सा रे ग म प मराठी : पुढचे पर्व

Submitted by Adm on 29 July, 2009 - 19:23

महाराष्ट्राचा आजचा आवाज नंतर झी मराठी ने सा रे ग म प चं पुढचं पर्व जाहिर केलयं. हे पर्व नवोदित गायकांसाठी असणार आहे. परवाच ह्याची निवडचाचणी मुंबई ला पार पडली. ह्या पर्वाचे बाकीचे डिटेल्स जजेस वगैरे (बहूतेक) अजून जाहिर झालेले नाहियेते. ( Black and white कार्यक्रमाच्या काही भागांमधे गायलेली गायिका स्वरदा गोडबोले हीची ह्या पर्वासाठी निवड झाली आहे).

हे पान ह्या पर्वातल्या गाण्यांविषयी गप्पा मारण्यासाठी.....

http://www.youtube.com/view_play_list?p=96710707C1C304CA ह्या लिंकवर सगळी गाणी पहायला मिळतील..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>खरेतर या पर्वात सादरीकरणात काहीतरी (जास्त नाही हो. पण काहीतरी???) नाविन्य असायला हवे होते. पण नाही!<<< असे कसे ? या पर्वात एक मोठ्ठ्ठ्ठ्ठ्ठ्ठा बदल झाला की, पल्लवी चक्क मॅचिंग साधतेय! Happy

मला समजलेले फायनलिस्ट:
राहुल सक्सेना
अभिलाषा
उर्मिला
मृण्मयी
अश्विनी
संहिता
स्वरदा
सुस्मीरता
अपुर्वा
रुतुजा

आश्चर्य म्हणजे फक्त १ च मुलगा, बाकी सगळ्या मुली !

पूनम, अगं ती दुबईची आहे. तिथलं टिआरपी मिळवण्यासाठी तिला हाईप करायलाच हवं.. शिवाय तिची ठाणे(?)-पुणे-दुबई अशी त्रिस्थळी यात्रा सुद्धा हाईप केलीये, म्हणजे एका दगडात तीन पक्षी
<<
मंजु-पूनम

एका दगडात तीन नाही ४ पक्षी !
या सगळ्या शिवाय सर्वत मह्त्त्वाचं कारण : असं वाचलं कि ती सलील ची स्टुडंट होती , मग यायलाच हवी ना ?
खूप च ओव्हर हाइप करतायेत तिला !

बाकी मराठी-अमराठी वाद घालायचा त्यांनी घाला पण निर्विवाद पणे मला तरी फक्त राहुल सक्सेना आणि अभिलाषा च टॉप २ मधे डिझर्व करतात असं वाटत , तिसरी सुस्मीरता (IMO) :).

मला ह्या पर्वात अवधूत थोडा अपसेटच वाटतोय. मे बी त्याचे निर्णय थोडे डावलले जातयत किंवा त्याचे स्टुडंट्स मागे पडतायत.
बाकी कोणी नोटीस केलं का हे?

राहूल सक्सेना यायलाच हवा फायनलला.. एकतर मुलगा आणि दुसरा म्हणजे परप्रांतीय.. दोन दोन निकष पूर्ण केलेत.. !

राहूल सक्सेना यायलाच हवा फायनलला.. एकतर मुलगा आणि दुसरा म्हणजे परप्रांतीय.. >> आणि चांगला पण आहेच!!

स्वरदा एव्हढा माझ्या डोक्यात कोणताच स्पर्धक जात नाही . Sad तिचे गाणे म्हणतानाचे , परिक्षकांच्या कमेंट्स ऐकतानाचे चेहर्‍यावरचे हावभाव ......... भयंकर डोक्यात जातात . त्यातून ती फायनल १० मध्ये आली हे कळल्यावर मला वाटते , माझा सारेगमपमधला इंटरेस्ट निगेटिव्ह कर्व्ह मध्ये गेलाय . तिचे " शोधू मी कुठे कशी " यू ट्यूबवर पाहिले ..... अशक्य हॉरिबल . वैशाली भैसने माडे ने सुंदर गायले होते .
ता.क. सध्या भारतात असूनही सारेगमप बघताच येत नाहीये . Sad म्हणून नो अपडेट्स . Sad Sad

