पुलवामा हल्ला आणि भारत पाकिस्तान संबंध

Submitted by हेला on 27 February, 2019 - 10:27

पुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.

ह्या सर्व प्रश्नांवर एकत्रित एका ठिकाणी चर्चा करायला हा धागा काढत आहे. मायबोलीच्या नियमात राहून चर्चा करा हि विनंती... वेबमास्टर ह्या धाग्याला कुलूप घालणार नाहीत अशी अपेक्षाही आहेच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कश्मिरी लोकांवर हल्ला करणेच चूकीचे आणी नीचपणाचे आहे. उलट या मुळेच त्या लोकांना आपला म्हणजे भारतीयांचा राग येऊन परकेपणा निर्माण होईल. अशा हल्ला करणार्‍या लोकांनाच चार लोकात फटकावले पाहीजे म्हणजे परत असले उद्योग करणार नाहीत.

तिकडे जेव्हा पर्यटन बहरात होते तेव्हा खरच शांतता होती. शेवटी प्रश्न पोटा पाण्याचा असतो पण आपल्या इथले अती उत्साही माकडे सगळ्यावर पाणी फिरवतात.

तिकडे जेव्हा पर्यटन बहरात होते तेव्हा खरच शांतता होती.>>>> हे वाक्य काहीसे खटकले. काश्मिर खोर्‍यातील मुख्य व्यवसाय म्हणजे पर्यटनावर आधारीत उद्योग. पण अतिरेक्यांच्या कारवायांमुळे पर्यटकांची संख्या कमी झाली. त्यामुळे शांतता होती तोपर्यंत पर्यटन बहरात होते. आताही पर्यटक जातात पण त्यांची संख्या कमी आहे.

फक्त कश्मिरी वरच देशात हल्ले झालेत पूर्ण चुकीचं आहे .
इथे हल्ले होण्यासाठी जात,धर्म,भाषा,जिल्हा काही ही कारण चालत .
भारत हा ऐक देश आहे हे खरं आहे पण तो ऐक अलग अलग राज्याचं समूह आहे हे कितीही नाकारले तरी सत्य आहे

फक्त काश्मिरींवर हल्ले झालं असं कोणी म्हटलंय का इथे?
की बाकीच्यांवर हल्ले झाले, म्हणून काश्मिरींवर झालेले चालतात?

जम्मूत बसस्थानकामध्ये ग्रेनेड हल्ला झाल्याची बातमी आहे. भारत पाकिस्तान संबंध ताणले गेले असताना आणि जम्मूत वातावरण तंग असताना हा हल्ला झाला आहे. अतिरेक्यांचे आणि त्यांच्या धन्याचे म्हणजे पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआएचे काश्मीर मध्ये शांतता नांदू नये म्हणून असे प्रयत्न सुरूच असतात असे दिसते.

जम्मूत बसस्थानकामध्ये ग्रेनेड हल्ला झाल्याची बातमी आहे >> श्या!! मला वाटलं होतं कि एअर स्ट्राईक मुळे आयएसाय घाबरंलं असेल.

फक्त काश्मिरींवर हल्ले झालं असं कोणी म्हटलंय का इथे?
की बाकीच्यांवर हल्ले झाले, म्हणून काश्मिरींवर झालेले चालतात
हल्ले konavarch झाले नाही पाहिजेत ते समर्धनिय नाही .
पण सर्वच प्रश्न मुळापासून न सोडवणे ही आपली वृत्ती आशा हल्ल्यान प्रोत्साहित करते. .
अंतर्गत सुरक्षा व्यवस्था हे ऐकनेव कारण सुधा नाही ह्या प्रसंग मागे

जम्मूत बसस्थानकामध्ये ग्रेनेड हल्ला झाल्याची बातमी आहे >>
अरेरे, नोटबंदी केली, सर्जिकल केले, एअर स्ट्राईक झाले, आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकड्यांना एकटं पाडलं तरी हे चालूच.

साधं सर्वांच्या माहितीच पण इथल्या विषयाशी संबंधित नाही .
पण उदाहरण सांगतो .
मुंबई ,गुजरात ह्या राज्यात हिंदी भाषा आसलेल्या लोकांवर हल्ले झाले .
साऊथ मध्ये सुधा हा प्रश्न ज्वलंत आहे पण आपण त्यांच्या ग्रुप मध्ये जावून जेव्हा नेट वर चर्चा वाचतो आपल्याला सुधा जाणवते .
पण केंद्र सरकार नी हा विषय किती धोकादायक वळण घेवू शकतो ह्या विष्यी अभ्यास केला का ? To सोडवण्यासाठी migration Kami राहवे म्हणून कोणती योजना निर्माण करू अमलात आणली का. तर उत्तर नाही .
प्रश्न सोडवून जेवढं फायदा निवडणुकी मध्ये होत नाही त्या पेक्षा किती तरी जास्त फायदा प्रश्न न सोडवण्यामुळे होतो हे सर्व राजकीय पक्षांना चांगलं माहीत आहे

