गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचं काल निधन झालं. कॅन्सरशी त्यांची झुंज त्यांच्या मरणाने संपली. त्यांना श्रद्धांजली.
गोवा सरकार निर्नायकी झाले. तसेही पर्रिकरांच्या आजाराने गंभीर रूप घेतल्यापासून गोव्याला मुख्यमंत्री नसल्यागत होता. नळ्या अडकवलेल्या अवस्थेत काम करता नाची त्यांची छायाचित्रे वेदनादायी होती. त्याही आधी गोवा विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर पर्रिकर मुख्यमंत्री असतील या अटीवरच भाजपला अन्य पक्षांचा पाठिंबा मिळवून सत्त्ता स्थापन करता आली होती. त्यासाठी देशाच्या संर क्षणमंत्रीपदासारखे महत्त्वाचे पद सोडून पर्रिकर परतले होते. गोव्यासारख्या लहानशा राज्यात एक पर्यायी नेतृत्व असू नये?
तिथे दिल्लीत पाहिलं तर मोदीसरकारमध्ये पाच वर्षांत जेमतेम अर्था काळ एक पूर्णवेळ संरक्षणमंत्री असावा.
आधी अरुण जेटली अर्थखात्यासारख्या महत्त्वाच्या खात्यासोबत संर क्षण खात्याचा कारभार बघत होते.
ते आजारी पडल्यावर पीयुष गोयल रेल्वे, कोळसा आणि अर्थ अशी तीन मोठी मंत्रालये पाहत होते.
आधीचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे भाजपने आयात केले होते.
गृहमंत्री राजनाथ सिंग आहेत की नाहीत हेही कळत नाही. त्यांचे अनेक अधिकार सुरक्षा सल्लागार अजित दोभाल गाजवतात का, असे मानायला जागा आहे
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या प्रशासकीय जबाबदार्या पाहतात असे भासते.
मानव संसाधन सारख्या महत्त्वाच्या खात्यावर नेमलेल्या स्मृति इराणींची कारकीर्द वादग्रस्त घडामोडींसाठी आणि संसदेतल्या त्यां च्या मेलोड्रामाटिक भाषणासाठीच लक्षात राहील.
शेतीसारख्या इतर अनेक खात्यांच्या मंत्र्यांची तर नावेही आठवत नाहीत.
सरकारच्या पाच वर्षांच्या कामकाजावर नजर टाकली तर बहुतेक सर्व अधिकार पी एम ओ कडेच केंद्रित होत असल्याचे दिसते.
या सरकारात पी एम ओ मध्ये असलेल्या अधिकार्यांची संख्या आधीच्या अनेक सरकारांच्या तुलनेत बरीच जास्त आहे, असे वाचले होते.
परदेशांशी आर्थिक गुंतवणूविषयक वाटाघाटी अणि अंम्लबजावणीसाठी पी एम ओ मध्ये कक्ष उघडले गेले आहेत.
राफेल करार पंतप्रधानांनी केला. त्यांच्या सोबत दोभाल होते असे दिसते. या सरकारात ते मोदींखालोखाल पॉवरफुल आहेत. संरक्षणमंत्री असलेले पर्रिकर राफेल कराराबाबत अनभिज्ञ होते हे त्यांच्या" मला माहिती करून घ्यावी लागेल, अॅपरंटली, इट अॅपिअर्स दॅट" अशा लेखी आणि तोंडी शब्दांवरून दिसून येते. त्यांच्यानंतरच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन देशापेक्षा सरकारच्या आणि मोदींच्या संरक्षणात अधिक ऊर्जा आणि वेळ खर्च करतात असे वाटते.
आता निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये इतर पक्षांतील नेत्यांच्या आयातीच्या बातम्या सतत येत आहेत. हेच चित्र २०१४ च्या सार्वत्रिक
निवडणुकांआधी आणि अनेक राज्य विधानसभा निवडणुकांच्या वेळीही दिसून आले. ईशान्येकडच्या राज्यांत तर सगळा विधिमंडळ पक्षच आयात लोकांनी भरलेला असल्याचे दाखले आहेत.
