Submitted by हेला on 27 February, 2019 - 10:27
पुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.
ह्या सर्व प्रश्नांवर एकत्रित एका ठिकाणी चर्चा करायला हा धागा काढत आहे. मायबोलीच्या नियमात राहून चर्चा करा हि विनंती... वेबमास्टर ह्या धाग्याला कुलूप घालणार नाहीत अशी अपेक्षाही आहेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मसूद अझहरला १९९४ मध्ये
मसूद अझहरला १९९४ मध्ये श्रीनगर मध्ये अटक झालेली (काँग्रेसच्या काळात)
तेंव्हापासून कित्येक विदेशी पर्यटकांचं अपहरण करून त्याला सोडवायचे प्रयत्न झाले, पण ते होऊ दिल नाही.(काँग्रेसच्या काळात)
मग विमान अपहरण झालं. भारतीय कमांडोजची टीम कारवाईला तयार होती आणि अजित डोवाल (उर्फ गावठी जेम्स बॉण्ड) आणि वाजपेयींनी मात्र कारवाईला नकार दिला.
वाजपेयींच्या सेक्रेटरी, एन के सिंग, चा मेव्हणा शशी भूषण सिंग तोमर त्या फ्लाईट मध्ये असल्याने कमांडो ऍक्शनला नकार दिला. ऍक्शन घेण्याचे तीन चान्स भारतीय सैन्याकडे होते पण तिन्ही त्यांनी गमावले फक्त वाजपेयींच्या (त्यांच्या सेक्रेटरीच्या) हट्टाखातर.
त्यातून मसूद अझहर, अहमद ओमर साइड शेख आणि मुश्ताक अहमद झरगर नावाच्या तीन नामचिन अतिरेक्यांना सोडून द्यावे लागलं.
नंतर या मसूद ने घातलेला हैदोस माहितीच आहे तुम्हाला. २००८ च्या मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्याला तोच कारणीभूत होता.
लक्षात ठेवा वयक्तिक sacrifice ची वेळ आली की नेहमी मागे हटणारे हे लोक आता देशभक्तीचं नाव घेऊन वोटची भीक मागतायत.
संदर्भ: काश्मीर आणि वाजपेयींची वर्षे, ए एस दुलात
ए एस दुलात कंदहार अपहरणाच्या वेळी RAWचे प्रमुख होते.
पाकिस्तान आणि भारत कळीचा
पाकिस्तान आणि भारत कळीचा प्रश्न काश्मीर
का प्रजा मुस्लिम राजा हिंदू
राजा चा निर्णय भारतात सहभाग
पाकिस्तानचा विचार मुस्लिम बहूसंख्य राज्य नियमानुसार पाकिस्तान मध्ये हवे
बांगला बोलणारे पाकिस्तान ला नकोसे त्यांच्या वर अत्याचार परिणाम बांगला देश ची निर्मिती ,
काश्मिरी संस्कृती भारत आणि पाकिस्तान पेक्षा वेगळी स्वतंत्र देश हवा
दोन्ही देशांचा विरोध
करण bhogolic सीमा ,
सीमा रेषा खुल्या मैदानात येणार
दोन्ही देशांना सामरिक दृष्ट्या प्रतिकूल
मग फक्त वर्चस्व ची लढाई ताकत बरोबरीची नाही .
Aikta महाराष्ट्र पाकिस्तनपेक्षाही varchad आहे gdp मध्ये .
मग दहशतवाद .
आसा इतिहास आहे.
काश्मीर काश्मिरी लोक दोन्ही देश फाट्यावर मारून स्वर्धाची लढाई लढत आहेत .
काश्मीर independent करायला दोन्ही देश कधीच तयार होणार नाहीत .
त्या मुळे युद्ध भूमी पासून दूर राहून पाकिस्तानी आणि हिंदुस्तानी popat पंची करत आहेत
@हेला, बाय द वे पुस्तकात
@हेला, बाय द वे पुस्तकात लिहिलं जाणाऱ्या सर्व गोष्टी सत्य असतात याबद्धल मला खात्री नाही... अशा पुस्तकांमध्ये लिहिलेल्या गोष्टींबाबत तुमचं मत काय ? ते सत्य आहे कि नाही किन्वा त्यातिल किती सत्य आहे हे आपण कसं काय ओळखू शकतो यावर तुमच्यासारख्या जाणकारांनी प्रकाश टाकावा..
बाय द वे पुस्तकात लिहिलं
बाय द वे पुस्तकात लिहिलं जाणाऱ्या सर्व गोष्टी सत्य असतात याबद्धल मला खात्री नाही... अशा पुस्तकांमध्ये लिहिलेल्या गोष्टींबाबत तुमचं मत काय ?>> ब.मो. पुरुन्दरे लिखित सहित्याला याच मापात तोलता कि त्यासाठी दुसरा तराजु वापरता..??
