भाजपामध्ये असलेली गुणवंतांची/ नेत्यांची उणीव

Submitted by भरत. on 18 March, 2019 - 01:23

गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचं काल निधन झालं. कॅन्सरशी त्यांची झुंज त्यांच्या मरणाने संपली. त्यांना श्रद्धांजली.

गोवा सरकार निर्नायकी झाले. तसेही पर्रिकरांच्या आजाराने गंभीर रूप घेतल्यापासून गोव्याला मुख्यमंत्री नसल्यागत होता. नळ्या अडकवलेल्या अवस्थेत काम करता नाची त्यांची छायाचित्रे वेदनादायी होती. त्याही आधी गोवा विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर पर्रिकर मुख्यमंत्री असतील या अटीवरच भाजपला अन्य पक्षांचा पाठिंबा मिळवून सत्त्ता स्थापन करता आली होती. त्यासाठी देशाच्या संर क्षणमंत्रीपदासारखे महत्त्वाचे पद सोडून पर्रिकर परतले होते. गोव्यासारख्या लहानशा राज्यात एक पर्यायी नेतृत्व असू नये?

तिथे दिल्लीत पाहिलं तर मोदीसरकारमध्ये पाच वर्षांत जेमतेम अर्था काळ एक पूर्णवेळ संरक्षणमंत्री असावा.
आधी अरुण जेटली अर्थखात्यासारख्या महत्त्वाच्या खात्यासोबत संर क्षण खात्याचा कारभार बघत होते.
ते आजारी पडल्यावर पीयुष गोयल रेल्वे, कोळसा आणि अर्थ अशी तीन मोठी मंत्रालये पाहत होते.
आधीचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे भाजपने आयात केले होते.

गृहमंत्री राजनाथ सिंग आहेत की नाहीत हेही कळत नाही. त्यांचे अनेक अधिकार सुरक्षा सल्लागार अजित दोभाल गाजवतात का, असे मानायला जागा आहे
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या प्रशासकीय जबाबदार्‍या पाहतात असे भासते.
मानव संसाधन सारख्या महत्त्वाच्या खात्यावर नेमलेल्या स्मृति इराणींची कारकीर्द वादग्रस्त घडामोडींसाठी आणि संसदेतल्या त्यां च्या मेलोड्रामाटिक भाषणासाठीच लक्षात राहील.
शेतीसारख्या इतर अनेक खात्यांच्या मंत्र्यांची तर नावेही आठवत नाहीत.

सरकारच्या पाच वर्षांच्या कामकाजावर नजर टाकली तर बहुतेक सर्व अधिकार पी एम ओ कडेच केंद्रित होत असल्याचे दिसते.
या सरकारात पी एम ओ मध्ये असलेल्या अधिकार्‍यांची संख्या आधीच्या अनेक सरकारांच्या तुलनेत बरीच जास्त आहे, असे वाचले होते.
परदेशांशी आर्थिक गुंतवणूविषयक वाटाघाटी अणि अंम्लबजावणीसाठी पी एम ओ मध्ये कक्ष उघडले गेले आहेत.

राफेल करार पंतप्रधानांनी केला. त्यांच्या सोबत दोभाल होते असे दिसते. या सरकारात ते मोदींखालोखाल पॉवरफुल आहेत. संरक्षणमंत्री असलेले पर्रिकर राफेल कराराबाबत अनभिज्ञ होते हे त्यांच्या" मला माहिती करून घ्यावी लागेल, अ‍ॅपरंटली, इट अ‍ॅपिअर्स दॅट" अशा लेखी आणि तोंडी शब्दांवरून दिसून येते. त्यांच्यानंतरच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन देशापेक्षा सरकारच्या आणि मोदींच्या संरक्षणात अधिक ऊर्जा आणि वेळ खर्च करतात असे वाटते.

आता निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये इतर पक्षांतील नेत्यांच्या आयातीच्या बातम्या सतत येत आहेत. हेच चित्र २०१४ च्या सार्वत्रिक
निवडणुकांआधी आणि अनेक राज्य विधानसभा निवडणुकांच्या वेळीही दिसून आले. ईशान्येकडच्या राज्यांत तर सगळा विधिमंडळ पक्षच आयात लोकांनी भरलेला असल्याचे दाखले आहेत.

