हर्पेन ह्यांचे अभिनंदन!!

Submitted by मार्गी on 7 March, 2019 - 04:19

हर्पेन ह्यांनी चद्दर ट्रेक पूर्ण केला

समस्त माबोकरांना नमस्कार. आपले प्रेरणास्थान असलेल्या हर्पेन ह्यांनी नुकताच गोठलेल्या झांस्कर नदीवरचा चद्दर ट्रेक पूर्ण केला आहे. हर्पेन ह्यांच्या सर्व कर्तृत्व शिखरांप्रमाणे हा त्यांचा अनुभवही थरारक आहे. तेव्हा समस्त माबोकरांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले अनुभव सविस्तर शब्दबद्ध करावेत. हा चद्दर ट्रेक काय असतो, तयारी काय लागते, तांत्रिक बाबी काय असतात, काय अनुभव येतात हे सर्व त्यांनी सांगावे. शिवाय दर वर्षी हा ट्रेक करताना ट्रेकर्स मृत्युमुखी पडतात. त्याबद्दलही सांगावे. आणि पर्यटक- ट्रेकर्सचा लदाखच्या पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांपर्यंत सर्व बाबींची चर्चा करावी अशी त्यांना विनंती आहे.

गोठलेल्या झांस्कर नदीलाही उन्हाळा सुरू होताना पाझर फुटतो. तसा हर्पेन ह्यांच्या लेखणीलाही पाझर फुटेल व आपल्यावर तिची बरसात होईल ही आशा करतो! Happy

धन्यवाद!

Group content visibility: 
Use group defaults

ग्रेट हर्पेन, अभिनंदन !

काही वर्षांपूर्वी तुम्ही धावणं / ट्रेकिंग विसरा असं ज्याला सांगण्यात आलं तो चद्दर ट्रेक पूर्ण करतो! _/\_

हर्पेन ,
आपले मनःपूर्वक अभिनंदन !
आपण शब्दशिखरही पादाक्रांत कराल ...
'या' लेखनासाठी शुभेच्छा !

अभिनंदन हर्पेन.
नविन लिहायचंय पेज ओपन कर आणि जे मनात येईल ते लिहित जा. नक्की लिहून होईल.
वाट बघतोय. Happy

अभिनंदन हर्पेन!
नक्की लिहा तुम्ही या तुमच्या ट्रेकबद्दल!

हर्पेन, अभिनंदन !
मी प्रयत्न करेन लिहायचा पण हातून पुर्ण होईल की नाही सांगता येत नाही.>> तुम्ही असं म्हणताय? ह्यावर विश्वास ठेवायचा का? बरं Happy
एवढ्या कठीण धावण्या-चढण्या Happy पुर्ण करताय तर लेखही पुर्ण कराल ओ. >>>>>> + ११११११११

हर्पेन, खूप खूप अभिनंदन!
लेख लिहिण्याचं मनावर घ्याच. सावकाश लिहा. (अपूर्ण ठेवण्यापेक्षा सावकाश बरं! ) Lol

हर्पेन, wow, what an achievement.

समाजकार्य, मॅरेथॉन, ट्रायथॉलॉन आणि अजून किती काही करता. One more feather to your cap.

चद्दर ट्रेक बद्दल ऐकून होते. 100+ किमी.चा आहे ना म्हणे. अतिशय उत्सुकता आहे याबद्दल वाचायची. क्रमशः लिहा, पण आम्हाला माहिती वाचायला द्याच. Happy

ज ह ब ह री !!!
एकंदर हिमालयच आवडता. माऊंटेनियरिंग, विविध हिमालयन एक्स्पिडिशन्स, चादर ट्रेकबद्दल व्हिडिओ बघणे हा त्यातलाच भाग. पण कधी न भेटताही ओळखीच्या झालेल्या, मल्टिफॅसेटेड अश्या हर्पेनने चादर ट्रेकही केला हे वाचून त्याच्याबद्दलच्या कौतुकात अजून भर पडली. हार्दिक अभिनंदन हर्पेन! आता ह्या ट्रेकवर छानशी लेखमालिका येवू दे. पराग, केदार, अनया वगैरेची लेखमालिका वाचणं अशीच पर्वणी होती.

वा.. अभिनंदन !
एक लेख तो बनता है यार , माबोकरांसाठी !
तुम्हाला कंटाळा असेल लिखाणाचा तर मायबोलीवरून कोणी सक्षम लेखनिक घ्या मदतीला ; व्यासांनी श्रीगणेशाला घेतले होते तद्वत...

हर्पेन, मनापासून अभिनंदन!!!

आता विनय थोडासा बाजूला ठेऊन सविस्तर पूर्वतयारीपासून लिहायला घ्या बघू. Happy

Pages