न्यु झीलंडमधल्या ख्राइस्ट चर्च इथे झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याबद्दल आपण सगळ्यांनी ऐकलंच असेल. जगातला कोणताही देश अतिरेकी, द्वेषाधारित, विध्वंसक विचारसरणीपासून सुरक्षित राहिलेला नाही. या हल्ल्यानंतर न्युझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी देशाला उद्देशून केलेलं वक्तव्य अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आश्वासक वाटलं. त्यांच्या भाषणातला हा काही भाग. (स्वैर अनुवाद)
या हल्ल्याने घायाळ झालेल्या लोकां करिता हा माझा संदेश. हा संदेश फ़क्त माझ्याच नव्हे तर माझ्या देशाच्या वतीने आहे , माझ्या देशवासियांच्या भावनाही याच असतील , याची मला खात्री आहे.
या हल्ल्यात क्षती पोचलेल्या लोकांसोबत आमच्या सहवेदना आणि प्रार्थना आहेत. बळी पडलेले लोक ख्राइस्टचर्चचे होते. त्यातल्या अनेकांचे ते जन्मस्थान नव्हते. खरं तर त्यातल्या अनेकांनी आपल्या वास्तव्यासाठी न्युझीलंडची निवड केली होती. हा देश त्यांनी (स्थलांतरासाठी) स्वत:हून निवडला त्याच्याशी नातं जोडलं, इथे त्यांची कुटुंब होती, इथल्या समाजाबद्दल त्यांना जिव्हाळा होता आणि या समाजानेही त्यांना प्रेम दिलं. या जागी ते एक सुरक्षित निवारा शोधीत आले. इथे त्यांना त्यांच्या धर्म आणि संस्कृतीचे पालन करण्याचे स्वातंत्र्य होते.
तुमच्यातल्या अनेकांना प्रश्न पडला असेल, हे असं माझ्या देशात कसं घडू शकतं? आपण लक्ष्य ठरण्याचे कारण, आपण द्वेष करणार्यांना आसरा दिला हे नव्हते. आपण वंशभेदाला , अतिरेकी विचारसरणीला थारा दिला, म्हणून हा हल्ला इथे झाला नाही. यांतलं ( वंशभेद, द्वेष, अतिरेकी विचार) काहीही आपल्यात नाही, म्हणूनच केवळ आपल्याला लक्ष्य केलंय. आपल्याला लक्ष्य केलंय कारण आपण विविधता, प्रेम, आपुलकी ही तत्त्वं मानतो. ही तत्त्वं मानणार्यांना सामावून घेतो. निराधार गरजूंना आश्रय देतो.
या तत्त्वांपासून आम्ही जराही ढळणार नाही, ढळू शकणार नाही याची खात्री बाळगा.
दोनशे वेगवेगळ्या वंशाच्या आणि एकशे साठ भाषा बोलणार्यांचा हा देश आहे, याचा मला अभिमान आहे. या विविधतेत आमची काही सामाईक तत्त्वं सामावलेली आहेत. या हल्ल्याची झळ लागलेल्यांबद्दल आमच्या मनात सहवेदना आहे, आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत; हे आजच्या घडीला माझे सांगणे आहे.
ज्या विचारसरणीतून हे कृत्य झालं तिचा मी तीव्रतम शब्दांत निषेध करते.
तुम्ही (आपला देश, आपला समाज म्हणून) आम्हांला निवडलं असेल, पण आम्ही तुम्हांला पूर्णपणे नाकारतोय. तुमचा धिक्कार करतोय.
पोलिसांकडे हत्त्यारे असतात ना
पोलिसांकडे हत्त्यारे असतात ना मग जनतेला कशाला हवीत .इ>> In countries like Australia and New Zealand many keep guns to kill animals which harass their farms etc. Many own guns , revolvers as protection from intruders because they live alone. Some keep their guns in gun clubs where they go for target practice.
भरत भाऊ,
भरत भाऊ,
एकतर असं मानणारे (की मुस्लिम समाज दहशतवादाविरोधात नाही) स्वतः मुस्लिमांमध्ये राहत नसतात. >> हे वाक्य सरसकटीकरण करणारे आहे. कोण कुठे राहतो हे तुम्हाला कधीपासून माहीत व्हायला लागलं?
