पुलवामा हल्ला आणि भारत पाकिस्तान संबंध

Submitted by हेला on 27 February, 2019 - 10:27

पुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.

ह्या सर्व प्रश्नांवर एकत्रित एका ठिकाणी चर्चा करायला हा धागा काढत आहे. मायबोलीच्या नियमात राहून चर्चा करा हि विनंती... वेबमास्टर ह्या धाग्याला कुलूप घालणार नाहीत अशी अपेक्षाही आहेच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

यांनी सुद्धा शब्द फिरवले. आधी माध्यमांत ३०० + अतिरेकी मेले म्हणून सूत्रां करवी माहिती पेरली. ती खोटी ठरू लागली, लोक त्याबद्दल बोलू लागले, तर ते एअर स्ट्राइकचा पुरावा मागतात अशी मखलाशी.

दोन्ही देशातील देशांनी सत्ता धारी व विरोधी पक्षांनी मीटिंग घेवून सहमती होणारे विषय आणि सहमती न होणारे हे विषय हे वेगळे करून
कमीत कमी प्रश्न सुटण्याची पहिली पायरी म्हणून सहमती होणाऱ्या विषयावर तरी चांगले संबंध निर्माण करावेत

>>

शिमला करार का कायसं झाल्तय म्हणं.

कश्मिरी लोकांवर हल्ला करणेच चूकीचे आणी नीचपणाचे आहे. उलट या मुळेच त्या लोकांना आपला म्हणजे भारतीयांचा राग येऊन परकेपणा निर्माण होईल.

-- रश्मी ताई.. काश्मिरी लोक भारतीय नाहीत का?

रश्मी ताई.. काश्मिरी लोक भारतीय नाहीत का?>>>>> हेला, आपण त्यांना आपलेच मानतोय. माझे वाक्य चूकले त्याबद्दल दिलगीर आहे.

आपल्या देशासाठी जीव गमावलेल्या शहिदांच्या पत्नींच्या मागणीवर अनिरुध्द.. हसत आहे इथे.
<<

कैच्या कै लॉजिक !
मी त्या बातमीवर हसलो आहे.

आता त्या वीरपत्नीने जर खरोखरच एअर स्ट्राईकचे पुरावे मागितले असतील तर त्यांना बालाकोटमधे किती दहशतवादी मारले गेले याचे पुरावे दाखवणे, सरकारला जरुरीच आहे. मात्र बालकोट एअर स्ट्राईकचे राजकारण करणार्‍या भारतातल्या पाकिस्तानी पिट्टूंना तो बातमीतला कोल्हापूरी पुरावाच द्यायला हवा.

आवंतर : बालाकोट एअर स्ट्राईकमधे नेमके किती दहशतवादी मारले गेले याचा कोणता ही खुलासा सरकारने व वायुदलाने अधिकॄतपणे कोठेही केलेला नाही.

बालाकोट एअर स्ट्राईकमधे नेमके किती दहशतवादी मारले गेले याचा कोणता ही खुलासा सरकारने व वायुदलाने अधिकॄतपणे कोठेही केलेला नाही.>>
निवडणुका झाल्यावर करणार का? आणि मग अमित शहा बोलला ते खोटं समजायचं का?

अधिकृतपणे हो. अनधिकृतपणे केलाय. म्हणजे काय छात्या फुगवायला आकडा सांगितला. पण तो खोटा पडतोय हे दिसलं की अधिकृतपणे काही नाही.
--------------
पुलवा मा बळींचं , एअर स्ट्राइकचे राजकारण तर भाजपच करतंय.
-------------------
-
हे असं चाललंय. उत्तर नसलं की आपल्या विरोधकांना , प्रश्न विचारणार्‍यांना थेट पाकिस्तानचे हस्तक असा शिक्का मारायचा. चांगली पळवाट आहे.

आणि ह्या स्ट्राईकचे पुरावे मागितले जात आहेत तसेच मागेही सर्जिकलचे पुरावे मागितले होते लोकांनी. मागच्या अनुभवाने शिकणे तर सोडा पण थोडीतरी लाज वाटायला हवी तर ती डोक्याला गुंडाळून उलट लोकांना देशद्रोही म्हणत आहात म्हणजे लोक तुमचा सर्जीकल करणार हे नक्की.
ते फेकडं तिकडं गुजरातेत म्हणतंय की सरकारला प्रश्न विचारायचा ट्रेण्ड आलाय म्हणून.

