पोळी - चपाती - फुलके इत्यादी संदर्भात चर्चा

Submitted by क्ष... on 28 April, 2011 - 17:04

मायबोलीवर दर दोन महिन्यांनी पोळ्या नीट होत नाहीत, तवा कोणता वापरू? पीठ कोणते वापरू अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ते सगळे एकत्र करण्यासाठी हे पान.

भाकरी आणि फुलक्यांचा व्हिडीओ - http://www.maayboli.com/node/14935

जुन्या मायबोलीवरील पोळ्यांची चर्चा इथे आहे - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/4519.html

अजुन एक चर्चा इथे पण मिळेल - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/111686.html?1225813423

माझे काय चुकले? आणि युक्ती सांगा या दोन्ही बा.फ. वर यासंदर्भात असंख्य वेळा विचारले गेले आहे. तेच सर्व इथे डकवले जाईल.

पोळ्यांसाठी कोणता तवा चांगला? ते इथे सापडेल
- http://www.maayboli.com/node/25369
जुन्या मायबोलीवरची तव्यासंदर्भातली चर्चा इथे आहे - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/103164.html?1157632534

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अदिती, thank you!

रुनी, डायरेक्ट ओट्यावर लाटावे लागते>>हा मुद्दा माझ्या डोक्यात नव्हता आला! बरोबर आहे. आणि thank you so much for your offer! मला एकदम छान वाटलं वाचून! पण तू खरंच नको पाठवूस! मला एक दुसरं (http://www.amazon.com/Good-Cook-Classic-Wood-Rolling/dp/B000ARPJRM/ref=s...)मिळालंय ज्याला प्राईम शिपिंग आहे $७.५० ला. Fits my budget because I'm prime member.

$१००० म्हणजे अती अतीच आहे... १५०-२०० ठिक होती.

रोटीमेकर बरा आहे माझा. १००० रुपयात चपात्या मस्त होत आहेत. Happy

मायबोली वर शोधत होते. पण काहीच सापडले नाही म्हणून इथेच विचारते.

महाराष्ट्रीयन पद्धतीची शुद्ध मऊसूत चपाती रोजच्या रोज वेळेवर पुरवणारे कुणी आहेत का ? डिलिव्हरी नांदेड सिटीमधे हवी आहे.
(ऑनलाईन काही पाहीलेत;पण त्या चपात्या नक्कीच नाहीत).

घडीच्या मऊसुत पोळ्या (चपाती) हव्या असतील तर कणीक घट्ट मळून पुर्ण बुडेल इतक्या पाण्यात ठेवतो रात्री. सकाळी कणीक पुन्हा मळून पोळ्या केल्या तर कशाही दर्जाचा गहू असला तरी पोळ्या रेशमासारख्या मऊ होतात.
Submitted by शाली on 7 March, 2019 - 08:34

बहुतेक हयात किण्वन प्रक्रिया होत असावी.
आयडिया छान आहे.
Submitted by डूडायडू on 7 March, 2019 - 11:07

शाली, दुसर्या दिवशी ही कणिक खूप पातळ नाही का होत?
Submitted by मेधावि on 7 March, 2019 - 11:25

नाही होत. पिठाचा हात लावून मळायची पुन्हा. कणीक पाण्यात ठेवायच्या अगोदर चांगली मळून (तिंबून) घ्यायची.
Submitted by शाली on 7 March, 2019 - 11:31

नेहमीच्या चपात्या का? मुंबईच्या हवेत पीठ आंबणार नाही का,तसेच पीठाचा रंग काळसर होत नाही का? - देवकी

देवकी, हो नेहमीच्या चपात्या. आमच्या घरी हा प्रकार नेहमी होतो. तुम्ही म्हटलेलं काहीही होत नाही. अर्थात कणिक चांगली तिंबलेली हवी.
गम्मत म्हणजे मी ज्यांना ज्यांना ही टिप सांगितली त्यातल्या कुणीच ट्राय केली नाही. Happy
Submitted by शाली on 7 March, 2019 - 19:00

शाली जमलं तर खरंच स्टेप बाय स्टेप फोटो टाकाल का? मळलेली कणीक अशी कच्चकन पाण्यात टाकायला कसंतरीच वाटतंय Happy
Submitted by मेधावि

एक लाटी टाकून बघायची Happy
Submitted by राजसी on 7 March, 2019 - 21:19

उद्या फोटो टाकेन नक्की. खरं तर ही आज्जीची ट्रिक आहे. पुर्वी पुपोसाठी कणीक मळताना ती पाट्यावर ठेऊन वरवंट्याने ठेचत असत फोल्ड करत बराच वेळ. त्याला पर्याय म्हणून आज्जी हे करायची. एक लाटी ठेऊन नक्की काय रिझल्ट मिळेल ते नाही सांगता येणार.
Submitted by शाली on 7 March, 2019 - 21:29

इंटरेस्टिंग आयडीया आहे शाली.
इतराजणी, मऊसुत चपात्यांसाठी शरबती गव्हाच पीठ वापरून पहाता का ? इथे मी सुजाता/आशिर्वाद वगैरेचा आता शरबती आटा म्हणुन पॅक मिळतो तो वापरती आहे.
आई लोक शरबती गहुच दळुन वापरतात. बघुदा. कारण आमच्या आईसाहेबांना सांगताना त्यां म्हणाल्या कि , लहानपणापासून शरबती गहूच खाल्ला आहेस कि.
Submitted by सीमा on 7 March, 2019 - 21:35

मऊ चपात्यांसाठी रात्रभर पीठ पाण्यात का ठेवायचे? . मी साधारण अर्धा पाऊण तास आधी कणिक तिंबत ठेवते, अन नंतर हलक्या हाताने गोळे करते, मस्त मऊ पोळ्या होतात.