दुसरीकडे जिथे आम्ही सर्वाधिक सुधारणा केल्या असे मोदीसरकार म्हणते त्या क्षेत्रातले अर्थतज्ज्ञ टिकत नाहीत. रघुराम राजन, अरविंद पानगडिया, अरविंद सुब्र मण्यन, उर्जित पटेल, सुरजीत भल्ला हे लोक सरकारची साथ सोडून गेले. रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदी प्रशासकीय अधिकारी बसला. नोटाबंदीचे समर्थन केलेल्या मोजक्या अर्थसास्त्र्यांतला एक कुणी मुख्य आर्थिक सल्लागार झाला. नोटाबंदीच्या बाबतीत सरकारने रिझर्व बँकेचे आक्षेप धुडकावून तो निर्णय लादला असे इतिवृत्तावरून दिसते.
म्हणजे तज्ज्ञ मंडळी सरकारसोबत काम करू शकत नाहीत. जे आहेत ते लोक स्वतःची मते प्रामाणिकपणे मांडण्याची हिंमत दाखवू शकतील का याबाबात शंका आहे. गुरुमूर्तींसारखे लोक रिझर्व बँकेच्या बोर्डावर आहेत.
भाजप हा तसा जुना पक्ष आहे. ७५ वर्षांचा इतिहास असलेली त्यांची मातृसंघटना आहे, जिच्या खुणा देशाच्या कारभाराशी संबंधित प्रत्येक संस्थेत सापडतील. तरीही अशी परिस्थिती का यावी?
सगळ्या आधिकार शक्ती एका पीएमओकडे एकवटल्या आहेत. यात गुंणवान लोकांच्या अभावाइतकाच अविश्वासाचाही मुद्दा आहे. तज्ज्ञ लोकांच्या म्हणण्याला किंमत नाही. भारतासारख्या खंडप्राय, अने कपदरी विविधता असलेल्या , महाकाय समस्या भेडसावणार्या देशाच्या
कारभाराचे हे चित्र सुखद आणि आशादायक खचित नाही. एका राज्याचे प्रशासन चालवायला हे मॉडेल कदाचित चालून जाईल (त्याबद्दलही शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहेच) पण देशाच्या कारभाराचे काय? एकटा माणूस ही सगळी कामे करू शकतो, असे खरेच वाटते का?
अजून अंतिम संस्कार पण नसतील
अजून अंतिम संस्कार पण नसतील झाले पर्रिकरांचे.
You are amazing.
त्याचा इथे काय संबंध? हा
त्याचा इथे काय संबंध? हा प्रकार गेले कित्येक महिने चालू आहे. इतक्या आजारी माणसाला अशा अवस्थेत काम करावं लागणं हेच क्लेशदायक आहे.
स्वर्गीय मनोहर पर्रिकरांच्या
स्वर्गीय मनोहर पर्रिकरांच्या निधनाच्या निमित्ताने, इथेही भाजपा सरकारवर बिनबुडाची टिका करण्याची संधी सोडली नाही.
--
किती ती वैचारिक दिवाळखोरी, निदान त्यांचे अत्यसंस्कार व्हायची तरी वाट पाहायची.
--
स्वर्गीय मनोहर पर्रिकरांना विनम्र श्रद्धांजली !
<< इतक्या आजारी माणसाला अशा
<< इतक्या आजारी माणसाला अशा अवस्थेत काम करावं लागणं हेच क्लेशदायक आहे. >>
------- सहमत...
काही आठवडे आधी अगदी असेच मत मी व्यक्त केले होते.
नाका-तोंडात नळी असतांना त्यांच्याकदुन भाषणाचे चार वाक्य वदवताना, सोबत मंचावर भाजपाचे अध्यक्ष... नंतर हातात फाईल घेतलेले आणि चालतांनाही त्रास होत असतानाचे फोटो. कशासाठी ?
त्यांच्यावर जो आजार बेतला होता अशा परिस्थितीत त्यांच्या वेदना कमी होतील असे का नाही बघितले गेले? त्यांची फरफट कशासाठी केली गेली? इथे त्यांना मदतीची अत्यंत अवशक्ता असतानाही असे कोणते कारण होते ज्यामुळे त्यांना अत्यावश्यक असलेला आराम त्यांच्या पक्षाने त्यांना दिला नाही?
सर्वच दु:खदायक आहे.
भरत तुम्ही मंत्री पदासाठी
भरत तुम्ही मंत्री पदासाठी गुणवत्ता असणाऱ्या माणसांची कमी म्हणताय??
