न्युझीलंड- दहशतवादी हल्ला

Submitted by भरत. on 16 March, 2019 - 07:33

न्यु झीलंडमधल्या ख्राइस्ट चर्च इथे झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याबद्दल आपण सगळ्यांनी ऐकलंच असेल. जगातला कोणताही देश अतिरेकी, द्वेषाधारित, विध्वंसक विचारसरणीपासून सुरक्षित राहिलेला नाही. या हल्ल्यानंतर न्युझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी देशाला उद्देशून केलेलं वक्तव्य अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आश्वासक वाटलं. त्यांच्या भाषणातला हा काही भाग. (स्वैर अनुवाद)

या हल्ल्याने घायाळ झालेल्या लोकां करिता हा माझा संदेश. हा संदेश फ़क्त माझ्याच नव्हे तर माझ्या देशाच्या वतीने आहे , माझ्या देशवासियांच्या भावनाही याच असतील , याची मला खात्री आहे.
या हल्ल्यात क्षती पोचलेल्या लोकांसोबत आमच्या सहवेदना आणि प्रार्थना आहेत. बळी पडलेले लोक ख्राइस्टचर्चचे होते. त्यातल्या अनेकांचे ते जन्मस्थान नव्हते. खरं तर त्यातल्या अनेकांनी आपल्या वास्तव्यासाठी न्युझीलंडची निवड केली होती. हा देश त्यांनी (स्थलांतरासाठी) स्वत:हून निवडला त्याच्याशी नातं जोडलं, इथे त्यांची कुटुंब होती, इथल्या समाजाबद्दल त्यांना जिव्हाळा होता आणि या समाजानेही त्यांना प्रेम दिलं. या जागी ते एक सुरक्षित निवारा शोधीत आले. इथे त्यांना त्यांच्या धर्म आणि संस्कृतीचे पालन करण्याचे स्वातंत्र्य होते.

तुमच्यातल्या अनेकांना प्रश्न पडला असेल, हे असं माझ्या देशात कसं घडू शकतं? आपण लक्ष्य ठरण्याचे कारण, आपण द्वेष करणार्‍यांना आसरा दिला हे नव्हते. आपण वंशभेदाला , अतिरेकी विचारसरणीला थारा दिला, म्हणून हा हल्ला इथे झाला नाही. यांतलं ( वंशभेद, द्वेष, अतिरेकी विचार) काहीही आपल्यात नाही, म्हणूनच केवळ आपल्याला लक्ष्य केलंय. आपल्याला लक्ष्य केलंय कारण आपण विविधता, प्रेम, आपुलकी ही तत्त्वं मानतो. ही तत्त्वं मानणार्‍यांना सामावून घेतो. निराधार गरजूंना आश्रय देतो.

या तत्त्वांपासून आम्ही जराही ढळणार नाही, ढळू शकणार नाही याची खात्री बाळगा.

दोनशे वेगवेगळ्या वंशाच्या आणि एकशे साठ भाषा बोलणार्‍यांचा हा देश आहे, याचा मला अभिमान आहे. या विविधतेत आमची काही सामाईक तत्त्वं सामावलेली आहेत. या हल्ल्याची झळ लागलेल्यांबद्दल आमच्या मनात सहवेदना आहे, आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत; हे आजच्या घडीला माझे सांगणे आहे.

ज्या विचारसरणीतून हे कृत्य झालं तिचा मी तीव्रतम शब्दांत निषेध करते.
तुम्ही (आपला देश, आपला समाज म्हणून) आम्हांला निवडलं असेल, पण आम्ही तुम्हांला पूर्णपणे नाकारतोय. तुमचा धिक्कार करतोय.

Group content visibility: 
Use group defaults

मनुस्मृती हा शब्द इथे कोणाकोणाच्या प्रतिसादात आलाय?
कोणीही न बोललेले शब्द आलेत असे गृहीत धरून त्यावरून झोडपा झोडपी करणे ही चर्चेची नवी पद्धत अलीकडे पडलेली दिसते.