संहिताची मौली दवे झालीये . येत्या सोमवारी मैया मैया गातेय . उद्या कुलवधूच्या स्पेशल एपिसोडमध्ये नवरी नटली गायलीये बहुतेक . अजून चढवणार तिला बहुतेक . Happy

तशीच अश्विनी गोरे देशपांडे , गाणे कधी चुकून माकून छान गायलीच , तर चेहरा असा वाकडा , की परिक्षक जर जास्त मार्क देणार असतीलच , तरी एव्हढा कमी आत्मविश्वास बघून देणार नाहीत . माझ्या मनातले अभिजीत मंगळवारच्या भागात बोलला , की तुझे गाणे ऐकून शांत वाटत नाही . तिच्या गाण्यात फार अस्वस्थता आहे . ( अ‍ॅडमा , आता ह्याचे एक्स्प्लनेशन विचारू नकोस . Happy )

फायनलिस्टच्या बाबतीत डीजे ला अनुमोदन . Happy

आणि चांगला पण आहेच! >>>> ते सापेक्ष आहे.. Happy मी ह्या पर्वातली सगळी गाणी ऐकली नाहित.. त्यात राहूल ची दोन तीनच ऐकली.. आणि मला तरी तो ठिक वाटला... वाईट नाही आणि अगदी ग्रेट पण नाही.. आधी कोणत्या तरी हिंदी कार्यक्रमात आला होता.. ते मी पाहिलं नव्हतं सो डोन्नो...

स्वरदा फायनल १० मधे कुठे आली?? ती "नॉमिनेट" झाली आहे.
<< माहित नाही कशी काय पण आहे हे नक्की, कदाचित अजुन एखादी वाइल्ड कार्ड राउंड होईल तिच्या साठी ! Proud

पुढच्या वेळीही हिंदी + मराठी असणार का?

<<< या वेळी अर्धेच स्पर्धक गायले न?
मला तरी सुस्मीरता, उर्मिला, सिद्धेश हे लोक दिसले नाहीत जेंव्हा अभिजीत अला होता तेंव्हा !

उरलेल्या स्पर्धकांना पण सेम राउंड मधून जायला लावलं पाहिजे !
हिंदी राउंड साठी अभिजीत समोर बरोबर त्यांनी राहुल्-अभिलाषा निवडले ज्यांना हिंदी रिअ‍ॅलिटी शोज चा खूप अनुभव आहे !

DJ, ही जी list आहे ती तुझी आहे का?? Happy I mean IYO ?? कारण, एक तर ह्या गेल्या दोन भागात (दिवाळीच्या) अर्धेच जण गायले, ४ च जण पुढे गेले.. आणि हो उर्मिला पण नव्हती ना त्यामधे..

खरी चुरस तर अभिलाशा, उर्मिला, राहुल आणि सुस्मिरता ह्यांच्या मधेच आहे (IMO) Happy

ती स्वरदा तर खरच डोक्यात जाते यार......

DJ, ही जी list आहे ती तुझी आहे का?? I mean IYO ??
<<< LOL नाही, मी सगळे भाग पाहिले पण नाहीयेत , आणि खरं सांगायचं तर १० लोक लक्षात पण रहाण्या सारखे नहीयेत.
मी फर तर ५ लोकांची लिस्ट बनवु शकते Proud

ही फायनलिस्टस ची लिस्ट करन्फर्म असल्याचा स्पॉयलर वाचला मी, दुसर्‍या सारेगमप कम्युनिटी वर (गेल्या वर्षीच्या अनिरुद्ध जोशीनी हे पोस्ट केलय.)

अ‍ॅशबेबी प्लीज त्या लेखात काय विचार व्यक्त केले आहेत त्या बद्दल थोडंसं लिहा ना. खूप उत्सुकता वाटतेय पण सध्या इथे तो अंक नाहीये वाचायला.