मला वाटते पोळ्या जश्या शेकल्या जातात तसे त्या कडक किंवा मऊ होतात. मला चपाती लाटणे अन शेकणे एकत्र करता येत नाही, तसे केले तर एकतर त्या करपतात किंवा कडक होतात, सो मी आधी सगळ्या लाटून घेते मग मोठया आचेवर शेकते,त्या छान मऊ मऊ होतात☺️
Submitted by VB on 7 March, 2019 - 22:16

VB ही काही आवर्जून करायची ट्रिक नाहीए. बरेचदा कणीक उरते ते फ्रिजमध्ये ठेवायच्या ऐवजी असे ठेवावे. कधीकधी कितीही पारखुन घेतला तरी गव्हू चांगला निघत नाही. त्यावेळी ही पध्दत उपयोगी येते. तसेही दळणात मुठभर सोयाबीन्स टाकले तरी पोळ्या मऊ होतातच. पोळ्या शेकन्याची लय महत्वाची आहेच. तसेच तव्यावरची पोळी रुमालावर सरळ ठेवण्या ऐवजी उभी धरुन पटकन मुडपून ठेवल्यानेही चपात्या जास्तवेळ मऊ रहातात. अंडे चालत असेल तर चार माणसांच्या कणकेत एक अंडे टाकले तरीही पोळ्या सुरेख होतात. (वास येत नाही अंड्याचा) Happy

Submitted by शाली on 7 March, 2019 - 22:46

Var shalee yani lihilay te shilya kankesathi me kelay. Polya kalya hot nahit, Ani mau on hotat. Of course, urleli kanik thodi aste so panyat budawlelya shilya kanket thodi fresh kanik add karayla lagte.

Sorry for English.
Submitted by प्रज्ञा९ on 7 March, 2019 - 23:24

आज करून पाहते. >>>> दक्षिणा, तुझा अनुभव नक्की लिही इथे. माझा अंदाज असा आहे की, ती चिपचिप कणिक परत सारखी करून पोळ्या योग्य बनवण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागेल. वेळखाऊ काम असणार आहे.

मऊ लुसलुशीत आणि पदरदार पोळ्यांसाठी बेस्ट उपाय फूड प्रोसेसर मध्ये पीठ मळणे. भिजवून ठेवली तर जगातल्या बेस्ट पोळ्या होतात, पण वेळ नसेल आणि लगेच केल्या तरी मऊसूत पोळ्या. आणि मळताना हात (उष्णता) लागत नसल्याने छान पांढऱ्या पोळ्या होतात. नंतरही कणिक तुलनेत कमी काळी पडते.

मळलेली कणिक पाण्यात ठेवायची? तशीच्या तशीच? > हो मी पूर्वी एक दोन वेळा हे केलं आहे. एका `सुगरण सल्ला' टाईप पुस्तकात सांगितल होतं. फ्रीज मध्ली कणिक काळी पडते. ती अशी पाण्यात ठेवायची थोड्या वेळ. आणि नंतर ती ( पाण्यातून गोळा निथळून घेऊन) , लागेल तसं पीठ वापरून मळायची. त्यामुळे ती `कणिक परत सतेज दिसू लागते व पोळ्याही चांगल्या होतात ' .

मीरा तुमच्याकडे कसे आहे ते माहीत नाही पण आमच्याकडे पोळी पांढरी झाली तर पिठ चांगले नाही किंवा कणीक चांगली तिंबली नाही असे समजतात. पिठ मळताना हाताची उष्णता गरजेची आणि योग्य प्रमाणात असते. अर्थात हे आमच्याकडील समज आहेत.

एवढ्या लोकांनी करून पाहिले आहे, म्हणजे एकदा होऊनच जाऊ दे कणीक की कणीक व पाणी का पाणी . जमलं तर काळ्या कणकेला उजळवता तरी येईल.

प्राचीन करुन पहा. शक्यतो कुणी पाण्यात कणीक ठेवायला धजावतच नाही.
ही रोजच्या वापरातली टिप नाहीए. रोजच्या वापरासाठी अंडे वापरावे कणकेत. दळण दळून आणत असाल तर न विसरता सोयाबिन्स टाकायचे मुठभर. अगदी मऊ होतात पोळ्या आणि पौष्टीकताही वाढते.

सोयाबीन मी घालते दळणात.
पाण्यात भिजवलेली कणीक ठेवायची म्हणजे जरा विचार कराव अलागेल.
दक्षिणा, केल्यावर लिहा इथे.

