकी, द्वेषाधारित, विध्वंसक विचारसरणीपासून सुरक्षित राहिलेला नाही. या हल्ल्यानंतर न्युझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी देशाला उद्देशून केलेलं वक्तव्य अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आश्वासक वाटलं. त्यांच्या भाषणातला हा काही भाग. (स्वैर अनुवाद)
या हल्ल्याने घायाळ झालेल्या लोकां करिता हा माझा संदेश. हा संदेश फ़क्त माझ्याच नव्हे तर माझ्या देशाच्या वतीने आहे , माझ्या देशवासियांच्या भावनाही याच असतील , याची मला खात्री आहे.
या हल्ल्यात क्षती पोचलेल्या लोकांसोबत आमच्या सहवेदना आणि प्रार्थना आहेत. बळी पडलेले लोक ख्राइस्टचर्चचे होते. त्यातल्या अनेकांचे ते जन्मस्थान नव्हते. खरं तर त्यातल्या अनेकांनी आपल्या वास्तव्यासाठी न्युझीलंडची निवड केली होती. हा देश त्यांनी (स्थलांतरासाठी) स्वत:हून निवडला त्याच्याशी नातं जोडलं, इथे त्यांची कुटुंब होती, इथल्या समाजाबद्दल त्यांना जिव्हाळा होता आणि या समाजानेही त्यांना प्रेम दिलं. या जागी ते एक सुरक्षित निवारा शोधीत आले. इथे त्यांना त्यांच्या धर्म आणि संस्कृतीचे पालन करण्याचे स्वातंत्र्य होते.
तुमच्यातल्या अनेकांना प्रश्न पडला असेल, हे असं माझ्या देशात कसं घडू शकतं? आपण लक्ष्य ठरण्याचे कारण, आपण द्वेष करणार्यांना आसरा दिला हे नव्हते. आपण वंशभेदाला , अतिरेकी विचारसरणीला थारा दिला, म्हणून हा हल्ला इथे झाला नाही. यांतलं ( वंशभेद, द्वेष, अतिरेकी विचार) काहीही आपल्यात नाही, म्हणूनच केवळ आपल्याला लक्ष्य केलंय. आपल्याला लक्ष्य केलंय कारण आपण विविधता, प्रेम, आपुलकी ही तत्त्वं मानतो. ही तत्त्वं मानणार्यांना सामावून घेतो. निराधार गरजूंना आश्रय देतो.
या तत्त्वांपासून आम्ही जराही ढळणार नाही, ढळू शकणार नाही याची खात्री बाळगा.
दोनशे वेगवेगळ्या वंशाच्या आणि एकशे साठ भाषा बोलणार्यांचा हा देश आहे, याचा मला अभिमान आहे. या विविधतेत आमची काही सामाईक तत्त्वं सामावलेली आहेत. या हल्ल्याची झळ लागलेल्यांबद्दल आमच्या मनात सहवेदना आहे, आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत; हे आजच्या घडीला माझे सांगणे आहे.
ज्या विचारसरणीतून हे कृत्य झालं तिचा मी तीव्रतम शब्दांत निषेध करते.
तुम्ही (आपला देश, आपला समाज म्हणून) आम्हांला निवडलं असेल, पण आम्ही तुम्हांला पूर्णपणे नाकारतोय. तुमचा धिक्कार करतोय.
कधी पेपर वाचतोस कारे?
कधी पेपर वाचतोस कारे? अर्ध्या हळकुंडाशिवायदेखील आपोआपच पिवळा झालेल्या फिल्म्या लेका तू सांगशील त्या ब्लॉगमधून उचलायला मी तुझा नोकर वाटलो काय?
आधी आजचा पेपर वाच मग कीबोर्ड बडीव -
http://www.saamana.com/article-by-jagan-ghanekar/
यापूर्वीचाही पेपर बघ -
http://www.saamana.com/no-martyres-word-in-home-ministry/
मग इथून? https://www.google
मग इथून?
https://www.google.co.in/amp/s/aapkaashish.wordpress.com/2017/04/28/%25E...
अरे जी माहिती आज्च्या सामनात
अरे जी माहिती आज्च्या सामनात आली ती दुसर्यांच्या ब्लॉगवर हुंगायची काय गरज आहे?
अरे जी माहिती आज्च्या सामनात
अरे जी माहिती आज्च्या सामनात आली ती दुसर्यांच्या ब्लॉगवर हुंगायची काय गरज आहे?
Submitted by बिपीन चन्द्र हर... on 26 April, 2019 - 17:26 >>
जाऊंद्या भाऊ, चिअरलिडर्सचे चाळे मनावर घेऊ नका. मुख्य कार्यक्रमात त्यांचा काही हिस्सा नसतो, फक्त मध्ये मध्ये येऊन औटघटकेचा नाच करायचा आणि बालिश राजपुत्राप्रमाणे डोळे मारायचे एव्हढाच काम दिलंय त्यांना.
वेल सेड शशांक. थँक्स.
वेल सेड शशांक. थँक्स.
हमजाद मिल गये
हमजाद मिल गये
Pages