एकाच मांडवात दोघींशी लग्नाची पत्रिका

Submitted by किरणुद्दीन on 10 April, 2019 - 13:38

सध्या एक पत्रिका सोशल मीडीयात धुमाकूळ घालतेय. एबीपी माझाने सुद्धा ही बातमी कव्हर केली. पालगर इथल्या एका रिक्षाचालकाचे बेबी नावाच्या एका मुलीशी सूत जुळले. ते एकत्र राहू लागले. काही वर्षांनी त्याचे सूत पुन्हा रिना नावाच्या दुस-या मुलीशी जुळले. ती ही यांच्या बरोबर राहू लागली. अशी पाच सहा वर्षे झाली. दरम्यान रीनाला एक अपत्य झाले.

आता एकाच मांडवात हे तिघेही लग्न करीत आहेत. या लग्नाची पत्रिका सध्या चर्चेचा विषय झालेली आहे. मात्र त्यात आश्चर्य करण्यासारखे फक्त एकच कारण आहे ते म्हणजे एकाच मांडवात दोघींशी लग्न.

हे तिघेही पालघर भागातील आदिवासी जमातीतील आहेत. इथे व अन्य काही जमातींमधे लग्न न करता एकत्र राहणे हा काही चर्चेचा विषय नाही. हे अगदी सामान्य आहे. गरीबीमुळे लग्नावरचा खर्च फाट्यावर मारून संसाराला सुरूवात होते. जेव्हां पैसे येतील तेव्हां लग्न होते. काही जण उतारवयात लग्न करतात. तर काहींना ते अजिबातच शक्य होत नाही. त्यामुळे काहीच अडत नाही.

बहुतांश आदिवासी जमातींमधे कौमार्य ही कल्पना नाही. त्यामुळे लग्नाशिवाय एकत्र राहणारे दोघे जण केव्हांही काडीमोड घेऊन वेगळे राहू लागतात. त्याला समाजाची मान्यता आहे (अलिकडे मुख्य समाजाच्या संसर्गामुळे काही पुढारलेल्या कुटुंबाच्या चालीरिती बदलत आहेत. त्यामुळे त्यांना फॉलो करणारे देखील वाढत आहेत).

काडीमोड घेतलेल्या मुलीचे लग्न सहजच होते. योनीशुचिता वगैरेंचा संसर्ग नसल्याने तसे वावगे समजले जात नाही.

पुढारलेल्या समाजात आत्ता आत्ता लिव्ह इन रिलेशनशिप आली आहे. पूर्वी त्याबद्दल दबक्या आवाजात, नंतर चटपटीत मसाला म्हणून आणि आताशा गंभीरपणे चर्चा होऊ लागलेली आहे. पुरूषांपेक्षा पुढारलेल्या स्त्रियांना लिव्ह इन रिलेशनशिप पटू लागली आहे. कारण स्त्री स्वातंत्र्याला त्यात वाव आहे.

मुली स्वत:च्या पायावर उभ्या राहत असल्य़ाने नवरा म्हणजेच सर्व काही अशी परिस्थिती उरलेली नाही. त्यामुळे घटस्फोट सुद्धा सामान्य गोष्ट होत चालली आहे (सूडभावना नसल्यास). मात्र घटस्फोटीत मुलीचे लग्न समाजाच्या सर्व स्तरात समान पातळीवर सामान्य बाब नाही हे ही तितकेच खरे आहे.

सहजच बातमीमुळे ब्रेन स्टॉर्मिंन सेशन्स आणि तसे जीवन नैसर्गिकरित्या जगणे यांची तुलना करण्याचा मोह आवरला गेला नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<< आश्चर्य करण्यासारखे फक्त एकच कारण आहे ते म्हणजे एकाच मांडवात दोघींशी लग्न. >>>
एकापेक्षा अधिक जणांशी विवाह करायला बंदी आहे ना, म्हणून आश्चर्य वाटत असेल. आदिवासींच्या काय प्रथा आहेत याची कल्पना नाही. चू.भू.दे.घे.