दुसरीकडे जिथे आम्ही सर्वाधिक सुधारणा केल्या असे मोदीसरकार म्हणते त्या क्षेत्रातले अर्थतज्ज्ञ टिकत नाहीत. रघुराम राजन, अरविंद पानगडिया, अरविंद सुब्र मण्यन, उर्जित पटेल, सुरजीत भल्ला हे लोक सरकारची साथ सोडून गेले. रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदी प्रशासकीय अधिकारी बसला. नोटाबंदीचे समर्थन केलेल्या मोजक्या अर्थसास्त्र्यांतला एक कुणी मुख्य आर्थिक सल्लागार झाला. नोटाबंदीच्या बाबतीत सरकारने रिझर्व बँकेचे आक्षेप धुडकावून तो निर्णय लादला असे इतिवृत्तावरून दिसते.
म्हणजे तज्ज्ञ मंडळी सरकारसोबत काम करू शकत नाहीत. जे आहेत ते लोक स्वतःची मते प्रामाणिकपणे मांडण्याची हिंमत दाखवू शकतील का याबाबात शंका आहे. गुरुमूर्तींसारखे लोक रिझर्व बँकेच्या बोर्डावर आहेत.

भाजप हा तसा जुना पक्ष आहे. ७५ वर्षांचा इतिहास असलेली त्यांची मातृसंघटना आहे, जिच्या खुणा देशाच्या कारभाराशी संबंधित प्रत्येक संस्थेत सापडतील. तरीही अशी परिस्थिती का यावी?

सगळ्या आधिकार शक्ती एका पीएमओकडे एकवटल्या आहेत. यात गुंणवान लोकांच्या अभावाइतकाच अविश्वासाचाही मुद्दा आहे. तज्ज्ञ लोकांच्या म्हणण्याला किंमत नाही. भारतासारख्या खंडप्राय, अने कपदरी विविधता असलेल्या , महाकाय समस्या भेडसावणार्‍या देशाच्या
कारभाराचे हे चित्र सुखद आणि आशादायक खचित नाही. एका राज्याचे प्रशासन चालवायला हे मॉडेल कदाचित चालून जाईल (त्याबद्दलही शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहेच) पण देशाच्या कारभाराचे काय? एकटा माणूस ही सगळी कामे करू शकतो, असे खरेच वाटते का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

त्या प्रश्नात माझी पण एक भर
4) स्वतः ची लायकी नसताना, त्या विषयातील अधिकारी व्यक्तीने दिलेला सल्ला ग्राह्य न मानन्यासाठी कोणता माज कारणीभूत आहे?

शशांक .
बरोबर आहे .पोस्ट कोणतीही असू द्या मोदी विषयी द्वेष आणि BJP Kashi वाईट ह्याच वर्तुळा मध्ये ह्या कंपूच्या पोस्ट फिरत असतात
त्या सर्कल बाहेर येतच नाहीत

३. तज्ज्ञ लोक का सोडून जात आहेत?
हे भारताच्या इतिहासात फक्त BJP chya राज्यातच घडलंय असा तुमचा दावा आहे का

डाळ खराब का होते असा धागा जरी काढला तरी हा कंपू डाळ खराब होण्यात BJP आणि मोदींचा कसा हात आहे अशा पोस्ट टाकतील

डाळ खराब का होते असा धागा जरी काढला तरी हा कंपू डाळ खराब होण्यात BJP आणि मोदींचा कसा हात आहे अशा पोस्ट टाकतील
नवीन Submitted by Rajesh188 on 19 March, 2019 - 14:33
<<

अगदी !
Lol

च्च! असं कसं? डाळ खराब होण्यास नेहरू कारणीभूत असतील... प्रोटोकॉल को भुलो मत.

राजेश, शशांक,

तुम्ही इथे नवीन आहात का?

