Submitted by कटप्पा on 9 April, 2019 - 11:37
पुण्यात होतो तेंव्हा काही तेलगू तामिळ मित्र झाले होते, हाफीसात पण त्यांच्याच भाषेत बोलायला सुरू करायचे. मराठी असलो आम्ही आणि एखादा नॉन मराठी आला तर आम्ही हिंदी बोलतो.
हे गुलते गाणी ऐकणार तर फक्त त्यांची, चित्रपट बघणार तर फक्त त्यांची.
एकाला विचारले मराठी चित्रपट बघतो का, म्हणे नो बॉस, माई हिंदी बी नई देखता, सिर्फ तामिळ देखता हु.
त्या दुसऱ्या धाग्यावर मी विषय काढला तर चढले माझ्यावर. इतका काय साऊथ इंडियन चित्रपट कौतुक?
तद्दन फालतू हिरो, भिकार कथा, अविश्वसनीय मारामाऱ्या... नक्की काय आवडते.
माझं आवाहन आहे, नका बघू असले चित्रपट.. मराठी बघा. परत परत बघा.
इतकीच खाज असेल साऊथ सिनेमांची तर सलमान , रोहित शेट्टी रिमेक करतात ते बघा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हा प्रश्न म्हणजे "मराठी
हा प्रश्न म्हणजे "मराठी लोकांना हॉटेलात पंजाबी खायला का आवडते?" या चालीवरचा वाटतो.
आता हा धागा काढणार्या आयडीने स्वतः एका तेलुगू पिक्चरमधल्या कॅरॅक्टरचे नाव का घेतले असेल असा प्रश्न निर्माण होतो. काय मराठी नावं कमी पडली ? परश्या, भाऊ, दादा, बाजी, सर्जा अशी बरीच नावं घेता आली असती पण आयडीने मात्र तेलुगू नाव घेणे पसंत केले !!
धनि>>सहमत
धनि>>सहमत
म्हणूनच मी फक्त शिवाजी
म्हणूनच मी फक्त शिवाजी गायकवाड, सयाजी शिंदे अश्या मराठी माणसांचेच सौदिंडियन सिनेमे बघते
मला खूप आवडतात साउथ चे पिक्चर
मला खूप आवडतात साउथ चे पिक्चर,एकदम हटके स्टोरी आणि हहपुवा अशी मारामारी असते,त्यात पण हॉरर पिक्चर असतील तरीही जामच कॉमेडी असते,आणि स्टोरी तर काहीही भन्नाट अशी भलतीच त्यामुळे कोणताही साउथ चा पिक्चर बोअर नाही वाटत,मराठी हिंदी मधल्या स्टोरी रटाळ वाटतात
मला वाटते मराठी आणि साऊथ
मला वाटते मराठी आणि साऊथ इंडस्ट्री बऱ्यापैकी सेम आहे.
टॅलेंट आधी, लुक्स नंतर.
सिद्धर्थ जाधव किंवा धनुष.. यांचे चेहरे बघून यांना हिरो चे रोल फक्त याच इंडस्ट्री मध्ये मिळू शकतात.
कंचना सिरीज बघितलीय ना.
कंचना सिरीज बघितलीय ना.
कोण कंचना?
कोण कंचना?
ही
ही
याचा रिमेक होतोय ना म्हणे
याचा रिमेक होतोय ना म्हणे हिंदीत ?
Hindi पेक्षा साऊथ चे पिक्चर
Hindi पेक्षा साऊथ चे पिक्चर चांगले असतात .
त्यात मनोरंजन भरलेलं असतं ..
मराठी पिक्चर सुधा खूप चांगले असतात
ए या एक अक्षरी सिनेमाचा
ए या एक अक्षरी सिनेमाचा हिंदीत रिमेक झालाय का? गेला बाजार निदान तो हिंदीत तरी डब झालाय का? बघायची इच्छा आहे.
काही साऊथ पिक्चर बघायची
काही साऊथ पिक्चर बघायची डेरिंग केली मी पण इतके बकवास कि.. परत कधी बघितले नाही
अर्थात काही अप्रतिम सिनेमे आहेतच तिकडे पण अगदी मोजके असतील बाकी सर्व
टिपिकल हाणामाऱ्या आणि तो एकच सतत दिसणारा कॉमेडियन..