माझे कितीतरी मुसलमान मित्र आहेत. जेव्हा जगात कुठे मुस्लिम वा व्हाइट सुप्रीमिस्ट वा इतर कोणीही दहशतवादी हल्ला करतात तेव्हा त्यातील एकच मित्र निषेध करत असतो, बाकी सगळे फक्त मुस्लिमांवर हल्ले होतात तेव्हा निषेध करतात. महत्वाची गोष्ट म्हणजे त्या एका मित्राला तो दर शुक्रवारी मशिदीत जात नाही आणि "मशिदीत ना जाण्याच्या छोट्या अपराधासाठी परमशक्तीमान दयाळू अल्लाह आपल्यासारख्या छोट्या माणसाला शिक्षा का करेल ?" हा भाबडा प्रश्न विचारल्यामुळे नातेवाईकांकडून वाळीत टाकलं गेलं.
मला धाग्याशी संबंध नसलेले बरेच प्रश्न पडलेत. >>
तुम्हाला पडलेले प्रश्न अतिशय रास्त आहेत. पण मुळ कारणांचा विचार केल्याशिवाय आणि योग्य तो उपाय केल्याशिवाय कुठलीही समस्या सुटत नाही, ही अतिशय बेसिक गोष्ट आहे.
तथाकथित मानवतावाद्यांचे डबल स्टॅंडर्ड आणि मूळ कारणांकडे त्यांच्याकडून नेहेमीच केली जाणारी डोळेझाक यावर बरंच काही लिहिता येईल. कदाचित स्वतःच्या जिवाच्या भीतीने ते अस करत असावेत.
असो, तुम्ही जे प्रश्न विचारलेत तसाच युक्तिवाद मीही आधी केला (खालीलप्रमाणे), परंतू कुणी स्वतःचे मत त्यावर दिले नाही.
या धार्मिक वा अँटी इमिग्रेशन हत्याकांडासारखीच कितीतरी हत्याकांडे आफ्रिकेत मुस्लिम व ख्रिश्चनांमध्ये जवळजवळ दर महिन्याला 2 तरी होतात. त्यातही निष्पाप लोकच स्वतःचा जीव गमावतात, स्त्रिया अब्रू गमावतात. त्यांच्याबाबतीत जग संवेदनाहीन झालंय कारण ती बातमी वृत्तपत्रांत कुठल्यातरी एका कोपऱ्यात छापली जाते आणि 1 तासात वाचक ते विसरूनही जात असतील. परंतु न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, युरोप, अमेरिका इत्यादी ठिकाणी अशी हत्याकांडे झाली की सगळे तोबा तोबा म्हणून आकांत करू लागतात. मेणबत्ती मोर्चा निघतो, पण मूळ कारणांविषयी फार थोडे लोक बोलतात. असे का?
माझ्या मते, आफ्रिकेतील त्या देशांत आर्थिक, नातेवाईक वा राजकीय हितसंबंध गुंतलेले नसल्यामुळे कुणालाही त्या हत्याकांडांचं काही पडलेलं नाही. त्याउलट विकसित देशांत अनिवासी भारतीय असल्यामुळे, अँटी इमिग्रॅंट वा अँटी हिंदू वा अँटी मुस्लिम हत्याकांडे/ हल्ले झाले की त्यांचा जीव कासावीस होतो.
१ न्युझीलंडभरच्या स्त्रियांनी
१ न्युझीलंडभरच्या स्त्रियांनी काल हेड स्कार्फ बांधून देशातल्या मुस्लिम स्त्रिया, हल्ल्यात बळी पडलेले लोक आणि इस्लाम च्या पाठी आपण खंबीरपणे उभे आहोत, हे दाखवले.
२ न्यु झीलंडच्या संसदेच्या विशेष अधिवेशनाची सुरुवात इस्लामी प्रार्थनेने केली गेली.
३. कालच्या जुम्म्याच्या नमाजासाठी हजारो मुस्लिमेतर न्यु झीलंडवासी नमाजाच्या जागी उपस्थित राहिले, दूरचित्रवाणी आणि आकाशवाणीवरून अजानचं प्रसारण केलं गेलं. नमाजानंतर देशभर दोन मिनिटे शांतता पाळण्यात आली.