हल्ले झाले ना
प्रत्येक हल्ल्याचे विषय वेगळे आस्ले तरी भावना ऐकाच आस्ते हा आपला नाही परका आहे .
फक्त विरोध करायचं म्हणून शब्दांचे खेळ करू नका

मुंबई ,गुजरात ह्या राज्यात हिंदी भाषा आसलेल्या लोकांवर हल्ले झाले .
<<
महाराष्ट्र व गुजरातमधे सरसकट सर्व हिंदी भाषिकांना मारहाण नव्हती झाली. फक्त भैय्या व बिहारींना चोपले होते, त्या-त्या राज्यातील पब्लिकने. हे बिहारी व भैय्ये प्रत्येक राज्यात मार खातात तरीही निर्लज्जा सारखे पुन्हा मार खायला परत येतात.

किती तरी धागे किती तरी मत वाचली पण आस कोण्ही सुचवलं कव.
दोन्ही देशातील देशांनी सत्ता धारी व विरोधी पक्षांनी मीटिंग घेवून सहमती होणारे विषय आणि सहमती न होणारे हे विषय हे वेगळे करून
कमीत कमी प्रश्न सुटण्याची पहिली पायरी म्हणून सहमती होणाऱ्या विषयावर तरी चांगले संबंध निर्माण करावेत

तुम्ही काश्मिरींवरच्या हल्ल्यापासून चर्चा जाणूनबुजून भटकवताय.
एका राज्यपालाने काश्मिरींवर बहिष्कार टाका असं म्हटलंय.
गेल्या काही दिवसांत काश्मिरी विद्यार्थी , प्राध्यापकांना संघटितपणे धाकदपटशा दाखवून पळवून लावले जाते आहे.
अशाने त्यांच्यासमोर कोणता मार्ग उरेल?
आता इथे कोणीतरी काश्मिरी पंडितांचा मुद्दा काढेलच. एका चुकीची दुरुस्ती दुसऱ्या चुकीने होऊ शकत नाही.

वा वा. भारताच्या एकात्मतेचे सुंदर चित्र दिसते आहे. बिहारी, युपीवाल्यांना मारण्याचे समर्थन.
यांच्या राष्ट्रवादाची नक्की काय कल्पना आहे?

<
महाराष्ट्र व गुजरातमधे सरसकट सर्व हिंदी भाषिकांना मारहाण नव्हती झाली. फक्त भैय्या व बिहारींना चोपले होते, त्या-त्या राज्यातील पब्लिकने. हे बिहारी व भैय्ये प्रत्येक राज्यात मार खातात तरीही निर्लज्जा सारखे पुन्हा मार खायला परत येतात.
ते निर्लज पोटासाठी झालेत ना त्यांची चूक आहे ना मुंबई गुजरात ची .
हे केंद्र सरकारची चूक आहेत प्रत्येक प्रस्नावर केंद्र सरकार सजक हवे .
केंद्रांनी हा विषय लक्षात घेवून up Bihar मध्ये युद्ध स्तरावर काही योजना आखून त्या पूर्ण केल्या पाहिजे होत्या ज्यामुळे प्रश्नाची दहागता कमी झाली असती .
प्रश्न सोडवला तर राजकारण करून मत कोणत्या विषयावर मागायची हा गंभीर प्रश्न त्यांच्या समोर येतो ना (, हयात सर्व असले bjp काँग ,etc)

TN Sheshan ह्यांनी निवडणुकीतील गैर प्रकार रोखले ना म्हणजे आपल्या राज्य घटनेत सर्व प्रश्नांची उत्तर आहेत पण आपण आता पर्यंत ऐकाच कलमाचे दोन तुकडे करून स्वर्थाच फक्त सांगायचे हेच काम करत आलो आहे .
फक्त राज्य घटना जशी आहे तशीच राबवली तरी देशांतर्गत सर्व प्रश्न सुटतील

"आम्ही नुकसान करू शकतो ही जाणीव तेव्हढी करुन देणे" हे आणि केवळ एव्हढेच माफक ध्येय बालाकोट हल्ल्यामागे असल्याचे हवाई दलाने तसेच श्री अहलुवालिया यांनी स्पष्ट केले. "आम्ही असतो तर बदला घेऊन कायमचा बंदोबस्त केला असता, आमच्या एका मृत्यूबाबत त्यांचे दहा मारले असते" अशा वल्गना भाजप नेत्यांनी 'युपीए' काळातील दहशतवादाबद्दल केल्या. पण पूर्वी ज्या वल्गना केल्या त्या कृतीत उतरवू शकत नाही हे मान्य करावेच लागले असते. ही मोठी अडचण झाली. स्वत:ची प्रतिमा भव्य दिव्य ठेवण्याचे नार्सिसिस्ट व्यक्तिमत्त्वावर दडपण असते. चुका मान्य करणे परवडत नाही. 250-300-350 दहशतवाद्यांना ठार मारले अशा बातम्या प्रसिद्धी करण्यामागे हाच हेतू असेल.

