Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44
या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
याला म्हणतात कलियुग. किस सिन
याला म्हणतात कलियुग. किस सिन आहेत लहान मुलांना नेऊ नका.. वाह !
ऑ, काय हो चुकीचे सांगितले ☺️
ऑ, काय हो चुकीचे सांगितले ☺️☺️
तुम्ही पाहिलं नसेल मुलं किती टक लावून phd करायची असल्यागत किस सीन्स बघतात ते.गली बॉय मध्ये किमान 6 आहेत(आता कापले असतील तर माहीत नै).मी मैत्रिणी बरोबर गेले होते, थेटरात मोजून 15 लोक होते(ऑड वेळेचा शो) तरीही 'हे काय मेलं सारखं सारखं' वाटून गेलंच.
आपल्या संस्कृती इत्यादी बाबी
आपल्या संस्कृती इत्यादी बाबी बघता ऑकवर्ड वाटणं साहजीक आहे पण हॉलीवूड अॅनिमेटेड पिक्चर ही दाखवत नाही का मुलांनां? त्यातही असतात.
सगळं काय ते लपून छपून ही उगीच हिपॉक्रिसी नाही का?
अवांतराबद्दल क्षमस्व पण ह्यासाठी वेगळा धागा कोण काढणार?
हिपोकरसि धागा म्हणजे कटप्पा
हिपोकरसि धागा म्हणजे कटप्पा
नेट्फ्लिक्स वर इविनिंग शॅडोज
नेट्फ्लिक्स वर इविनिंग शॅडोज म्हणून पिक्चर पाहिला. हिंदी आहे. मला आवडला. एकदा बघण्यासारखा आहे पिक्चर. बरेच अवॉर्डस आहेत या पिक्चरला. यात मोना आंबेगावकर, अनंत महादेवन आणि देवांश दोशी आहेत. या मुलाचं काम खूप आवडलं.
स्टोरीलाईन अशी की एका टीपिकल साऊथ इंडियन फॅमिलीमधल्या कर्मठ घरातला मुलगा जो समलैंगिक आहे त्याची ही गोष्ट. त्याचं असं असणं हे आईपर्यंत पोहोचवणं ही सिनेमाची एक बाजू आणि हे सत्य कळल्यानंतर आईची होणारी तगमग, भावनिक आंदोलनं, ही आईची आणि सिनेमाची दुसरी बाजू. आई - मुलाचं नातं खूप छान दाखवलंय. दोघांचं ट्रीपला जाणं, मुलाचं तिला स्वयंपाकात मदत करणं, तिच्यातल्या स्वत्वाची त्याने जाणीव करून देणं खूप मस्त साकारलंय.
हिपोक्रसी असेलही. बाकी एखाद
हिपोक्रसी असेलही. बाकी एखाद दुसरे सीन मुलं बघतातच. ते सर्व पिक्चर मधे असतात.यात 5-6 होते त्यामुळे नको वाटले.आता एक पाहिलेला चालेल आणि 5-6 का नको याचे उत्तर माझ्याकडे नाही ☺️☺️.मुद्दामहून दाखवणार नाही इतके खरे.
Submitted by राज on 10 March,
Submitted by राज on 10 March, 2019 - 19:>>>>> हा बघतेय नेफ्लिक्सवर .
गल्लीबॉय बघायला मी आणि माझी
गल्लीबॉय बघायला मी आणि माझी १३ वर्षांची लेक गेलो होतो.
आजकाल ती बरेच इंग्रजी चॅनेल्स सर्फ करते, बघते. इंग्लिश गाणी, तो झेन का झाईन, त्यांचे बॅन्ड्स, टेलर-अरियाना-कमिला वैगेरे मुली :-). अजुन बरेच.
त्या गाण्यांमधे आणि एकुणच कुठलही साधं इंग्लिश चॅनेल बघितलं तरी कुठेही कधीही किसिंग सीन येउन शकतो
त्यामुळे निदान किसिंग सीन्सबद्दलचा ऑकवर्डनेस तितका नाही राहिलाय. आणि अगदी काही सेकंदासाठी असेल तर तेवढं काही वाटत नाही.
Submitted by अंजली_१२ on 20
Submitted by अंजली_१२ on 20 March, 2019 - 00:09 >>>>> अंजली, तुझी ही पोस्ट वाचून आता एअरपोर्टवर वाट पहाताना हा सिनेमा पाहून घेतला. दिडच तसाचा आहे, पण विषय इतक्या प्रभावीपणे मांडला आहे. आवडला. सगळ्यांनी काम पण उत्तम केली आहेत, त्यातही मोना आंबेगावकर आईच्या भूमिकेत फारच आवडली.
हो ना मला पण तिचा रोल खूप
हो ना मला पण तिचा रोल खूप आवडला. परफेक्ट अम्मा रोल मधे सूट झालीये.
इन्व्हिजिबल गेस्ट बघितला.
