“युद्धस्य कथा रम्या” असे म्हटले जाते. कारण युद्धात देशभक्ती, पराक्रम, त्याग, राजकारण, प्रखर संवाद, आरपारची लढाई, होत्याम्य, आणि बलिदान यांची भरपूर रेलचेल असते. बऱ्याच वेळेस आपल्याला कथा आपल्याला माहीत असते पण आपण चित्रपट बघतो कारण खरे कौशल कथेची मांडणी करण्यात असते आणि प्रेक्षक त्याकडे विशेष लक्ष देतात. केसरी हा चित्रपट ऐतिहासिक अश्या “सारगढीची लढाई” वर आधारित आहे. ही लढाई १२ सप्टेंबर १८९७ या दिवशी ब्रिटिश साम्राज्याच्या 36व्या शीख रेजिमेंटच्या २१ जवान आणि १०००० अफगाणी पठाण यांच्यात झाली होती. जगातील आता पर्यंतच्या पहिल्या पाच सर्वोच्च लढाईत या लढाईची गणना होते. त्यांच्या पराक्रम ऐकूनच आपण रोमांचित होतो. ते क्षण जर आपल्या डोळ्यासमोर साकारले तर काय होईल?
पहिला हाफ ठीकठाक आहे. चित्रपटाची पहिले १० मिनिटामध्ये सोडली तर त्यात विशेष काही नाही. अक्षय कुमार जो की हवलदार ईशर सिंह यांची भूमिका करतोय त्याचा प्रवेश ठीकठाक झाला आहे. इतर व्यावसायिक सिनेमा प्रमाणे डशिंग एन्ट्रीक टाळली आहे. सगळा फोकॅस ईशर सिंह या व्यक्तीरेखे वर आहे. खास करून खलनायकाचे पात्र चांगले फुलवता आले असते. खलनायकाला त्याच्या व्यक्तिरेखेला पहिले १० मिनिटे वगळता पहिल्या हाफ मध्ये वाव नाही. परिणीतीचे व्यक्तिरेखा सुद्धा आणखी चांगल्या पद्धतीने रंगवता आली असती. तिच्या व्यक्तिरेखेला थोडा वेळ आणि न्याय द्यायला पाहिजे होता. पहिल्या भागात चित्रपट संथ होतो पण त्यात विनोदी पेरणी उत्तम केली आहे. तेरी मिट्टी गाणे सुरेल झाले आहे.
सारगढीच्या किल्ल्याचे जागेचे खूप महत्त्व असते. दोन मोठ्या गुलिस्तान आणि लॉकहार्ट किल्ल्या मधील संभाषण पोहचण्याचे काम इथे होत असते आणि त्यासाठी हा किल्ला एक महत्त्वाचा दुवा असतो. खलनायक आणि त्याचे दोन साथीदार अचानक सारगढीच्या किल्ल्यावर आक्रमण करतात. त्यांना फक्त २१ सैनिक उत्तर देतात. पण का आक्रमण करतात यांचे थोडे जास्त कथानक दाखवले असते तर उत्तम झाले असते. दुसरा हाफ मात्र कमाल आहे. युद्धाचे प्रसंग चांगल्या रित्या दर्शवलेले आहेत. २१ सैनिकाचे हळवे क्षण आणि जबरदस्त मनोधर्य योग्य पद्धतीने दाखवलेले आहेत. ज्या वेळेस भोलाला एक बदाम मिळतो आणि तो जपून ठेवतो तो भावनिक क्षण छान टिपला आहे. भोला सिंहचे जाताना हसणे चटका लावून जाते.
छायाचित्रणाची कसब पणाला लागल्या मुले काम छान झाले आहे. पहिल्या भागाचे दिग्दर्शन ठीक आहे पण दुसरा भाग अप्रतिम आहे. दिग्दर्शकाने ऐतिहासिक कथेवर चांगले काम केले आहे. “अनुराग सिंग” यांचे हिंदीत पहिले दिग्दर्शन आहे हे जाणवत नाही. या आधी अनुरागने पंजाबीत काही हिट चित्रपट दिले आहेत. चित्रपटात लढाई दाखवताना पार्श्वसंगीताचा उत्तम रित्या वापर केलेला आहे. चित्रपटाचे दुसऱ्या भागाचे संपादन सुद्धा एकदम झक्कास झाले आहे. ईशर सिंहचे दुसऱ्या भागातील दृश्य बघताना अंगावर काटाच येतो. काही लढाईचे क्षण तर इतके जबरदस्त आहेत की तुमचे पैसे वसूल झाल्याचे समाधान तुम्हाला मिळते. संवाद मात्र करकरीत आहेत. अक्षय कुमारच्या वाट्याला उत्तम संवाद आले आहेत.