नाही नरेश. अगदी विपरीत परीस्थितीत सुद्धा कश्मीर मध्ये पर्यटन सुरु होतं, कारण त्यावेळी राजा ट्रॅवल्स हे तिकडे जास्त टुर नेत होते. त्यांचे धाडस बघुन तिथल्या लोकांनी अतीरेक्यांच्या धमक्यांकडे दूर्लक्ष करुन आपला व्यवसाय चालू ठेवला. त्यांचे बघून इतर लोक पण तिथे जायला लागले. मला साल मात्र नक्की कोणते ते आठवत नाही. तिथल्या लोकांच्या मुलाखतीत स्पष्ट होतं की आम्ही विपरीत स्थितीत सुद्धा लोकांना कश्मीर दाखवु, कारण आमच्या कुटुंबाना कोण पोसणार? ही वस्तुस्थिती आहे.

जरा कुठे पाक-भारतात युद्धजन्य स्थिती निर्माण झाली की लोक इथल्या मुसलमांनाकडे संशयाने बघायला लागतात हे भारतीय मुस्लिमांकरता अत्यंत अपमानजनक व हानीकारक आहे. लोकांनी परस्पर विश्वास दाखवला की कुठलीच वाईट घटना, म्हणजे निदान दंगली वगैरे होणार नाहीत.

जरा कुठे पाक-भारतात युद्धजन्य स्थिती निर्माण झाली की लोक इथल्या मुसलमांनाकडे संशयाने बघायला लागतात हे भारतीय मुस्लिमांकरता अत्यंत अपमानजनक व हानीकारक आहे. >> अगदी खरे. पण हा घातक दृष्टीकोण ज्या संघटनेमुळे निर्माण झाला तीच्याच राजकीय पक्षाचे सध्या सरकार आहे. 'हिरवे रक्त', 'कटलेट्स', 'लांडे', 'दहशतवादी जमात' ई.ई. मानहानीकारक विशेषणे कोणती संघटना सहेतुक पसरवते ते सर्वांनाच माहित आहे.

जरा कुठे पाक-भारतात युद्धजन्य स्थिती निर्माण झाली की लोक इथल्या मुसलमांनाकडे संशयाने बघायला लागतात हे भारतीय मुस्लिमांकरता अत्यंत अपमानजनक व हानीकारक आहे.
<<

यासाठी ते स्वत:च जबाबदार आहेत.
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यात पाकिस्तान जिंकला तर फटाके वाजवणे, म्यानमारमधील मुस्लिमांवर तेथील सरकार अत्याचार करते म्हणून येथे दंगे करुन शहिद स्मारक तोडण्यापासून ते महिला पोलिसांचा विनयभंग करण्यापर्यंत त्यांची मजल जाते. निरपराध कारसेवकांना रेल्वेच्या डब्यात बंद करुन व बाहेरुन पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्यात येते. भारतात आजपर्यंत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमधे पाकिस्तानी दहशतवाद्यांची मदत करायला इथला कोणीना-कोणी स्थानिक मुसलमान सदैव तत्पर असतो हे पुराव्यानिशी सिद्द झाले आहे. मग इतर धर्मीय भारतीय ह्या लोकांकडे संशयाने बघतात तर त्यात त्यांचा दोष काय ?

रश्मी, काश्मीर मध्ये पर्यटक पुर्वी शांततेच्या काळात जायचे त्यामानाने कमी जातात असेच मी लिहिलेय. त्यात सुध्दा विदेशी पर्यटकांचे अपहरण झाल्यानंतर अनेक देशांनी त्यांच्या नागरिकांना काश्मीरमध्ये जाण्यासाठी विशेष काळजी घेण्यासाठी कळविले आहे. म्हणून परदेशी पर्यटक सहसा भारतात काश्मीर मध्ये पुर्वी सारखे जात नाहीत. काश्मीर मधील अशांत परिस्थितीचा पर्यटन व्यवसायावर खुप प्रतिकुल परिणाम झालेला आहे.

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकचे पुरावे ज्या कुणाल हवेत त्यांनी कोल्हापुरात जावे, तिथे मस्तपैकी कोल्हापुरी स्टाईलने एअर स्ट्राईकचे सर्व पुरावे मिळतील. Lol

आपल्या देशासाठी जीव गमावलेल्या शहिदांच्या पत्नींच्या मागणीवर अनिरुध्द.. हसत आहे इथे.
एअर स्ट्राईक जाऊद्या परंतु ह्यांच्या स्वार्थी अमानुष मानसिकतेचे पुरावे असे जागोजागी मिळून येतात.

Pages