पुलवामा हल्ला आणि भारत पाकिस्तान संबंध

Submitted by हेला on 27 February, 2019 - 10:27

पुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.

ह्या सर्व प्रश्नांवर एकत्रित एका ठिकाणी चर्चा करायला हा धागा काढत आहे. मायबोलीच्या नियमात राहून चर्चा करा हि विनंती... वेबमास्टर ह्या धाग्याला कुलूप घालणार नाहीत अशी अपेक्षाही आहेच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सरकारनी अतिरेकी किती मारले ते ३० आसू द्या किंवा २५० त्यामुळे देशहित धोक्यात येत नाही .
पण आपल्याच सरकार वर शंका घेणे मात्र देशाचे हित संकटात आणू शकत

तुम्ही पण सांगा कि आम्ही पण एवढे मारले ६५ आणि ७१ ला. काही हरकत नाही.

हे आणखी एक आलय आयक्यूच्या बुरख्यात..
झुरळं मारलेली कार बाबा कधी ??? कितने आदमी मारे हा एकुनच लय मरदानगीचा विृषय वाटायलाय तुम्हाला.. ..
पाच वर्ष चुलीत गेली. आता किती मारले ही फायनल गोळाबेरीज असनार असल्याच्या घाईत आलाय जनू.. लाज वाटली पाहिजे रे बाळानो. .. कळप प्रण्यांसाठी असतो रे। माणसासाठी नाही.. झुंड बनके काय जास्तीत जास्त करता येते आपल्याला?? ??समोरचा थोडा काळ बिळात जाईल इतकेच.. यामुळे तुम्हाला आर्गज्म. ?? वा रे व्वाा !!

बोला पुृडे.. तुम्ही करणार त्याच्या दुप्पट विषयांतर करणार मी आता. . ते अडमिन बसलेच आहे पापकार्न खात।।

65 नि 71 एकांचे नि 2019 दुसर्यांच्े काय रे भामट्यानो ??? राष्ट्वादाचा झ तरी माहिती आहे का रे तुम्हाला देशद्रोह्यानो. ???

भर चौकात अशा विचारसरणीच्या लोकांचे तिआनमेन केले पाहिजे।।

ह्या धाग्याला तरी बंद पडण्याचे प्रयत्न होऊ नका देऊ

अजून बऱ्याच घडामोडी बाकी आहेत भविष्याच्या पेटाऱ्यात

एक जनरल प्रश्न - आर्म्ड फोर्सेस ज्यावेळि एखादी मोहीम/कार्यवाही करते तेंव्हा त्या मोहीमेचे चित्रीकरण अथवा डीटेल्स प्रकाशित करते का? ह्यापूर्वी अशा अनेक मोहीमा झाल्या असतील, त्याचे काही पुरावे सरकार पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध करते का?

आर्म्ड फोर्सेस च्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे ही चिंतेची बाब आहे.

<< एक जनरल प्रश्न - आर्म्ड फोर्सेस ज्यावेळि एखादी मोहीम/कार्यवाही करते तेंव्हा त्या मोहीमेचे चित्रीकरण अथवा डीटेल्स प्रकाशित करते का? ह्यापूर्वी अशा अनेक मोहीमा झाल्या असतील, त्याचे काही पुरावे सरकार पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध करते का? >>
------- ह्यापूर्वी अशा अनेक मोहीमा झाल्या असतील का झाल्या होत्या ?

अनेक घटना भारताच्या इतिहासात २०१४ नंतर प्रथमच घडल्या आहेत, पैकी हे सर्जिकल स्ट्राईक केल्याची' जाहिर वाच्यता' हे एक उदाहरण. विषयाचे अज्ञान म्हणा किंवा प्रकरणाचे गांभिर्य नाही किंवा सरकारचा नसलेला धाडसी पणा दाखवणे.

<<, आर्म्ड फोर्सेस च्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे ही चिंतेची बाब आहे. >>
----------- आर्म्ड फोर्सेस बद्दल कुणालाही शंका नाही. ते त्यांचे काम व्यावस्थित करत आहेत.
सरकारच्या कामगिरी वर प्रश्न आहेत. सरकारच्या विश्वासार्हते वर प्रश्न आहेत. त्या अडचणीच्या प्रश्नाला दुसरीकडे वळवायचे खेळ बंद केले तर सैन्याबद्दलचा आदर आहे असे दिसेल.
अन्यथा सैन्याचा तुम्ही लोकच अपमान करत आहात, हे लेक्षात ठेवा.