Justin Trudeau

Islamophobia & hate have no place anywhere, and have a devastating impact. I visited the South Nepean Muslim Community Mosque tonight, to mourn for those killed in the New Zealand terrorist attack and listen to young people about how we can keep building safe & inclusive communities.

मुळात apples अँड oranges असलेलं article, आता प्रतिक्रियेमुळे साम्यस्थळे शोधा आणि आत्मपरीक्षण केले तर बरं! असं म्हणावेसे वाटते.

उलट अतिरेक्यांविरूद्ध त्याच समाजातील लोक पुढे यावेत असे वाटत असेल, तर इतर जनतेने सर्वांना घाउकरीत्या आरोपीच्या पिंजर्‍यात उभे न करणे हे प्रचंड महत्त्वाचे आहे. अतिरेक्यांच्या प्रभावाला आणखी लोक बळी पाडण्याचा हुकमी मार्ग आहे असे घाउक आरोप म्हणजे. कारण इतर बहुसंख्य समाजाकडून जर भीती असेल तर तुलनेने सुरक्षित वाटणार्‍या स्वतःच्या घेटोज मधे परत जाण्याशिवाय लोकांकडे पर्याय राहात नाही.>>>>> फार एंड चे म्हणणे बरोबर असले तरी मुस्लिम समाजाचा ठेका घेतलेले ( जसे सनातन, बजरंग दलवाले काही लोक हिंदु धर्माचा घेतात तसे ) मौलवी , मुस्लिम समाजाला जाणुनबुजुन वेगळे पाडत असतात. काही वेळेस हे लोक नुसतेच मदरश्यात शिकलेले असावे, भारतीय शाळांमध्ये नाही असे वाटण्याइतपत वागतात.

साधारण १० ते १५ वर्षापूर्वी भाजपा मध्ये असलेले एक मुस्लिम नेते ( काहीतरी खान आडनाव होते एवढेच आठवतेय ) गेल्यानंतर त्यांना मुंबईत कबरस्तानात दफन करायला पण हे लोक जागा देईनात. लोकसत्तामध्येच वाचले होते मी ते. वाचुन वाईट वाटले होते. अरे असे कसे कोणी कोणाला वाळीत टाकु शकते? मेल्यांनतर पण हे लोक वैर चालू ठेऊ शकतात? हद्द झाली.

दुसरी घटना, ही मात्र खरच पॉझीटिव्ह आहे. साधारण ९५ ते ९८ च्या दरम्यानची. एक मौलवींचे पुण्यातल्या एका मशिदीत प्रवचन चालू होते. म्हातारे- कोतारे, काही तरुण तर काही लहान मुले असे तिथे बसले होते. मध्येच चार-पाच तरुण बाहेरुन आले आणी आत घुसुन त्यांनी मौलवींना बजावले की आम्ही लिहीले आहे तसेच वाचा. तर त्या कागदात बरेच प्रक्षोभक , इतर धर्मा विरुद्ध लिहीले होते, जे ते मौलवींना लोकांच्या मनावर बिंबवायचे होते. मौलवींनी नकार दिल्यावर त्या मुलांनी मौलवींना मारायला सुरुवात केली. मग लगेच मशिदीत आधी जमलेल्या तरुणांनी त्या बाहेरच्या मुलांना चांगला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.

वरील दोन्ही घटना विरुद्ध आहेत. समाजातल्या किमान ८५ टक्के लोकांना अतीरेकी वागणे पसंत नसते. मालेगावचेच उदाहरण घ्या. निहाल अहमद हे जनता दलाचे मालेगावमधील नेते. जरा खुट्ट झाले की ते सारखे मोर्चा काढायचे, का तर मुस्लिमांवर अन्याय होतोय म्हणे. त्या काळात काँग्रेसचे राज्य होते, भाजपाचे नाही. मालेगावची आताची लोकसंख्या आहे साधारण ४ लाख ५० हजार. त्यापैकी मुस्लिम समाज दिड ते दोनच्या आसपास. पण यांनी मोर्चा काढला की मोर्चाला हजर मंडळी फक्त १०-१२ हजार, मग बाकी मुस्लिम लोक गेले कुठे?

