Submitted by बेफ़िकीर on 16 March, 2019 - 12:16
गझल - वळणांची येऊन दया
वळणांची येऊन दया मी सतत वळालो होतो
त्यामुळेच हे समजत नाही, कुठे निघालो होतो
मनामनाला जपायची बस वृत्ती होती माझी
माफ करा मी चुकून तुमच्या जगात आलो होतो
तहानलेल्यांमध्ये पडलो सदा एकटा ... कारण
तहान लागावी यासाठी व्याकुळ झालो होतो
हा खाली दिसतच नाही या खुशीत हसले सारे
मीही हसलो, मी त्यांच्या वरतून उडालो होतो
'सोड तुझा बालीशपणा जर पुढे जायचे असले'
तुला म्हणालो होतो मी हे तुला म्हणालो होतो
'बेफिकीर'च्या गझलांच्या व्हर्जनवर जगले वेडे
नभ मिळते धरतीला, मी तेथेच मिळालो होतो
=====
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नभ मिळते धरतीला, मी तेथेच
नभ मिळते धरतीला, मी तेथेच मिळालो होतो>>>मस्तच.
वा! सुरेख जमली आहे.
सुंदर, बेफिकीर.
सुंदर, बेफिकीर.
मनाला स्पर्शून गेली
छान
छान
वाह...सुंदर!
वाह...सुंदर!
नभ मिळते धरतीला, मी तेथेच मिळालो होतो> छानच
गझल फारच सुंदर आहे.
गझल फारच सुंदर आहे.