पुलवामा हल्ला आणि भारत पाकिस्तान संबंध

Submitted by हेला on 27 February, 2019 - 10:27

पुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.

ह्या सर्व प्रश्नांवर एकत्रित एका ठिकाणी चर्चा करायला हा धागा काढत आहे. मायबोलीच्या नियमात राहून चर्चा करा हि विनंती... वेबमास्टर ह्या धाग्याला कुलूप घालणार नाहीत अशी अपेक्षाही आहेच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मी कश्मिरी वरील हल्लाच कुठेच समर्थन केले नाही उलट कोणताही हल्ला किंवा हिंसा समार्धनिय नाही असेच माझे मत आहे .
माझ्या मुळ विषयाला तुम्ही बगल देत आहात .
मी हे सांगायचं प्रयत्न करतो आहे की आपले सरकार आणि राजकारणी कोणतीच समस्या मुळापासून न सोडवता अर्थवट सोडून समस्या तशीच ठेवतात.
त्यामुळे समस्या अजुन गंभीर बनून हिंसक प्रतिक्रिये पर्यंत लोकांची प्रतिक्रिया जाते .
आणि समस्या न सोडवण्यात राजकारणी लोकांचं जास्त फायदा असतो हे मी सांगायचं प्रयत्न करतोय पण तुम्ही बगल देताय विषयाला

काश्मिरींवर हल्ला करण्यामागे कोणती समस्या आहे?
हे हल्ले कोण करतंय आणि करवत़ंय?
मूळ समस्येवरचा उपाय होईल अथवा न होईल.
असे हल्ले होऊ नयेत हे सांगायलाच सरकारने आठवडा घेतला. आधी असे कोणतेही हल्ले झालेले नाहीत, असंच म्हणणं होतं. मायबोलीवरही भाजप समर्थकांनी तसं लिहिलंय.
–-------
एअर स्ट्राइकमध्ये किती लोक मेले हे माध्यमांनी स्वतःच्या मनाने सांगितलं, असं इथे आता म्हटलं जातंय.
माध्यमं या बातम्या अनामिक सूत्रांच्या हवाल्याने देत होती.
अगदी तिथे तीनशे मोबाईल असल्याचीही.
म्हणजे ही माहिती लीक होत होती. राफेलप्रकरणी सरकार द हिंदुविरोधात कारवाई करणार आहे, तशी याबाबतीतही करेल का?
–--
अमित शहांनी २५० चा आकडा कुठून आणला, तो धरायचा की नाही याबाबत इथले भाजप समर्थक गप्प का आहेत?

हयात हा ऐक तर्क सांगता येईल .
एअरफोर्स नी अनेक टार्गेट विचारात घेवून त्यातला ऐक निवडला आसेल .त्या नंतर तिथे किती अतिरेकी आसू शकतील .विरोध किती तीव्र प्रमाणात होईल ,कोणती हत्यार अतिरेकी वापरतील .पाकिस्तानी एअरफोर्स किंवा आर्मी कसा विरोध करेल हे सर्व नक्कीच विचारात घेतलं असणार .
रिअल लाईफ मध्ये कोणावर हल्ला करायचं आसेल तर किती प्लॅन करावा लागतो हा तर airstrike आहे .
त्यामुळे तिथे ३०० अतिरेकी आसू शकतील ही माहिती पहिलीच मिळाली आसेल म्हणून ३००, हा आकडा सरकार देते आहे तो कमी किंवा जास्त होवू शकतो पण airstrike झाला हे तरी पहिले मान्य करा

परत परत फिरवून एअर स्ट्राइक झाल अहे मान्या करा ह्या पालुपदाला लावून धरण्याचं काय काम? एअर स्ट्रईक झलाय हे अख्ख्या जगाने मान्य केलंय, अगदी पाकिस्ताननेही केलं आहे. सगळ्या न्युट्रल मिडिया चॅनेलनेही मान्य केलं.

मुख्य मुद्दा इथे नेहमी डावलण्याचा जो प्रयत्न सुरु आहे तो हा की तिथे अतिरेकी होते का?, होते तर किति? त्यात्ले किती मेले? मेले नसतील तर हे मिशन फेल आहे का? वाहिन्यांना मृतांचा आकडा कुठुन मिळाला? वायुसेना मृतांच आअकडा जाहिर करण्याचे काम सरकारचे आहे हे का म्हणते? अनेक प्रश्न आहे. ते सोडून भलतीकडे चर्चा नेण्याचे प्रयत्न हाणून पाडले जातील.

<< कमी किंवा जास्त होवू शकतो पण airstrike झाला हे तरी पहिले मान्य करा >.
------ airstrike झाला मान्य, ३०० काय ३००० अतिरेकी आणि अनेक अनेक अड्डे यांची हानी झाली हे पण मान्य.