लोकांना सुरक्षीतता हवी आहे, आनंदी जीवन हवे आहे. कशाला ते या राजकारणात पडतील? त्यापेक्षा एकमेकात विश्वास निर्माण करा. आणी हे काम आधी सरकारचे आहे , कारण त्यांच्याकडे कायदा आहे. कायदा नीट राबवला गेला तर बुलंद शहर सारखी नीच घटना कधीच घडणार नाही. लोकांनी पण कुठल्याही अफवेला बळी न पडता आधी खात्री करावी, नाहीतर दंगली पेटायला किती वेळ लागेल?

लोकांनी पण कुठल्याही अफवेला बळी न पडता आधी खात्री करावी,
~ असे झाले असते तर आज भाजपाचे राज्य नसते भारतावर. Happy

भाजप नेत्याला दफन नाकारण्याची बातमी मला आठवत नाही. पण ही बातमी आठवतेय.
The Muslim Council on Sunday decided not to allow burial of .the bodies of the nine terrorists killed during the Mumbai siege in the Marine Lines Bada Qabrastan (cemetery).

The council said it was trying to send a message to all cemeteries in India that none of the bodies should be buried on Indian soil.

ही आणखी एक
https://in.reuters.com/article/india-mumbai/bodies-of-nine-mumbai-gunmen...

भरत हिच ती ओरिजनल बातमी असेल. उलटी फिरुन ती आता भाजपानेत्याला जागा दिली नाही अशी अफवा झाली असावी. भाजपवाले तशाही त्यांच्या विरोधातल्या बातम्याही १८० मध्ये फिरवून टाकतात.

भरत, तुम्ही दिलीत ती ही बातमी नाहीये.

अहो हेला, जरा दुसर्‍यावर विश्वास ठेवायला शिका. भाजपाच्या बाजूने कोणी बोलले तर लगेच ते फेकू अशी टिप्पीकल धारणा बनवु नका. मला डॉ. मनमोहन सिंग आवडतात . मग त्यांच्या बाजूने मी बोलले तरी मला फेकूच समजाल , नाही का?

ती खानसाहेबांची बातमी लोकसत्तातच छापुन आली होती. आणी लोकसत्ता काही भाजप्यांचा किंवा माझ्या कोणा नातेवाईकांच्या मालकीचा पेपर नाहीये.

मी लहा नपणापासून लोक सत्ताच वाचत आलोय. मला ती बातमी वाचल्याचं आठवत नाही.

ही वरची बातमी मात्र बर्‍यापैकी चर्चेत होती.

भरत, लोकसत्ता तर माझ्या जन्माच्या आधीपासुन आमच्या घरात येतो. तेव्हा मुंबई आवृत्ती आमच्याकडे यायची आणी अजूनही तीच येते. दुसर्‍या पेजवर ती बातमी होती. आणी ते भाजपात आहेत म्हणून जागा मिळाली नाही हे पण त्यात लिहीले होते. तेव्हा मला समजेना की पक्षाचा दफनाशी काय संबंध? माणुस गेला तो गेला. पाहीजे तर कोणी ओळखीतल्या बिजेपी माणसाला ( जुन्या जाणत्या ) विचारुन बघा.

ओके !

