“युद्धस्य कथा रम्या” असे म्हटले जाते. कारण युद्धात देशभक्ती, पराक्रम, त्याग, राजकारण, प्रखर संवाद, आरपारची लढाई, होत्याम्य, आणि बलिदान यांची भरपूर रेलचेल असते. बऱ्याच वेळेस आपल्याला कथा आपल्याला माहीत असते पण आपण चित्रपट बघतो कारण खरे कौशल कथेची मांडणी करण्यात असते आणि प्रेक्षक त्याकडे विशेष लक्ष देतात. केसरी हा चित्रपट ऐतिहासिक अश्या “सारगढीची लढाई” वर आधारित आहे. ही लढाई १२ सप्टेंबर १८९७ या दिवशी ब्रिटिश साम्राज्याच्या 36व्या शीख रेजिमेंटच्या २१ जवान आणि १०००० अफगाणी पठाण यांच्यात झाली होती. जगातील आता पर्यंतच्या पहिल्या पाच सर्वोच्च लढाईत या लढाईची गणना होते. त्यांच्या पराक्रम ऐकूनच आपण रोमांचित होतो. ते क्षण जर आपल्या डोळ्यासमोर साकारले तर काय होईल?
पहिला हाफ ठीकठाक आहे. चित्रपटाची पहिले १० मिनिटामध्ये सोडली तर त्यात विशेष काही नाही. अक्षय कुमार जो की हवलदार ईशर सिंह यांची भूमिका करतोय त्याचा प्रवेश ठीकठाक झाला आहे. इतर व्यावसायिक सिनेमा प्रमाणे डशिंग एन्ट्रीक टाळली आहे. सगळा फोकॅस ईशर सिंह या व्यक्तीरेखे वर आहे. खास करून खलनायकाचे पात्र चांगले फुलवता आले असते. खलनायकाला त्याच्या व्यक्तिरेखेला पहिले १० मिनिटे वगळता पहिल्या हाफ मध्ये वाव नाही. परिणीतीचे व्यक्तिरेखा सुद्धा आणखी चांगल्या पद्धतीने रंगवता आली असती. तिच्या व्यक्तिरेखेला थोडा वेळ आणि न्याय द्यायला पाहिजे होता. पहिल्या भागात चित्रपट संथ होतो पण त्यात विनोदी पेरणी उत्तम केली आहे. तेरी मिट्टी गाणे सुरेल झाले आहे.
सारगढीच्या किल्ल्याचे जागेचे खूप महत्त्व असते. दोन मोठ्या गुलिस्तान आणि लॉकहार्ट किल्ल्या मधील संभाषण पोहचण्याचे काम इथे होत असते आणि त्यासाठी हा किल्ला एक महत्त्वाचा दुवा असतो. खलनायक आणि त्याचे दोन साथीदार अचानक सारगढीच्या किल्ल्यावर आक्रमण करतात. त्यांना फक्त २१ सैनिक उत्तर देतात. पण का आक्रमण करतात यांचे थोडे जास्त कथानक दाखवले असते तर उत्तम झाले असते. दुसरा हाफ मात्र कमाल आहे. युद्धाचे प्रसंग चांगल्या रित्या दर्शवलेले आहेत. २१ सैनिकाचे हळवे क्षण आणि जबरदस्त मनोधर्य योग्य पद्धतीने दाखवलेले आहेत. ज्या वेळेस भोलाला एक बदाम मिळतो आणि तो जपून ठेवतो तो भावनिक क्षण छान टिपला आहे. भोला सिंहचे जाताना हसणे चटका लावून जाते.
