प्रलय-१९
जेव्हा आयुष्यमानचे डोळे उघडले तेव्हा त्याला जाणवलं तो कोणाच्या तरी शय्याकक्षात होता . लुसलुशीत गादी त्याच्या शरीराला आरामदायी वाटत होती . त्याने आजूबाजूला पहिले एका बाजूला ते दोन बुटके आपली मान खाली घालून उभे होते . दुसऱ्या बाजूला एक म्हातारा माणूस त्याच्या शेजारी बसलेला होता . तो काही बोलणार त्याआधीच म्हातारा म्हणाला.....
" तुझ्या मनात बरेच प्रश्न असतील सार्या प्रश्नांची उत्तरे तुला आता मिळणार नाहीत . पण काही प्रश्नांची उत्तरे मी तुला सांगेन . ती म्हणजे तुझी सुरुकुने निवड केली आहे ......
ज्यावेळी प्रलयकारिका जागृत होते . त्यावेळी प्रलयकारिकेचा सामना करण्यासाठी प्रलयकारिकेला हरवण्यासाठी , किंवा प्रलयकारिकेला नष्ट करण्यासाठी सुरुकु एकाची निवड करतो.....
मारुतांचा मुख्य पुजारी आहे , त्याच्याकडे प्रलयकारिकेस जागृत करण्याची शक्ती आहे . प्रलयकारिका त्यांची सेवा करत राहिली आहे , पण प्रलयकारिका जेव्हा जेव्हा येते तेव्हा तेव्हा प्रलय निश्चित असतो .....
जो कोणी प्रलयकारिकेला जागृत करतो , ती त्यांची सेवा करते मात्र तिचा जन्मच प्रलयकाळ घेऊन होतो... या जगतात पहिल्यांदा जेव्हा प्रलयकारिकेला जागृत केलं गेलं होतं , त्यावेळी जो प्रलय आला त्यानंतर प्रलयकारिकेला जागृत करण्याच्या सर्व पद्धतीवरती बंदी घातली गेली होती . पण काही लोकांनी गपचूप तो अभ्यास सुरूच ठेवला . नंतर काही पूजाऱ्यांना मारुतांनी आपला राजआश्रत्र दिला . पण मारूत राजांनी कधीच प्रलयकारिकेला जागृत केलं नाही . कारण त्यांना प्रलयाची माहिती होती . मात्र काळ्या भिंतीच्या प्रकरणानंतर प्रलयाबाबत सर्वजण विसरले आहेत . त्यामुळे त्यांनी कदाचित प्रलयकारी केला जागृत केलं असावं......
त्या प्रलयकारिके चा सामना करण्यासाठी त्यावेळी काही गोष्टीची गरज होती. तिला हरवण्यासाठी किंवा तिच्या सोबत लढण्यासाठी सामान्य मनुष्य , त्याची सामान्य हत्यारे , सामान्य प्राणी काहीच करू शकत नाही... त्याच्यासाठी सुरुकुची निर्मिती केली होती . सुरुकू हा एक प्रकारचा प्राणी आहे . पण पृथ्वीवरील कोणत्याही प्राण्यापेक्षा तो सर्वस्वी वेगळा आहे . सुरुकु स्वतःहून त्याच्या वाहकास निवडतो आणि त्या सुरूकूने तुझी निवड केलेली आहे . तू आता प्रलयकारिकेचा सामना करणार आहेस .........
" पण प्रलयकारी का कोण आहे ....? मला याबद्दल काही माहीत नाही . मी तिला कसं हरवणार....? मला माझेच वैयक्तिक भरपूर प्रश्न आहेत ....? ज्यांची उत्तरे मी शोधत आहे.....?
" तुला एक गोष्ट माहित नसेल . ती मी सांगेन .... प्रलयकारिका म्हणून एका स्त्रीचीच निवड केली जाते . आणि तिला हरवण्यासाठी सुरूकच स्वतःहून त्या स्त्रीच्या सर्वात जवळच्या पुरुषांचीच निवड करतो . तो तिचा भाऊ , वडील किंवा पती असतो....