कर्मठ असणे आणि अतिरेक्यांना समर्थन असणे हे दोन्ही सारखेच नाही. >>

सर्वच धर्माचं हे लंगडं समर्थन असतं, आणि इस्लामच्या बाबतीत तर हे कट्टर विचार उघड उघड अतिरेकी विचार मानण्यास प्रवृत्त करतात.
एक सच्च्या मुसलमानांची कुराणातली व्याख्या पहा -
१) "Indeed the ones possessed of true faith are those who believed in Allah and His Messenger and then they did not entertain any doubt and strove hard in the Way of Allah with their lives and their possessions. These are the truthful ones. (Surah 49 Al-Hujurat, Ayat 15-15)

सरळ अर्थ असा की अल्लाच्या कुठल्याही गोष्टीवर संदेह निर्माण करणारा सच्चा मुसलमान असूच शकत नाही.

२) We have sent down the Qur'an with the Truth, and it is with the Truth that it has descended. And We have not sent you but to proclaim good news and to warn (Surah Al-Isra [17:105] )

कुराण हेच अल्लाहने पाठवलेलं अंतिम सत्य आहे.

३) Those who disbelieve and avert [people] from the way of Allah - He will waste their deeds. (Surah Muhammad [47:1-38])
जो संदेह करेल तो अल्लाहच्या कोपला पाञ ठरेल. मग यात काफिरांचे गळे कापायच्या सुरा असूदे नाहीतर बायकांवर चाबकाचे फटके ओढायच्या. काफरांच्या शिक्षांची वर्णनं ऐकून मला बाकीच्या धर्मातले नरक हॉलिडे डेस्टिनेशन वाटायला लागले.

त्यातल्या त्यात एक सुरा माझ्या विशेष लक्षात राहिली ती ही - "The Messenger of Allah (Peace be upon him) said: 'There are two groups of my Ummah whom Allah will free from the Fire: The group that invades India, and the group that will be with 'Isa bin Maryam, peace be upon him.'" (Sunan an-Nasa'i Book 25 Hadith 3177)

आता जर कर्मठ मुसलमान शब्दश कुराण मानत असेल (जो अल्लाचा अंतिम शब्द आहे ), तर तो या अतिरेकाला पाठिंबा देऊन थेट अल्लाचा इच्छेचा मानच राखतोय ना ?

इतकं क्लिअर कॉर्रिलेशन असताना कर्मठ इस्लाम अतिरेकाला प्रोत्साहन देत नाही, असं कसं काय म्हणता येईल ?

आता दोनच पर्याय उरतात, एक आहेत्या कुराणात बदल करणे (जे ख्रिश्चनांनी ओल्ड टेस्टामेन्ट बरोबर केले), किंवा पूर्ण कुराणच रद्दबादल करणे (जे बऱ्याच हिंदूंनी मनुस्मृती बरोबर केले) . दोन्हीतली एकही शक्यता मला सध्या आवाक्यातली दिसत नाही, कारण बदलाची सुरुवात आतून व्हायला हवी, आणि तो आवाज उठवणारे मवाळ मुस्लिम बहुसंख्य असूनही मौनव्रतात आहेत.

तर युरोपात येणार्‍या सर्व प्रकारच्या स्थलांतरितांबद्दल त्याला राग आहे आणि त्यात इंडियन्सही आलेत. या रागाला वाट देण्यासाठी त्याने लक्ष्य निवडलं मशिदीचं. >>
२०१३ च्या न्यूझीलंड जनगणनेनुसार हिंदू एकूण लोकसंख्येच्या 2.11% आहे तर मुस्लिम फक्त 1.18% (https://en.wikipedia.org/wiki/Demographics_of_New_Zealand). म्हणजे सगळ्याच स्थलांतरांवर राग असता त्या माथेफिरूने पहिल्यांदा हिंदूंवर काढायला हवा होता नाही का? तेच तर संख्येने जास्त आहेत , जास्त शिकलेले आणि सधन आहेत , त्यांच्यामुळेच तर त्याच्या नोकऱ्या धोक्यात आल्या, युरोपियन रक्त अशुद्ध झालं. तरीही त्यानं मंदिराला आपला निशाणा बनवण्याऐवजी मशिदीला का केलं?