65 नि 71 एकांचे नि 2019 दुसर्यांच्े काय रे भामट्यानो ??? राष्ट्वादाचा झ तरी माहिती आहे का रे तुम्हाला देशद्रोह्यानो. ???

भर चौकात अशा विचारसरणीच्या लोकांचे तिआनमेन केले पाहिजे।।
पावट्या
थोडा संयम ठेवा इथे चर्चा चालली आहे .मनाला न पटणारे युक्तिवाद सुधा वाचायची तयारी आसावी लागते .
बाकी तुम्ही स्वतःला खूपच त्रास करून घेत आहात .

चिनी मारल्याच्या दाव्यावर शंका घेणारे देशद्रोही आता काय गप्पा सांगतात ? हा आर्म्ड फोर्सेसचा अपमान आहे.
मी सुद्धा अधून मधून चीन ला जाऊन एक तरी शहर उडवून येतच असतो.

सर्व प्रतिसादात किती दहशतवादी मेले ते सान्गा असा सूर दिसत आहे. एक लक्षात घ्या की ३० किलो RDX घेउन दारने पुलवाम्यात ४० जणाना मारले. त्यात झालेल्या नुकसानाचे फोतो सर्वनी पाहिले आहेत्/असतील. भारताच्या वायुदलाने आपण १००० किलो बॉम्ब टाकले असे सान्गितले आहे. यावरुन कल्पना येऊ शकते की किती नुकसान होऊ शकेल. शिवाय हे बॉम्ब लेझर गायडेड यन्त्रणा वापरून टाकले आहेत. त्यामुळे एकदा कोठे बॉम्ब टाकायचे ते coordinats fix झाले कि विमानाना अगदी हल्ल्याच्या जागी जायची जरूर नाही. कारण बॉम्ब वरून न टाकता दुरून टाकायचे आहेत. हे माहित नसल्याने कदाचित आपली विमाने नुसतीच तिथे कुठेतरी बॉम्ब टाकायला गेली होती व तसे करून ती परतली असे अनेकाना वाटत आहे. .

हल्ला झाल्याबरोबर ३०० किलो आरडीएक्स होते असे सांगितले जात होते. हा ३०० आकडा आवडीचा आहे का ? ते ही उच्च प्रतीचे आरडीएक्स.
वाहीन्यांचा दाखला देऊन सरकारतले लोक सुद्धा ३०० किलो आरडीएक्स बद्दल बोलत होते. पण वाहीन्यांनी स्फोट झाल्याबरोवर ३०० किलो हा आकडा कुठून काढला ?
उच्चप्रतीच्या १०० किलो आरडीएन्स मुळे ३० मजल्यांची इमारत उद्ध्वस्त होऊ शकते. तिथे एकच बस कशी उडाली ? आख्खा ताफा नसता का गेला ? नंतर ते ६० किलो झाले. नंतर ३५ किलो. आता दहा किलो असल्याचे सांगितले जाते.

सरकार कडून टीव्हीच्या बातम्यांचे खंडन का होत नाही ? डिबेट मधे छाती ठोकून घेत असतात की ते.

या मुळेच सरकार वर कुणाचा विश्वास राहीलेला नाही.

आता २५० अतिरेकी आणि ३०० मोबाईल हे कुठून समजले एव्हढे सांगावे आणि पुढच्या मुद्द्याकडे वळावे. मुद्दामून बगल मारू नये. भरकटवू नये.

३०० / २५०. याची स्पष्टीकरणे.

