Submitted by क्ष... on 28 April, 2011 - 17:04
मायबोलीवर दर दोन महिन्यांनी पोळ्या नीट होत नाहीत, तवा कोणता वापरू? पीठ कोणते वापरू अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ते सगळे एकत्र करण्यासाठी हे पान.
भाकरी आणि फुलक्यांचा व्हिडीओ - http://www.maayboli.com/node/14935
जुन्या मायबोलीवरील पोळ्यांची चर्चा इथे आहे - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/4519.html
अजुन एक चर्चा इथे पण मिळेल - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/111686.html?1225813423
माझे काय चुकले? आणि युक्ती सांगा या दोन्ही बा.फ. वर यासंदर्भात असंख्य वेळा विचारले गेले आहे. तेच सर्व इथे डकवले जाईल.
पोळ्यांसाठी कोणता तवा चांगला? ते इथे सापडेल - http://www.maayboli.com/node/25369
जुन्या मायबोलीवरची तव्यासंदर्भातली चर्चा इथे आहे - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/103164.html?1157632534
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मेधा , मी नेमके उलटे करते.
मेधा , मी नेमके उलटे करते. कमी आचेवर पोळी टाकायची आणि परतल्यावर आच मोठी करायची.
मलाही , लाटणे भाजणे एकावेळी जमत नाही. लाटून होईपर्यंत ,कमी आचेवर तवा तापत रहातो.
शालीजी ,स्वस्ति सारखे झाले
शालीजी ,स्वस्ति सारखे झाले माझेही.आयत्या पिठावर प्रयोग केल्याने कणीक मिसळावी लागली, पण मऊ झाली व काळीही पडली नाही
आजचा प्रयोग बर्याच प्रमाणात
आजचा प्रयोग बर्याच प्रमाणात यशस्वी :).
I just loved the texture of aatta.
पोळ्यांमध्ये फारसा फरक जाणवला नाही, पण पोळ्या करायला मात्र मज्जा आली.
पोळ्यांमध्ये फारसा फरक जाणवला
पोळ्यांमध्ये फारसा फरक जाणवला नाही, पण पोळ्या करायला मात्र मज्जा आली.>>
मी आधी घड्याकरून घेते त्यामुळे लाटणे आणि भाजणे एकावेळी सोपे जाते. मध्यम आचेवर तवा छान तापला असेल तर पोळ्या चांगल्या भाजल्या जातात. एका पसरट भांड्यावर पेपरप्लेट ठेऊन त्यावर पेपेर नॅपकिन ठेऊन त्यावर तयार पोळ्या एकावर एक ठेवते. सगळ्या झाल्यावर लगेच झाकून ठेवते. ते जास्तवेळ गरम राहते. भांड्यात खाली वाफेचे पाणी जमा होत जाते. पोळ्याही मऊ राहतात.
कणिक मऊ तिंबलेली असावी आणि
कणिक मऊ तिंबलेली असावी आणि तासभर तरी भिजलेली असावी. घट्ट कणिक असेल तर चपाती पण घट्ट होते. कणिक जेवढी मऊ तेव्हड्या चपात्या मऊ. आणि जेवढा कमी वेळ तव्यावर शेकवण्यास लावाल तेवढी चपाती लुसलुशीत. जास्त वेळ तव्यावर ठेवली तर कडक होते.
मनगट दुखणे हे एक कारण कणीक
मनगट दुखणे हे एक कारण कणीक घट्ट न मळण्याचे.
आणि पाण्यातल्या कणेकेच्या चपात्या लाटता यायच्याच नाहीत मला.
मला पीठ अगदी सैल किंवा अगदीच घट्ट नाही जमत. जाउदे माझ्या पोळ्या तशा चांगल्या असतात.
आज एक कणकेचा गोळा उरला आहे
आज एक कणकेचा गोळा उरला आहे.उद्या त्यावर हा प्रयोग करायचा आहे.(करणार आमची बाई)
जाउदे माझ्या पोळ्या तशा चांगल्या असतात>>>> हेवा वाटतो ग! जाऊ दे मी कधी करते त्याच चांगल्या.
जाउदे माझ्या पोळ्या तशा
जाउदे माझ्या पोळ्या तशा चांगल्या असतात. .. >>सस्मित ->> +१ आत्मविश्वास माझ्याकरिता अनुकरणीय आहे
माझ्या पोळ्या तशा चांगल्या
माझ्या पोळ्या तशा चांगल्या असतात. ..> माझ्यापण , म्हणजे माझ्याच फुलके आणि भाकरी च्या तुलनेत !