कारण सरळ आहे, हिंदू लोकांनी दुसऱ्याच्या घरात काड्या करायचं सोडून आपल्या घराकडे लक्ष दिलंय . याउलट बाकीची शांतीप्रिय मुस्लिम जनता आपल्याच कट्टरपंथीयांना आवर घालण्यात अपयशी ठरलीय.

त्याने एखाद्या मंदिराला ल क्ष्य केलं असतं तर आपल्या प्रतिक्रिया अशाच असत्या का? >>
हो, जर हिंदूंनी नको तिकडे कर्मठ आणि अतिरेकी विचारांची गरळ ओकली असेल तर जरूर सांगू. तसा एक कारनामा दाखवा हिंदूंचा जो दुसऱ्या देशात इतका अक्राळविक्राळ होत गेला.

@रश्मी..
त्यांचे नावच लोकसत्ताकार असे आहे, तुम्ही त्यांच्याशी वाद घालू नका. त्यांच्या घरी महाराष्ट्रातील सर्व शहरांच्या आवृत्त्या येतात व ते वाचतात देखील. तेंव्हा ते म्हणतायत ना की त्यांनी, तुम्ही सांगितलेली बातमी लोकसत्तात वाचली नाही म्हणून, मग ते बरोबरच आहे. त्यांनी ती बातमी वाचली नाही म्हणजे ती बातमी लोकसत्तात आलीच नसणार.

विलभ धन्यवाद, मी देखील हेच म्हणणार होतो. भरत यांना इस्लामची कुठली बाब दहशतवादाला प्रोत्साहन देते हे चांगलेच माहीत आहे. पण केवळ टाईमपास करायचा म्हणून खालील प्रश्न येतात.

<<< मुस्लिम समाज मागास आणि स्थितिवादी असल्याचा आणि इस्लामी दहशतवादाचा परस्परसंबंध काय हे समजून घ्यायचे आहे.>>>

{म्हणजे सगळ्याच स्थलांतरांवर राग असता }
हे त्याचंच म्हणणं आहे ( असं वाचलंय, नंतर शोधून देईन) ते तुम्हांला मान्य असलंच पाहिजे असं नाही.

बिपीन भाऊ , मनुस्मृतीचा विषय कुणीच काढलेला नसताना तुम्ही त्यावर लिहून इतरांना संधी का देताय?

ता. क. - कृपया यावर मनुस्मृतीची व्हॉटअबाउटगिरी करू नये, कारण मी मनुस्मृतीचा समर्थक नाही आणि आताच्या जमान्यात मनुस्मृतीला कोणीही विचारत नाही. तरीही करायचीच असेल मनुस्मृतीचा शेवटचा पाठ नीट वाचून त्याची शरियाबरोबर तुलना करून मगच करावी.
Submitted by ShashankP on 17 March, 2019 - 23:12

विलभ, तुमच्या पोस्टमधून it is okay to kill Muslims असा अर्थ निघतोय.
इथे तुमच्यासह अनेकजण त्या दहशतवाद्याच्या क्रुत्याचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन करताहेत - कारण तुमच्यामते तो अँटी मुस्लिम आहे.

मला वाटते,
फ्रान्संमधील चार्ली हेब्दो शुटआऊटच्या वेळी अनेक भारतीय पुरोगाम्यांनी त्या शुटआऊट करणार्‍या दहशतवाद्यांचे समर्थन केले होते कारण काय तर त्या कार्टुनिस्टनी शांतताप्रिय धर्माच्या प्रेषिताचे व्यंगचित्र काढून इस्लाम विरोधी वर्तन केले होते. शिवाय पलिकडील वेबसाईटवर त्या 'अतिरेक्यांनी जे केले ते कसे योग्य होते' हे सांगाणारा एक लेख देखील आला होता.