" म्हणजे मोहिनी प्रलयकारिका आहे तर........
आयुष्यमानला धक्काच बसला होता . कारण ज्या स्त्रीच्या शोधात निघाला होता , ती प्रलय घेऊन येणार होती . आणि प्रसंग पडला तर तिला मारावे लागणार होतं.... त्याचं हृदय पिळवटून निघाले . त्यांना आयुष्यात जेव्हा पहिल्यांदा प्रेम केलं , तेही त्याच स्त्रीवर जी स्त्री प्रलयकारिका होती . आणि त्याला स्वतःला आता तिच्या विनाशासाठी जावं लागणार होतं....
" पण मोहिनीच निवड प्रलयकारिका म्हणून का झाली.....?
" प्रलयकारिकेसाठी पृथ्वीतलावरील सर्वात शक्तिशाली स्त्रीचीच निवड केली जाते......
आयुष्यमान पुढे काही बोलणार होता त्याआधीच तो म्हातारा म्हणाला ....
" हे बुटके माझे नोकर आहेत जंगलातील हा महाल आणि त्याच्या संरक्षणासाठी त्यांची निवड केली आहे . त्यामुळे जो कोणी मनुष्य किंवा प्राणी इकडे येताना त्यांना दिसतो त्याबरोबर ते त्याला पकडतात . पण आम्हाला माहीत नव्हतं की तुझी निवड होणार आहे . त्यामुळे त्यांनी बोट कापलं त्याबद्दल मी क्षमा मागतो......
त्यावेळी पुन्हा एकदा तो मोठा आवाज आला . समोर असलेल्या खिडकीतून तो प्राणी आत आला . तो कक्ष भला मोठा होता त्यामुळे तो प्राणी सहजपणे आत येऊ शकला . घोड्यासारखे चार पाय , मोठे च्या मोठे पंख , लांब शेपटी व शेवटला वर्तुळाकार आणि एखाद्या पक्षाप्रमाणे लांब मान व चोच .....
" हाच सुरूकू ....
तो म्हातारा म्हणाला
सुरुकु जवळ येत आपल्या चोचीने आयुष्यमानला डवचत होता . जणू काही आयुष्यमानला तो जन्मापासून ओळखत होता......
उत्तरेच्या सैनिक दलाचे स्मशान झाले होते .
कोणाचा हात गेला होता , कोणाचे पाय जागेला नव्हते . ज्याचं सारं काही व्यवस्थित होतं तो बेशुद्धावस्थेत होता . जेव्हा एक दोघेजण शुद्धीवर आले तेव्हा त्यांनी जे बेशुद्ध होते , पहिल्यांदा त्यांना उठवायला सुरुवात केली . नंतर त्या सर्वांनी मिळून जखमींच्या उपचारास सुरुवात केली . ते अंधभक्त एखाद्या महान योद्ध्यासारखे लढले होते . ते त्यांच्यासाठी काहीच अवघड नव्हतं . त्यांना सर्व प्रकारची युद्ध कौशल्य आत्मसात होती . त्यामुळे त्यांच्यापुढे सामान्य सैनिकांचा टिकाव लागणे कधीच शक्य नव्हते . मात्र ही सारी सामान्य माणसे त्यांच्या महाराणीसाठी , त्यांच्या राजकुमार साठी लढली होती . जखमी झाली होती . आणि हे सर्व निष्फळ ठरलं होतं . कारण राजकुमार त्याठिकाणी नव्हताच . राजकुमाराला घेऊन जाण्यात भक्त यशस्वी झाले होते......