अभिलाषाचा आवाज मला आवडतो. सुस्मिरताची एकाच प्रकारची गाणी ऐकली आहेत.. व्हर्सटॅलिटी दाखवली तर कसा वाटेल तिचा आवाज? Uhoh
राहुल चांगला गातो, पण बाकीची मुलंही इतकी वाईट नव्हती.. कोल्हापूरचे दोघेही छान होते, पण एकाला 'शास्त्रीय शिकला नाही' म्हणून आणि दुसर्‍याला 'आत्मविश्वास नाही' म्हणून सतत बोलले आणि बाहेर काढले Sad
अश्विनीबद्दल अनुमोदन! कमेन्ट्स ऐकताना काय तो वाकडा चेहरा? सेम मृण्मयी! दिसायला चांगल्या, आवाज चांगले आणि असे काय चेहरे करतात? Uhoh संहिता मात्र सुंदरही आहे, आणि ऐकतेही व्यवस्थित Happy
मो-ला अनुमोदन. अवधूत बसलेला असतो आपला उगाच. सलिल आणि इतर परिक्षक बोलतात त्यांचा अंदाज घेऊन बोलतो, नाहीतर पाचकळपणा करतो Angry तो लिटिल चॅम्प्सला खरंच चांगलं परिक्षण करायचा.

गेल्या भागात ९ झाले, येत्या सोम-मंगळ बाकी ९ होतील. त्यात असेल उर्मिला, सुस्मरिता वगैरे Happy

मंगेशकरांनी झी वर आणि एकुणच ह्या प्रकारच्या कार्यक्रमांवर खुप टीका केलीय. वाचताना वाटते की त्यांची आधी वाहिन्यांबद्दल वेगळीच कल्पना होती आणि मग त्यांचा स्वतःचाच भ्रमनिरास झाला. ह्या असल्या कार्यक्रमांमधुन कोणीही चांगला गायक बनु शकणार नाही, बनलाच तर त्याचा मनोरुग्ण कदाचित बनु शकेल ( वाहिन्यांच्या प्रसिद्धिचे मधाचे बोट कार्यक्रम संपल्यावर लगेच काढुन घेतले जाते आणि हे काढले जाणार याची जाणीव वेळीच झाली नाही तर मनोभंग ठरलेला)

महाराष्ट्राचा आजचा आवाज ह्या कार्यक्रमाची मुळ संकल्पना त्यांनी वाहिनीला दिली. कार्यक्रम स्विकारताना या कलाकारांनी खुप मोठा धोका पत्करला होता. त्यामुळे याची परतफेड म्हणुन झीने यांची नवी गाणी बसवून एक कॅसेट काढावी व तिला चॅनेलवर प्रसिद्दी द्यावी असे झीकडुन वदवुन घेतले होते. पण कार्यक्रम संपताच झीने लगेच त्याकडे पाठ फिरवली.

अजुन काही -

परिक्षण करताना काय काय बोलायचे हेही चॅनेलवाले ठरवणार. बेसुर गायला तर सुर कमी लागला म्हणायचे, बेसुरा म्हणायचे नाही Happy

'आजचा आवाज' मधुन काही चांगले आवाज लोकांना ऐकवावे, विस्मृतीत गेलेल्या चाली, ज्यांची भाषाच नव्या पिढीला माहित नाही, ती ऐकवावी, वृत्त, छंद वगैरेची माहिती द्यावी. एकाच कवितेचे वेगवेगळे अर्थ निघु शकतात हे समजावे वगैरे बरेच मनात होते. पण पहिल्या दोन्-तीन एपिसोडनंतर झीने 'तुम्ही फार बोलता, बोलणे एडीटले आहे' असे सांगायला सुरवात केली. म्हणुन मग निमुटपणे फालतु गप्पा मारायला सुरवात केली, मामा-भांजे, भांज्याची प्रेयसी इतपर्यंत स्तर खाली आला. असेच करत राहिलो असतो तर माझाही स्तर खालावला असता अशा भितीने वेळीच थांबलो.

ज्ञानेश्वरी, इतिहास इत्यादी गोष्टींवरची टिप्पणी ऐकुन लोक मला इतिहासाचार्य/ ह.भ.प. वगैरे म्हणायला लागले. नुसते वाचलेले बोलुन दाखवले तर लोक लगेच असल्या पदव्या द्यायला आतुर होतात, त्या लोकांचा काय स्तर असणार? आणि असले लोक काय महागायक निवडणार??