ह्या चार पाच वर्षात सोशल मीडिया चा वापर राजकारणी लोक करू लागलेत .
मग आपल्या सोयीचे खोटे व्हिडिओ सोशल मीडिया वर टाकण्यात येवू लागले कमेंट करण्यासाठी सुधा पगारी लोक ठेवणे असले प्रकार सर्वच पक्ष करत आहेत आणि ह्या चढाओढीत अनेक गैरसमज पसरवले जावू लागले .त्या मुळे असले गैरप्रकार रोकण्या साठी उपाय योजना करावी आशि मागणी सुधा आता होते आहे .
यूट्यूब upload होणाऱ्या प्रत्येक video's cha मुळ स्तोत्र काय आहे त्याचा स्पष्ट उल्लेख व्हिडिओ खाली आला पाहिजे ही मागणी मागे तीच कारण आहेत.
प्रिंट मीडिया तर खूप पूर्वी पासून प्रत्येक पक्षांनी वाटून घेतली आहे त्यामुळे ऐकच बातमी विविध वर्तमान पत्रात वेगवेगळ्या स्वरूपात आस्ते .
इथे कमेंट करणारे कोणत्या तरी पक्षाचे कार्यकर्ते आहेत किंवा पगारी नोकर आहेत आसा समज खूप जणांनी करून घेतला आहे त्यामुळे निःपक्ष चर्चा होताना दिसत नाही .
काही ठराविक प्रकारची मत ठराविक आयडी देत आहेत .आणि त्या मुळे सत्य शोधण्यात अडचणी येत आहेत.
त्या मुळे चर्चा कमी आणि वादविवाद जास्त आस स्वरूप आल आहे

ती भाजपची अध्यक्ष आहे. त्या पक्षाला मतं मिळतील म्हणून तुम्हाला भीती वाटते हे तुमचे स्टेटमेण्ट आहे. शिवाय पुन्हा मी त्या पक्षाचा कुणी नाही असा आवही आणताय. त्या पक्षाची वकिली कराल तर जबाबदारी पण घ्या. द्या स्पष्टीकरणे.

54002524_1037318183144166_4215688921339658240_n.png

ज्याना बालाकोटवर केलेल्या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले याची माहिती हवी आहे त्या सर्वांनी पाकिस्तानचा व्हिसा घेऊन तिकडे जावे व याची देही याची डोळा खातरजमा करून घ्यावी. तसेच परत आल्यावर येथे फोटो द्यावेत म्हणजे आमची शंका दूर होईल.

<सर्व प्रतिसादात किती दहशतवादी मेले ते सान्गा असा सूर दिसत आहे>
लोकांना मराठीची शिकवणी घ्यायची तातडीची गरज आहे.
आधी हवाई हल्ला झाला हे मान्य कराची फुटकी टेप होती. आता तुम्ही तीनशेचा आक डा कुठून काढलात आणि पसरवलात यात यांना किती दहशतवादी मेले असा सूर दिसतो.

१००० किलोच्या बाँब्स बद्दल आजच्या इंडियन ए क्स्प्रेसमध्ये काहीबाही छापलंय.

चीन मधे वीस लाख चिनी मेले यावर शंका घेणारे आता तुम्हाला मोजदाद करायला पाठवतो म्हणू लागलेत.
मी स्वतः चीनची शहरे उद्ध्वस्त केलीत. मला काय सांगता ?

बरं. जाऊ द्या. यांना जमणारे कामही नाही ते. आता शेवटचं. आणि रामराम !

माजी लष्करप्रमुख व्ही.के.सिंग ( तेच ,जन्मतारीख बदलून सेवा वाढवून घेण्याचा प्रयत्न करणारे ) म्हणतात, “ भारत इस्त्राइल सारखा होऊ शकत नाही कारण भारतात लष्कराला आणि यंत्रणेला प्रश्न विचारणारे लोक आहेत “

व्ही.के.सिंग यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी एक प्रश्न.

पुण्यातला म्हात्रे पूल सगळ्यांना माहित आहे.

कोण आहेत हे म्हात्रे ?

१९३६ साली जन्मलेले रविंद्र हरेश्वर म्हात्रे इंग्लंडमध्ये भारताचे राजनैतिक अधिकारी होते.

४ फेब्रुवारी १९८४ ला बर्मिंगहॅम मधल्या आपल्या ऑफिसातून लेकीच्या वाढदिवसाला केक घेऊन बाहेर पडलेल्या रविंद्र म्हात्रे यांच अपहरण झाल.

जम्मू काश्मिर लिबरेशन फ्रंट ह्या संघटनेने जबाबदारी घेतली आणि एक मिलियन पौंड आणि भारतातल्या तुरुंगात असलेल्या मकबूल भट्ट ह्या अतिरेक्याला सोडून द्याव अशी मागणी केली.