छायाचित्रणाची कसब पणाला लागल्या मुले काम छान झाले आहे. पहिल्या भागाचे दिग्दर्शन ठीक आहे पण दुसरा भाग अप्रतिम आहे. दिग्दर्शकाने ऐतिहासिक कथेवर चांगले काम केले आहे. “अनुराग सिंग” यांचे हिंदीत पहिले दिग्दर्शन आहे हे जाणवत नाही. या आधी अनुरागने पंजाबीत काही हिट चित्रपट दिले आहेत. चित्रपटात लढाई दाखवताना पार्श्वसंगीताचा उत्तम रित्या वापर केलेला आहे. चित्रपटाचे दुसऱ्या भागाचे संपादन सुद्धा एकदम झक्कास झाले आहे. ईशर सिंहचे दुसऱ्या भागातील दृश्य बघताना अंगावर काटाच येतो. काही लढाईचे क्षण तर इतके जबरदस्त आहेत की तुमचे पैसे वसूल झाल्याचे समाधान तुम्हाला मिळते. संवाद मात्र करकरीत आहेत. अक्षय कुमारच्या वाट्याला उत्तम संवाद आले आहेत.
चित्रपट संपल्या नंतर फक्त काही सह कलाकाराची नाव लक्षात राहतात. बाकी २० सैनिकाच्या उप-कथानक आणखी फुलवता आली असती तर चित्रपट आणखी बहरला असता. पहिल्या भागात काही दृश्य गुळगुळीत झाली आहेत. दुसर्या भागात प्रत्येक पात्राची भावनिक गुंतागुंत आणि कर्तव्य यांची छान पद्धतीने रेखाटणी झाली आहे. प्रत्येक सैनिक असलेल्या कलाकाराने अभिनयाचा आलेख उंच नेला आहे. कास्टिंग व्यवस्थित आणि चांगली झाली आहे. ईशर सिंह यांचे वरिष्ठ इंगज यांच्या वाट्याला फक्त २-३ दृश्य आहेत. व्हीएफएक्सचा वापर जरी कमी असला तरी युद्धाचे दृश्य एकदम कडक आहेत. ईशर सिंहचा त्वेष, शौर्य, जबाबदारी, गिळलेला अपमान आणि त्यातून पेटून उठून केलेला उत्तुंग पराक्रम उठून दिसतो. शेवटी अति तटीच्या संग्रामात २१ सैनिकाची आहुती पडते. शेवटी तर गुरमुख सिंह हे पात्र अद्भुत युद्ध करून मन जिंकतो.
व्हीएफएक्सचा आणखी चांगला वापर करून युद्ध दृश्याची परिणामकरता आणखी वाढवता आली असती. सह कलाकारांना आणखी चांगल्या पद्धतीने प्रस्तावित करता आले असते तर आणखी सुसंगत वाटले असते. पहिला हाफ आणखी सुंदर केला असता तर चित्रपटाला जास्त रंग चढला असता. खलनायक, सह-कलाकार यांना आणखी वाव द्यायला पाहिजे होता.
ऐतिहासिक कथा बीज, सह-कलाकाराचा उत्तम अभिनय, चांगली आणि भडकपणा नसलेली मांडणी, न्याय देणारी पटकथा, पार्श्वसंगीताचा योग्य वापर, लढाईचे उत्तम चित्रीकरण, ऐतिहासिक कथेला न्याय देण्याचा चांगला प्रयत्न आणि अक्षय कुमारच्या चांगला अभिनयाने नटलेला चित्रपट. यामुळे चित्रपट वेगळ्या उंची वर गेला आहे. दुसरा हाफ पहिल्या हाफची राहिलेली कसर भरून काढतो. एक चांगला चित्रपट बघितल्याचे समाधान आपल्याला भेटते. मला या चित्रपटाला ५ पैकी कमीत कमी ३.५ स्टार द्यायला आवडेल.
छान परीक्षण! आवडलं
छान परीक्षण! आवडलं
पण का आक्रमण करतात यांचे थोडे
पण का आक्रमण करतात यांचे थोडे जास्त कथानक दाखवले असते तर उत्तम झाले असते.
~ मग चित्रपटाचा हेतूच फसला असता ना?
प्रतिसादा साठी धन्यवाद
प्रतिसादा साठी धन्यवाद अज्ञातवासी आणि हेला!!!
~ मग चित्रपटाचा हेतूच फसला असता ना? >> मी या घटनेवर आधारित youtube मालिकेचे काही भाग बघितले आहेत. ६५ भागाची मालिका आहे त्यात सविस्तर कथानक दाखवलेले आहे. https://www.youtube.com/watch?v=4IGuS3VsomU
अहो ६५ भाग पाहिलेत तर लिहायला
.