ईथे बरेच जण कणिक काळी होण्याबाबत बोलताहेत , पण जर पीठ मळताना तेल लावले नाही अन ते ऊरलेले पिठ फ्रिजमध्ये ठेवले तरी ते काळॅ पडत नाही. तेल किंवा तुपाचा हात लागला तरच फ्रिजमधले पीठ काळे पडते.

ईथे बरेच जण कणिक काळी होण्याबाबत बोलताहेत , पण जर पीठ मळताना तेल लावले नाही अन ते ऊरलेले पिठ फ्रिजमध्ये ठेवले तरी ते काळॅ पडत नाही. तेल किंवा तुपाचा हात लागला तरच फ्रिजमधले पीठ काळे पडते>> हो हा अनुभव मला पण आला . म्हणून मग मी उरलेली कणिक फ्रिझर ला टाकते . मग नाही पडत ती काळी अगदी २ आठवडे सुद्धा टिकते. फक्त पोळ्या कारण्याआधी २ तास तरी काढून ठेवायला लागते .कारण दगड झालेला असतो फ्रिझर ला त्याचा.

जर पीठ मळताना तेल लावले नाही अन ते ऊरलेले पिठ फ्रिजमध्ये ठेवले तरी ते काळे पडत नाही.>>>+१
दक्षिणा, केल्यावर लिहा इथे.>>+१

अरे, नवीनच पद्धत. आमच्या मावशी कणीक उरली असेल पोळ्यांची तर फ्रीजमध्ये ठेवतांना त्या गोळ्याला जरा श्या पाण्याची आंघोळ घालून; डब्याच्या तळात पाणी दिसेलसं घालून मग ठेवून द्यायच्या. प्ण त्यांनी केलेल्या सगळ्याच पोळ्या तश्या मऊ व्हायच्य सो "त्या" कणकेनं काही फरक पडत असेल असं वाटत नाही.
बाकी कणीक चांगली तिंबणे, आणि गॅस च्या आचेपेक्षा मोठी पोळी न लाटणे हे नेहेमीचे उपाय आहेत फुलके चांगले आणि मऊ व्हायला.

अरे, विसरलेच होते.
मला वाटलं होतं, पीठ अगदीच ओलं , चिकचिकीत होईल. पण मळायला घेतल्यावर अगदी लुसलुशीत, मउसर,लवचिक झालं. पुपो करायची इच्छा झाली.
कणिक फारच मउ झाली. अगोदर अगदी घट्ट मळायला हवं होतं.
Long story short , माझ्याचाने काय इतक्या मउ कणकेच्या पोळ्या झाल्याच नाहीत. जमल्याच नाहीत. अगोदर घट्ट मळून परत एक प्रयत्न करण्यात येईल.

प्रयोग करुन पाहिल्याबद्दल धन्यवाद स्वस्ति. Happy
मी टिप देताना पिठ घट्ट मळायचे हे सांगीतले होते. तुमच्या नजरेतून सुटले वाटते.

>>>घडीच्या मऊसुत पोळ्या (चपाती) हव्या असतील तर कणीक घट्ट मळून पुर्ण बुडेल इतक्या पाण्यात ठेवतो रात्री.

तुमच्या नजरेतून सुटले वाटते. >>>> नाही ओ शालीदा. वाचलं होतं. पण कळतयं पण वळतं नाही त्यातला प्रकार. :).
आणि फ्रीज मध्ये आयतं पीठ होतं म्हणून कंटाळा केला.

प्रयोगाचा आजचा दिवस दुसरा.
मनगटं दुखलं इतकं घट्ट पीठ भिजवलं आहे आणि पाण्यात घातले आहे.
(आता देव पण पाण्यात घालू का ????? :विचारमग्न बाहुली:)

मला वाटते पोळ्या जश्या शेकल्या जातात तसे त्या कडक किंवा मऊ होतात. मला चपाती लाटणे अन शेकणे एकत्र करता येत नाही, तसे केले तर एकतर त्या करपतात किंवा कडक होतात, सो मी आधी सगळ्या लाटून घेते मग मोठया आचेवर शेकते,त्या छान मऊ मऊ होतात☺️>> लाटलेली पोळी तापलेल्या तव्यावर टाकली की तीसेक सेकंदातच उलटायची आणि मग गॅस कमी करून आधीपेक्षा मंद आचेवर ही दुसरी बाजू व्यवस्थित भाजायची. मग परत आच जरा वाढवून पोळी परत उलटून पहिली बाजू भाजायची. ह्या पद्धतीने गॅस कमीजास्त करत पोळ्या भाजल्या की लाटणे व भाजणे लयीत होते व पोळ्याही छान होतात. सवयीनं हे गॅस कमीजास्त करणं आपोआप जमायला लागतं.

कोणी ग्लुटेन-फ्री पीठ घरी प्रयोग करून पोळ्यांसाठी तयार केलं आहे का? म्हणजे ज्वारी, बाजरी, मुग, बेसन, तांदुळ वगैरे पीठं प्रमाणात एकत्र करून त्याच्या पोळ्या (होतील का?)?

Pages