यांना देशभरात लोकसभेच्या ५५२ जागा लढवण्यासाठी उमेदवार मिळत नाहीत ,
जस्ट कल्पना करा, ७५ वर्षे जुन्या , पाठीशी RSS सारखी प्रचंड मोठी आणि बांधीव संघटना असणाऱ्या पक्षाला निवडणूक लढण्यासाठी बाहेरून उमेदवार आयात करायला लागतात.
मुळात आडातच नाही ते पोहर्यात कुठून येणार?
शेवटी धाग्याचे नाव बदलायची
शेवटी धाग्याचे नाव बदलायची नामुष्की ओढवलीच तर.
नाका-तोंडात नळी असतांना
नाका-तोंडात नळी असतांना त्यांच्याकदुन भाषणाचे चार वाक्य वदवताना, सोबत मंचावर भाजपाचे अध्यक्ष... नंतर हातात फाईल घेतलेले आणि चालतांनाही त्रास होत असतानाचे फोटो. कशासाठी ?
त्यांच्यावर जो आजार बेतला होता अशा परिस्थितीत त्यांच्या वेदना कमी होतील असे का नाही बघितले गेले? त्यांची फरफट कशासाठी केली गेली? इथे त्यांना मदतीची अत्यंत अवशक्ता असतानाही असे कोणते कारण होते ज्यामुळे त्यांना अत्यावश्यक असलेला आराम त्यांच्या पक्षाने त्यांना दिला नाही? >>>
उदय हे सर्व निष्कर्ष तुम्ही कशावरून काढले? दुसर्या एका आयडीने मोदींनी त्यांच्या वयोवृद्ध आईला एटीएमच्या रांगेत उभं केलं असा आरोप केला होता.
सर्व जग मोदींच गुलाम आहे नि त्यांच्या प्रत्येक गोष्टी इतर लोक ऐकतातच हे चित्र उभं करण्याचा प्रयत्न का करत आहात? पर्रीकर्रांना स्वतःची पर्सनॅलिटी / स्वतःचे मत नव्हते का? जो माणूस कर्म हेच ध्येय मानतो त्याने वाईट स्वास्थ्य असतानाही काम करण्याची इच्छा ठेवली तर ती जबरदस्ती होते काय? विशेषतः पर्रीकरांना "ते आता काही दिवसच जगणार आहेत" हे माहिती असताना कुणाची भीती का वाटावी कि ज्यामुळे जबरदस्तीने त्यांच्याकडून काम करून घेता येईल ते सांगाल का ??
@ShashankP
@ShashankP
हे खयाली पुलाव पकवणारे उपटसुंभ, शेंडाबुडखा नसणारी काहीही वाक्य ठोकून देतात.
--
स्वर्गीय पर्रीकर अमेरिकेतून उपचार घेऊन भारतात परत आल्यावर इथल्या मिडीयाने "तुम्ही आता सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेऊन, आराम करणार का?" असा प्रश्न विचारल्यावर, स्वर्गीय पर्रीकरांनी त्यांना सांगितले "की मी, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राजकारणात सक्रिय राहून देश सेवा करत राहिन, निवृत्तीचा तर प्रश्नच नाही".
हे इतके उघड सत्य असूनही हे कॉंग्रेसी उपटसुंभ, मोदींनीच जबरदस्तीने स्वर्गीय पर्रीकरांच्या आजारपणाच्या काळात त्यांना कामाला जुंपले होते, अश्या अफवा पसरवत असतात.
एक आत्यंतिक आजारी माणूस
एक आत्यंतिक आजारी माणूस मुख्यमंत्र्याची जबाबदारी व्यवस्थित पार पडू शकत होता, तर ती दुसर्या कोणीही पार पाडता यायला हवी होती. तेवढ्यासाठी संरक्षणमंत्रीपदासारखे महत्त्वाचे , जबाबदारीचे काम सोडून पर्रिकरांना गोव्यात परत का पाठवले?
(टीप - ते संरक्षणमंत्री असेतो, त्यांच्या आजाराबद्दल ऐकले नव्हते).
लेखात मांडलेल्या १. पदे भरण्यास पुरेशी अथवा लायक माणसे नसणे
२ अधिकार आणि निर्णयांचे केंद्रीकरण
३ तज्ज्ञ व्यक्तींचे न टिकणे
या मुद्द्यांवरही जाणकार सदस्यांकडून काही लिहिले जावे.
या सरकारात नितीन गडकरी सध्या किती खाती सांभाळताहेत?