वरचा डाळीचा प्रतिसाद इथे साडे चार वर्षांपूर्वी लागू होणारा आहे

पर्रीकर यांच्याबद्दल आदर नव्हता म्हणणे आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार व्हायच्या आत धागे काढणे हा फक्त विखाराचा आरंभ आहे

रोज उठून जगायलाच काहीतरी भयंकर प्रॉब्लेम येतो अशा मोडमध्ये असणे हेही फार जुने आहे

विरोधकांमधील गुणवान नेत्यांना एकदाची सत्ता मिळावी असे मला अलीकडे खरच आणि फार तीव्रतेने वाटते

असे नेते आहेतही त्यांच्यात, पण नेमके सगळे मायबोलीवर बिझी असतात

हो ना

बेफिकीर, मी प्रो बिजेपी आहे. तरीही मला काही अंशी भरत यांचे म्हणणे पटले. एक शिक्षण संस्था व इतर काही महत्वाची पदे या करता केंद्रात मा. स्मृती इराणी व महाराष्ट्रात विनोद तावडे यांची निवड चुकलीय. काही बाबतीत आपले पंप्र नरेंद्र मोदी हे पण चुकलेत. खरे तर मा. सुरेश प्रभु यांनी सुद्धा रेल्वेसाठी बर्‍याच सुधारणा सांगीतल्या होत्या. ते सुद्धा बुलेट ट्रेनच्या विरुद्ध होते, मी पण आहे ( मला कोण विचारतयं ?)

मोदींचे काही निर्णय मला खरच पटले नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. परत केंद्रात भाजपा सरकार आले तर काही निर्णयांवर फेरविचार व्हावा. बाकी त्रिशंकू आले तर विचारायलाच नको.

उपस्थित केलेल्या एकही प्रश्नाचे उत्तर न देता प्रतिसाद देण्याचे बेफि, राजेश, शशांक यांचे कसब वाखाणण्याजोगे आहे.

जाता जाता, मला वै. रित्या मोदींचा नोटाबंदीचा निर्णय आवडला. अंमलबजावणी नीट झाली असती तर लोकांनी पण शंख ठोकले नसते. मोदींचा हेतू प्रामाणीक होताच, पण जरा घाई झाली इतकेच. तसेच सुरेश प्रभुंना रेल्वेखाते देण्या ऐवजी अर्थ खाते द्यायला पाहीजे होते, कारण त्यांचे शिक्षणच ते आहे. केंद्रात काँग्रेस असो वा बिजेपी, योग्य शिक्षण असलेल्या माणसाकडे योग्य ते खाते असेल तर देशाची प्रगतीच होईल.

पर्रीकर यांच्याबद्दल आदर नव्हता म्हणणे आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार व्हायच्या आत धागे काढणे हा फक्त विखाराचा आरंभ आहे >> पर्रीकरांनी केजरीवालांबद्दल ते उद्गार काढल्यानं त्यांच्याबद्दल आदर नसेल तर त्यात चुकीचं काय आहे?

अंत्यसंस्कार व्हायच्या आत तिकडं गोव्यात भाजपा संसदीय पक्षाची मिटींग चालू होती पुढच्या राजकारणाबद्दल, तो विखाराचा भाग होत नाही का? ती तर तुमचीच आणि त्यांचीच माणसं होती की. पर्रीकर एवढे आजारी असताना, फक्त आणि फक्त सत्ता जाऊ नये म्हणून त्यांना मुख्यमंत्री पदावर रहायला भाग पाडलं ते काय होतं? किती ती सत्तालोलूपता. त्यांना विश्रांती दिली असती तर कदाचित ते अजून काही दिवस/महिने चांगलं जगू शकले असते. आता यावर उत्तर येइल की त्यांनीच सांगितलं होतं की मी शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करत राहिन म्हणून. त्यांना सेवा करत राहता यावं यासाठी त्यांना मुख्यमंत्री म्हणून काम करायला सांगणंच गरजेचं होतं का? खुर्चीवर बसूनच सेवा करता येते का?

तुमचंच लॉजिक लावून दिवस रात्र कुठल्याही गोष्टीचा नेहरूंना दोष देताना विखार नसतो का तुमच्यात?

<डाळ खराब का होते असा धागा जरी काढला तरी हा कंपू डाळ खराब होण्यात BJP आणि मोदींचा कसा हात आहे अशा पोस्ट टाकतील> असं केलं तर त्याची व्यवस्थित कारणमींमासाही देऊ. नुसतंच विशेषणं वापरून काहीतरी चुरचुरीत लिहिल्याचा आव आणणार नाही.

उपस्थित केलेल्या एकही प्रश्नाचे उत्तर न देता प्रतिसाद देण्याचे बेफि, राजेश, शशांक यांचे कसब वाखाणण्याजोगे आहे. >>
धन्यवाद , तुमच्याकडुन शेवटी काहीतरी शिकलो म्हणायच !