(No subject)
म्हणजे माझ्याच फुलके आणि
म्हणजे माझ्याच फुलके आणि भाकरी च्या तुलनेत ! >>>
म्हणजे माझ्याच फुलके आणि
म्हणजे माझ्याच फुलके आणि भाकरी च्या तुलनेत !>>>>
काल एक गोळा याकरिता राखीव ठेवला होता.त्याची आज चपाती केली.तर माझी बाई म्हणली,यापेक्षा मी नेहमी करते त्याच चांगल्या होतात.
मायबोलीवरची ( या धाग्यावरची
मायबोलीवरची ( या धाग्यावरची किंवा जुन्या मायबोलीवरची ) चर्चा वाचून मी गेली कित्येक वर्षे कोमट पाणी वापरते. रोजच्या वापरातला कॉफी कप भरुन पाणी मायक्रोवेव्ह मधे गरम करते. तेवढ्या पाण्यात साधारण २० फुलके होतील एवढी कणीक मळता येते. मळलेली कणीक १५- वीस मिनिटे ठेवायची. आणि मग परत एकदा मळून फुलके करायला घ्यायचे. मी ४-५ फुलके आधी लाटून घेऊन मग तवा तापायला ठेवते. मग एका वेळी लाटणे आणि आधी लाटून ठेवलेले भाजणे असे व्यवस्थित जमते.
कणिक व्यवस्थित छान मळुन घेते.
कणिक व्यवस्थित छान मळुन घेते. लाटताना छोटी लाटी लाटुन , त्यावर तेल पसरवून आणि मग पीठ भुरभ्रुन त्रिकोण करायचा. त्रिकोणच ठेवायचा. त्रिकोण कुठही मुडपायचा नाही. (मुडपला कि चपाती फुगत नाही. एकदम महत्वाची स्टेप आहे. त्रिकोण कोपरात /साईडला कुठेही मुडपायचा नाही म्हणजे नाही. )
आता त्रिकोण पीठ लावून घ्यावा आणि लाटुन मोठा करायचा. प्रॅक्टीस असेल तर गोल होतो . त्रिकोण च राहिला तरी ठिक आहे. (लाटताना चपाती पोलपाटावर अलगद गोल फिरली पाहिजे. म्हणजे एक सारखी लाटली जाते. उगाच फार हाताळु नये. असा एक छान आवाज येतो लयातला. मला सांगता येत नाही. )
तवा गरम झाला असेल तर तेल घालुन तव्यावर मग चपाती घालायची. गॅस मध्यम ठेवायचा .१५ सेकंदात थोडी कोरडी झाल्यासारखी वाटली कि उलटायची. (फोड येवू दिले तर जास्त भाजली गेली. ) आता गॅस मोठा करायचा. परत तेल घालायचे. खालची बाजु व्यवस्थित भाजली कि मग उलट करून दुसरी बाजु भाजुन घ्यायची (तव्यावर हातानेच गोल फिरवित). या प्द्धतीत ३ वेळा चपाती उलटली जाते.
सुरेख पापुद्रे सुटलेली खुखुशीत चपाती होते. आई सारखी होत नाही तरीही. :(पण अल्मोस्ट देअर.
बघा करुन.
आमच्याकडे चपात्या मोठ्या असतात. फुलके करत नाही. त्यामुळ साधारण दोन /अडीच फुलक्याच कणीक लागाव एका चपातीला.
गरम चपाती आणि चहा जगात भारी नाष्टा आहे. आयती मिळाला तर.
1. जगात भारी चपाती म्हणजे
1. जगात भारी चपाती म्हणजे बायोकोने केलेली चपाती. रेशीमसुध्दा बायकोने केलेल्या चपातीसारखे मऊ असते.
2. आईचा स्वयपाक सगळ्यात भारी पण तो तिच्या घरी. घरी मात्र बायकोचा स्वयपाक आईपेक्षा काकणभर सरसच.
3. नवऱ्याने केलेली मंडई आणि चपाती जगात वाईट. भाजीवाला कुणाला फसवो अथवा न फसवो, नवरेमंडळींना हमखास फसवतोच आणि हे बायकोला कळतेच. भले नवऱ्याने २० रुपयांना घेतलेली जुडी ५ ला घेतली असं सांगीतलं तरी “फसवले तुम्हाला” हे ठरलेलं.
सीमा +१
सीमा +१
त्रिकोण सोडुन बाकीचं अगदी सेम. मी गोल उंडे करते.