अप्रिय किंवा अडचणीचे विषय टाळणे आणि चर्चा तिसरीकडेच नेणे असा प्रकार वाटतो. लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवाण्यात सरकार यशस्वी झालेले आहेत. पण पुलवामा का घडले? ३०० किलो स्फोटके अतिरेक्यांना कशी सहजपणे मिळाली? असे हल्ले भविष्यात होणार नाही यासाठी सरकारने काय पावले उचलली ? हल्ला रोखण्याचे साधे साधे उपाय योजले गेले नव्हते तर ह्या अपयशाची जबबादारी सरकारातल्या कुणाची नाही का?

<< बहुतेक भाजप समर्थकांनाच एअर स्ट्राइकबद्दल शंका वाटू लागलीय. >>
--------- शंका घेतली तर मग तो खोटा समर्थक आहे.... प्रश्नच विचारायचा नाही - जे सांगितले, ते मानले, ते पटले तरच १०० % दोने सोने/ खरा समर्थक.

लिटमस टेस्ट आहे.

पेड लोकांशी हुज्जत घालणे नको वाटते. यांच्या अंगावर ४० पैसे फेकतात, त्यासाठी ते दिसेल त्याच्या अंगावर भुंकत सुटतात.
एअर स्ट्राईक झालाच. जरी कुणी मेले नसेल तरीही हवाई दलाच्या शौर्याचं कौतुकच आहे. हवाई हद्द ओलांडली.

पण त्यानंतर जे काही चालू आहे त्याचा आणि हवाई दलाचा काही एक संबंध नाही. जग जे प्रश्न विचारतेय ते त्या संबंधातले आहेत. हवाई दलाच्या मागे लपून आपल्या लबाड्या लपवण्याची खेळी लोकांना तेव्हांच माहिती पडलीय. खेड्या पाड्यातून तर राफेलचं अपयश लपवायला युद्ध केलं असंच बोलताहेत लोक, अतिउत्साही लोकांप्रमाणे त्यांच्याकडेही दुर्लक्ष केले पाहीजे.

आपल्या त्या अती उत्साही (पक्षी भाबड्या) लोकांकडे दुर्लक्ष आणि इतर देशद्रोही काय !

Airstrike झाला होता हे सर्वांना मान्य आहे मग हा विषय बाजूला ठेवूया .
Airstrike मध्ये किती अतिरेकी मेले हा आकडा वादाचा विषय आहे .
अतिरेकी २० मरू नाही तर २००० भारतीय जनतेला त्याच दुःख होण्याचं कारण नाही .
पण सरकार सांगतंय तो ३०० हा आकडा bjp ला निवडणुकीत फायदा करून देईल ..
किंवा bjp त्याच भांडवल करून स्वतःची राजकीय किंमत वाढवेल ही खरी भीती आहे .आणि खरा आक्षेप ह्यालाच आहे .
आणि निवडणुकीच्या तोंडावर सरकारनी फक्त airstrike केला हेच जाहीर करायला पाहिजे होते पाकिस्तानच किती नुकसान झालं हा प्रश्न अधांतरी ठेवला पाहिजे होता किंवा मनमोहन जी सारखं गप्प तरी राहिले पाहिजे होते
जर नुकसानच नसेल झालं तर f १६ , पाकिस्तान नी का पाठवलं हा पण दुसरा प्रश्न उभा राहतो ना

हो खरा आक्षेप त्यालाच आहे. आपले पाच वर्षात कोणतेच काम चमकदार झाले नसल्याने आणि जनता उलटू लागल्याने काहीतरी धमाकेदार करण्यासाठी सैन्याचा वापर निवडणुका जिंकण्यासाठी करणे ह्यावर आक्षेप घेतला जाईलच. जे निर्लज्ज असतील ज्यांना शहिदांच्या टाळू वरचे लोणी खायचे असेल तेच भाजप च्या ह्या नीतीला पाठींबा देतील.

आयक्यु सम्राट
तुम्हाला ठाऊक आहे का , २०१४ च्या निवडणुकीच्या आधी काही महीने आपण चीनचे वीस लाख सैनिक ठार केले होते ते ?

bjp त्याच भांडवल करून स्वतःची राजकीय किंमत वाढवेल ही खरी भीती आहे >>

याच न्यायाने कसलीही कामगिरी नाही , राफेलचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला, संयुक्त राष्ट्रसंघात दलित, आदिवासी, मुस्लीम यांचे शिरकाण केल्याबद्दल भारताची नाचक्की झाली... याचे परिणाम निवडणुकीत भोगावे लागतील आणि पुन्हा चहा विकावा लागेल याच भीतीपोटी हे सर्व घडवून आणलं असाही अर्थ निघेल ना ?