मकबूल भट्ट काश्मिरी अतिरेकी होता ज्याचा १९७१ च्या लाहोर विमान अपहरण प्रकरणात हात होता , १९६६ साली चकमकीत पोलीस अधिकाऱ्याच्या मृत्यूला कारणीभूत झाल्याचा आरोप होता.
१९७६ साली मकबूल भट्ट पकडला गेला आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावलेली होती.
मकबूल भट्ट ने दयेची याचना करणारा अर्ज केलेला होता.

तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधीनी अतिरेक्यांच्या मागण्या मान्य करायला नकार दिला आणि इंग्लंडला रविंद्र म्हात्रे यांची सुटका करण्यासाठी कारवाई करण्याच आवाहन केल.

६ फेब्रुवारी रोजी अतिरेक्यांनी रविंद्र म्हात्रे यांचा खून करून बर्मिंगहॅम शहरापासून २० किलोमीटर अंतरावर त्यांचा देह टाकून दिला.

राष्ट्रपतींनी मकबूल भट्ट ची दयेची याचना फेटाळून लावली आणि ११ फेब्रुवारी १९८४ रोजी मकबूल भट्ट ला तिहार तुरुंगात फाशी देऊन त्याला तिथेच दफन करण्यात आल.

पुण्यातल्या म्हात्रे पुलाला ह्या रविंद्र म्हात्रे यांच नाव दिलेलं आहे.

आता व्ही.के.सिंग.

तर कंदाहार प्रकरणात अतिरेक्यांना घेऊन विमानाने कोण गेलेलं आणि कुठल्या सरकारने अजहर मसूदला पकडल आणि कुठल्या सरकारने सोडून दिलेलं हे सगळ्या देशाला माहित आहे.

त्यावेळची वर्तमानपत्रे वाचली तर रविंद्र म्हात्रे यांच्या मृत्युनंतर इंदिरा गांधीनाही टीका सहन करावी लागलेली पण अतिरेक्यांना सोडणार नाही ह्या भूमिकेवर त्या ठाम राहिल्या.

रवींद्र म्हात्रे राजनैतिक अधिकारी होते, त्यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर झालेला आघात भरून येणारा नव्हता ,पण त्यावेळी इंदिरा गांधीनी कशाला प्राधान्य दिल ?

सैन्याच मनोबल वाढवायला लष्करी नेतृत्व आणि राजकीय नेतृत्व कस असाव लागत हे इंदिरा गांधी आणि तत्कालीन लष्कर प्रमुखांनी वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे.

तुम्ही ज्या सरकारची भलामण करताय त्या सरकारने कंदाहार प्रकरणात कारवाई केली असती किंवा मसूद अजहर सोडायला नकार न देता राजनैतिक पातळीवर पाकिस्तानवर दबाव आणला असता तर देश तुमच्या पाठीशी उभा राहिला नसता का ?

इतिहासात जर तर ला अर्थ नसतो.

लोक जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारतात आणि तुम्हाला उत्तर द्याव लागत त्याचा अर्थ आपण लोकशाही व्यवस्थेत राहतोय एवढाच असतो.

सरकारला लोकांनी प्रश्न विचारावेत आणि सरकारने त्याला उत्तर द्यायला बांधील असाव हि भारताची लोकशाही राज्यव्यवस्था आहे श्रीमान सिंग.

तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याची तुमची हिंमत नाहीये किंवा तुमच्याजवळ समर्पक उत्तर नाहीयेत म्हणून तुम्ही लष्कराच्या, गोपनीयतेच्या आड दडू पाहताय का ?

इंदिरा गांधीना त्यावेळेला पण लोकांनी प्रश्न विचारले आणि त्यांनी जाहीरपणे उत्तर दिली.

इंदिरा गांधी ना पत्रकार परिषदेला घाबरत होत्या ना लोकांना उत्तर द्यायला.

तुम्हाला प्रश्न विचारले तर उर्मटपणे तुम्ही " प्रश्न का विचारता ? " म्हणून उलट विचारताय ह्यातच तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे.

एवढच.

By @Anand Shitole

१९७१ च्या जनरल इलेक्शन मध्ये ३५२ जागा काँग्रेस I नी जिंकल्या होत्या पण युद्ध नंतर झालेल्या इलेक्शन मध्ये ह्या जागा कमी होवून १५४ वर आल्या .
ह्याची काय कारण असतील

अजून एक...