एकच माणूस जर तीन-चार महत्त्वाची खाती सांभाळू शकत असेल (पीयुष गोयल हे दुसरे उदाहरण) , तर इतके मोठे मंत्रीमंडळ कशासाठी हवे? सरकारी खर्चाने पत्रकार परिषदा घेऊन विरोधकांवर टीका करण्यासाठी?
पक्षांतर करणे हा आपल्या
पक्षांतर करणे हा आपल्या राजकारणातील जुना रोग आहे .
जाणकारांकडून लिहिले जावे >>>>
जाणकारांकडून लिहिले जावे >>>> भरत तुम्ही पण जोकच करता,
धाग्याचे नाव बदलणे इकडच्या ट्रोल्स ना नामुष्की वाटते, पण अख्ख्या BJP+RSS केडर बेस मधून एक फुल्ल टाइम संरक्षण मंत्री मिळू नये यात नामुष्की वाटत नाही,
मानव संसाधन खात्यासारख्या महत्वाच्या खात्याला एक किमान शिक्षित मंत्री मिळू शकत नाही ही नामुष्की वाटत नाही.
बाजारात जे टॅलेंट उपलब्ध आहे ,ज्या टॅलेंट ला पैसे मोजून सल्ला देण्यासाठी ठेवले आहे, त्याच्या प्रोफेशनल सल्ल्याकडे दुर्लक्ष करून हे लोक अर्थक्रांती सारख्या शेंडा बुडखा नसलेल्या संस्थेचे बोलणे ऐकून धोरणात्मक निर्णय घेतात ही खरी शोकांतिका आहे.
तुमच्याकडे टॅलेंट नसेल, ठीक आहे (असतात एकेक संघटनेच्या मर्यादा, ) पण म्हणून दिलेले सल्ले दुर्लक्षणे हा निव्वळ मूर्खपणा आहे
सिम्बा, तुमच्या प्रतिसादातलं
सिम्बा, तुमच्या प्रतिसादातलं प्रत्येक वाक्य वाचताना अगदी-अगदी होत होतं.
टाइम संरक्षण मंत्री मिळू नये
टाइम संरक्षण मंत्री मिळू नये यात नामुष्की वाटत नाही,. >>> निर्मला सीतारामन पार्ट टाइम मंत्री आहेत की काय?
प्रोफेशनल सल्ल्याकडे दुर्लक्ष करून हे लोक अर्थक्रांती सारख्या शेंडा बुडखा नसलेल्या संस्थेचे बोलणे ऐकून धोरणात्मक निर्णय घेतात >>> हे मोदींनी /सरकारने कधी म्हटलेलं / जाहीर केलेलं आहे का?
मानव संसाधन खात्यासारख्या महत्वाच्या खात्याला एक किमान शिक्षित मंत्री मिळू शकत नाही ही नामुष्की वाटत नाही. >>
याबाबत मला हेला व विठ्ठल भाऊंचा सपोर्ट नक्कीच मिळेल. त्यांनीच खालील कॉमेंट लोकशाहीविषयक धाग्यावर टाकलीय.
हेला
शिक्षण आणि राजकारण ह्याचा तसा संबंध येत नाही, धोरणं काय असावीत कशी राबवावीत हे कौशल्य महत्त्वाचे. पीएचडी झालेल्या व्यक्तीस ज्ञान असते, निर्णय क्षमता असेलच असे नसते
विठ्ठल
वसंतदादा पाटिल चौथी शिकलेले होते, पण त्यांची प्रशासनावर पकडहोती. नारायण राणे यांच्याबद्दल देखिल असे म्हणता येईल. प्रशासन कसे चालते याची जाण आणि प्रशासनाकडुन काम करुन घेण्याची कुवत या दोनही कमी शिकलेल्या नेत्यांकडे होती/आहे.
नोटाबंदीसाठी प्रैफेशनल
नोटाबंदीसाठी प्रैफेशनल लोकांचा सल्ला धुडकावला हे रेकॉर्डेड आहे.
वसंतदादा पाटील स्वातंत्र्यलढ्यात पडल्याने शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत.
त्यांच्या काळात त्यांच्या कामकाजावर शिक्षणाच्या अभावाचा परिणाम कोणाला जाणवला नाही.
इराणींची अशी काय कर्तबगारी होती? मंत्री झाल्यावर सुद्धा?