पदरात पडलं.. Proud

म्हणजे बालाकोट स्ट्राईक झालाच नाही का? किती दुर्दैवी आहे हे सगळं. Sad
नवीन Submitted by सस्मित on 7 March, 2019 - 17:05
<<

भारतीय वायुसेनेने पाकिस्तानी हद्दीत घुसून एअर स्ट्राईक केला हे उघड सत्य आहे. त्याशिवाय वायुसेना ऑफिशियल पत्रकार परिषद घेणारच नाही. सध्या गदारोळ सुरु आहे तो उतावळ्या भारतीय मिडीयांने सांगितलेल्या मरणार्‍या दहशतवाद्यांच्या आकड्यावरुन.

तसेही किती दहशतवादी मारले गेले याला काहिही अर्थ नाही. भारताने पाकिस्तान विरोधात कोणती ही कारवाई करायची भाषा केली की पाकिस्तान लगेच "आमच्याकडे अणुबॉब्म आहे व तो वापरायला आम्ही कधीही मागे-पुढे पाहाणार नाही" अशी धमकी भारताला द्यायचा व या आधीची भारतीय सरकारे ह्या धमकी समोर लगेचच मान झुकवायची.

मात्र पाकव्याप्त काश्मिरातच काय आम्ही तुमच्या मुख्यभुमिवर हल्ला करु शकतो, तुम्हाला काय करायचे आहे ते करा असा इशारा पाकिस्तानला या एअर स्ट्राईकने मिळाला व नेहमी अणुबॉबची भाषा बोलणारा पाकिस्तान शांततेच्या भाषेवर आला.

सध्या गदारोळ सुरु आहे तो उतावळ्या भारतीय मिडीयांने सांगितलेल्या मरणार्‍या दहशतवाद्यांच्या आकड्यावरुन. >> स्पॉटनाना सारखा दिसणारा एक मनुष्य गुजरातीत २५० मेल्याचे सांगत होता.

सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही असे कुणी म्हटलेले आहे कळेल का ? कॉपी पेस्ट केले तर आभारी राहीन.

हवाई दलाने दिलेले फोटोग्राफ्स पण कुणी अपलोड केले तर हा विषयच इथे संपेल..

बालकोट एअर स्ट्राईकचे राजकारण करणार्‍या भारतातल्या पाकिस्तानी पिट्टूंना >> म्हणजे भाज्प्याना .. तेच तर राजकारण करत आहेत. अभिनंदन चे फोटो लावून प्रचारयात्रा सुरु आहेत. शहिदांचे टाळू वरचे लोणी खायची ह्यांची सवय जुनी आहे.

तसेही किती दहशतवादी मारले गेले याला काहिही अर्थ नाही.

''आता '' तुमाला त्यात काही अर्थ वातत नाही याचे आता आम्हाला काहीहि विशेष वाटत नाही ..तमाम बरळकुमारां चे यूटर्न आम्ही गेले कित्येक , महिने बघत आहोत ..

फक्त असे भम्पकयुक्त बरळन्याची सवय प्रयत्नपूर्वक सोडल्यास स्वता लाच फायदा होईल असे सुचवितो ..

आयटी सेल मार्फत हल्ल्याचे व्हिडीओ देशभरात व्हायरल करायचे. विकत घेतलेल्या मीडीयावरून ३५०, ३००, २५० असे आकडे सांगायचे. कुणी संशय घेतला की पाकिस्तानच्या बाजूचा.
मायबोलीसारख्या ठिकाणी मात्र अहो असतात काही उत्साही, त्यांच्याकडे लक्ष देऊ नये असे पवित्रे घ्यायचे.
आंतरराष्ट्रीय मीडीया काय म्हणतो हे सांगितले की म्हणजे तुमचा हवाई दलावर विश्वास नाही का ? पाकवर विश्वास आहे असे प्रतिप्रश्न करायचे..

शहीद पत्नी ला सुद्धा देशद्रोही म्हणायचे आणि ते लक्षात आल्यावर ताबडतोब दुसरीकडे लक्ष डायव्ह्रर्ट करायचे.

या पद्धतीने चालू आहे सगळं. चालू द्या. आम्ही इग्नोर मारतोय.
मात्र व्हिडीओज खोटे असल्याचे समोर आलेले आहे.

हो.. विडीओज तर कुठल्याशा काँप्युटर गेम मधील एडिट करुन वापरलेले ग्राफिक्स आहेत म्हणे.

हॅट्स ऑफ टु भाजप आयटी सेल..!

बीबीसी ने चार व्हिडीओज चे सत्य बाहेर आणले आहे.
एका व्हिडीओत ३०० लोकांच्या कबरी खणताना रडणारे मुस्लीम दिसतात. हा व्हिडीओ चार पाच वर्षे जुना आहे. भूकंपाच्या वेळचा. अजून एक असाच व्हिडीओ आहे.
तर हल्ल्याचे दोन व्हिडीओ आहेत. एक व्हिडीओ गेम मधला आहे तर दुसरा इंग्रजी सिनेमातला.