चित्रपट संपल्या नंतर फक्त काही सह कलाकाराची नाव लक्षात राहतात. बाकी २० सैनिकाच्या उप-कथानक आणखी फुलवता आली असती तर चित्रपट आणखी बहरला असता. पहिल्या भागात काही दृश्य गुळगुळीत झाली आहेत. दुसर्या भागात प्रत्येक पात्राची भावनिक गुंतागुंत आणि कर्तव्य यांची छान पद्धतीने रेखाटणी झाली आहे. प्रत्येक सैनिक असलेल्या कलाकाराने अभिनयाचा आलेख उंच नेला आहे. कास्टिंग व्यवस्थित आणि चांगली झाली आहे. ईशर सिंह यांचे वरिष्ठ इंगज यांच्या वाट्याला फक्त २-३ दृश्य आहेत. व्हीएफएक्सचा वापर जरी कमी असला तरी युद्धाचे दृश्य एकदम कडक आहेत. ईशर सिंहचा त्वेष, शौर्य, जबाबदारी, गिळलेला अपमान आणि त्यातून पेटून उठून केलेला उत्तुंग पराक्रम उठून दिसतो. शेवटी अति तटीच्या संग्रामात २१ सैनिकाची आहुती पडते. शेवटी तर गुरमुख सिंह हे पात्र अद्भुत युद्ध करून मन जिंकतो.
व्हीएफएक्सचा आणखी चांगला वापर करून युद्ध दृश्याची परिणामकरता आणखी वाढवता आली असती. सह कलाकारांना आणखी चांगल्या पद्धतीने प्रस्तावित करता आले असते तर आणखी सुसंगत वाटले असते. पहिला हाफ आणखी सुंदर केला असता तर चित्रपटाला जास्त रंग चढला असता. खलनायक, सह-कलाकार यांना आणखी वाव द्यायला पाहिजे होता.
ऐतिहासिक कथा बीज, सह-कलाकाराचा उत्तम अभिनय, चांगली आणि भडकपणा नसलेली मांडणी, न्याय देणारी पटकथा, पार्श्वसंगीताचा योग्य वापर, लढाईचे उत्तम चित्रीकरण, ऐतिहासिक कथेला न्याय देण्याचा चांगला प्रयत्न आणि अक्षय कुमारच्या चांगला अभिनयाने नटलेला चित्रपट. यामुळे चित्रपट वेगळ्या उंची वर गेला आहे. दुसरा हाफ पहिल्या हाफची राहिलेली कसर भरून काढतो. एक चांगला चित्रपट बघितल्याचे समाधान आपल्याला भेटते. मला या चित्रपटाला ५ पैकी कमीत कमी ३.५ स्टार द्यायला आवडेल.
चला, म्हणजे धागा व्यवस्थित
चला, म्हणजे धागा व्यवस्थित मार्गाला लागला म्हणायचा.
थोड्या वेळात सगळी चूक माझीच होती हे सिद्ध होईल.
'केसरी' चित्रपट काढून माबोकरांमध्ये भांडणं लावल्याबद्दल चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि प्रमुख कलाकार व तत्सम मंडळी यांचा निषेध.
ओके, म्हंजे शीख सैनिकांनी
ओके, म्हंजे शीख सैनिकांनी त्यांच्या धन्यांसाठी अपार शौर्य गाजवले त्याची कथा हाय तर. बेष्ट, आता असाच सिनेमा कोरेगावभीमाच्या लढाईवर काढायला पायजे. कुणाची किती देशबकती आहे ते लगेच कळेल.
