बुलेट ट्रेन - मुंबई अहमदाबाद मुंबई

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 September, 2017 - 15:44

बघता बघता आपल्या डोळ्यांसमोर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन धावायला लागेल तो दिवस आता फार दूर नाही.
यानिमित्ताने मनात उठलेले प्रश्न
प्रश्न उठायचे कारण - बुलेट ट्रेननिमित्त होणारा अवाढव्य खर्च - तब्बल १.१ लाख कोटी !
आणि त्याचा मला पर्सनली काहीच न होणारा फायदा.
अर्थात मी टॅक्स भरतो म्हणून प्रत्येक गोष्टीचा फायदा मला व्हायलाच पाहिजे असे गरजेचे नाही, देशाचा विकास याला देखील आपलाच फायदा म्हटले पाहिजे.
पण बुलेट ट्रेन हि खरेच विकासासाठी आहे का? असल्यास कोणाच्या विकासासाठी? आणि तो देखील होणार आहे का?
माझ्या ऐकण्यात आले आहे की बुलेट ट्रेनचे तिकीट विमानाएवढेच किंवा किंचित जास्तच असणार आहे. जर हे खरे असेल तर किती लोकं या ट्रेनचा वापर करतील? याचा काही सर्व्हे काही स्टडी केला आहे का?
(माझ्या कानावर आलेली बातमी - सरकारी अनुमानानुसार सुरुवातीला वर्षाला 1.6 कोटी लोक या ट्रेनने प्रवास करतील, म्हणजे दिवसाला जवळपास 45000 लोक मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनने जातील. - मला जरा हा आकडा जास्तीचा फुगवलेला वाटतोय. प्लीज कन्फर्म)
जर आजच्या तारखेला हा प्रकल्प फायद्यात जावा ईतके लोकं प्रवास करणार नसले तरी येत्या काळात ते वाढणार आहेत का? किंबहुना ते वाढावेत यासाठी काही योजना आहेत का?
आजच्या तारखेला हा प्रकल्प फारसा फायद्यात नसला तरी काही वर्षांनी जेव्हा देशातील महत्वाची सारे शहरे बुलेट ट्रेनने जोडली जातील तेव्हा ते देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल ठरेल का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नोटबंदीच्या वर्षश्राद्धाला मोदींनी त्याच्या यशाची भरपूर जाहिरात केलेली - सरकारी पैशाने.
आता निवडणूक प्रचारात ते त्याबद्दल का बोलत नाहीत? Wink
ती सुई स्वतःलाच टोचेल म्हणून?

नोटबंदी वर जय महाराष्ट्र चॅनल वर काँग्रेस नि खूप निवडणूक जाहिराती दिल्या आहेत
एक मुलगी नोटबंदी मुळे लग्न मोडले असे सांगताना दिसत आहे ।
मला खूप हास्यास्पद वाटली ती जाहिरात
आणि bjp नोटबंदी वर काहीच बोलत नाही त्यामुळे kas आळणी वाटतंय

इथे खूपसे लोक विकीलिंक्सना खूपच महत्त्व देत आहेत. एक्स्प्रेस वे होण्याला तत्कालीन परिस्थिती बरीच जबाबदार होती. जुन्या मुंबईपुणे मार्गावर अनेकदा वाहतूकखोळंबा होऊ लागला होता. अपघात, टॅंकर उलटणे नेहमीचे झाले होते. उर्वरित महाराष्ट्रातून मुंबईकडे येण्यासाठी हाच प्रमुख मार्ग होता आणि अनेक राजकीय नेतेही यावरूनच प्रवास करीत असल्याने त्यांनाही चांगलीच झळ बसत असे. एकदा तर चौदा तासांचा खोळंबा झाला होता. शरद पवारांना एकदा अशीच झळ बसली आणि मग पर्यायी मार्गाचा विचार वरच्या पातळीवर सुरू झाला. त्यातच स्व. मीनाताई ठाकरे यांचे या मार्गावरील एका नर्सिंग होममध्ये निधन झाले आणि तिथे लवकर पोचण्यास अडथळा आला. त्यानंतर मात्र युद्धपातळीवरून पर्यायी मार्गाचे काम सुरू झाले. तोपर्यंत युतीची सत्ता आली होती. गडकरींनी नेटाने ते पूर्ण केले. विरोध थोडाफार झाला. मुख्यत: मार्गावरील गावकऱ्यांकडून झाला. हा मार्ग लिमिटेड ॲक्सेसचा असल्याने गावकऱ्यांना गुरचरणी, शेतीची कामे यासाठी रस्त्यापलीकडे जाणे कठिण झाले. शिवाय योग्य नुकसानभरपाईचाही मुद्दा नेहमीप्रमाणे होता. पण एकंदरीत लोकांचा पाठिंबा होता कारण सततच्या अपघात आणि खोळंब्याला लोक कंटाळले होते. पर्यावरणाचाही मुद्दा फारसा ताणला गेला नाही. काम खरोखर जनहिताचे आहे हे पटले तर विरोध फारसा होत नाही आणि झाला तर लगेच मावळतो.

>>काम खरोखर जनहिताचे आहे हे पटले तर विरोध फारसा होत नाही आणि झाला तर लगेच मावळतो.<< +१
प्रोजेक्ट (फिजिबल स्टडी) मध्ये जनहित नसेल तर प्रोजेक्ट पुढे जाणारच नाहि...

https://youtu.be/MtY51yteHMY

बुलेट ट्रेन मध्ये तुम्ही आम्ही बसणार नाही , टी फक्त जगाला दाखवायला आहे.

कोण बोलले होते हे ?

देशाच्या भविष्याकरता या प्रोजेक्टची स्ट्रटिजिक वॅल्यु काय आहे, हे समजुन घेणं जरुरीचं आहे >>> ती स्ट्रॅटेजिक व्हॅल्यु काय ते सांगाल का ? विशेषतः बीकेसी-अहमदाबाद ह्या होऊ घातलेल्या बुलेट ट्रेनच्या बाबत वाचायला आवडेल. मी हे अगदी तटस्थपणे विचारत आहे

छान
गुजरातचे अभिनंदन

एल एन टी गुजरातेत पूर्णपणे शिफ्ट झाली की नाही अजून ?

नवीन Submitted by swwapnil on 29 October, 2020 - 23:59
--

मग तुमची काय इच्छा आहे ?
पवारांच्या आयआरबीने करावी ??

Pages