यात स्पॉयलर काय होत? हे सगळं
यात स्पॉयलर काय होत? हे सगळं तर ट्रेलर मधेच आहे
शेवटी अति तटीच्या संग्रामात
शेवटी अति तटीच्या संग्रामात २१ सैनिकाची आहुती पडते.
पहिला भाग कंटाळवाणा आहे हे या
पहिला भाग कंटाळवाणा आहे हे या स्पॉयलर मधून समजलं.
धन्यवाद आशुचँप, च्रप्स, बोकलत
धन्यवाद आशुचँप, च्रप्स, बोकलत.
चित्रपट बद्दल माहिती सांगणारे काही वाक्य असल्याने नावात स्पॉईलर टाकले आहे.
व्हाट्सपवर वाचले, त्या काळात
व्हाट्सपवर वाचले, त्या काळात अखंड हिंदुस्तान होता. म्हणजे तो अफगाण प्रांत शत्रू नव्हता, पठाण इंग्रजांविरुद्ध आजादी की लडाई लढत होते म्हणे अन शीख इंग्रजी सैन्याकडून लढत होते म्हणे.
म्हणजे देशासाठी नेमके कोण लढत होते ?
चित्रपटात असंख्य चुका आहेत..
चित्रपटात असंख्य चुका आहेत.. राष्ट्रवाद आणि युद्धखोरीच्या लाटेचे मुस्लीम विरोधी भावनेचे पैशात रुपांतर करण्यासाठी सत्याचा बळी दिलेला सिनेमा. शिखांची लढाई ब्रिटीश साम्राज्याचे नोकर म्हणून होती. धर्मासाठी नव्हती. अर्थात शीख समुदाय युद्धाच्या बाबतीत शूरवीर आहेच तो भाग वेगळा.
बापरे ते पठाण हिरो होते मग
बापरे ते पठाण हिरो होते मग म्हणायचं.
शिख सैनिकांनी सुरुवातीच्या
शिख सैनिकांनी सुरुवातीच्या काळात हेच केले आहे. १८५७ च्या युद्धात देखील ब्रिटीश सैन्यासाठी प्राणाची बाजी लावून लढणारे आणि बंडखोर शिपायांना टिपून टिपून मारणारे शिखच होते. जनरल नील च्या नेतृत्वाखाली गावेच्या गावे उध्वस्त करत जाणारे शिख सैनिकच होते.
त्यांचे शौर्य, स्वामिभक्ती सगळं वादातीत आहे, पण सारासार विचार करता हे कुर्हाडीचा दांडा गोतास काळ असा प्रकार झाला.
त्यामुळे सारागढीचे एक नवल म्हणून इतिहास वाचायला हरकत नाही पण अभिमान बाळगावा असे त्यात काही नाही
सारगढीच्या जवळचा गुलिस्तान हा
सारगढीच्या जवळचा गुलिस्तान हा किल्ला महाराजा रणजीत सिंघ यांनी बांधला होता.
त्यानंतर बऱ्याच वर्षांनी ब्रिटिशांनी तो किल्ला हस्तगत केला आणि ब्रिटिशांनी ३६व्या शीख रेजिमेंट त्या भागाच्या रक्षणासाठी उभी केली.
"सारगढी किल्ला" इंग्रजांनी गुलिस्तान आणि लॉकहार्ट किल्ल्यांच्या सुरक्षे साठी २ एप्रिल १८९४ ला बांधला. “सारगढीची लढाई” १२ सप्टेंबर १८९७ ला झाली.
सर्वप्रथम राष्ट्रवाद चुलीत
सर्वप्रथम राष्ट्रवाद चुलीत घालायला शिकले पाहीजे. शीख ब्रिटीशांकडून लढत असोत अथवा बारामतीकडून.. २१ शिखांनी १०००० सैनिकांशी दिलेली लढत यात शौर्य आहेच आहे. सिनेमा पाहिलेला नसल्याने इतकेच.
असेच शौर्य मग मराठा सेनानी
असेच शौर्य मग मराठा सेनानी प्रतापराव गुजर यांनी दाखवले आहे. ते तर केवळ ७ जणच होते.