न्यूझीलंड च मोजमाप पूर्ण
न्यूझीलंड च मोजमाप पूर्ण जगाला लावत असाल ते चुकीचं आहे तिथे परिस्थिती वेगळी आहे
राजेश, कधी जाताय मुसलमान
राजेश, कधी जाताय मुसलमान मारायला? वाईत कशी परिस्थिती आहे? तिकडे मारण्याइतके मुसलमान नसतील तर मुंबई बरे पडेल तुम्हाला.... हत्यारांची सोय धनंजय कुलकर्णीने करुन ठेवलीच आहे. तो बाहेर आला नसेल तर सनातनी पण भरपूर भेटतील मुंबईत.
हेला परत चुकीचे उत्तर देतात
हेला परत चुकीचे उत्तर देतात .पहिली पोस्ट समजून घ्या मी काय लिहलय ते
सामाजिक रचना न्यूझीलंड वेगळी
सामाजिक रचना न्यूझीलंड ची वेगळी आहे तिथे ४१,% लोक कोणताच धर्म पाळत नाहीत
हेला परत चुकीचे उत्तर देतात
हेला परत चुकीचे उत्तर देतात .पहिली पोस्ट समजून घ्या मी काय लिहलय ते। >>>
जाऊंदेत राजेशभाऊ, माफ करा त्यांना...केमिकल लोचा झाल्यामुळे त्यांना हालुसिनेशन्स होत आहेत त्यामुळे कुणीही न लिहिलेली वाक्ये दुसऱ्यांच्या नावावर टाकत सुटलेत!
सध्या तरी ते लवकर बरे व्हावेत अशी आशा करणंच आपल्या हातात आहे.
थोडक्यात, मदिना मध्ये जेव्हा
थोडक्यात, मदिना मध्ये जेव्हा मोहम्मद पैगंबरांचे आगमन झाले तेव्हा मदिनावासी ज्या प्रकारच्या मानसिकतेत होते किंवा कुर्ग येथील हिंदू लोक, टिपू सुलतानाच्या आग्रहाखातर स्वतःचा दुर्गम भूभाग सोडून मैदानात मैत्रीचा उत्सव साजरा करण्यासाठी ज्या मानसिकतेतून जमा झाले त्याच मानसिकतेत सध्या न्यूझीलंड आहे.
{ तिथे ४१,% लोक कोणताच धर्म
{ तिथे ४१,% लोक कोणताच धर्म पाळत नाहीत}
आवडलं हे. धर्म पाळत नाहीत पेक्षा मानत नाहीत.
<< { तिथे ४१,% लोक कोणताच
<< { तिथे ४१,% लोक कोणताच धर्म पाळत नाहीत}
आवडलं हे. धर्म पाळत नाहीत पेक्षा मानत नाहीत. >>
------ हे ४१ % कुठून आलेत? माहितीचा स्त्रोत काय आहे?
धर्म न मानणार्यात चीन अग्रेसर आहेत. एखादा सर्वे असेल तर अनेक लोक धर्म जाहिर करत नाही याचा अर्थ ते लोक कुठलाही धर्म पाळतच नाही असे होत नाही. काही लोक त्याला अत्यंत खाजगी बाब समजतात.
------ हे ४१ % कुठून आलेत?
------ हे ४१ % कुठून आलेत? माहितीचा स्त्रोत काय आहे?
आपली Wikipedia
धर्म न मानणार्यात चीन
धर्म न मानणार्यात चीन अग्रेसर आहेत. एखादा सर्वे असेल तर अनेक लोक धर्म जाहिर करत नाही याचा अर्थ ते लोक कुठलाही धर्म पाळतच नाही असे होत नाही. काही लोक त्याला अत्यंत खाजगी बाब समजतात.
हे पटण्यासारखं आहे
At the risk of receiving
At the risk of receiving personal attacks i want to post this. I just read that the film Hotel Mumbai which is based on the real terrorist attack on 26/11/ 2008 Mumbai’s Taj Hotel has been pulled off from theaters in New Zealand. The reason being the attack on Muslim worshippers on 14 March in Christchurch.