मोदींनी काँग्रेस सरकारच्या च्या योजना कॉपी केल्या किंवा नाव बदलून आणल्या. आम्ही इथे उत्तरे कॉपी करून आणतो.

मोदींनी काँग्रेस सरकारच्या च्या योजना कॉपी केल्या किंवा नाव बदलून आणल्या. आम्ही इथे उत्तरे कॉपी करून आणतो. >>
उदाहरणार्थ ? जी काही लिस्ट द्याल त्यात गांधी परिवाराच्या नावाच्या योजना किती ते पाहणे मनोरंजक ठरेल.

>>विरोधकांमधील गुणवान नेत्यांना एकदाची सत्ता मिळावी असे मला अलीकडे खरच आणि फार तीव्रतेने वाटते
असे नेते आहेतही त्यांच्यात, पण नेमके सगळे मायबोलीवर बिझी असतात
Rofl

वा वा! फारच अभ्यासू मुद्देसूद प्रतिसाद येताहेत.
या प्रश्नांना कॉपी पेस्ट करता येतील, अशी रेडिमेड उत्तर नसणार. असे आणखी पेपर येणार आहेत.

खरतर "नावडतीचे मीठ अळणी" एव्हढ्या एका वाक्यात या धाग्याचे सार आहे!

तरीही "असे मानायला जागा आहे", "असे भासते", "असे वाटते", "असे इतिवृत्तावरुन दिसते" असल्या भासमान विचारानी भरलेल्या लेखाला मुद्देसूद उत्तर अपेक्षित आहे म्हणे Uhoh

अहो ते तुमचे परसेप्शन आहे आणि ते कुणी बदलू शकेल असे वाटत नाही

लोकांनी निवडून दिलेले सरकार आहे. ते त्याच्या पद्धतीने काम करतय. लोकांना वाटले की यांना पाडावे तर ते पाडतील किंवा परत निवडून देतील
उगाच एक माणूस काम करतोय का दहा माणसे काम करतायत वगैरे कशाला दळणे दळायची

लोकांनी निवडून दिलेले सरकार आहे. ते त्याच्या पद्धतीने काम करतय. लोकांना वाटले की यांना पाडावे तर ते पाडतील किंवा परत निवडून देतील>>>>>
देऊ देत ना.... मग तुमच्या पोटात का दुखतंय?
की मोदी सरकार कडे गुणवत्ता नाही म्हटल्यावर मिरच्या झोंबतायत?

3 पाने झाली एकाने अजून खणखणीत गुणवत्तेचे उदाहरण दिले नाही, येऊन जाऊन सगळी भिस्त किती km रस्ते बांधले या आकड्यावर,

GsT चे भिकार इम्प्लिमेंटेअशन का? फसलेल्या Demon ची जबाबदारी कोण घेणार? (त्या दुसऱ्या धाग्यावर कोणीतरी आर्थिक दंडाची शिक्षा सुचवली होती, आता भाजप/मोदी 3लाख कोटी ची नुकसानभरपाई देणार का देशाला?)
परदेशाशी भारताचे संबंध इतके का बिघडले याचे उत्तर कुणी देणार नाही

जिथे पर्सेप्शनचा मुद्दा आहे, तिथे तसं लिहिलंय. जिथे फॅक्ट्स आहेत, तिथे तसं लिहिलंय. पर्सेप्शनला फॅक्ट म्हणुन मांडायची पद्धत माझी नाही.

<लोकांनी निवडून दिलेले सरकार आहे. ते त्याच्या पद्धतीने काम करतय. लोकांना वाटले की यांना पाडावे तर ते पाडतील किंवा परत निवडून देतील>
मी पण लोकांमधला एक आहे. त्याबद्दलचं माझं मत मांडलं तर पोटात का दुखावं?

It appears that, apparantly हे शब्द पर्रिकरांनी राफेल करारासंबंधी बोलताना आणि लिहिताना वापरलेत.

लेखात लिहिलंय. पुन्हा आठवण करून द्यायला.