आई त्रिकोण करते. पण त्याच्याही गोलच चपात्या लाटल्या जातात.
गरम चपाती आणि चहा जगात भारी
गरम चपाती आणि चहा जगात भारी नाष्टा आहे. आयती मिळाला तर. >>>>> अगदी अगदी अगदी
सीमा , मी तव्यावर तेल घालत नाही , पण या पद्धतीने पोळ्या करून बघेन . (तेल न लावता)
शाळेत असताना , आमच्या एका ट्युशनच्या बाईंनी सांगितलेलं ते चांगल लक्शात आहे ..
त्रिकोणी लाटीतून गोल पोळ्या करणे हे "त्रिकोणातून परिवर्तूळ काढता येतं " याचं real life application आहे.
चपाती/पोळी मध्यमपेक्षा अधिक
चपाती/पोळी मध्यमपेक्षा अधिक आंचेवर तापलेल्या तव्यावर दोनदा परतायची. तव्यावर पडली की चारपाच सेकंदांत उलटायची. नरम कापडाच्या बोळ्याने अलगद फिरवायची. जरा जास्त वेळ ठेवायची. खालून करपू द्यायची नाही. डाग काळे झाले तर त्यातून वाफ निसटून जाते आणि पोळी/चपाती फुगत नाही. खालची बाजू सतत उचलून पाहायची नाही. थोड्या सरावाने समजेल. मग पुन्हा परतायची आणि किंचित दाबून फुगवायची. एका बाजूला निर्माण झालेली वाफेची फूग हळुवारपणे बोळ्याने दाबून पुढे ढकलायची. सहसा फुगतेच. घडीची नसली तरी. लगेचच कापडाचा तुकडा किंवा टिश्यू घातलेल्या डब्यात काढून ठेवायची. सगळ्या पोळ्या/चपात्या भाजून होईपर्यंत डब्यावर एखाडी डबा झाकणारी ताटली ठेवावी म्हणजे डब्याची उघडझाप पटकन करता येते. सर्व पोळ्या/चपात्या झाल्यावर तळाचे तलम फडके पूर्ण उघडून त्यात पोळ्या ठेवाव्या आणि वरूनही त्याच फडक्याने पटकन आच्छादाव्यात. पुन्हा डब्यात ठेवून डब्याचे झाकण लावून डबा घट्ट बंद करावा. यामुळे आत वाफ धरत नाही आणि ओलसरपणा न येता वस्तू अधिककाळ टिकते. हे सर्व अगदी अलवारपणे करावे. कुठेही कालथ्याची खणाखणी, हाणामारी होऊ देऊ नये.
विस्तव कमी जास्त करण्याची गरज नाही. त्याऐवजी चपाती/पोळी एका बाजूने तव्यावर असण्याचा वेळ कमीअधिक करावा. म्हणजे आंच वाढवण्याऐवजी ती बाजू अधिक वेळ तव्यावर ठेवावी. यामुळे आच कमीजास्त करण्यासाठी वापरावा लागणारा आपला हात मोकळा राहातो.
भाकरीदेखील अशीच तव्यावर फुलवता येते.
फूड प्रोसेसरमध्ये कणिक मळली तर थोडा वेळ ठेवून द्यायची गरज नाही. तेलाच्या हाताने मळून घेतले की झाले. कणिक प्रोसेसरमध्ये असतानाच हवे तर तेलमीठ घालता येते आणि ते सगळ्या पिठात सम प्रमाणात पसरते.
मीही त्रिकोणाची गोल म्हणजे
मीही त्रिकोणाची गोल म्हणजे घडीची चपाती करते. तेल घडी करताना लावते पण भाजताना नाही.
लाटताना चपाती पोलपाटावर अलगद गोल फिरली पाहिजे. म्हणजे एक सारखी लाटली जाते. उगाच फार हाताळु नये. >>>कोरडे पीठ जास्त घेतले तर लाटताना चपाती गोल फिरते पण त्यामुळे ती कोरडीच होते आणि भाजताना तवा काळा पडतो. तयामुळे लाटताना मी हातानेच उलट सुलट करत गोल लाटते. जास्त पीठ लागत नाही आणि तवा अन पोळपाटचा परिसर स्वच्छ राहतो. पीठ मऊ असेल तर लाटायला वेळ लागत नाही.
कणिक पाण्यात ठेवायचा प्रयोग
कणिक पाण्यात ठेवायचा प्रयोग भाकरी च्या कणिके साठी पण करण्या सारखा आहे का ?