विलभ, तुमच्या पोस्टमधून it is okay to kill Muslims असा अर्थ निघतोय.
इथे तुमच्यासह अनेकजण त्या दहशतवाद्याच्या क्रुत्याचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन करताहेत - कारण तुमच्यामते तो अँटी मुस्लिम आहे. >>>>

असा अर्थ तुम्हाला कुठल्या वाक्यातून दिसला?
त्या पोस्टित it is okay to kill kafirs अशा अर्थाच्या कुराणातील परवानगीची (जी मुस्लिमांचे कर्तव्य म्हणून सांगितली जाते) माहिती दिलीय. इस्लाम मानणारे आपोआप ते कर्तव्य पाळायला बांधील होतात. ती परवानगी काढून कुराणात respect other religions हे टाकण्याची गरज आहे. असा विलभ यांच्या पोस्टिचा आशय आहे.

बिपीन, कृपया पुन्हा एकदा वाचा, लोकांनि मनुस्मृतीचा विषय काढू नये म्हणून मी ते लिहिलं. तुम्हाला त्याचा राग आला असेल तर मनुस्मृतीचा वेगळा धागा काढावा.

त्यापुढील वाक्य मी लिहिले कारण मनुस्मृतीच्या शेवटच्या धड्यात मनुस्मृतित बदल कसे करायचे ते सांगितलंय, जे कायदे सांगणाऱ्या इतर धर्माच्या ग्रंथांत नाही. त्यामुळेच हिंदू धर्म इतर धर्मांपेक्षा उजवा ठरतो (जरी मनुस्मृती सध्याच्या काळासाठी outdated आहे तरीही)

रिव्हर्स स्वीप >>> +१
बरोबर आहे मला वाटतं इथे फक्त एकांगीच विचार सुरु आहे ... अश्या भ्याड हल्ल्याचे समर्थन अजिबात करायचे नाही परंतु हे असे का व्हायला लागले याचा नक्कीच विचार झाला पाहिजे. हि सुरुवात का झाली ? याला कारणीभूत कोण किंवा विशिष्ट विचार धारांची लोकं आहेत.

मध्यंतरी सुजीत भोगले यांचा एक लेख वाचनात आला होता तो खाली देत आहे (हि एक सत्य घटना आहे)

सिरीया हा देश आयसीस ने ताब्यात घेतला तिथून प्रचंड प्रमाणात शरणार्थी युरोप च्या दारावर धडका देऊ लागले. युरोपियन द्रवत नव्हते. मग तो एका लहान मुलाचा समुद्र किनार्यावरील मृतदेह असलेला फोटो व्हायरल झाला आणि मग सगळ्या मानवतावादी संघटना सरसावल्या त्यांनी त्यांच्या युरोपियन युनियन मधील सरकारांवर दडपण आणून सिरीयन शरणार्थी घेण्यास भाग पाडले.

ती अशीच एका युरोपियन देशातील एक मानवाधिकार कार्यकर्ती. सुखवस्तू , एका ९ वर्षाच्या गोड छोकरीची आई. घटस्फोटीत. तिने एका सिरीयन मुस्लीम निर्वासित कुटुंबाची जबाबदारी घेतली त्यांना स्वतःच्याच घरात राहायला जागा दिली. त्या कुटुंबात आई वडील आणि दोन मुले. एक मुलगा १३ वर्षाचा आणि मुलगी ९ वर्षाची.

एका रात्री ती आई पाणी प्यायला उठली तर तिला तिच्या मुलीच्या खोलीतून विचित्र आवाज येत होते. म्हणून ती दार उघडून आत डोकावली. तर तो १३ वर्षाचा शरणार्थी मुलगा तिच्या ९ वर्षाच्या लहान मुलीवर चक्क बलात्कार करत होता. ती मुलगी प्राणपणाने विरोध करत होती पण तिचा विरोध तोकडा पडत होता. आई मध्ये पडली आणि तिने कशी बशी आपल्या मुलीची अब्रू वाचवली.

यातील धक्कादायक उत्तरार्ध असा आहे कि त्या शरणार्थी पालकांना याचे काहीही विशेष वाटलेच नाही. कारण त्यांच्या मते ती मुलगी काफर होती ( ख्रिश्चन ) आणि या मुलाने तिच्याशी कसेही वागले तर ते योग्य आणि क्षम्यच आहे.