आशुचँप , तुम्ही सेन्सीबल असाल
आशुचँप , तुम्ही सेन्सीबल असाल असा माझा समज होता. माझा प्रतिसाद स्पष्टपणे ब्रिटीश भारतासाठी होता. त्या वेळी कुणाला राष्ट्रवाद ठाऊक होता ? सिंपल लॉजिक आहे ते. त्यामुळे शीख कुणाच्या बाजूने लढले यापेक्षा २१ शीखांनी १०००० अफगाणांवर विजय मिळवला हे महत्वाचे यात तुम्हाला आकांडतांडव का करावेसे वाटले, एव्हढा कांगावेखोरपणा का करावा लागला ?
राहिली संघाची बात. तर घरात बसून राष्ट्रवादाच्या गप्पा मारणे ही संघीत शैली आहे. त्यासाठी घरातील प्रत्येकाने संघात जावे लागत नाही.
शिवाय आजकाल ऑनलाईन शाखा भरतात. कुठून ना कुठून या राष्ट्रवादाच्या कल्पना डोस्क्यात शिरत असतात. ज्या तुमच्या डोक्यात आहेत. हे सुद्धा नाकारणार असाल तर बिन्धास्त नाकारा, मला काही एक फरक पडत नाही.
राष्ट्रवाद हे बदमाषांचे शेवटचे हत्यार आहे. नाझी राष्ट्रवादाने जर्मनीचे भले झाले असे तुमचे म्हणणे असेल तर तुम्हाला तुमच्या राष्ट्रवादाच्या कल्पना मुबारक. लढणारा सैनिक राष्ट्रवाद वगैरे डोक्यात घेऊन लढतो का ? जमल्यास लष्करी अधिका-यांना विचारा.
ज्या राष्ट्रवादात मुसलमानांना स्थान नाही त्या राष्ट्रवादाची गंमत मला समजून घेण्याची इच्छा नाही. तुमचे बेसिक्स क्लिअर करा.
एकदा म्हणता ब्रिटीशांच्या बाजूने टिपूशी लढणे योग्य होते, हजारो वर्षांची परंपरा होती एकदा म्हणता केसरी मधला राष्ट्रवाद गंडलेला आहे. गंभीर लोच्या आहे. तसे तुम्हाला नसेल वाटत तर अजून दहा प्रतिसाद द्या आणि मला आरोपीच्या पिंज-यात उभे करा किंवा अजून दहा पट आक्रस्ताळेपणा करा.
शुभेच्छा !
एकदा म्हणता ब्रिटीशांच्या
एकदा म्हणता ब्रिटीशांच्या बाजूने टिपूशी लढणे योग्य होते
काका मी हे कुठे म्हणलंय हे सांगता का?
शीख सैन्य आणि 1857 मधले शिपाई यांच्यात काय वैर होतं हे सांगणार का?
पेशवे आणि टिपू यांच्यात खूप आधीपासूनच हाडवैर होतं, हैदर अली पासून आणि पेशव्यांनी याही पेक्षा भयानक मूर्खपणा केला आहे आंग्रे विरुद्ध इंग्रजांची मदत घेऊन आणि यासाठी त्यांना कोणीच माफ करणार नाही
आणि शीख लोकांना बोललो म्हणजे पेशवे मान्य असा समज तुमचा असेल तर तो पहिले चुलीत घाला
हा माझा प्रतिसाद, तुमचे कष्ट वाचवायला. हा परत एकदा वाचा आणि पेशव्यांनी केले ते योग्य असा अर्थ कुठून निघतोय ते मलाही सांगा
पन्नाशीचा बाळ मला काका म्हणतो
पन्नाशीचा बाळ मला काका म्हणतो म्हणजे मी ७५ त गेलो. थोडक्यात ते फेक प्रोफाईल तुमचंच होतं की काका काका म्हणणारं... त्या प्रोफाईलची मानसिकता पूर्ण सडकी आणि घाणेरडी होती. अगदीच शिवराळ नाही पण समकक्ष भाषा होती. आता मला तुमच्याशी वाद घालायचा नाही हे तीनदा क्लिअर केल्यानंतर तुम्ही बंदुकीच्या जोरावर मला राष्ट्रवाद स्विकारा नाही तर माझ्या म्हणण्यावर चर्चा कराच असे म्हणणार असाल तर....