जखमींना औषध पुरवले जात होते . जो तो ज्याच्या त्याच्या परीने उपचार करत होता . पण सारे तंत्रज्ञ मंदाराविषयी विसरूनच गेले होते . तो काहीतरी सांगत होता , त्याच्याविषयी विसरून गेले होते . तो जिवंत आहे की मृत , तो कुठे आहे याचेही त्यांना भान नव्हतं . मात्र तो तंत्रज्ञ मंदार जिवंत होता . चाकू जरी त्याच्या हृदयाजवळ लागला असला तरी त्याच्या हृदयात गेला नव्हता.....
भिल्लवाने मंदारला पाहिले . सैनिकांच्या मदतीने त्याला उचलून बाजूला घेत त्याच्या वरती उपचार केला . हृदयाच्या जवळ गेलेला चाकू काढून मलमपट्टी केली . काही वेळ अजून गेला असता तर मंदार नक्कीच मृत्युमुखी पडला असता . एवढा मोठा तंत्रज्ञ इतके वर्ष जिवंत राहिला पण या साध्या गोष्टीने त्याला मरण येणार होतं....
" अश्वराज , अश्वराजाला पाहिले का ....? तो कोठे गेला.....?
मंदार अडखळत अडखळत बोलत होता....
" नाही , आम्ही पाहिलं नाही ....... "
भिल्लव म्हणाला....
" माझी पिशवी , शिट्टी महत्त्वाची आहे .... अश्वराजला माघारी पाठवले पाहिजे ..... आता लगेच आपण नाही जाऊ शकत विक्रमाला थांबवण्यासाठी ....
तर एका सैनिकाने शिट्टी आणून मंदारजवळ दिली . त्याने शिट्टी वाजवली . अश्वराज धावत आला .
" अश्वराज परत माघारी जा , शौनकचा शोध घे.... त्याच्यासोबत असलेल्या वारसदाराच्या सभेच्या प्रमुखा सोबत काळ्य विहिरीपासून पुढे निघालेल्या विक्रमाच्या सेनेकडे जा ..... शौनक जवळ दृश्य रूपांतरण कापड आहे . त्याची मदत घेऊन तुम्ही सैनिकांना परावृत्त करू शकता......लवकर निघ......
तेच दृश्य रूपांतर कापड ज्यामध्ये मंदारने तो प्रलय , त्याची काही झलक पाहिली होती . ते कापड शौनक जवळ होते . अश्वराज वाऱ्याच्या वेगाने तिकडे निघाला.....
महाराणी शकुंतला एका कोपर्यात बसली होती . तिचा पहिला पुत्र तिच्यासमोर जिवंत जाळला गेला . दुसरा पुत्र ' त्याच्यापासून ' झाला होता . त्या पुत्राने आता संपूर्ण पृथ्वीतल विनाशाच्या वाटेवर आणून ठेवला होता . तिसरा मुलगा जो तिचा एकमेव आशेचा किरण होता , तोही आता ' त्यानेच ' नेला होता . होय तिला माहित होतं . तो आवाज तिच्या ओळखीचा होता . ती काळी सावली तिच्या ओळखीचे होती.....
आज जो अंधभक्तांना घेऊन आला होता , तो तोच होता तोच होता , जो काही वर्षांपूर्वी तिच्या आयुष्यात आला होता . तो होता ज्याने तिच्यावरती भुरळ घातली होती . तो तोच होता ज्याच्या संमोहनाखाली येऊन तिने त्याला सर्वस्व अर्पण केले . तो तोच होता ज्याच्यापासून तिला विक्रमाची प्राप्ती झाली.....
तिने त्याला ओळखले होते , पण ती काहीच बोलू शकली नाही . ती काहीच करू शकली नाही. ती त्याला विरोध करू शकली नाही . तिला स्वतःचा मनस्वी राग येत होता . ज्यावेळी तिचा पहिला पुत्र जिवंत जाळला जात होता त्यावेळी ती गप्प राहिली . ज्यावेळी तो तिच्या आयुष्यात आला त्यावेळी ती संमोहनाखाली होती . मात्र आता तसं काहीही नसताना ती त्याला विरोध करू शकली नाही . ती त्याच्याशी लढू शकली नाही . तिचं काळीज पिळवटून निघत होतं . तिला राग येत होता . तिला राग येत होता स्वतःचा , तिला राग येत होता राजा सत्यवर्माचा , तिला राग येत होता साऱ्या अंधभक्ताचा.....