कुणाच्याही पोटात दुखत नाही पण त्याच त्याच टिमक्या किती दिवस वाजवताय?
उत्तर उत्तर नाही म्हणून आकांडतांडव करण्यापेक्षा लोक त्यांच्या पद्धतीने उत्तर देतील त्याची वाट बघा.... तेंव्हा उगाच EVM EVM म्हणून गळे काढू नका

अहो,
गुणवत्तेची मोजून 5 उदाहरणे द्या वेगवेगळ्या खात्यांची
1) HRD
2)गंगा सफाई
3) परराष्ट्र
4) संरक्षण ( राफेल करार ची टिमकी कृपया वाजवू नये तो करार PMO मधून झाला)
5) अर्थखाते

अकांडतांडव?
टिमक्या?
तुमचा शब्दकोश वेगळाच दिसतोय.
टिमक्या वाजवणे - आत्मस्तुती करणे

इथे मोदी सरकारच्या का र्यपद्धतीबद्दल काही निरीक्षणं नोंदवलीत, त्यावर काही लिहिण्यापेक्षा माझ्याच नावाने दुगाण्या झाडणं चालू आहे.

गेल्या सत्तर वर्षांत देशाला पहिल्यांदाच काम करणार सरकार मिळालं अ सं ऐकत आलोय. पण त्या सरकारच्या कामकाजाबद्दल बोलायला मात्र बंदी. मोदी समर्थकांनी तर २०१४ पासूनच कालवा करायला सुरुवात के लेली, जेव्हा आ म्ही जागता पहारा धागा काढलेला. आता खुद्द मोदीच तसं म्हणताहेत.

VIEW ALL
देखें पूरी लिस्ट: मंत्रिमंडल में शामिल मंत्रियों के नाम और उनके विभाग
पियूष गोयल को रेल मंत्रालय का जिम्मा सौंपा गया है. वहीं सुरेश प्रभू को वाणिज्य मंत्रालय दिया गया है
Posted on: September 3, 2017, 4:22 PM IST | Updated on: September 4, 2017, 12:09 PM IST
FP Staff
Firstpost Hindi Firstpost Hindi Firstpost Hindi Firstpost Hindi Firstpost Hindi
देखें पूरी लिस्ट: मंत्रिमंडल में शामिल मंत्रियों के नाम और उनके विभाग
प्रतीक्षित कैबिनेट विस्तार से रविवार को पर्दा उठ गया. निर्मला सीतारमण को रक्षा मंत्री बनाया गया. पियूष गोयल को रेल मंत्रालय का जिम्मा सौंपा गया है. वहीं सुरेश प्रभू को वाणिज्य मंत्रालय दिया गया है.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने रविवार को अपनी कैबिनेट का विस्तार किया. तीन साल के कार्यकाल में मोदी कैबिनेट का यह तीसरा विस्तार है. इसमें 9 नए चेहरों को शामिल किया गया. वहीं 4 मौजूदा मंत्रियों धर्मेंद्र प्रधान, पीयूष गोयल, निर्मला सीतारमण और मुख्तार अब्बास नकवी को तरक्की देकर कैबिनेट मंत्री बनाया गया है.

नीचे देखें नए-पुराने मंत्रियों को मिलाकर किस दिग्गज के पास है कौन सा मंत्रालय...