सर्वप्रथम राष्ट्रवाद चुलीत
सर्वप्रथम राष्ट्रवाद चुलीत घालायला शिकले पाहीजे. शीख ब्रिटीशांकडून लढत असोत अथवा बारामतीकडून.. २१ शिखांनी १०००० सैनिकांशी दिलेली लढत यात शौर्य आहेच आहे. सिनेमा पाहिलेला नसल्याने इतकेच.
Submitted by किरणुद्दीन on 26 March, 2019 - 07:48
संपादन (2 hours left)
असेच शौर्य मग मराठा सेनानी प्रतापराव गुजर यांनी दाखवले आहे. ते तर केवळ ७ जणच होते.
अजून इतिहासातले दाखले हवे असतील तर दहाव्या शतकात इंग्लंडमध्ये स्टॅमफोर्ड ब्रिजची लढाई प्रसिद्ध आहे. त्यावेळी एकट्या वायकींग वीराने शेकडोंच्या संख्येत असलेल्या इंग्लिश सैन्याला रोखून धरले होते. आपल्या सैन्याला सज्ज व्हायला वेळ मिळावा म्हणून त्याने वायकींगची ओळख असलेली डबल अॅक्स घेऊन ब्रिजची एक बाजू रोखून धरली आणि एकाही शत्रूला पूल पार करू दिला नाही. अखेरीस एकाने नदीतून पोहत जाऊन ब्रिजखालून त्याच्यावर भाला मारला तेव्हा तो जखमी होऊन मागे हटला.
Submitted by आशुचँप on 26 March, 2019 - 07:49
सर्वप्रथम राष्ट्रवाद चुलीत घालायला शिकले पाहीजे.
म्हणजे उद्या पाकिस्तानने भारतावर सर्जिकल स्ट्राईक केला तर त्यांचे कौतुक करणार का?
Submitted by आशुचँप on 26 March, 2019 - 07:53
राष्ट्रवाद ब्रिटीशांमुळे भारताला माहीत झाला. नाहीतर सगळे इथे एकमेकांच्या रक्ताचा घोट घ्यायला टपलेले होते.
टिपू सुलतान ब्रिटीशांविरुद्ध लढत असताना आणि त्या सैन्याला त्याने जेरीस आणले असताना पेशव्यांनी ब्रिटीशांना मदत करून टिपू सुल्तानाचा पराभव केला.
पेशव्यांना राष्ट्रवादी म्हणणार की देशद्रोही हे ठरवा तुम्हीच. उत्तर आपोआप मिळेल. बाकी विपर्यासासाठी अनेक धन्यवाद.
Submitted by किरणुद्दीन on 26 March, 2019 - 07:56
संपादन (2 hours left)
इतिहासात थोडं डोकावणार का?
शीख सैन्य आणि 1857 मधले शिपाई यांच्यात काय वैर होतं हे सांगणार का?
पेशवे आणि टिपू यांच्यात खूप आधीपासूनच हाडवैर होतं, हैदर अली पासून आणि पेशव्यांनी याही पेक्षा भयानक मूर्खपणा केला आहे आंग्रे विरुद्ध इंग्रजांची मदत घेऊन आणि यासाठी त्यांना कोणीच माफ करणार नाही
आणि शीख लोकांना बोललो म्हणजे पेशवे मान्य असा समज तुमचा असेल तर तो पहिले चुलीत घाला
>>>>
माझ्या दोन ओळीवर तुमचे एव्हढे आकांडतांडव आहे. पुढे दोन ओळी लिहील्या की अजून तेव्हढेच. एव्हढे आकांडतांडव करण्यासारखे सुसंबद्ध काय होते तुमच्या प्रतिसादात. उगाच पेरूचे फळ चांगले असते म्हटले की टरबूज का नाही छाप वाद घातला आहे तुम्ही. म्हणून मला माफ करा.
आशुचँप , तुम्ही सेन्सीबल असाल
आशुचँप , तुम्ही सेन्सीबल असाल असा माझा समज होता.
तरीदेखील खुशाल मला संघी ठरवून रिकामे झालात.
कुठून ना कुठून या राष्ट्रवादाच्या कल्पना डोस्क्यात शिरत असतात. ज्या तुमच्या डोक्यात आहेत
नाझी राष्ट्रवादाने जर्मनीचे भले झाले असे तुमचे म्हणणे असेल तर तुम्हाला तुमच्या राष्ट्रवादाच्या कल्पना मुबारक.
