रणरणत्या उन्हात चालत असताना एक सात वर्षाची मुलगी डोंबर्याचा खेळ करीत उन्हात पोटासाठी उंच बांधलेल्या दोरीवरून वेगवेगळ्या कसरती दाखवत होती. इवलासा जीव असे कष्ट करताना पाहून कसेसेच झाले..अनेक विचारांनी मन कोंदून गेले. तिच्या झोळीत काही रक्कम देऊ केली आणि पुढे आले.
मनातले विचार शब्दबद्ध झाले..
सुखाच्या पुलावरून चालताना
तिच्या शरीराचा ताप,
जाणवला
तिला बघताना
भुकेसाठी तोलताना आयुष्य...
जीववर उदार होऊन ती
एकेरीवर चालत होती....
तिच्या पावलांना होणारा त्रास,
मनाला टोचणी देऊन गेला....
सावलीत उभं राहून,खेळ बघताना....
त्याच वयाची मी आठवले...
ती इथे करपतेय उन्हात..
मी अडले होते दुकानात...बाहुलीसाठी..
आईला उभं करून उन्हात.....
तिच्या पाठीवर भुकेचे ओझे आहे ओझे आज...
माझ्या दप्तराचे ओझे बाबा सांभाळत होते तेव्हा....
तिला पाण्याचा थेंब नाही....
अन मी महागड्या सरबतासाठी रडत होते.....
ती कष्टत आहे....
मी सुखात होते, आहे..
दुड दुड करण्याच्या वयात....
शाळेत शिकण्याच्या वयात.....
बागेत बागडण्याच्या वयात....
लाडिक हट्ट करण्याच्या वयात...
ती चिमुकली करपतेय.....
बालपण हरपतेय...
असेल ना तिच्याही मनात.....खुदू खुदू हसण्याची इच्छा...
बेभान गाणे गाण्याची इच्छा....
मी मात्र माझ्या सुखात रडते आहे....
सावलीतही कुढते आहे....
सगळं असूनही तक्रार आहे....
आयुष्याच्या दोरीवर कसरत करताना ती मात्र हळुवार हसते आहे...
मुक्ता
(रोहिणी बेडेकर)
निशब्द!!! आवडलं...
निशब्द!!!
आवडलं, असतरी म्हणवणार नाही, पण काळीज हलल कुठंतरी!
निशब्द!!!
निशब्द!!!
आवडलं, असतरी म्हणवणार नाही, पण काळीज हलल कुठंतरी!>>>+111111111111111
मायबोलीवर स्वागत आहे मुक्ते!
मायबोलीवर स्वागत आहे मुक्ते! खुप खुप लिही.
छान, आवडली
छान, आवडली
सुन्न....
सुन्न....
खूप सुरेख कविता. पुलेशु.
खूप सुरेख कविता. पुलेशु.
सगळ्यांचे खूप आभार....
सगळ्यांचे खूप आभार....
खरच सुरेख वर्णन त्या छकुलीच..
खरच सुरेख वर्णन त्या छकुलीच...मनाला भावनारी छकुली.
धन्यवाद सिद्धी
धन्यवाद सिद्धी