मूळ लेखात मांडलेल्या मुद्द्यांना उत्तरे न देता फटे फोडणे सुरू झाले आहे, याची नोंद घेतली आहे.
वसंतदादख चौथी नव्हे तर
वसंतदादा चौथी नव्हे तर व्हर्नाक्युलर फायनल म्हणजे सातवी शिकले होते.
सीतारामन बाई मंत्रीपदावर कधी
सीतारामन बाई मंत्रीपदावर कधी आल्या?
जवळपास 4 वर्षा नंतर
2) मग RBI नको म्हणत असताना हा निर्णय पुढे रेटने कोणाच्या बुद्धीचे काम होते? मोदी? की जेटली?
जर मोदी असतील तर परत आपण त्याच मुद्द्यावर येतोय, अर्थ खात्याला पार्ट टाइम मंत्री असताना मोदींनी त्यात लक्ष घालायचे करण काय? कारण टॅलेंट चा दुष्काळ.
जर जेटली बुद्धी असेल तर त्याहून मोठा प्रॉब्लेम, RBI आणि इतर अर्थ तज्ज्ञ नाही म्हणत असताना कॅप्टन ऑफ द टीम असा आचरट निर्णय पास कसा होऊ देतो? कारण एकच अक्कल कमी असणे
शिक्षण आणि राजकारण यांचा संबंध खरेच येत नाही,
दुर्दैवाने स्मृती बाई नि तिकडे राजकारण न करता धोरण आखणे अपेक्षित होते, ज्या साठी शिक्षण हवे (कारण शिक्षण विषयक धोरण होते, सांस्कृतिक खाते वगैरे नव्हते) शिक्षण नसेल तर दुसऱ्याचे ऐकून घेण्याचा विनय अंगी हवा, इकडे त्याही बाबतीत बोंबच आहे.
माणूस जेव्हढा जास्त अशिक्षित
माणूस जेव्हढा जास्त अशिक्षित तेव्हढा तो हुशार असतो. उच्चशिक्षित लोकं अशिक्षित लोकांनी काढलेल्या कंपनीत काम करतात.
मंत्र्यांनी आपल्या खात्याची
मंत्र्यांनी आपल्या खात्याची धोरणं ठरवणे योजना आखणे आणि त्याची अमलबजावणी करून विझिबल चेंज घडवून आणणे अपेक्षित आहे. त्यात तज्ज्ञ लोकांची ज्ञानविषयक मदत, अधिकारी लोकांची कार्यकारी मदत घेणे अपेक्षित आहे
भाजपच्या खासदारादि लोकांकडे
भाजपच्या खासदारादि लोकांकडे नेतृत्वगुण नसतीलही, किंबहुना नाहीतच. पण एकूण एक लोक फर्डे वक्ते आहेत. टीवी चॅनेल्सवरच्या चर्चांतूनही आपले खरेखोटे बालिश मुद्देही तावातावाने आणि टिपेच्या सुरात रेटून नेताना आपण बघतो. आपली वेळ संपली तरी मोठ्याने बोलत राहाणे, दुसऱ्याचे प्रतिपादन ऐकूच येणार नाही अशी परिस्थिती निर्माण करणे यात ते तरबेज आणि प्रशिक्षित असतात. वक्तृत्व ही खूप मोठी उपलब्धि आहे. त्याच्या जोरावर सभा जिंकता येते, लोकांना झुलवता- भुलवता - वळवता येते .
होय. विरोधकांबद्द् ल तुच्छता
होय. विरोधकांबद्द् ल तुच्छता तर त्यांच्या चेहऱ्यांवर थापलेली असते.
काँग्रेसी लोकांना सतत कार्यरत
काँग्रेसी लोकांना सतत कार्यरत राहणे; हो ! शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे कशाशी खातात तेच माहीत नाही असे दिसते. काम करायचं म्हणजे काय? लोकसेवा म्हणजे काय? देशासाठी, नागरिकांसाठी झिजणे म्हणजे काय? लोकहिताचा ध्यास म्हणजे काय? जबाबदारीची जाणीव असणे म्हणजे काय? जबाबदारी पूर्ण करायची आंतरिक इच्छा म्हणजे काय ? काहीच माहीत नाहीये.
खरंच अश्या पक्षाला एकतरी सीट निवडून मिळते?कोण लोकं ह्यांना निवडून देतात? खरंच कामं करण्याची इच्छा असणारी डोकी इथे कांग्रेस मध्ये कामाला आणि काम करण्याऱ्याला किंमत नाहीये कळल्यावर पक्ष सोडून कामसू भाजपा मध्ये जात असणार!