इन्व्हिजिबल गेस्ट बघितला. एकदम जबरी आहे. जर त्याचा कॉपी टु कॉपी असेल तर बदला भारीच असेल कारण स्टोरी खरच मस्त आहे. मला शेवट अतर्क्य वाटला नाही. एकदम गुंतवून ठेवतो मुव्ही. मी त्या रोल मध्ये अमिताभला इमॅजिन करून बघितल आणि वाटल कि अमिताभ मुळ स्टोरी प्रेडिक्टेबल झाली असावी. कारण त्याची इमेज त्या कॅरॅक्टर पेक्षा ओव्हरपॉवरिंग झाली असावी. मुळ चित्रपटात तस अज्जिब्बात होत नाही.
सीमा + १!
सीमा + १!
मी पण इन्व्हिजिबल गेस्ट बघितला. मला पण अतर्क्य वाटली नाही स्टोरी!
>>मला पण अतर्क्य वाटली नाही
>>मला पण अतर्क्य वाटली नाही स्टोरी!<<
हम्म, याचा अर्थ "बदला" मध्ये नक्किच काहि तरी घोळ घातलेला आहे. बेफिंच्या त्या धाग्यावर पब्लिकला बरेच प्रश्न पडलेले आहेत, क्वाय्ट दि कांट्रेरी ओरिजिनल मुवि इज फ्लॉलेस...
यस, अमिताभच्या एंट्रीमुळे
यस, अमिताभच्या एंट्रीमुळे प्रेडीक्टेबल नक्कीच होतो, एंट्रीलाच संशय यायला सुरवात होतो !
टायटल सुध्दा बघा कसं प्रेडीक्टेबल आहे, द इनव्हिजिबल गेस्ट नावावरून कथेचा अंदाज येत नाही पण या सिनेमाला ‘बदला’ टायटल देणे स्टोरी टु ऑबव्हियस बनवते, जसे बडजात्याने ‘विवाह’ नाव देऊनच टाकले सिनेमाला एकदाचे प्रामाणिकपणे
पण या सिनेमाला ‘बदला’ टायटल
पण या सिनेमाला ‘बदला’ टायटल देणे स्टोरी टु ऑबव्हियस बनवते. >> बरोबर. कारण मी जेव्हा इन्व्हिजिबल गेस्ट बघत होते तेव्हा सारख वाटत होत कि 'बदला' कधी घेणार आता आणि कोण/कशाचा वगैरे. जर हिंदी या नावाचा मुव्ही आहे हे माहितच नसतं तर , बदला घेणार वगैरे अज्जिब्बात शंका सुद्धा आली नसती.
बदला नेटफ्लिक्स वर आला कि बघणार खर .
मुळात अमिताभ च्या ऐवजी (नथिंग अगेन्स्ट हिम. मला आवडतो अजुनही.) नविन /अनोळखी चेहरा घेतला असता तर. पण असो. मी अजुन बघितला नाही 'बदला'. उगाच हवेत तीर सगळे. इन्व्हिजिबल मुळ इतकी इप्रेस झाले कि 'बदला' पण आवडलाच पाहिजे अस वाटु लागलय त्यामुळ लिहित सुटलीये.
फ्रेम तू फ्रेम कॉपी आहे
फ्रेम तू फ्रेम कॉपी आहे
नेटफ्लिक्स वर "पास्कल " हा
नेटफ्लिक्स वर "पास्कल " हा मलेशियन युद्धपट आहे . एकदम टॉपक्लास... उरी पाहून निराशा झाला असाल तर अजून भारी वाटेल. तांत्रिकदृष्ट्या सुद्धा हॉलीवूडसारखा वाटतो. सत्यघटनेवर आधारित आहे.
https://www.imdb.com/title/tt9063106/
टोटल धमाल पाहिला.डोकं बाजूला
टोटल धमाल पाहिला.डोकं बाजूला ठेवून बघण्याचा काय च्या काय पिक्चर आहे.त्यातले सुरुवातीचे पैसे घेऊन आगीतून वाचवायचे सीन अत्यंत इन्ससेन्सेटिव्ह वाटले.पण असे पिक्चर बनवताना इतक्या बारकाईने विचार कोणी करत नाही.मला हा सिमबा पेक्षा जास्त आवडला.कारण कोणताही संदेश देण्याचा आव आणलेला नाही.पैसे भरपूर उडवले आहेत.तितके परत मिळतील किंवा मिळाले असावे.माधुरी पण थोड्या वयाच्या खुणा दिसत असल्या तरी आवडली.मजनू भाई आमच्या फॅमिली चा आजन्म क्रश आहे, तो आवडतोच.बाकी सर्व आवडले.नावं घेत नाहीये, पण टिपिकल धमाल आणि ऑल द बेस्ट मध्ये जी कास्ट असते, गुलाबी सूट वाला वेडा, सर्व फेमस स्टार कास्ट इ.इ.त्या सर्वांची कामं चांगली झालीत.सोनाक्षी चं गाणं अत्यंत अनावश्यक आहे, नसतं तरी चाललं असतं.पूर्ण ईशा गुप्तांच अनावश्यक होती, पण तिला काही कारणाने आणलं असेल.