अजून इतिहासातले दाखले हवे असतील तर दहाव्या शतकात इंग्लंडमध्ये स्टॅमफोर्ड ब्रिजची लढाई प्रसिद्ध आहे. त्यावेळी एकट्या वायकींग वीराने शेकडोंच्या संख्येत असलेल्या इंग्लिश सैन्याला रोखून धरले होते. आपल्या सैन्याला सज्ज व्हायला वेळ मिळावा म्हणून त्याने वायकींगची ओळख असलेली डबल अॅक्स घेऊन ब्रिजची एक बाजू रोखून धरली आणि एकाही शत्रूला पूल पार करू दिला नाही. अखेरीस एकाने नदीतून पोहत जाऊन ब्रिजखालून त्याच्यावर भाला मारला तेव्हा तो जखमी होऊन मागे हटला.
सर्वप्रथम राष्ट्रवाद चुलीत
सर्वप्रथम राष्ट्रवाद चुलीत घालायला शिकले पाहीजे.
म्हणजे उद्या पाकिस्तानने भारतावर सर्जिकल स्ट्राईक केला तर त्यांचे कौतुक करणार का?
राष्ट्रवाद ब्रिटीशांमुळे
राष्ट्रवाद ब्रिटीशांमुळे भारताला माहीत झाला. नाहीतर सगळे इथे एकमेकांच्या रक्ताचा घोट घ्यायला टपलेले होते.
टिपू सुलतान ब्रिटीशांविरुद्ध लढत असताना आणि त्या सैन्याला त्याने जेरीस आणले असताना पेशव्यांनी ब्रिटीशांना मदत करून टिपू सुल्तानाचा पराभव केला.
पेशव्यांना राष्ट्रवादी म्हणणार की देशद्रोही हे ठरवा तुम्हीच. उत्तर आपोआप मिळेल. बाकी विपर्यासासाठी अनेक धन्यवाद.
इतिहासात थोडं डोकावणार का?
इतिहासात थोडं डोकावणार का?
शीख सैन्य आणि 1857 मधले शिपाई यांच्यात काय वैर होतं हे सांगणार का?
पेशवे आणि टिपू यांच्यात खूप आधीपासूनच हाडवैर होतं, हैदर अली पासून आणि पेशव्यांनी याही पेक्षा भयानक मूर्खपणा केला आहे आंग्रे विरुद्ध इंग्रजांची मदत घेऊन आणि यासाठी त्यांना कोणीच माफ करणार नाही
आणि शीख लोकांना बोललो म्हणजे पेशवे मान्य असा समज तुमचा असेल तर तो पहिले चुलीत घाला
किती वेड पांघरणार ? ही लढाई
किती वेड पांघरणार ? ही लढाई स्वतंत्र भारतातली आहे कि काय ? ब्रिटीशांविरुद्ध टिपू लढला तर तो राष्ट्रवाद नाही, इतर लढले की राष्ट्रवाद ही काय भानगड ? आपल्या डोक्याच्या बाहेरचे आहे हे सोयीचे. आता बास करा जमल्यास..
एकमेकांना हरवण्यासाठी परकीय
एकमेकांना हरवण्यासाठी परकीय शत्रूची मदत घेणे ही गौरवशाली परंपरा पार अलेक्झांडर च्या काळापासून भारतीय राजांनी पाळली आहे. पण त्यांना निदान राजेपद तरी हवे होते
शीख सैन्याने ब्रिटिशांची चाकरी करून काय साध्य केले?
पेशव्यांनी, नाबाबांनी तैनाती सैन्य घेऊन पायावर धोंडा मारून घेतलाच पण शीख सैन्याने ऐन वेळी ब्रिटिशांना साथ देऊन पुढच्या गुलामगिरीचे जोखड भारताच्या गळ्यात घातले
त्यावेळी जर शीख तटस्थ जरी राहिले असते तरी कदाचित इतिहास खूप वेगळा झाला असता
कोणाच्या डोक्याच्या बाहेरचे
कोणाच्या डोक्याच्या बाहेरचे आहे ते दिसून येत आहे. मुद्दे नसले ना होते असे
असुद्या असुद्या
आपल्या विद्वत्तेबद्दल आभार
आपल्या विद्वत्तेबद्दल आभार आपले. असेच मार्गदर्शन मिळत राहो. संघी राष्ट्रवादाच्या सोयीच्या व्याख्या आपल्या डोक्याच्या बाहेरच्याच आहेत. जगात वेगळ्या व्याख्या असतात. असो.