In a press release, Icon Film
In a press release, Icon Film Distribution announced the suspension of the film saying they were removing the film from cinemas ‘out of respect for a country in mourning.’
They have also suspended all advertising around the film.
"After consultation with local exhibition partners, the decision was made to suspend the film out of respect for a country in mourning," they said
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/vishesh-news/terrorism-in-europe-1863343/
आपण जसे समजतो की जग म्हणजे एक
आपण जसे समजतो की जग म्हणजे एक ग्लोबल village झालाय हे काही पूर्ण सत्य नाही अजुन सुधा लोकांच्या मनात श्रेष्ठ कनिष्ठ अशा भावना आहे
ग्लोबल सोडा, अगदी भारतातलं
ग्लोबल सोडा, अगदी भारतातलं कितिही छोटं व्हिलेज असलं तरी तिथल्या लोकांच्या मनात श्रेष्ठ कनिष्ठ असतेच...
बराच फरक पडलाय पण अजून आहे
बराच फरक पडलाय पण अजून आहे भेदभाव
ईस्टर संडेला इसिस या दहशतवादी
ईस्टर संडेला इसिस या दहशतवादी संघटनेने न्यूझीलंड हल्ल्याचा बदला श्रीलंकेत 300+ ख्रिश्चन लोकांना मारून घेतला !
म्हणजे न्यूझीलंड मधील लोक तसे नशीबवान म्हणायचे (किंवा तिथले सरकार अलर्ट असावे).
विशेष बाब ही की न्यूझीलंड हल्ल्याच्या मानाने श्रीलंका हल्ला मायबोलीवर दुर्लक्षित राहिलेला दिसतो. माझ्या मते त्याची दोन कारणे असावीत, एक म्हणजे फुरोगाम्यांना असलेली इस्लामची भीती व दुसरे म्हणजे भारतीयांचे श्रीलंकेत नसलेले आर्थिक हितासंबंध. श्रीलंकेत कुणी भारतीय मायग्रंट म्हणून जात नसल्याने (किंवा खूप कमी संख्येने जात असल्याने) तिथली घटना याआधी न्यूझीलंड हल्ल्याची काळजी करणाऱ्या परदेशस्थ लोकांना तितकी काळजी करण्यासारखी वाटली नसेल.
मी या गोष्टीला दुतोंडीपणा म्हणणार नाही.
इथे कोणीतरी हे असं काहीतरी
इथे कोणीतरी हे असं काहीतरी लिहील अशी अपेक्षा होतीच. तुमच्याकडून पूर्ण झाली.
श्रीलंकेतील बॉम्ब स्फोटात
श्रीलंकेतील बॉम्ब स्फोटात कोणतीही जीवित हत्या झाली नाही ,
तो एक खेळकर लोकांनी खेळले ला खेळ होता त्याचा आनंद ghyacha दुःख व्यक्त करायचे नसते ,
म्हणून मायबोली वर त्याची दखल घेतली गेली नाही
परदेशस्थ लोकांना तितकी काळजी
परदेशस्थ लोकांना तितकी काळजी करण्यासारखी वाटली नसेल. > ते जरा योगभौ, जीएस्भौ कुठल्या कॅटॅगरीमधे मोडतात?
श्रीलंकेतील बॉम्ब स्फोटात
श्रीलंकेतील बॉम्ब स्फोटात कोणतीही जीवित हत्या झाली नाही ,
तो एक खेळकर लोकांनी खेळले ला खेळ होता त्याचा आनंद ghyacha दुःख व्यक्त करायचे नसते )))))))छे छे भलतच शांतता प्रेमी धर्म(reiligion of peace)अस करण शक्यच नाही...हे RSS कींवा trump यानीच.त्या धर्माला बदनाम.करण्याच कारस्थान रचलय....तो मोदी आनी rss पघा लय कारस्थानी
इथे कोणीतरी हे असं काहीतरी
इथे कोणीतरी हे असं काहीतरी लिहील अशी अपेक्षा होतीच. तुमच्याकडून पूर्ण झाली.