परंतु या घटनेने त्या मानवाधिकार कार्यकर्तीचे डोळे उघडले आणि तिने त्या कुटुंबाची रवानगी सरकारी शरणार्थी गृहात केली.

वरील सगळा किस्सा तिने स्थानिक पेपर मध्ये लिहिला होता.

संपूर्ण युरोप चे सांस्कृतिक सामाजिक जीवन या शरणार्थी मुस्लिमांच्या मुळे उध्वस्त होते आहे. दंगली , रक्तपात आदी जवळजवळ संपुष्टात आलेल्या गोष्टी आता पुन्हा युरोप च्या दैनंदिन जीवन शैली चा हिस्सा होत आहेत. पण हा काळाने उगवलेला सूड आहे. याच युरोपियन देशांनी जगभर साम्राज्य विस्तार करताना प्रचंड रक्तपात केला होता. स्थानिक धर्म नष्ट केले होते. आपल्या क्रूर कृत्यांना पोप चा आशीर्वाद मिळवून आपले रक्ताळलेले हात पोप च्या चोग्याला पुसले होते.

आज सिरीयन शरणार्थीच्या रूपाने त्यांनी आत घेतलेला troy चा घोडा त्यांची वाट लावल्याशिवाय शांत होणार नाही. कर्मफळाचा सिद्धांत काम करतो आहे. आपण कुणा एकाची बाजू न घेता आपली ताकद वाढवत रहाणे आणि मेणबत्ती ग्यांग च्या नादाला लागून भ्रमित न होणे आवश्यक.

परवा न्यूझीलंड मधील घटना किंवा रोहिंग्या मुस्लिमांना पाहून आपल्याकडील ज्या मेणबत्ती ग्यांग ला प्रेमाचा उमाळा येतो त्यांच्या साठी हि डोळे उघडवणारी पोस्ट आहे.

माझे विचार पटणार नाहीत इतके कटू आहेत पण ते तितकेच सत्य सुद्धा आहेत. पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या..

©सुजीत भोगले

चर्चेचा ओघ अतिशय पद्धतशीरपणे दहशतवाद्यावरून त्याला बळी पडलेले लोकच कसे या कृ त्याला कसे जबाबदार आहेत याकडे वळवला गेलाय.

अ‍ॅपल्स आणि ऑरेंजेस, मुस्लिमांनी इन्ट्रोस्पे क्शनची गरज, दहशतवादी हल्ला न म्हणता माथेफिरू म्हणाणे, स्टॉकहोम इथल्या मुस्लिम इमिग्रंटने केलेला हल्ला हे या हल्ल्याचे कारण, हा मुद्दा मला गैरसोयीचा आहे, मग पुढे चर्चेचा ओघ स्थितिप्रिय मुस्लिम धर्म आणि इस्लामिक टेररिझम्कडे, मुस्लिम धर्म आणि इतर धर्मांचे संघर्ष इथे वळलाय.

माझ्यासाठी कोणत्याही व्यक्तीने कोणाही विरोधात केलेले असले कृत्य हे सारखेच निषेधार्ह दहशतवादी कृत्य आहे. अमुक उद्देशाने वा कारणाने केलेले दहशतवादी कृत्य सहानुभूतीस पात्र होत असेल, तर आपण आपल्या माणुसकीच्या व्याख्या तपासून घ्यायला हव्यात.

Everything before the word "but" is horse shit.
-- Ned Stark

बाकी या सुजीत भोगले च्या पोस्ट चा पुरावा काय? कुठल्या देशात घडलं म्हणे हे? काही लिंक वगैरे आहे की खोटं बोलून धुरळा उडवायची संतुलित पद्धत चालू ठेवलीय?