पत्रिका वगैरे असते आदिवासींमधे? बघूतरी कशी दिसतेय?

पॉलीअँड्रीचे उदाहरण किती कॉमन आहे त्यांच्यात?

पॉलीअँड्रीचे >>> अशा एका शिल्लक जमातीचे केवळ अकरा जण शिल्लक आहेत अशी बातमी होती. आदिवासींमधे मुख्य समाजाच्या चालीरितींची मोठ्या प्रमाणावर लागण होत चालली आहे. महाराष्ट्रातल्ञा आदिवासींवर एका अमेरिकन स्त्री ने संशोधन केले आहे. माझ्या वडिलांनीही केले आहे. एक जर्म स्त्री दर वर्षी भारतात यासाठी यायची. तेव्हां एक परिसंवाद झालेला. लहान असताना मी गेलो होतो.

त्यात विकास हवा की परंपरा जपणे असा काहीतरी काथ्याकूट चालू होता.

वारली- कातकऱ्यांमध्ये बायकापुरुषांनी लग्नाशिवाय एकत्र राहाण्याची प्रथा गेल्या पन्नास वर्षांपर्यंत सर्वसाधारण होती. लग्न हे पवित्र बंधन असे काही त्यांच्यात नसे. ज्यांच्या ज्यांच्या घरी आपण खाल्लेप्यायले आहे त्यांना एकदातरी खाऊपिऊ घालायचे एव्हढाच उद्देश असायचा. घाणे कुटणे, हळद, उंबराचे पाणी, देव खेळवणे, उंबराच्या फांदीला हळदकुंकू वाहून नारळ फोडणे अशा काही आदिम परंपरा पार पडल्या की अंतरपाट धरून एकमेकांना माळा घालतात. मग गावकरी बसतात. साडी, हातातपायात दिलंघेतलेलं बघतात. जेवतात. तारपे आणि दारूवर रात्री फेर धरतात. आदल्या दिवशी हळद आणि मांडवाचे जेवण असते. यात लग्न न करता राहिलेल्या बाईचा समावेश होऊ शकत नाही. म्हणजे फक्त तिचा हातभार वर्ज्य असतो. बाकी कुठेही ती वावरू शकते. स्वयंपाकात मदत करू शकते. पुष्कळच खुलेपणा होता. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. आदिवासींना ' मुख्य प्रवाहात' आणण्याची चळवळ जोमाने सुरू आहे. टी वी , सिनेमा या माध्यमांतून रोज येऊन डोळ्यांवर आदळणाऱ्या संस्कृतीचा प्रभाव वाढतो आहे. राजकीय पाठिंब्याने भजनकीर्तनहोमहवनादि उन्नयनीकरण आश्चर्यकारक प्रमाणात वाढले आहे.

मुली स्वत:च्या पायावर उभ्या राहत असल्य़ाने नवरा म्हणजेच सर्व काही अशी परिस्थिती उरली नाही
त्यामुळे आता

पुरुषांना सुधा पोडगी मागण्याचा हकक मिळाला पाहिजे

वनवासी वाल्यांचं काम वाढतंय तस तसे आदिवासी बद्लत चालले आहेत.
त्या जर्मन विदुषींनी चक्क मराठीत भाषण केलं होतं. त्यांनी पिग्मी लोकांचे दाखले दिले. अ‍ॅमेझॉनच्या जंगलातल्या जमातींचे दाखले दिले. वि़कास आणि नैसर्गिक जीवनातील आनंद / सुख यावर विवेचन केले. त्याच बरोबर वि़कासा अभावी होणारे अपमृत्यू, अंधश्रद्धा याचाही धांडोळा घेतला. थोडक्यात दोन्ही बाजूचे स्ट्राँग पाँईण्ट्स आहेत. पण याच्यावर ज्यांनी निर्णय घ्यायचा ते सक्षम आहे कि नाहीत याची चिंता दुसरेच करताहेत , तसेच जर बाह्य जगाची माहीतीच नसेल तर योग आणि अयोग्य काय यावर विचार कसा करणार हे दोन्ही प्रवाह योग्य कि अयोग्य हे ठरवणेही कठीण.