Submitted by भरत. on 24 April, 2019 - 08:46 >>>
तुमची संवेदनशीलता याआधी कळाल्याने मी ३ दिवस आतुरतेने तुम्ही या हल्ल्यावर लिहिलेल्या एखाद्या अभ्यासपूर्ण धाग्याची वाट पाहात होतो. आज शेवटी माझा भ्रमनिरास झाला आणि मी तो प्रतिसाद लिहिला.
@असिफ भाऊ, एव्हढा कंजूषपणा करू नका, "परदेशस्थ" या शब्दाच्या आधीचे बरेच शब्द तुम्ही गाळलेत, तेव्हढे समजून घ्या नि मगच काय ते लिहा.
त्यांनी धागा नाही काढला
त्यांनी धागा नाही काढला म्हणून गळा काढण्यापेक्षा तुम्ही धागा काढा, पण तुम्ही ते करणार नाही कारण न्यूझीलंडवर झालेल्या हल्ल्याचे जे संतुलित समर्थन त्या धाग्यावर झाले तसे आपल्या श्रीलंकेच्या धाग्यावर होणार नाही हे तुम्हाला माहिती आहे.
शशांक , या धाग्यावर पहिल्या
शशांक , या धाग्यावर पहिल्या पानावर तुमचे तीन प्रतिसाद आहेत. त्यातल्या एकाही प्रतिसादात लोक मारले गेल्याबद्दल दु:ख नाही.
आताही इस्लामी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे तुम्हांला आनंद झाल्यासारखा दिसतोय.
तुमच्यातलं माणूसपण तपासून घ्यायची गरज आहे.
आताही इस्लामी दहशतवाद्यांनी
आताही इस्लामी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे तुम्हांला आनंद झाल्यासारखा दिसतोय.)))))))))आता ईस्लामी दहशतवाद लोकांच्या अंगवळणी पडलाय.।. रोज मरे त्याला कोण.रडे.....अशी म्हणच आहे.....रोज.कुठेना कुठेतरी आहेच हे................................ता.क...गेली 20एक वर्ष भारत पर्यटनाला आलेले(मी भावना दुखवत नाही पर्यटन म्हणतोय मुद्दाम .हक्कालपट्टीला सेक्युलर पर्याय) पाच सहा लाख कश्मीरी पंडीत गेले की नाही अजून परत....
शशांक , या धाग्यावर पहिल्या
शशांक , या धाग्यावर पहिल्या पानावर तुमचे तीन प्रतिसाद आहेत. त्यातल्या एकाही प्रतिसादात लोक मारले गेल्याबद्दल दु:ख नाही.
आताही इस्लामी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे तुम्हांला आनंद झाल्यासारखा दिसतोय.
तुमच्यातलं माणूसपण तपासून घ्यायची गरज आहे. >>>
तुमचे मनाचे श्लोक तुम्हाला लखलाभ...
मला आनन्द तर नक्कीच झालेला नाहिय, तुम्ही असले उफराटे निश्कर्ष कुठुन काढता देव जाणे.
श्रिलन्केवरिल जो हल्ला झाला त्यावरिल तुमच्या प्रतीक्रियेची वाट पहातोय.
@लसावी, तुम्ही कुठल्या "सन्तुलीत समर्थनाबद्धल" बोलताय ते तुम्हालाच ठाउक.
गेली 20एक वर्ष भारत पर्यटनाला
गेली 20एक वर्ष भारत पर्यटनाला आलेले(मी भावना दुखवत नाही पर्यटन म्हणतोय मुद्दाम .हक्कालपट्टीला सेक्युलर पर्याय) पाच सहा लाख कश्मीरी पंडीत गेले की नाही अजून परत.... >>>
त्यांचे परतीचे रस्ते काश्मिरींनी बंद केले. त्यांच्याशी वाद नको म्हणून केंद्र सरकारने पंडितांसाठी वेगळी वसाहत स्थापित करण्याचीही योजना आणली , तर काश्मिरींनी त्यालाही विरोध सुरु केला. अर्थात, सध्याचे काश्मिरी लोक हे फुरोगाम्यांचे जावई असल्याने व त्यांचा धर्मही शांततेचा पुरस्कर्ता धर्म आहे अशी वदंता असल्याने एकही फुरोगामी काश्मिरींना विश्वबंधुत्व शिकवायला गेला नाही.
Pages