@ व्यत्यय >>> शोधतो मी. जसा मी सांगितले कि हे काही दिवसापूर्वी वाचनात आलेले आहे ... तेव्हा मला थोडं शोधायला लागेल ... हे whatsapp नव्हते हे नक्की

या दहशतवाद्याच्या विचारांबद्दलचे तीन लेख वाचलेत/ वाचतोय.
https://www.vox.com/2019/3/18/18267682/new-zealand-christchurch-shooter-...

https://foreignpolicy.com/2019/03/16/the-inspiration-for-terrorism-in-ne...

https://medium.com/@emilypothast/what-the-christchurch-killers-manifesto...

त्यातले काही मुद्दे
तो मेनिफेस्टो आणि शूटिंगचा व्हिडियो इंटरनेटवर टाकल्याने इतर अनेक लोक त्याच्याकडून प्रेरणा घेऊ शकतील. (आ यसिस आणि अल कायदा च्या तुलनेत कमी गंभीर?)
पुढचा मुद्दा कॉपी पेस्टच करतोय : The individuals targeted were selected because Tarrant sees Muslims as “invaders” and he wants to make them afraid. (The irony here is rich, given the history of colonialism and genocide in Australia, New Zealand, and other majority-white countries that began as European colonies.) But he also chose to attack Muslims because existing levels of Islamophobia insure that “attacking them receives the greatest level of support.”
त्याचं लक्ष्य फक्त मुस्लिम लोक होते यात समाधान किंवा कम्फर्ट वा टून घेणार्‍यांसाठी Millions of people [are] pouring across our borders … [i]nvited by the state and corporate entities to replace the White people who have failed to reproduce, failed to create the cheap labour, new consumers and tax base that the corporations and states need to thrive,” he argues in his manifesto. “This crisis of mass immigration and sub-replacement fertility is an assault on the European people that, if not combated, will ultimately result in the complete racial and cultural replacement of the European people.”
यातून जे लोक स्वतःला वगळू शकत असतील त्यांनी नक्की खुष व्हावं.
यात त्याच्या प्रेरण आणि आशास्थान असलेल्या राजकारण्यांचा उल्लेख आहे. गन कंट्रोल लॉचा आहे.

, इथे काहीजण स्थलांतरितांना हाकलणं बरोबर या मताचे आहेत, त्यांना मी आधीच्या एका प्रतिसादात जे समजून घ्यायला सां गितलं त्याचा सारांशच एका लेखात मिळाला
Basically everything that Tarrant thinks other people are doing are conspicuously things that white people of European descent have literally done to other people for several hundred years. It was white Europeans who settled in North America and Australia by the millions, not only outbreeding the Indigenous populations but decimating them with disease, establishing laws that suppressed the free practice of their cultures and religions, even sanctioning genocide. It was white Europeans who colonized Africa and India, stripping the land of natural resources and converting the wealth into the engine of Industrialism. And it was white Americans of European descent who designed entire cities around the automobile, creating an unquenchable market for deadly fossil fuels.

एका लेखाचा शेवट करणारं हे वाक्य Tarrant’s manifesto is a call to action; our response must counter that call with unwavering solidarity with the targets of white supremacist violence everywhere.

या दहशतवाद्याने आपला मेनिफेस्टो आणि व्हिडियो टाकून ज्या प्रकारची चर्चा व्हावी अशी अपेक्षा केली होती, त्याच दिशेला हा धागा वळला . Sad

आपण स्वतः धागा काढला की काय काय होऊ शकते याचे नवनवीन अनुभव येत असावेत

मुळात पद्धतशीरपणे इथल्या नेत्यांचे पुलवामा नंतरचे कथित वर्तन कसे निष्काळजी होते हे अप्रत्यक्षपणे दाखवायची संधी आयतीच मिळाल्याचा आनंद मनात असतानाच हे गंभीर आहे, ते गंभीर आहे आशा प्रकारचे विचार व्यक्त करून समाज सुधारकाचा आव आणणे हे सगळेच दयनीय आहे

असो

Pages

Back to top