एकुण असल्या कार्यक्रमांविषयी वाहिन्यांची 'फक्त पैसा कमवायचा' हीच भुमिका असते आणि त्यासाठी ते कुठल्याही थराला जाउ शकतात हे मंगेशकरांनी 'मृगजळ' ह्या लेखात मांडले आहे.

धन्यवाद अ‍ॅशबेबी. खरं तर आत्तापर्यंतच्या सर्व पर्वात पंडितजी आणि वाडकरांचे परीक्षण हे अत्युच्च दर्जाचे होते. आणि त्यांचे वाक्य न वाक्य पटले. त्यांच्या निरुपणातला एक टक्काही मला कधी रटाळ वाटला नाही. पण मासेसना वेगळे हवे असते त्याला काय करणार !
बाकी सलीलही चांगले परीक्षण करतो. पण देवकी पंडितांसारखी रोकठोक बोलणारी व्यक्ती प्रत्येक पर्वात पाहिजेच. सध्या नुसताच मस्का चस्का चालू असतो कार्यक्रमभर. निकाल ( बहुतांशी ) बरोबर लावतात हाच दिलासा !

आभिजीत स्पेशल एपिसोड मधे हिंदी गाण्यांच्या राउंड ला बहुतेकांचे हिंदी उच्चार किती मराठीमय होते !
'हमे तुमसे प्यार कितना' तर जणु मराठीतच चाल्लं होत !
सांगत कसे नाहीत जजेस यावर काही?
'अब के सावन ऐसे बरसे' अगदीच सुमार, शून्य अ‍ॅटिट्युड आणि अतिशय शेकी !
'सीने मे जलन' चांगलं झालं पण अभिजीत नी म्हंटल्या प्रमाणे सुरेश वाडकर च्या प्रभावा खालीच झालं ते गाणं !( बहुतेक रिअ‍ॅलिटी शो सिंगर्स सुरेश वाडकर आणि सोनु निगम ची गाणी गाताना नको तितकी आवाजाची कॉपी मारायला जातात नेहेमी !).
राहुल सक्सेना नी 'लगन लग गयी है' चांगलं गायलं पण कितीदा तेच गाण् :(, त्याने हे गाणं बहुदा सारेगम, आयडॉल सगळीकडे गाउन झालय !
सुखविन्दर चं 'ढँट डॅन' वगैरे attempt केलं असत् तर छान वाटलं असतं !
अभिलाषा चं 'नदिया किनारे' बेस्ट झालं ( IMO) Proud

मला अभिलाषा चे 'नदिया किनारे', आणि 'सीने मे जलन' एपिसोड मधले सगळ्यात चांगले गाणे वाटले.. Happy मस्त गायला.. सुरेश वाडकरांच्या जवळपास गाणे यातच खुप काही आले.. Happy
राहुल चे गाणे आवडले नाही.. Sad , बाकी गाणी पण बकवास होती..
तो अभिजित खुप डोक्यात गेला.. प्रत्येक वेळी SD बर्मन, मन्ना डे, किशोर इ. बंगाली बाबूंची लक्षात येइल एवढी तारीफ Angry

अभिजीत कायमच डोक्यात जातो. कश्शाला बोलवतात कुणास ठाऊक.
राहुल सक्सेनाला एवढे का चढवतात? अजिबातच आवडली नाहीत दोन्ही गाणी.
अभिलाषाचे अवचिता परिमळू प्रचंड आवडले. नदिया किनारे पण चांगलेच झाले.

काल श्रुती विश्वकर्मा नॉमिनेट झाली. अंतिम फेरीत उर्मिला, संहिता, सुस्मिरता आणि मृण्मयी पोहोचल्या.

सागर जाधवचं 'तडप तडप के' गाणं खरंतर चांगलं झालं होतं. पण त्यावर परीक्षकांच्या मात्र 'दिग्दर्शित प्रतिक्रिया' आल्या. अर्थात, ते अपेक्षित होतंच.. Happy

अगदी! सागर जाधवला ठरवून डीमोटीव्हेट केलं असं मला कायमच वाटत आलंय.. अवधूतची पातळी दिवसेंदिवस घसरत चाललीये Angry काहीही बोलतो, विचारही करत नाही. सलील अजून तरी ठीक बोलतोय. रोनू मुझुमदारांनी उत्तम परिक्षण केलं- unbiased, as it should be.