ज्यांना पिक्चर दाखवायला आणलं ते हसून लोळत होते.त्यामुळे पैसे वसूल.
अनिल माधुरी चा जोडा अजूनही छान दिसतो.
>> अनिल माधुरी चा जोडा अजूनही
>> अनिल माधुरी चा जोडा अजूनही छान दिसतो.

mi_anu, अनिल श्रीदेवी चा जोडा कसा होता तुझ्या मताप्रमाणे?
)
(डीजे, अगदी रहावलं नाही हा प्रश्न विचारल्याशिवाय
तोही चांगलाच होता.मजनू भाई
तोही चांगलाच होता.मजनू भाई सर्वांबरोबर चांगला दिसतो.
बाँबेरीया नावाचा चित्रपट
बाँबेरीया नावाचा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहिला. धमाल आहे . जरूर बघा.
इनव्हिजिबल गेस्ट स्पॅनिश
इनव्हिजिबल गेस्ट स्पॅनिश भाषेत आहे का इंग्लिश?
टोटल धमाल मला पण आवडला होता. हे मत मी जितक्या ठिकाणी मांडलं तितक्या ठिकाणी मला वेड्यात काढण्यात आलं.
इनव्हिजिबल गेस्ट स्पॅनिश
इनव्हिजिबल गेस्ट स्पॅनिश भाषेत आहे का इंग्लिश?>> स्पॅनिश
"स्पॅनिश" - ओके. म्हणजे
"स्पॅनिश" - ओके. म्हणजे सिनेमा 'वाचावा' लागणार.
फेफा, हा चित्रपट
फेफा, हा चित्रपट सबटायटलससकट इथे मिळेलः
https://vimeo.com/293604999
इथे मला ' रीटा' ही मिळाला:
https://vimeo.com/133907817
मर्द को दर्द नही होता
मर्द को दर्द नही होता
अजीबात अपेक्षा न ठेवता पाहिला.
मुळात अशा नावाचा चित्रपट कधी बनेल, मी तो बघेन आणि मला तो आवडेल असं वाटलं नव्हते, चित्रपटाला हे असे नाव 'ज्यामुळे माणसाला वेदना जाणवतच नाहीत' असा एक रोग असणार्या मुलाची गोष्ट असल्याने दिले आहे. कल्पना युनिक आहे, गोष्ट अतरंगी आहे, सादरीकरण भन्नाट आहे. मधे जरा रटाळ होतोय असं वाटतंय न वाटतंय तोवर परत पकड घेतली.
जुन्या टिपिकल मसाला मुव्हीमधे असणे अनिवार्य असलेले हिरो हिरॉईनचे लहानपणीचे प्रेम, ताटातूट, जुडवा भाई, एक सज्जन, एक खलनायक, बदला, मारधाड, अॅक्शन, कॉमेडी असं सगळं काही ठासून असलेला हा चित्रपट आहे.
गुंडांची स्वतःची म्हणून कशी तत्वं असतात तशी टिपिकल हिंदी मसालापट असूनही ह्यात ह्या चित्रपटाची म्हणून एक तर्कशुद्धता आहे.
मी म्हणेन एकदा जरूर पहा.
रच्याकने - पानी पिते रेहना चाहिए वरना डिहायड्रेशन हो सकता है
आपल्या भाग्यश्रीचा मुलगा ह्या
मैने प्यार किया वाल्या भाग्यश्रीचा मुलगा ह्या सिनेमाचा हिरो आहे
सूलू_८२, धन्यवाद!
सूलू_८२, धन्यवाद!
नेफ्लि वर ईमॅगो नावाचा (मराठी
नेफ्लि वर ईमॅगो नावाचा (मराठी) सिनेमा पाहिला. कोणी ओळखीचे कलाकार नाहीयेत. पण अगदी आपल्या आजूबाजूला पाहतो तशीच गावातली लोकं, घरं यात दिसतात. अजिबात कसला धांगडधिंगा, शब्दबंबाळ डायलॉग्स नसलेला, आपल्यात जसे संवाद घडतील तसा शांत हलकाफुलका सिनेमा आहे.
एका गावातली साधी शाळकरी मुलगी जिला चेहेर्यावर हातावर कोड आहे त्यामुळे ती थोडी बुजलेली असते. कोणात फारशी न मिसळणारी, अबोल, आपलं घरकाम, आजोबांची कामं शांतपणे करणारी. तर तिचे भाषेचे शिक्षक तिला बाहेरच्या जगात जाण्यासाठी कसा आत्मविश्वास मिळवून देतात याबद्दल हा सिनेमा आहे. छान वाटला.
इथे वाचून बॉम्बेरिया पाहिला .
इथे वाचून बॉम्बेरिया पाहिला . गंडलेला वाटला .
कल्पना चमकदार पण सादरीकरण गोंधळात टाकणारे . गंभीर सोशल मेसेज द्यायचा की विनोदी तडका देऊन मेसेज द्यायचा या कात्रीत सापडलेला .
Pages