पण ती काही करू शकत नव्हती . तिला माहित नव्हतं तो कोण होता . तो कुणासाठी काम करत होता . तो कशासाठी हे सर्व करत होता .....? त्यांन रक्षक राज्याचा खरच निर्वंश केला होता......
महाराज विश्वकर्मा जलधि राज्याची पाच हजारांची सैना घेऊन महाराज विक्रमाला थांबवण्यासाठी आले होते . महाराज विक्रमाचा तळ आता त्यांच्या दृष्टिपथात होता .
" महाराज इथून पुढं गेलो तर त्यांना दिसू शकेल त्यामुळे आपल्याकडे युद्ध करण्यावाचून दुसरा पर्याय राहणार नाही......
महाराष्ट्र विश्वकर्मा बरोबर कौशिक चा विश्वासू हेर भार्गव आला होता......
" भार्गवा आपला तळ इथेच टाक . तू माझ्यातर्फे विक्रमासाठी संदेश घेऊन जा आपले सैन्य त्यांची शक्ती त्यांची शस्त्रे साऱ्यांचे वर्णन करा . मी जे पत्र लिहून देतोय ते त्याच्या पुढे जाऊन वाच.......
जलधि राज्याच्या त्या पाच हजार सैन्य तुकडीचा तळ तिथेच पडला . महाराज विश्वकर्म्याने भार्गवा जवळ पत्र लिहून दिले . तो विक्रमाच्या तळाकडे रवाना झाला......
दक्षिण-पूर्व समुद्रात असलेल्या बेटांना उडती बेटी म्हणून ओळखलं जायचं . ज्यावेळी पहिल्यांदा प्रलय काळ आला होता . त्यावेळी या बेटावरील लोकांनी सर्व पृथ्वीतलावरील लोकांना प्रलय थांबवण्यासाठी फार मदत केली होती . उडत्या बेटावरील लोक कधीच पृथ्वीच्या इतर राज्यांशी किंवा राजाशी संपर्कात नसत . ते नेहमीच अलिप्त राहात आले होते .
जेव्हा राजमहर्षी सोमदत्तने उडत्या बेटांचा उल्लेख केला , त्यावेळी सर्वांमध्ये कुजबुज झाली . कारण उडत्या बेटांची आख्यायिका सर्वांनीच ऐकली होती . राजमहर्षी पुन्हा एकदा बोलू लागले......
" उडत्या बेटांनी त्यावेळी शपथ घेतली होती ज्यावेळी प्रलयसदृश्य स्थिती येईल त्यावेळी ते आपल्या मदतीला येतील..... आपल्याला फक्त तो अग्निस्तंभ पेटवायचा आहे जो आपल्या राज्यात आहे . त्यानंतर काही प्रहारच्या अवधीतच त्यांची मदत आपल्याला पोहोच होईल.....
ज्यावेळी त्यांनी शपथ घेतली होती त्यावेळी पृथ्वीवरती शेकडो राजे होते . पण ज्या राज यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण लढले होते ते राज्य आपल्या राज्याच्या राजधानीचे ठिकाणच होतं . त्यामुळेच तो अग्निस्तंभ आपल्या राजधानीच्या जवळच आहे . तो फक्त आपल्याला प्रज्वलीत करायचा आहे....।
त्यावेळेस महाराज म्हणाले...
" महर्षी आता ही निकडाची वेळ आहे . अशावेळी आपण अशा आख्यायिकावरती वेळ न घालवता . खरे प्रयत्न करण्याची गरज आहे . मी काही सैनिकांना तो स्तंभ पेटवण्यासाठी पाठवून देतो . पण आपली खरी समस्या आहे ती म्हणजे हे लोक त्रिशूळ सैनिकांमध्ये कसे परावर्तित झाले.....?