भाकरी सॉफ्ट होण्या साठी काय करता येईल ?
सॉरी खूप बेसिक प्रश्न - - पाण्यात कणिक टाकून ते फ्रिज मध्ये ठेवायचे कि बाहेर ?
कणिक पाण्यात ठेवायचा प्रयोग
कणिक पाण्यात ठेवायचा प्रयोग भाकरी च्या कणिके साठी पण करण्या सारखा आहे का ?>>> नाही. भाकरीच्या पीठत गव्हाच्या पीठात जसा (ग्लुटेनमुळे)चिकटपणा असतो तसा नाही. त्यामुळे भाकरी कणिक पाण्यात ठेवल्यास विरघळून जाईल.
भाकरी सॉफ्ट होण्या साठी काय करता येईल ?>>> त्यासाठी भाकरी एक्सपर्ट असावे लागते. नाहीतर (माझ्यासारखे) ज्वारीच्या पीठात थोडे गव्हाचे पीठ मिसळायचे.
मोदकाच्या पिठाची ज्याप्रमाणे
मोदकाच्या पिठाची ज्याप्रमाणे उकड काढतो तशी ज्वारीच्या पिठाची काढायची.. मग अगदी लाटूनही भाकरी बनवता येतात.. अगदी सॅाफ्ट होतात
sonalisl , म्हाळसा : धन्यवाद
sonalisl , म्हाळसा : धन्यवाद !! नक्की करून पाहतो ..
वेळ वाचवायचा म्हणून मी ज्वारी
वेळ वाचवायचा म्हणून मी ज्वारी बाजरीच्या waffle होतील का बघत आहे
आणि इथले लोक अजूनच वेळकाढू प्रकार सुचवत आहेत
मुळात भाकरी सॉफ्ट का करायची
मुळात भाकरी सॉफ्ट का करायची पण??
आणि फक्त चावता येत नाही हे कारण असेल तर ज्वारी पिठाची पण उकड काढून किंवा गरम पाण्याने पीठ मळुन भाकऱ्या मऊ होतात
ब्लॅककॅट वॅफल ? भाकरी जमत
ब्लॅककॅट वॅफल ? भाकरी जमत नसतील आणि ज्वारी खायची असेल (डाएट किवा अन्य कारणांसाठी) तर पर्याय म्हणुन आंबोळी करण सोपी आहे.
शोधक, भाकरीचे पीठ भरपुर मळुन घेतले आणि भाकरी तव्यावर घातल्यावर , पाणी फिरविल्यावर पटकन उलटुन (पाणी वाळण्याच्या आधी) टाकावे. टायमिंग महत्वाचे आहे. एकदा हे टायमिंग जमले कि छान पापुद्र्याच्या भाकर्या होतात.
सीमा , आदू - धन्यवाद !!
सीमा , आदू - धन्यवाद !!
ज्वारी पीठाचा उकड काढून भाकरी
ज्वारी पीठाचा उकड काढून भाकरी बनवायचा विडीओ आहे का? आमच्या भाकरी ला पापुद्रा काही केल्या येत नाही, फुलका स्टाईल केले तरी.
भाकरी फुगली की पापुद्रा येतोच
भाकरी फुगली की पापुद्रा येतोच ना??की मी पापुद्रयाचा चुकीचा अर्थ घेतेय???
याच धाग्यावर कुठेतरी माझा एक
याच धाग्यावर कुठेतरी माझा एक प्रतिसाद असेल चपाती मऊ होण्यासाठी काय करू??हे केलं ते केलं तरी मऊ होत नाही,काहीतरी सुचवा अशा अर्थाचा, पण आता मला खूप छान जमायला लागल्यात चपात्या, आपोआप जमल्या पण खरं तर डोक्यात एक कॉम्प्लेक्स होता चपाती येत नसल्याचा, तो इथे बाकीच्यांचे पण चपाती येत नसल्याचे प्रतिसाद बघून 100℅ गेला,घरी आजूबाजूला कुणाला सांगितलं की चपाती नीट येत नाही तर तो हसण्याचा विषय व्हायचा,पाहुणे आले की मी भाकरी किंवा पुरी करायचे,
या गोष्टीसाठी माबो आणि माबोकर ना खूप खूप धन्यवाद, की माझा complex दूर केलाच आणि चपाती न येणं हा थट्टेचा विषय नाही its एकदम okkk हे डोक्यात फिट्ट बसवण्यासाठी
Pages