संहिता, सुस्मिरता सुंदरच गायल्या. उर्मिलाचं गाणं सोमवारी अजिबात 'नी' मिळण्याइतकं चांगलं झालं नव्हतं, पण अवधूत ती दिसली की 'नी' आणि सागर जाधव दिसला की 'प' हेच देतो, गाणं कसं का होईना! कालचं 'लंबी जुदाई' मात्र उर्मिलाचं मस्तच! वादच नाही. तरी पण तिला, राहुल सक्सेनाला उगाचच हाईप करताहेत असं मला वाटत आहे. एखाद्या भागात देवकी पंडीत आली, तर तिच्यापुढे कस लागेल त्या दोघांचा.

सोमवारी कार्तिकी आणि मुग्धा, तर काल प्रथमेश, रोहित आणि आर्या येऊन गायले. यात रोहितचा आवाज फुटल्यामुळे तो राखून गायला, तर आर्या थोडी shrill झाली.. कार्तिकी, मुग्धा, प्रथमेश एकदम सही! तो आता दहावीला आहे, तरी पल्लवी ताईंनी त्याची लांबून का होईना, पण पापी घेतलीच! Uhoh

'अभिजित' जज होता, तेव्हा फक्त अभिलाषाचंच गाणं चांगलं झालं होतं.

या दोन्ही भागात पंचरत्नांना (लिटील चँप्सना) पुन्हा बघून आनंद झाला. पुन्हा एकदा त्या पर्वाची आठवण झाली.
बाकी हिंदी गाण्यात मजा आली. "बैरी पिया" गाणे मस्त झाले.

अत्ताच सारेगम एवढं लक्षात ठेउन बघितलंच जात नाहिये. पण अजुनही लिटिल चॅम्प्सची जादु काही कमी झाली नाहीये , काल आणि परवाच्या एपिसोडमधे त्यांना पाहुन अगदी भरुन आलं.

अवधूत ला कॄपया हाकलुन द्या रे!! वाह्यात, पाचकळ, बिनडोक, सुमार ही विशेषणं कमी पडतात त्याच्या बोलण्यावर.. इतका डोक्यात जातोय तो..
सागर च्या गाण्यावर पूनमशी एकदम सहमत.. ठरवून त्याला बाहेर ठेवला काल.. गम्मत म्हण्जे 'हिन्दि' उच्चारांबद्दल कोण सांगताय!! अवधूत आणि सलील?? प्लीज....
एकुणच फालतु प्रोग्रॅम..

'माय्या माया' आवडलं मला, संहिता सही गायली , मुख्य म्हणजे ऑल्मोस्ट इतर सगळ्या मराठी रिअ‍ॅलिटी शो सिंगर्स सारखी मख्ख -महा गंभीर-कोर्‍या करकरीत चेहर्‍यानी नाही गायली !
अ‍ॅटिट्युड चांगला पकडला आणि good stage presence !:).
मौली दवे ची आठवण आलीच, अत्त्ता पर्यंत ज्यांनी ज्यांनी हे गाणं गायलं त्यांच्या वर ओरिजल पेक्षा मौली दवे चा प्रभाव जास्त होता Proud
पण संहिता आपल्या स्टाइल मधे गायली.
जर माउली ला 'माय्या माया' गाण्यात पहिला नंबर दिला तर दुसरा नंबर नक्कीच संहिताला :).
ज्यांनी हिंदी सारेगमप मधे मौली दवे चं माय्य्या माय्य्या ऐकलं नाही त्यांच्या साठी मस्ट वॉच (माउली चं गाणं तर ऐकाच आणि पर्फॉर्मन्स कशाशी खातात ते पहाच :), आणि त्या विकृत इस्माइल दरबार तोंडाला पाणी सुटल्या सारखा पहातोय मौली कडे ते ही पहा Sad ).
माय्या माय्या (मौली दवे) सा रे गमप चॅलेंज २००७:

http://www.youtube.com/watch?v=460FnY8kzJU

Pages