हे देखील मी कधी आणि कुठे म्हणलं आहे ते सांगा. तुम्हाला जास्तीचे दिसते का हो, जे मी आजवर कधी म्हणलं नाही ते खुशाल माझ्या नावावर खपवून पुन्हा त्याचे खापर माझ्याच डोक्यावर फोडत आहात.
https://www.maayboli.com/node/62603
हा मी दोन वर्षांपूर्वी लिहीलेला मजकूर. यातही तेच आहे. त्यावर असंख्य प्रतिसाद येऊनही कुणी मला संघी म्हणलं नाही. मी राष्ट्रवादी वगैरे काय काय लेबल लावली नाहीत. तोच मुद्दा इथे मांडला आणि तुम्ही तुमच्याकडे असलेला एकमेव शिक्का माझ्यावरती मारते झालात.
सेन्सिबल कुणाला म्हणाव यात
तुमच्याशी चर्चा होऊ शकत नाही
तुमच्याशी चर्चा होऊ शकत नाही इतके तुम्ही सिद्ध केले. जे मी सांगतोय ते मी कुठे म्हटले हे सांगा हे तुम्ही कुठल्या शाळेत शिकलात ठाऊक नाही. अत्यंत आभार या शिकवणीबद्दल.
थोडक्यात ते फेक प्रोफाईल
थोडक्यात ते फेक प्रोफाईल तुमचंच होतं की काका काका म्हणणारं...
असल्या घाणेरड्या सवयी नाहीत हो मला. सुरुवातीपासून माझे हाच आयडी आहे. मला अनेक माबोकर प्रत्यक्ष भेटले आहेत, ओळखतात आणि माझे सगळे तपशील माबोवर आहेत. तुमच्या आरोपांची राळ उडवणे अजून किती काळ चालणार आहे,
हास्यास्पद होत चाललं आहे तुमच सगळं, काका
रच्याकने माझं वय ३९ आहे.
तुमच्याच पद्धतीने मी तुम्हाला
तुमच्याच पद्धतीने मी तुम्हाला कुठे संघी म्हणालो ? तुम्ही खुशाल विपर्यास करता. आक्रस्ताळेपणा करता. त्यावर पुरावे मागता.
मी संघी राष्ट्रवाद म्हणालो की तुम्ही मी संघात गेलो नाही म्हणालात. मी कधी म्हणालो तुम्ही संघात गेला ते दाखवा.
हे सगळं अत्यंत बालीश आहे. पुन्हा माझ्याशी कृपा करून वाद घालायला येऊ नका.
एक घाणेरडं, सडकं आणि अत्यंत
एक घाणेरडं, सडकं आणि अत्यंत विकृत असं प्रोफाईल आहे ते काका काका म्हणतं त्याची माहिती मी दिली आहे फक्त. तुम्ही नेहमीच्या पद्धतीने ओढवून घेतली असेल तर माझा नाईलाज आहे.
आणि काका म्हणणे मान्य नसेल तर
आणि काका म्हणणे मान्य नसेल तर किरण्या म्हणतो, मला काय,
तु आधी उत्तर दे माझ्या लिखाणात तुला संघी काय दिसलं ते,
ते तर सांगता येत नाहीचे, उगाच आरोपांची राळ उडवणे सुरु आहे.
फेक आयडी हे एक नवीन काहीतरी, मुद्दयाला धरून बोलता येत नाही का बाळ तुला....
शुभेच्छा !
शुभेच्छा !
लवकर मोठा हो आणि कुणालाही
लवकर मोठा हो आणि कुणालाही काहीही ठरवून टाकण्यापूर्वी जरा विचार कर, आपलं वय काय आपण बोलतो किती
थोडक्यात काही फरक नाही. त्या
थोडक्यात काही फरक नाही. त्या प्रोफाईलची भाषा हीच आहे.
बस मग तेच धरून, आता काय डोकं
बस मग तेच धरून, आता काय डोकं आपटलं तुझ्यासमोर तरी तुझ्यात काही बदल होणार नाही.