आणि कहर म्हणजे साऊथ वाल्यांना इतका टोकाचा अहंकार आहे त्यांच्या इंडस्ट्रीचा कि
हिंदी आणि बाकी प्रादेशिक चित्रपटांकडे तिरस्कारानेच बघतात आमचीच कॉपी केली म्हणतात
आणि आपल्या कडे लोकांचा जीव चालला आहे साऊथ चे सिनेमे बघण्यासाठी
आपल्या कडच्या सगळ्या चॅनेल वर दिवसभर त्याच हिंदी डब पिक्चर चा रतीब सुरु आहे जस काही
आता जगात फक्त साऊथलाच पिक्चर बनतात
चित्रपटाचा आस्वाद घेण्यासाठी एक वैश्विक दृष्टी असावी जगभरातले चांगले चित्रपट बघावे
त्यात भाषेचा अडसर नसावा. ती त्यांच्याकडे कमी प्रमाणात आहे.
ते त्यांच्या नटाला दुधाचा अभिषेक घालण्यातच धन्यता मानतात
असो आवड आपापली
आपल्या मराठीत पण भरपूर बिनडोकं आणि रटाळ सिनेमे खूप जास्त आहे
आपण चांगल ते बघाव
मी फक्त त्या विनोदी नटासाठी,
मी फक्त त्या विनोदी नटासाठी, त्याचा अभिनय पाहण्यासाठी साउथींडीयन सिनिमे पाहतो. त्याच्या सारखा तोच आहे, इतर दोन तीन विनोदी नट आहेत तिकडचे पण त्यासम तोच. त्याचं नाव ठाऊकही नाही मला. रावडी राठोड सिनेमात मामाचं काम करणाऱ्या विनोदी नटाचे नाव काय आहे. मला फोटो डकवता येत नाही त्याचा. हिरो म्हणून रवि तेजा आवडतो पण चिकण्या हिरवीनींपुढं लै थोराड/एजेड दिसतो.
मराठी हिंदी सिनेमे चुकूनही
मराठी हिंदी सिनेमे चुकूनही बघत नाही.
Shashiram.
Shashiram.
मराठी मध्ये सुद्धा अत्यंत उच्य दर्जाचे पिक्चर आहेत .
हिंदी पेक्षा मराठी मधील काही गाणी आणि पिक्चर अतिशय uchya दर्जाचे आहेत .
आणि ह्या क्षेत्रात फक्त बंगाली भाषिक पिक्चर च मराठी ची बरोबरी करू शकतील बाकी कोण्ही नाही
दर्जा गेला तेल लावत. काही
दर्जा गेला तेल लावत. काही लोकांची मक्तेदारी आहे मराठीत. आय लव्ह सावूदिंडीयन सिनेमा.
त्याचं नाव ठाऊकही नाही मला.
त्याचं नाव ठाऊकही नाही मला.
>>
ब्रम्हानंदम
बरोबर. मी पंखा आहे त्यांचा.
बरोबर. मी पंखा आहे त्यांचा.
अरे काहेका ब्रह्मानंद भाई-
अरे काहेका ब्रह्मानंद भाई- कौन है वह?
तूम उसकी एक्टींग देखोगे तो
तूम उसकी एक्टींग देखोगे तो जानोगे
चित्रपट चांगला असला की बघावा.
चित्रपट चांगला असला की बघावा. भाषा येत नसेल तर सबटायटल्स वाचत बघणे जरा जीकरीचे असले तरी काही चित्रपट वर्थ असतात.
फालतू चित्रपट म्हणाल तर ते हिंदी, मराठी, इंग्रजीतही ढिगाने असतात की.
शेकडो हिंदीत डब केलेले साऊथचे
मानव सहमत. मीपण बरेच चित्रपट सबटायटल्सवर समजून घेतलेत व पाहण्याचे समाधान मिळाले. शेकडो हिंदीत डब केलेले साऊथचे सिनेमे आहेत. तसेच काही इंग्रजी चित्रपट सुध्दा डब केलेले असतात.