मोदी मंत्रिमंडल में शामिल मंत्रियों के विभाग-

कैबिनेट मंत्री

1. राजनाथ सिंह – गृह

2. सुषमा स्वराज – विदेश

3. अरुण जेटली – वित्त और कॉरपोरेट मामले

4. नितिन गडकरी – पोत एवं परिवहन, सड़क, जल संसाधन, नदी विकास और गंगा संरक्षण

5. सुरेश प्रभु – वाणिज्य, उद्योग

6. वीडी सदानंद गौड़ा – सांख्यिकी एवं कार्यक्रम क्रियान्यवयन

7. उमा भारती – पेयजल एवं स्वच्छता

8. रामविलास पासवान – उपभोक्ता मामले, खाद्य एवं जनवितरण

9. मेनका संजय गांधी – महिला एवं बाल विकास

10. अनंत कुमार – रासायन एवं उर्वरक, संसदीय मामले

11. रविशंकर प्रसाद – कानून एवं न्याय, इलेक्ट्रॉनिक्स एवं आईटी

12. जगत प्रकाश नड्डा – स्वास्थ्य एवं परिवार कल्याण

13. अशोक गजपति राजू – नागरिक उड्डयन

14. अनंत गीते – भारी उद्योग एवं पब्लिक इंटरप्राइजेज

15. हरसिमरत कौर बादल – खाद्य प्रसंस्करण

16. नरेंद्र सिंह तोमर – ग्रामीण विकास, पंचायती राज और खान

17. चौधरी बिरेंद्र सिंह – इस्पात

18. जुएल उरांव – आदिवासी मामले

19. राधामोहन सिंह – कृषि

20. थावर चंद गहलोत – सामाजिक न्याय

21. स्मृति जुबिन इरानी – कपड़ा, सूचना एवं प्रसारण

22. हर्ष वर्धन – विज्ञान एवं तकनीकी, पृथ्वी - विज्ञान, वन पर्यावण

23. प्रकाश जावड़ेकर – मानव संसाधन

24. धर्मेंद्र प्रधान – पेट्रोलियम एंव प्राकृतिक गैस, स्किल डेवलपमेंट

25. पियूष गोयल – रेल, कोयला

26. निर्माल सीतारमण – रक्षा

27. मुख्तार अब्बास नकवी – अल्पसंख्यक मामले
ह्या मधले कोणते मंत्री गुणवंत नाहीत

त्री
राज्यमंत्री - स्वतंत्र प्रभार
राज्यमंत्री
कैबिनेट मंत्री
क्र.संख्या पोर्टफोलियो मंत्री का नाम
1. प्रधानमंत्री के साथ ही उन मंत्रालयों और विभागों का प्रभार
जो किसी मंत्री को नहीं सौंपे गए हैं।
इनमें कार्मिक, जन शिकायत और पेंशन, योजना मंत्रालय, परमाणु ऊर्जा
तथा अंतरिक्ष विभाग शामिल हैं। डॉ. मनमोहन सिंह
2. रेल मंत्रालय श्री पवन कुमार बंसल
3. वित्त मंत्रालय श्री पी. चिदंबरम
4. कृषि एवं खाद्य प्रसंस्करण मंत्रालय श्री शरद पवार
5. रक्षा मंत्रालय श्री ए. के. एंटनी
6. गृह मंत्रालय श्री सुशील कुमार शिंदे
7. विदेश मंत्रालय श्री सलमान खुर्शीद
8. विज्ञान और प्रौद्योगिकी मंत्रालय और पृथ्वी विज्ञान मंत्रालय श्री जयपाल सुडिनी रेड्डी
9. स्वास्थ्य और परिवार कल्याण मंत्रालय श्री गुलाम नबी आजाद
10. नवीन एवं अक्षय ऊर्जा मंत्रालय श्री फारूक अब्दुल्ला
11. पेट्रोलियम और प्राकृतिक गैस मंत्रालय श्री एम. वीरप्पा मोइली
12. प्रवासी भारतीय मामले का मंत्रालय श्री वायलार रवि
13. नागरिक उड्डयन मंत्रालय श्री अजित सिंह
14. श्रम और रोजगार मंत्रालय श्री मल्लिकार्जुन खड़गे
15. मानव संसाधन विकास मंत्रालय डॉ. एम. मंगापटी पल्लम राजू
16. दूरसंचार और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय श्री कपिल सिब्बल
17. वाणिज्य और उद्योग और कपड़ा मंत्रालय श्री आनंद शर्मा
18. सड़क परिवहन और राजमार्ग मंत्रालय श्री डॉ. सी. पी. जोशी
19. आवास और शहरी गरीबी उन्मूलन मंत्रालय श्री अजय माकन
20. संस्कृति मंत्रालय श्रीमती चंद्रेश कुमारी कटोच
21. पोत परिवहन मंत्रालय श्री जी. के. वासन
22. संसदीय कार्य तथा शहरी विकास मंत्रालय श्री कमलनाथ
23. जल संसाधन मंत्रालय श्री हरीश रावत
24. सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय कुमारी शैलजा
25. रसायन और उर्वरक मंत्रालय श्री एम. के. अलगिरि
26. भारी उद्योग एवं सार्वजनिक उद्यम मंत्रालय श्री प्रफुल्ल पटेल
27. कोयला मंत्रालय श्री श्रीप्रकाश जायसवाल
28. विधि और न्याय मंत्रालय श्री अश्विनी कुमार
29. अल्पसंख्यक मामलों के मंत्रालय श्री के रहमान खान
30. खनन मंत्रालय श्री दिनशा जे पटेल
31. जनजातीय मामलों के मंत्रालय और पंचायती राज मंत्रालय श्री वी. किशोर चंद्र देव
32. इस्पात मंत्रालय

आणि हयात किती गुणवंत आहेत

Pages