विशिष्ट लोकांची संख्या एकने
विशिष्ट लोकांची संख्या एकने वाढवल्याबद्दल माझाच मी निषेध करीत आहे. (याचाही कुणाला त्रास असेल तर ...)
किरणुद्दीन, आशुचँप, तुम्ही
किरणुद्दीन, आशुचँप, तुम्ही दोघंही - काहीही वैय्यक्तिक ओळख नसताना सुद्धा- मायबोलीवर संतुलित लेखन करणारे आय-डी आहात, म्हणून हा वाद बघून क्लेश झाले. असो. लवकरच वाद मिटेल अशी आशा आहे.
मी वाद घालतच नाहीये. माझा
मी वाद घालतच नाहीये. माझा सुरूवातीचा प्रतिसाद बघा.
आशूचंंप, अहो काका काय? "ताई"
आशूचँप, अहो काका काय? "ताई" आहेत त्या. बरोबर ना ताई?
मार्मिक काकू, तुमचे कुठल्या
मार्मिक काकू, तुमचे कुठल्या ताईंशी वाद असतील ते असोत. स्कोर सेटलमेम्ट करताना मला त्यात नाही ओढलेत तर बरे होईल.
असं कसं? ताईंशी वाद असला तर
असं कसं? ताईंशी वाद असला तर त्यांच्या सगळ्या रूपांशी असणार ना?
तुम्हाला हजार वेळा सांगितलं आहे की ओरिजनल आयडीने काय हवा तो गोंधळ घाला पण पडद्याआड लपून तुम्ही लोकांना छळायला सुरूवात केली की मी प्रत्येक वेळेस तुम्हाला expose करणार.
फेरफटका - कारण नसताना उगाच
फेरफटका - कारण नसताना उगाच काहीही आरोप केल्यावर मी तरी काय बोलणार. माझेच मायबोलीवर प्रकाशित झालेले लेखन वाचले तरी लक्षात येईल की मी संघी तर सोडा त्यांच्या वाऱ्यालाही नसतो. त्यांची झापडबंद विचारसरणी मला पूर्ण अमान्य आहे, तरी हा किरणू मला केव्हाचा संघी संघी म्हणून झोडपत बसलाय. मी तर देव बिव पण फारसा मानत नाही. मी कुठल्याही राजकीय धाग्यावर सहसा मत मांडायला जात नाही. वेळ असला तर रोमात राहून वाचतो फक्त. इतिहास माझ्या आवडीचा आहे आणि युद्धे हा तर जास्तच. त्यामुळे त्या अनुषगांने मी मते मांडली तर किरणूला काय टोचलं माहीती नाही.
माझे म्हणणे अजूनही तेच आहे. शिख असो वा पेशवे वा टिपू वा नवाब वा अजून कोणी. इंग्रज हे आपले शत्रूच होते आणि त्यांना मदत करणे हे चूकच होते. आपल्या देशाची जी अमर्यादीत लूट करून आपल्याला पार पांगळा करून टाकणारे हे ब्रिटीश होते. त्यामुळे हे माझे मत कायम राहणार. मग संघी, पांगी, नथुरामी किंवा अजून काय शब्द असतील कोषात ते काढून म्हणा.
राष्ट्राच्या व्याख्यांमधे
राष्ट्राच्या व्याख्यांमधे एकमत आहे का ? लोकप्रिय व्याख्येनुसार प्रत्येक जात ही एक स्वतंत्र राष्ट्र होते. म्हणजे भारत हा सहा हजार राष्ट्रांचा समूह म्हणायला हवा. यातला कुणाचा राष्ट्रवाद ? म्हणून चुलीत घाला म्हणालो. साधारणपणे या गोष्टी माहीत असतील तर विनाकारण वाद होत नाहीत.
मार्मिक काकू, माझ्या विपूत
मार्मिक काकू, माझ्या विपूत डोकावला असता तर माझ्यावर लिंगबदलाची शस्त्रक्रिया करण्याची गरज पडली नसती.