निवडणुकीच्या तोंडावर सरकारने हेही सांगावं की आमचे ५० जवान एका आठवड्यात मारले गेलेत आणि संरक्षण मंत्रालयातून महत्त्वाचे, गोपनीय कागद.चोरीला जातात.

दिल्लीतल्या सीजीओ कॉम्प्लेक्स मधे लागलेल्या आगीत अनेक महत्वपूर्ण विषयांच्या फाईल्स जळून खाक झाल्या आहेत. या फाईल्स ऑडीटर्सना हव्या होत्या. सीजीओ कॉम्प्लेक्स हे सचिवालयाप्रमाणे असते. केंद्र सरकारची अनेक कार्यालये येथे आहेत.

हे सर्व घडवून आणलं असाही अर्थ निघेल ना ?

हे सर्व म्हणजे काय पूर्ण लिहा काय काय ते .
Crpf वर हल्ला आणि airettike आशा दोन घटना घडल्या आहेत

पूर्ण आणि अचूक लिहीले तरी तुम्ही हवे ते अर्थ काढत असाल तर कशाला विटाळ करून घ्या ? तुम्हाला जे समजायचे ते वरून समजलेले असते.

Crpf वरचा हल्ला हा सरकार प्रायोजित होता आस जर कोनी म्हणत आसेल तर पाकिस्तान त्या गोष्टीचं भांडवल का करत नाही .
स्वतला निरपराध सिद्ध करण्यासाठी पाकिस्तानकडे ह्याच्या पेक्षा चांगली संधी आसू शकत नाही .का पाकिस्तान सरकार सुधा भारत सरकारच्या कटात सामील आहे

आहो आयक्यु सम्राट
तुमच्या कोर्स मधे असंबद्ध प्रतिसादांचा वेगळा क्लास असतो का ?
नाही म्हणजे तुम्ही जसा कुतर्क करता तसाच कुतर्क असाही होऊ शकतो म्हणून उदाहरण दिले की ते विवडत बसता.
पण अमित शहाला पाकिस्तानने येऊन सांगितले का २५० मेले म्हणून असा प्रश्न काही तुम्हाला पडत नाही. जैश ने नुकसानीची कबुली दिली असे म्हणता म्हणजे जैश चे आनि तुमचे खासगी संबंध असावेत . नाही का ?

बाकी मनमोहनसिंगांच्या काळात वीस लाख चिन्यांचा खातमा झाला यावर बोलायला तयार नाही. कदाचित या निवडणुकीत जरी हे उघड झाले तर २०१९ ची निवडणूक हातातून जाईल अशी भीती तुम्हाला वाटत असेल.

