हर्पेन ह्यांचे अभिनंदन!!

Submitted by मार्गी on 7 March, 2019 - 04:19

हर्पेन ह्यांनी चद्दर ट्रेक पूर्ण केला

समस्त माबोकरांना नमस्कार. आपले प्रेरणास्थान असलेल्या हर्पेन ह्यांनी नुकताच गोठलेल्या झांस्कर नदीवरचा चद्दर ट्रेक पूर्ण केला आहे. हर्पेन ह्यांच्या सर्व कर्तृत्व शिखरांप्रमाणे हा त्यांचा अनुभवही थरारक आहे. तेव्हा समस्त माबोकरांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले अनुभव सविस्तर शब्दबद्ध करावेत. हा चद्दर ट्रेक काय असतो, तयारी काय लागते, तांत्रिक बाबी काय असतात, काय अनुभव येतात हे सर्व त्यांनी सांगावे. शिवाय दर वर्षी हा ट्रेक करताना ट्रेकर्स मृत्युमुखी पडतात. त्याबद्दलही सांगावे. आणि पर्यटक- ट्रेकर्सचा लदाखच्या पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांपर्यंत सर्व बाबींची चर्चा करावी अशी त्यांना विनंती आहे.

गोठलेल्या झांस्कर नदीलाही उन्हाळा सुरू होताना पाझर फुटतो. तसा हर्पेन ह्यांच्या लेखणीलाही पाझर फुटेल व आपल्यावर तिची बरसात होईल ही आशा करतो! Happy

धन्यवाद!

Group content visibility: 
Use group defaults

अभिनंदन हर्पेन!!!
चद्दर ट्रेकबद्दल सविस्तर लिहाल अशी अपेक्षा. वाचायला आवडेल.

अभिनंदन ह्रपेन,
तुमची सामाजिक कामे, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि इतर फिटनेस संबंधित उपक्रम सांभाळून तुम्ही जे करत आहात ते कौतुकास्पद आहे

खुप छान. अभिनंदन हर्पेन.
अनुभव व फोटो दोन्ही येऊ द्या.+११११

तुमची सामाजिक कामे, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि इतर फिटनेस संबंधित उपक्रम सांभाळून तुम्ही जे करत आहात ते कौतुकास्पद आहे+११११११११११११११११११११११

सिम्बा, 'म भा दिवस उपक्रम संयोजन' समाविष्ट करायचं राहिल ह्यात Happy

अभिनंदन हर्पेन !
चद्दर ट्रेकबद्दल सविस्तर लिहाल अशी अपेक्षा. वाचायला आवडेल. >+१

अरे काहीही काय चालवलंय मार्गी. मला काय लिहावे तेच कळत नाहीये.

तरीपण
१. एकतर हे ललीत लेखन होऊ शकत नाही.
२. हे ललीत असेल तर टुकार आहे तू इतरवेळी लिहितोस तसे चांगले नाहीये. (विषयच असा त्यामुळे Wink )
३. मला चांगले लिहायला जमत नाही.
४. मी तुला सांगितलेले तू कुठे ऐकलेस (मभादि मधे सहभाग घे म्हणून सांगितलेले)
५. काही अनुभव असे असतात की त्यांना शब्दबद्ध करताच येत नाही.

शिवाय उन्हाळा चालू व्ह्यायला अजून अवकाश आहे.

ऑन सिरियस नोट. मनापासून आभार.
बर्‍याच जणांनी दिलेल्या दुजोर्‍यामुळे अजूनच दडपण येतंय.
मी प्रयत्न करेन लिहायचा पण हातून पुर्ण होईल की नाही सांगता येत नाही.

मी प्रयत्न करेन लिहायचा पण हातून पुर्ण होईल की नाही सांगता येत नाही.>>

हर्पेन, प्रयत्न करणार म्हणजे नक्की यशस्वी होणार! Happy
तेंव्हा लिखाणाचे मनावर घे!

मी प्रयत्न करेन लिहायचा पण हातून पुर्ण होईल की नाही सांगता येत नाही.>> तुम्ही असं म्हणताय? ह्यावर विश्वास ठेवायचा का? बरं Happy
एवढ्या कठीण धावण्या-चढण्या Happy पुर्ण करताय तर लेखही पुर्ण कराल ओ.

मार्गी यांच्या विनंतीला पूर्ण अनुमोदन.. फार खुसखुशीत शब्दात मार्गी यांनी आपले मत मांडले आहे.. हर्पेन, अभिनंदन व लिखाणासाठी शुभेच्छा

अभिनंदन हर्पेन
मार्गिला अनुमोदन, हा ट्रेक करून आलेले फार कमी लोक ओळखीतय आहेत त्यामुळे हा अनुभव शब्दबद्ध झालाच पाहिजे

Pages