राजमहर्षी सोमदत्ताने उडत्या बेटा विषयी माहिती सांगितली खरी , पण उडत्या बेटांची निव्वळ आख्यायिका होती , ती खरेच आहेत का .....? असली तर त्यावरील लोक मदत करतील का .....? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत होते . जर भिंती पलीकडील महालातील शस्त्रागारात असलेला त्रिशूळ आणायचा असेल तर इतरही काही मार्ग असू शकतील असं लोकांचं म्हणणं होतं . एका आख्यायिकेमागे धावत जाण्यापेक्षा काही शूरवीरांना भिंतीपलीकडे पाठवून तो त्रिशूळ आणावा असच बर्याच जणांचं म्हणणं होतं........
या सर्वाच मूळ होतं , ते म्हणजे त्रिशूळ सैन्यात असलेले सामान्य नागरिक . ते सामान्य लोक त्रिशूळाचे सैनिक कसे बनले हाच मोठा प्रश्न होता......
ज्यावेळी प्रलयकारिका जागृत
ज्यावेळी प्रलयकारिका जागृत होते . त्यावेळी प्रलयकारिकेचा सामना करण्यासाठी प्रलयकारिकेला हरवण्यासाठी , किंवा प्रलयकारिकेला नष्ट करण्यासाठी सुरुकु एकाची निवड करतो.....>>>>>>एक ताकदवर को खत्म करने भगवान हमेशा दुसरा ताकदवर पैदा करता है
पूढे काय होईल याची उत्सुकता
पूढे काय होईल याची उत्सुकता प्रत्येक भगानंतर वाढतंच चाललीये.....!
...छान!
उत्तम. प्रचंड उत्सुकता!!
उत्तम.
प्रचंड उत्सुकता!!
खूप छान... एका दिवसात सगळे
खूप छान... एका दिवसात सगळे भाग वाचून काढले... मजा येतेय .. पुलेखुशू... रोज 2 भाग टाकले तरी तक्रार नाही.... हेहेहेहेहे....
Tumchya sarvanchya
Tumchya sarvanchya pratikriyebaddal manapasun dhanyawad
पुढचा भाग कधी टाकणार?
पुढचा भाग कधी टाकणार?
रोज एक भाग टाकनार आहात ना. मग
रोज एक भाग टाकनार आहात ना. मग ग्याप नका घेऊ.
रोज एक भाग टाकनार आहात ना. मग
रोज एक भाग टाकनार आहात ना. मग ग्याप नका घेऊ. >>>+१
नेहमी प्रमाणे च एकदम छान..
नेहमी प्रमाणे च एकदम छान...मला वाटले होते तसे विक्रम "त्याचा" मुलगा आहे ..पुढील भागाची उस्तुक्ता वाटतेय
Navin bhag kenvha yenar ?
Navin bhag kenvha yenar ?
लेखक सुट्टी वर गेलेत बहुतेक..
लेखक सुट्टी वर गेलेत बहुतेक..
Nahi suttivar nahit gele.....
Nahi suttivar nahit gele.......
Series pahanyachya kamat vyast ahet ....
Udya kartoy ek mothaaaasa bhag post. .. ....
(No subject)
एक मोठ्ठा....... भाग टाकनार
एक मोठ्ठा....... भाग टाकनार होता ना.
तीन दिवसांपासुन वाट बघतेय....
पुढचा भाग कधी
पुढचा भाग कधी
झाले वाचून सगळे भाग
झाले वाचून सगळे भाग
रंजक आहे कथानक. पुभाप्र.
छान
छान
लेखक हरवले आहेत..
लेखक हरवले आहेत..
Lekhak sapadle ahet ....
Lekhak sapadle ahet ....
(No subject)