डोळे पाणावले
डोळे पाणावले
काँग्रेसी लोकांना सतत कार्यरत
काँग्रेसी लोकांना सतत कार्यरत राहणे; हो ! शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे कशाशी खातात तेच माहीत नाही असे दिसते. >>>>>>
इंदिरा गांधी, नेहरू, शास्त्री, अगदी राजीव गांधी
लिस्ट खूप मोठी आहे.
कॉंग्रेस मधे किती कार्यक्षम
कॉंग्रेस मधे किती कार्यक्षम लोक होते/आहेत ?
कॉंग्रेसच्या काळात, सरकारशी कुठलाही संबध नसलेल्या रागा व सोगा यांच्याकडे सर्व सत्ता एकवटली होती व भारत देशाचा पंतप्रधान त्या फॅमिलीचा हुजर्या म्हणून सरकार चालवत होता.
---
आता संपूर्ण सरकार पिएमओतून चालतो, असा आक्षेप घेणारे कॉंग्रेसी त्यावेळी मात्र सरकार सोनिया गांधीच्या घरुन चालत होते यावर आक्षेप घेणार नाहीत.
---
तसेही एका विदेशी बाईचा हुजर्या म्हणून सरकार चालवण्यापेक्षा आता श्री मोदी " भारताचे पंतप्रधान" म्हणून एकहाती सरकार चालवत असतील तर ते मनमोहन सिंग यांच्या पेक्षा बरच आहे.
अरे बापरे... सोनिया एक हाती
अरे बापरे... सोनिया एक हाती कारभार चालवत होत्या??
म्हणजे 2004 ते 14 मध्ये भारताने जी काही प्रगती केली? (आता परत काय केली विचारू नका, GDP, शेतकी वाढ, IIP सगळे नंबर्स गेल्या 5 वर्षापेक्षा चांगले आहेत ) ती त्यांनी एक हाती केली?
आणि आताचे बेरोजगारी, मार खाल्लेली अर्थव्यवस्था ही सगळी मोदी ची देन आहे?
म्हणजे भाजप मध्ये गुणवत्तेचा खरंच दुष्काळ आहे म्हणायचा
अनिरुद्ध, तुम्ही इथल्यापेक्षा
अनिरुद्ध, तुम्ही इथल्यापेक्षा, म्हणजे मायबोलीपेक्षा , मोदींच्या मंत्रीम़ंडळात जास्त शोभून दिसाल.
म्हणजे 2004 ते 14 मध्ये
म्हणजे 2004 ते 14 मध्ये भारताने जी काही प्रगती केली? (आता परत काय केली विचारू नका, GDP, शेतकी वाढ, IIP सगळे नंबर्स गेल्या 5 वर्षापेक्षा चांगले आहेत ) ती त्यांनी एक हाती केली?

<<
लाखो-करोडोचे भ्रष्टाचार, ही प्रगती ?


--
तुम्ही राबट वाड्राच्या प्रगती बद्दल बोलताय बहुतेक.
--
सोगा, रागा सध्या कोर्टाकडून जामीन घेऊन बाहेर फिरतायत ही देखिल प्रगतीच आहे.
--
व्यक्तीमहात्म्य हा
व्यक्तीमहात्म्य हा भाजपसारख्या किंवा भारतातील अनेक पक्षांचा स्थायीभाव आहे. एकच व्यक्ती सुपरह्युमन असल्यासारखे कार्यकर्ते आणि लोकही वागत असतात. लोकशाहीत हे अपेक्षित नाही. जे कम्युनिस्ट पक्ष याला फाटा देत होते व पॉलिट ब्युरो वगैरे तिथे होते त्यांना संपवण्यात काँग्रेस आघाडीवर होती हे ही खरे आहे.
शिवाय भारत देशाचा पंतप्रधान
शिवाय भारत देशाचा पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंगांची काय लायकी होती,
ते भर पत्रकार परिषदेत सरकारने काढलेला अध्यादेश फाडून पप्पूने दाखवून दिले होते.
रीतसर लग्न केलेल्या व
रीतसर लग्न केलेल्या व नागरिकत्व घेतलेल्या स्त्रीला हे परदेशी म्हणतात, किती महान संस्कृती
Pages