अंगलट आलं की अतिउत्साही लोकांच्या नावे बिलं फाडून इथल्या लोकांना देशद्रोही म्हणणारे, पाकिस्तानात जा म्हणणारे... हवाई हल्ल्यचे दावे सरकारने कुठं केले असे विचारणारे. खालची लिंक एकही ओळ न गाळता वाचा. ज्या गोष्टी व्हायरल होतात त्यांना मंत्री पाठिंबा कसा काय देतात ?

https://www.bbc.com/marathi/india-47480176?fbclid=IwAR2uRjSC_xjtFZqLnKFj...

१९७१ च्या जनरल इलेक्शन मध्ये ३५२ जागा काँग्रेस I नी जिंकल्या होत्या पण युद्ध नंतर झालेल्या इलेक्शन मध्ये ह्या जागा कमी होवून १५४ वर आल्या .
ह्याची काय कारण असतील >>> म्हणूनच युद्ध केलं असं म्हणायचं होतं का तुम्हाला ? बरं.

१९७१ नंतर पुढल्या जनरल इलेक्शन कोणत्या वर्षी झाल्या होत्या हे सांगणार का?

१९७१ च्या युद्धात विजय मिळवल्यानंतर इंदिरा गांधी विक्रमी बहुमतांनी निवडून आल्या पाहिजे होत्या पण तसे घडले नाही उलट त्यांच्या जागा कमी झाल्या .
ह्याचा अर्थ भारतीय जनतेला इंदिरा जी चा आक्रमक पना आवडला नाही .

१९७७

हे सगळं वाचून मला नोटाबंदीची आठवण येतेय. नोटाबंदी घोषित होताच मोठ मोठ्या आकड्यांना अगदी उधाण आलं होतं. आणि मग शेवटी पण मोदींनी नोटाबंदी करायची हिंमत तरी दाखवली असा केविलवाणा सूर लागला होता. आताही तेच चाललंय.
--------------
कोंग्रेसच्या काळात सीमापार कारवाई झाली होती तर त्याचे फोटो का नाहीत, असे प्रश्न इथे मायबोलीवर विचारले गेलेत. हा सैन्यावर अविश्वास नाही का? देशद्रोह नाही का?
-----------
२५०-३०० चा दावा सरकारने केला नाही, मोदींनी केला नाही (चार दिवसांपूर्वी म्हणजे अहलुवालिया बोलले, तोप र्यंत अमित शहांनी सुद्धा केला नाही). एअर स्ट्राइकची बातमी येताच वाहिन्यांवर याबद्दल चर्चा झाली असेल, तेव्हा त्यात भाजप प्रवक्ते आणि समर्थकही असतीलच. त्यातल्या कोणी तरी तेव्हा , ३०० चा आकडा आला नाहीए. असं काही सांगता येत नाही, असं म्हटलं होतं का?
फेसबु कवर तर १००० पर्यंतचीही बोली लागलेली पाहिलीय.
माय बोलीवरचे धागे पुन्हा वाचले, तर ३०० वाल्या पोस्ट्स सापडणार नाहीतच, याची खात्री आहे का?

<१९७१ च्या युद्धात विजय मिळवल्यानंतर इंदिरा गांधी विक्रमी बहुमतांनी निवडून आल्या पाहिजे होत्या पण तसे घडले नाही उलट त्यांच्या जागा कमी झाल्या .
ह्याचा अर्थ भारतीय जनतेला इंदिरा जी चा आक्रमक पना आवडला नाही>
१९७१ नंतर पुढल्या निवडणुका १९७७ साली झाल्या होत्या.

तेव्हा लोकांनी १९७१ च्या बांग्ला मुक्तिची आठवण ठेवून मतदान केले होते. हा फारच उच्च प्रतीचा निष्कर्ष आहे. यावर बोलणे माझ्या अल्पमतीला परवडणारे नाही. खरं तर राजेश १८८ यांच्याशी चर्चा करू शकेल अशी मायबोलीवर एकच व्यक्ती आहे. सचिन पगारे. अन्य कोणी याशिवधनुष्याला बोटही लावू नये.

Pages