किरणुद्दीन, तुम्ही ज्या पद्धतीचे फोटो इथे टाकत आहात हे सगळे काँग्रेस च्या आयटी सेल ने फॉरवर्ड केलेले आहेत , मग जेंव्हा भाजप आयटी सेल ने जुने व्हिडिओ पसरवलेत अस म्हणता तर काँग्रेस काही मागं नाही , प्रश्न हा आहे कि तुम्हाला हे मान्य आहे का नाही कि इंडियन एअरफोर्स ने पाकिस्तान मध्ये जैशे च्या अतेरिकी प्रशिक्षण केंद्रावर हमला केला कि नाही , जर तो मान्य असेल तर तो करण्यासाठी ज्या पद्धतिने राजकीय इच्छाशक्ती दाखवली आहे त्या बद्दल तुम्ही सरकारच्या भूमिकेचं स्वागत करता का नाही. दुसरे असे कि काँग्रेस ने ह्या आधी पाकिस्तान सोबत २ युद्ध जिंकली आहेत ह्या बद्दल नक्कीच त्या वेळेस चे जे पंतप्रधान होते मग इंदिरा गांधी असू किंवा लालबहादूर शास्त्री ह्यांनि मोठी भूमिका बजावली होती, फक्त पुढे आपण पाकिस्तान सोबत केलेल्या तहात एक बांगलादेशाची निर्मिती सोडली तर फार काही मिळवले नाही , कश्मीर प्रश्न हा तसाच आहे , आणि दुसर हे कि आता परिस्तिथी बदलली आहे पाकिस्तान हा अणवस्त्रधारी देश आहे अशा परिस्थिती ते नेहमी धमकी देतात कि आम्ही त्याचा वापर करू आणि त्यामुळेच २६/११ च्या वेळेस आपण थोडी नरमाईची भूमिका घेतली, पण आताच्या सरकारने नुसतीच सैनिकी कारवाई केली नाही तर सर्व शक्य असलेल्या मार्गाने पाकिस्तान ला पार नरमाईची धोरणावर आणायला भाग पाडले .
राहिला प्रश्न जे लोक क्या कारवाईच्या विरोधात बोलणाऱ्यांना किंव्हा सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना राष्ट्रदोही ठरवण्याचे , तर हे समजून घ्या कि हा प्रश्न काही गल्लीतल्या राजकारणाचा नाही आहे , पाकिस्तान मधील आयटी सेल ह्या गोष्टीवर बारीक नजर ठेवून अशा लोकांच्या मतांचा वापर आपल्या देशावर आरोप करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्थरावर करतात , तुम्ही बघितलेच असेल कि ज्या प्रमाणे बरखा दत्त , दिग्विजय , कपिल सिब्बल, ममता बॅनर्जी सारख्याची मतं पाकिस्तानी सरकारने वापरून भारतावर आरोप केले कि तेथील सरकार हे सगळे इलेक्शन मुळे करत आहे , त्यांच तर म्हणणं हेच आहे कि आमच्या इथे काही अतिरेकी नाहीत.
https://twitter.com/ani_digital/status/1103294103704481798
मी हे समजू शकतो कि काँग्रेस ने हे म्हणायला पाहिजे कि आम्ही सुद्धा पाकिस्तान ला चांगला उत्तर देऊ पण सर्जिकल स्ट्राईक चे पुरावे द्या म्हणजे देशाच्या लष्कर आणि सरकार च्या विरोधात बोलण्यासारखे आहे . भाजपच्या आणि काँग्रेस च्या वाचाळवीरांनी अश्या वेळेस जरा समजून उमजून बोलले पाहिजे . मीडियाचा तर विषयच खोल आहे २६/११ च्या वेळेस त्याचा फायदा घेऊन पाकिस्तान मधल्या कंट्रोल रूम मधून इंस्ट्रुकॅशन्स देत होते टेरररीस्ट ला. तरीही त्यांना अजून समजत नाही आहे .

नमते साहेब
माझे मागचे प्रतिसाद वाचले असते तर एव्हढं मोठं टंकायचं आणि तुम्हाला उत्तर द्यायचा वेळ दोन्ही वाचले असते..

१) २०१४ च्या आधी चीन मधे घुसून वीस लाख चिनी मारले त्याबद्दल बोलायला भीती वाटते का ?
२) अमित शहाला २५० चा आकडा पाकिस्तान्यांनी दिला का ?
३) जैश ए मुहम्मदने नुकसानीची कबुली दिली हे कानात येऊन सांगितले का ?

केवळ यावरच बोला. अजिबात दुसरा मुद्दा आता नको. कितीही जोरात मुद्दा आला तरी दाबून ठेवा.

ओ ते जरा वरच्या ऐक्यूचे बरळकुमार आहे इतकेच.. तुम्ही लिहू लिहू रक्त आट वाल नि ते म्हनन चलो ये तो भोत अत्छी बात हुइ !! !

जान्दो गं गाकिनारेपे छोड दो उसकू ..

१) २०१४ च्या आधी चीन मधे घुसून वीस लाख चिनी मारले त्याबद्दल बोलायला भीती वाटते का ?- हे ज्ञान आघात आहे , कृपया या वर प्रकाश टाकावा ..चीन खूपच भोळे भाबडे आहे वाटत एवढ करून सुद्धा त्यांनी राहुल गांधींना चीन ला बोलावले ..
२) अमित शहाला २५० चा आकडा पाकिस्तान्यांनी दिला का ?- अमित शाह सरकारचे भाग आहेत , त्यांनी हे म्हंटले तर काँग्रेस का दुखले . तुम्ही पण सांगा कि आम्ही पण एवढे मारले ६५ आणि ७१ ला. काही हरकत नाही.
३) ३) जैश ए मुहम्मदने नुकसानीची कबुली दिली हे कानात येऊन सांगितले का ? जर पाकिस्तान हे मान्यच करत नाही कि अश्या नावाची काही संघटनच पाकिस्तान मध्ये नाही तर मग काँग्रेस त्याला मान्य करते का.. भारताने जी भूमिका घेतली ती अतिशय योग्य आहे .

वीस लाख मारले यावर अविश्वास ? सैन्य दलांचा अपमान केलात तुम्ही. सैन्याने शौर्य गाजवून शत्रूसैन्य गारद केले आणि तुम्ही म्हणता तुमचा विश्वास नाही ? पुढच्या वेळी तुम्हालाच मोजदाद करायला पॅराशुट बांधीन सोडू. देशद्रोही भाजप्ये कुठले !

Pages