साधा सरळ विषय आहे, इंग्रजांना
साधा सरळ विषय आहे, इंग्रजांना जर आपल्याच (म्हणजे भारतीय उपखंडात राहणाऱ्या लोकांनी) मदत नसती केली तर पुढे १५० वर्षे गुलामगिरीत रहावे लागले नसते. इंग्रज बाहेरून आलेले होते हे कळायला काय अक्कल गहाण ठेवावी लागत नाही. इथल्याच लोकांनी आपापल्या वादाचा फायदा इंग्रजांना करून दिला आणि एकेकाळी व्यापारासाठी प्रसिद्ध असलेला संपन्न देश कर्जबाजारी झाला.
यात कसला राष्ट्रवाद, कसल्या जाती आणि काय दिसतय किरणूला काय माहीती. मी काय म्हणतो तुझी जी काय विद्वता आहे तीच एकदा चुलीत का नाही घालत.
ते आवाजाचे म्हणताय होय? अहो,
ते आवाजाचे म्हणताय होय? अहो, ते कुणाकडून गावून घेणे तुमच्या सारख्या महान हस्तिला काय कठिण आहे का?
किरण्या आधीच सांगतोय, हा जो
किरण्या आधीच सांगतोय, हा जो काही वाद सुरु आहे बाई का बुवा, त्याच्याशी माझे नाव जोडू नकोस, वरती जसे कुठल्यातरी फेक आयडीशी जोडलास तसा. तुला ती घाणेरडी सवय आहे असे दिसते आहे, काहीतरी फेकमफाक करायची.
तु बाई अस, बुवा अस, काहीही अस, मला काय घेणेदेणे नाही. इथे काहीतरी बाळवटासारखे बरळलास तर मी बोलणार. त्यामुळे पुढच्या वेळी कोणाला संघी बिंघी म्हणण्यापूर्वी विचार कर
इंग्रज हे आपले शत्रूच होते
इंग्रज हे आपले शत्रूच होते आणि त्यांना मदत करणे हे चूकच होते.
इंग्रज शत्रूच होते हे इतकं ब्लॅक अँड व्हाईट नाहीये माझ्यामते. मी त्या काळात असते तर टिपू सुलतान किंवा सनातनि ब्राम्हण पेशवे यापेक्षा क्वीन व्हिक्टोरियाची इंग्रज राजवट ही नक्कीच प्रिफर केली असती. स्त्रिया(सर्व जातीच्या) व दलित यांच्यासाठी इंग्रज आले म्हणून सकारात्मक फरक पडला हे मान्य करायला अडचण असू नये.
अमर्यादित लूट केली , पांगळं केलं हे खरं असेल. पण ती जी काही भारताची पूर्वीची श्रीमंती होती त्यात स्त्रिया व शूद्रांचा वाटा किंवा अधिकार काय होता? त्यामुळे त्या संपत्तीची लूट केल्याचे दुःखही सर्वाना सारखेच होणार नाही.
होय हा मुद्दा मान्य आहेच.
होय हा मुद्दा मान्य आहेच. तत्कालीन काळात अनेक त्रुटी होत्या आणि दुर्बल घटकांना वाली नव्हता हे अगदीच बरोबर आहे. पण लूट ही फक्त पैशाची झाली नाही ना.
आपली ग्रामव्यवस्था, हस्तमाग आणि एकूणातच वस्त्रोद्योग उध्वस्त झाला.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात १९४३ साली बंगालमध्ये भिषण दुष्काळ पडला आणि ६० लाखाहून अधिक लोक टाचा घासत घासत मेले. आणि इतक्या भिषण परिस्थितीतही ब्रिटिश सैन्याला कमी पडेल म्हणून ब्रिटिशांनी अन्न धान्याची पोती युरोपात नेली. चर्चिलचा हा निर्णय होता. यावर अनेक इतिहासकारांनी लिहून ठेवले आहे. जसा हिटलरचा तसा हा चर्चीलचा अप्रत्यक्ष होलोकॉस्टचा होता.
त्यापेक्षा मग एक समाज म्हणून कालांतराने सुधारणा घडून आल्या असत्या. अजूनही काय आपण राजे, संस्थानिक याच्यातच गुरफटलो नसतो.
अर्थात या जर तर च्या गोष्टी आहे, पण म्हणून इग्रज चांगले होत नाहीत. दुसऱ्या महायुद्धामुळे स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समानता मिळाली, म्हणून दुसरे महायुद्ध चांगले ठरत नाही, तसेच हे.
Pages