माझा आधीचा प्रतिसाद इग्नोर करून देशद्रोही देशद्रोही हा खेळ चालूच आहे. पुरावे मागणा-या या व्यक्तीला देशद्रोही म्हटले जात आहे का ? या व्यक्तीचा कोल्हापुरी चप्पलने सत्कार करायचा आहे का ?

https://abpmajha.abplive.in/india/wife-of-pulwama-attck-martyr-asks-proo...

Crpf चे ४० जवान दहशत वादी हल्ल्यात मारले गेले आणि ती सत्य घटना आहे कारण ४० जवानांचे अंत्यसंस्कार त्यांच्या मूळगावी केले gele आहेत .
म्हणजे ह्याला पुरावा आहे ४० जवान हे दहशत वादी हल्ल्यात मारले गेले नसून अचानक सर्दी खोकला सारख्या आजाराने मेले आहेत aasach विरोधी पक्षांना सांगायचं होते पण पुढे काय संकट येईल त्याची जाणीव झाल्यामुळे हा दहशतवादी हल्ला BJP नी च केंद्र सरकार chya मदतीने घडवला आसा आरोप ममता बनर्जी आणि कोण कोण ह्यांनी केला .
पण स्व सैन्यावर स्वतःच हल्ला घडवून aanyanacha प्रकार जगात कोठे सुधा घडू शकतो का .
आणि हा आरोप सत्य आहे आस समजलं तर पाकिस्तान साठी सुवर्ण संधीच आस्ती .
जगा समोर भारतातला त्यांनी नागडा करून जगभर फिरवलं आसात .हे द्वेष नी आंधळे झालेल्या विरोधी पक्षांना समजू नये .हे दुर्दैव.
पहिली गंभीर चूक ही विरोधी पक्षांनी च केली आहे .
त्या नंतर airstrike कडे येवूया हयात अतिउत्साही न्यूज चॅनल जास्त दोषी आहेत .
विरोधी पक्ष म्हणत आहे airstrike झालाच नाही
झाला पण अतिरेकी मेलेच नाहीत .
आशि दोन मत आहेत .
अहो आसला jabarat विरोधी पक्षमि मिळणे परम भाग्यच आहे .अजुन ऐक airstrike विरोधी पक्षांना च्या सहमतीने करायची संधी सरकार नी गमावली .
मुरलेला pm आसता तर रात्रीस खेळ मधल्या अना सारखं विरोधी पक्षांच्या मता शी हो हो म्हणून सहमत झाला आसता आणि अजुन ऐक airstrike Karun परत ३०० अतिरेकी मारले आस्ते

हे लोक हवाई दलात काम करतात का ? यांना प्रश्न विचारले की हवाई दलाची बदनामी कशी काय होते ?
या बातम्या व्हायरल होत असताना कुणीही प्रश्न विचारायचे नाहीत का ?

<< विकत घेतलेल्या मीडीयावरून ३५०, ३००, २५० असे आकडे सांगायचे. कुणी संशय घेतला की पाकिस्तानच्या बाजूचा. >>

------- ३० काय किंवा ३०० काय... आपण ३००० अतिरेक्यांना यमसदनी पाठविले असे मानायचे...

पण आधी पुलवामा घटनेची चौकशी करा. कुणाच्या हलगर्जीपणामुळे ३०० किलोची स्फोटके तिथे पोहोचली (३०० काय मॅजिक नंबर आहे का ?), एव्हढा मोठा फौजफाटा रस्त्याने जाताना त्याच्या सुरक्षेची काहीच काळजी घेतल्या गेली नव्हती.

२५० लोकांना मारले म्हणणा-या एका तडीपार टकल्याबद्दल काय म्हणणार ? अतिउत्साही ? त्याचा दोष नसेलच म्हणा.

शहीद पत्नी सुद्धा देशद्रोही आहे यांच्या दृष्टीने, फक्त तडीपार, दंगलखोर, चोर तेव्हढे देशद्रोही नसावेत कदाचित..

<< अंतर्गत सुरक्षा व्यवस्था हे ऐकनेव कारण सुधा नाही ह्या प्रसंग मागे >>
----- असे मानणे कधीपासुन सुरु झाले? आणि पुढे कधी पर्यंत मानायचे ?