त्यांचे नाव लक्षात नाही.

बातमीची लिंक आणि पत्रिकेचा फोटो द्या कि मूळ धाग्यातच.
मला ही दुसरीच जुनी बातमी मिळाली
https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-LCL-human-interest-sto...

विकासासोबतच 'त्यांची' परंपरादेखील जपली जाऊ शकते खरंतर. पण ज्यांनी विकास घेऊन जाणे अपेक्षित आहे ते आधी आपली खुळचट धर्म, कर्मकांड, पितृसत्ताक पद्धती वगैरे नेऊन पोचवतात आणि मग तो विकास राहतो मागेच.

चांगले विचारमंथन किरणुद्दीन

आदिवासींना ' मुख्य प्रवाहात' आणण्याची चळवळ जोमाने सुरू आहे.>>> हे योग्य की अयोग्य, यावर तुमचे मत काय आहे हिरा? मला तरी त्यांना ओढून मुख्य प्रवाहात आणू नये असे वाटते पण माझा आदिवासी जीवनाचा काहीच अभ्यास नाही, एखाद दुसरे पुस्तक वाचण्या व्यतिरिक्त.

पण ज्यांनी विकास घेऊन जाणे अपेक्षित आहे ते आधी आपली खुळचट धर्म, कर्मकांड, पितृसत्ताक पद्धती वगैरे नेऊन पोचवतात आणि मग तो विकास राहतो मागेच. >> खरच आहे! Its too unnecessary!
त्यांचं होणारं शोषण, आरोग्य ह्या गोष्टींवर जसे आपल्याकडून त्यांच्याकडे इन्पुट्स जायला पाहिजेत,
त्याचबरोबर, आदिवासींचा ईकॉलॉजिकल फूटप्रिंट, निसर्गा शी त्यांची असलेली जवळीक , नैसर्गिक शहाणपण ह्या गोष्टी आ पण शिकाव्यात अशा आहेत. माझ्या माहितीतले काही लोक आणि गृ प्स त्यांच्यात राहून त्यांच्याकडून शिकणे (जगण्यातली सहजता (सुखसोयी नव्हेत) वगैरे) ह्यावर काम करतात.

त्याचबरोबर डाकीण वगैरे सार ख्या प्रथा बंद व्हायला पाहिजेत हे ही तितकेच खरे.. मला पहिल्यांदा वाचले तेव्हा फार हादरायला झाले होते!

आदिवासी समाज बराचसा स्वयं केंद्रित असतो .त्याचे आर्थिक , सामजिक , व धर्मिक जीवन बाह्य सम्पर्का पासून खूप वर्ष अलिप्त राहिल्याने ते स्वयं केंद्रित असणे स्वभाविक आहे .
जगतील सर्व समाज पहिला आदिवासी अवस्थेत च होता .पुढे तो ग्रामीण समाज .मग शहरी समाज असा वाटचाल करू लागला .

ज्यांनी विकास घेऊन जाणे अपेक्षित आहे ते आधी आपली खुळचट धर्म, कर्मकांड, पितृसत्ताक पद्धती वगैरे नेऊन पोचवतात आणि मग तो विकास राहतो .
निस्वार्थी पने आदिवासी लोकांचं विकास करणारी लोक आहेत कुठे .काही राजकीय पक्ष आहेत ते आदिवासी विकास बध्दल घसा बसेपर्यंत बोलत असतात .प्रत्सक्षात आदिवासी लोकांचं विकास करत नाहीत स्वतचं मात्र भरपूर राजकीय विकास घडवून आणतात .
जे एनजीओ आहेत त्यांना प्रसिद्धी आणि देणग्या इथपर्यंत च आदिवासी लोकांशी संबंध असतो .
धार्मिक संस्था आर्थिक मदत करतात पण स्वतःचा धर्म त्यांच्या माथी मारतात .
त्या मुळे अजुन सुधा अत्यंत हलाखी चे जीवन ते जगत आहेत . तसू भरही विकास त्यांचा झाला नाही