(जा मुली दिल्या घरी सुखी रहा )
एकमेकांना हरवण्यासाठी परकीय
एकमेकांना हरवण्यासाठी परकीय शत्रूची मदत घेणे ही गौरवशाली परंपरा पार अलेक्झांडर च्या काळापासून भारतीय राजांनी पाळली आहे. >>> एव्हढा वाद घालून शेवटी तिथेच फिरून आल्याबद्दल मनःपूर्वक आभार आपले.
मला एकंदर तुमच्या आकलनशक्तीची
मला एकंदर तुमच्या आकलनशक्तीची कमाल वाटते, आपल्याला बोलत आले नाही की समोरचा संघीय म्हणून ओकायचं बरोबर जमतंय तुम्हाला
मलाही कळू द्या यात संघीय काय आहे ते? मी आजवर कधीच गेलो नाहीये संघात आणि त्यांचे विचारही ऐकत नाही, तुम्हाला जास्त माहिती आहे असे दिसत आहे
त्यामुळे आपल्या डोक्यातील विचार गंगा वाहू द्या बरे
राजकारणाच्या ध्याग्यावरही
राजकारणाच्या ध्याग्यावरही अनेकांना संघीय म्हणून झालंच आहे
त्यामुळे आपल्या मतांशी न जुळणारे मत दिसले की संघीय म्हणून ठोकयाच हा एक कलमी बाणा दिसतोय तुमचा
आणि मग जा मुली वगैरे बालिशपणा
मोठे होण्यासाठी अवकाश असेल तर व्हा पाहू जर पटकन मोठे
निदान बालबोली वर तरी जात जा मग
मला तुमच्याशी वाद घालण्यात रस
मला तुमच्याशी वाद घालण्यात रस नाही. तुमची बैठक उघड झाली आहे इतकेच. इतरांना माझे प्रतिसाद समजतील. तुम्हाला समजावेत असा आग्रह नाही. मला समजत नाही असे वाटत असेल तर हरकत नाही. चालू द्या तुमचे. यावर अजून चार लिहा.
तुमची बैठक उघड झाली आहे इतकेच
तुमची बैठक उघड झाली आहे इतकेच.
मलाही सांगा ना ती संघीय कशी काय?
उचलली जीभ लावली टाळ्याला
एकदातरी मुद्यावरून बोला की, पळ काढण्यापेक्षा
शिखांनी, पेशव्यांनी, नबाबांनी
शिखांनी, पेशव्यांनी, नबाबांनी इंग्रजांना मदत केली हे चूक होतं असे म्हणणे म्हणजे संघीय कसे काय होते हे मला कळून घेण्याची प्रचंड इच्छा आहे
बघा जमले तर सांगा
तुमच्या आकलनाच्या पलीकडे असेल तर तसेही सांगा
अन शीख इंग्रजी सैन्याकडून लढत
अन शीख इंग्रजी सैन्याकडून लढत होते म्हणे.
म्हणजे देशासाठी नेमके कोण लढत होते ?
नवीन Submitted by BLACKCAT on 26 March, 2019 - 15:06
१ जानेवारीला ज्यांचा विजय दिन २०० वर्षांनंतरही नगर हायवेवरच्या लोकांची प्रचंड गैरसोय करुनही साजरा केला जातो ते कोणाकडून लढत होते म्हणे?
वाटलेच होते, हा ओघ तिकडे
वाटलेच होते, हा ओघ तिकडे जाणार,
पेशवे त्यांच्यावर अत्याचार करत होते , म्हणून त्यांनी इंग्रजांची मदत मागितली.
पेशवे स्वतःचे घर भरत होते. त्यांचा पराभव ही देशभक्तीच, ह्या पराभवानन्तरही इंग्रज पेशव्याला 7 लाख की किती पेन्शन देत होते म्हणे
Pages