<< फक्त कश्मिरी वरच देशात हल्ले झालेत पूर्ण चुकीचं आहे .
इथे हल्ले होण्यासाठी जात,धर्म,भाषा,जिल्हा काही ही कारण चालत . >>
------- जबाबदार कोण ?
हल्ले अनेक ठिकाणी होतात.
(१) रस्त्याने चालत असताना, अपघात झाला... समोरच्या व्यक्तीला मारझोड केली.
(२) घराची, जमिनीची जागा रिकामी केली नाही.... समोरच्या व्यक्तीला मारझोड केली/ मारले.
(३) रेल्वे मधे जागेच्या प्रश्नावरुन भांडण/ मारामारी.
(४) नळावर पाण्याच्या रांगेवरुन भांडण/ मारामारी.
(५) शेत/ जमिन/ प्रसिद्धी.... या व अशा हजार क्षुल्लक कारणांनी हल्ले मारामार्‍या होतात.
वाईट आहेच, पण हे सर्व रँडम प्रकारात मोडतात... त्या बद्दल मला येथे काहीच म्हणायचे नाही आहे. तो संपुर्ण वेगळा विषय आहे.

काश्मीर मधे पुलवामा येथे हल्ला झाला. ४० जवान मारल्या गेले. हे खुप वाईट झाले. आता त्या हत्येचा 'बदला' म्हणुन देशात इतरत्र काश्मीरी बांधवांवर हल्ले करायचे, त्यांच्यावर चुकीचे खटले दाखल करायचे हे अत्यन्त चुकीचे आहे.... घातक आहे. हे सर्व भारतीय आहेत, ते निरपराधी आहे. हल्ल्याशी त्यांचा काहीही संबंध नाही आहे.
याच "बदल्याच्या" भावनेने देशात विविध ठिकाणी काश्मीरींवर हल्ले होत असती ल तर अजुनच चिंताजनक परिस्थिती आहे.

असे हल्ले होत असतील, आणि समाजातील "सज्जनतेचा" बुरखा पांघरलेले लोक हल्ल्याचा साधा निषेधही करत नसतील आणि वर जोडीला शब्दांची फिरवा-फिरवी करुन हल्ल्याचे गांभिर्य कमी करत असतील तर परिस्थिती नाजुक आहे. अतिरेक्यांनी स्फोट घडवुन जेव्हढी हानी होणार नाही त्यापेक्षा कितीतरी मोठी हानी अशा बदल्याच्या भावनेने झालेल्या हल्ल्यांमुळे होते.

<<भारत हा ऐक देश आहे हे खरं आहे पण तो ऐक अलग अलग राज्याचं समूह आहे हे कितीही नाकारले तरी सत्य आहे >>
------- पेरावे तसे उगवते. अभ्यास करा... चुक दिसले तर चुक आहे हे म्हणायचे धाडस बाळगा. चुका कोण करत आहे हे बघुन मग आपली 'सावध' प्रतिक्रिया तयार करु नका. राज्यात आणि केंद्रात आपलेच सरकार आहे म्हणौन म्हणुन अगदीच गुळगुळीत लिहायचे टाळा. अशाच गुळगुळीत पणामुळे याच राज्यात हिंसक जमावाचा एक कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी बळी पडला. कायदा आणि सुव्यावस्था झोपली आहे का ? कुणालाच याचे सोयरसुतक नाही ? काहीही वैषम्य वाटत नाही ?

सर्व प्रकारचा हिंसाचार, सर्व काळात, चुकीचा आहे. निशस्त्र व्यक्तीवर हल्ला होत असेल तर धिट पणा दाखवा आणि आपला निषेध नोंदवा.

बायकोने तिच्या लव्हरला लिहिलेली प्रेम पत्रे तिच्या कपाटातून घेऊन नवरा कोर्टात गेला,

बायको बोलली , हे चोरलेले कागद आहेत, नॉट व्हॅलीड

------------

नवर्याच्या हॉटेलातील लफडयाचे बायकोने डिटेक्टिव्हद्वारे फोटो मिळवले,

पण कोर्टात नवरा बोलला , हे फोटो चोरून काढले आहेत, म्हणून बेकायदेशीर आहेत

-----------

Proud
धन्यवाद भाजपा

<< प्रत्येक हल्ल्याचे विषय वेगळे आस्ले तरी भावना ऐकाच आस्ते हा आपला नाही परका आहे . >.

------ कुठल्याही प्रकारे हल्ल्याचे समर्थन करणे किंवा त्याचे गांभिर्य कमी करणे चुकीचे आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहे हे समजले नसेल तरच असे गांभिर्य कमी करणे, किंवा चर्चा भरकटवणारे लॉजिक पुढे आणायचे प्रकार घडणार.

अपेक्षित पोलराझेशन होते आहे का ? पेरावे तसे उगवणार... चांगले आचार/ विचार पेरा भविष्यात त्याची फळे मिळतील.

Pages