गोपाळ गोडसे , चंदेरी पाने
गोपाळ गोडसे , चंदेरी पाने ह्यांनाही हाच नियम लावायचा का ?
(No subject)
धाग्याचा विषय काय आणि ट्रोल्स
धाग्याचा विषय काय आणि ट्रोल्स बरळतायत काय ?
https://www.esakal.com/desh
https://www.esakal.com/desh/congress-leader-gives-call-pm-narendra-modi-...
साहित्याला साहित्य असच
साहित्याला साहित्य असच तोलायचं न. यु की त्येंना संदर्भ ग्रंथ म्हणायची फ्याशन आलीय का?
द अॅक्सिडेंटल प्राइम
द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर विसरलात? पुस्तक आणि चित्रपटही.
पुलवामा हल्ला हा पाकिस्तानी
पुलवामा हल्ला हा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला नसून ती एक दुर्घटना होती असे ट्विट कॉंग्रेसी वाचाळ दिग्विजय सिंग याने केले आहे. हे कॉंग्रेसी पाकिस्तान प्रेमापोटी कोणत्या थराला जातील याचा काहीच नेम नाही.
--
भारतातील मोदी सरकार उलथवून टाकण्यासाठी २०१४ साली कॉंग्रेसी मण्या अय्यर पाकिस्तानकडे मदत मागायला गेला होता. बहुतेक याच मदतीची आस कॉंग्रेसला आजही आहे म्हणूनच कॉंग्रेसी नेते व समर्थक पाकिस्तानचे गोडवे गात आहेत.
Mufti Abdul Rauf Detained:
Mufti Abdul Rauf Detained: Jaish-e-Mohammed Chief Masood Azhar's Brother Taken Into Preventive Custody By Pakistan
https://www.ndtv.com/india-news/jaish-chief-masood-azhars-brother-taken-...
FATF ने घालून दिलेल्या डेडलाईनमध्ये पाकिस्तानला तातडीची कारवाई करणे आवश्यक झाले आहे.
गेल्या आठवड्यात भारताने पाकिस्तानच्या सुपूर्द केलेल्या कागदपत्रांमध्ये त्या मुफ्ती अब्दुल रौफ व हमाद अझहर ह्यांची नावे आहेत. ह्या दहशतवाद्यांकडे plan B तयार असेलच पैसे पुरवण्याचा. 'तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो' असं न होता ग्लोबल प्रेशरमुळे का होईना, दहशतवाद्यांवर फास आवळत आणला पाहिजे. पाकिस्तानला ह्यासाठी भरपूर शुभेच्छा!
एकिकडे इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांनीही पाकिस्तानला धमकी दिली आहे की इराणच्या जवानांवर हल्ले चढवणाऱ्या दहशतवाद्यांवर पाकिस्तानने कारवाई केली नाही तर इराणचे लष्कर पाकिस्तानात घुसून ही कारवाई करेल. आपल्या जवानांवर पुलवामा येथे १४ फेब्रूवारीला हल्ला करायच्या एक दिवस आधी पाकिस्तानातल्या दहशतवादी संघटनेने इराणच्या सीमेवर तैनात असलेल्या २७ जवानांचा आत्मघातकी हल्ल्यात बळी घेतला होता. ह्यातल्या जैश-अल-अदल अश्या काहितरी नाव असलेल्या संघटनेलाही पाकिस्तानी गुप्तचर संघटना ISI चा पाठिंबा असल्याचा इराणचा आरोप आहे. इराणी 'Revolutionary Guards' च्या मेजर जनरलनी पाकिस्तानचे ह्या सगळ्यावर गप्प बसणे पाकिस्तानला महागात पडेल असा दम दिलाय. इराणी quds force च्या मेजर जनरलनी तर सर्वच शेजारी देश पाकिस्तानवर भडकले आहेत ह्याची जाणीव करून दिली होती आणि पाकिस्तानने स्वत:च्या भविष्याचा विचार करावा असं सांगितलं होतं. काही दिवसांपुर्वी अफगाणिस्ताननेही असंच सुनावलं होतं.
एकदा ह्यांचं शेजारच्या घरांत उचापत्या करणं थांबलं तर घरातले problems सोडवायला थोडी सोल्युशन्स शोधून, थोडं प्रेशर देवून त्या त्या वेळी असलेल्या सरकारला काही करणं भाग पाडता येईल.
दिग्विजय सिंगना परत नर्मदा
दिग्विजय सिंगना परत नर्मदा परिक्रमेवर पाठवायला हवं.
<<भाजपे कितीही नाचकाम करू देत
<<भाजपे कितीही नाचकाम करू देत , सत्य हेच आहे ....
काँग्रेसने कसाबला पकडले , काँग्रेसने फाशी दिली.>>
थोडी जरी लाज शरम असेल ना तर असले फालतू क्लेम करू नये.. अहो साधी एके ४७ पण नव्हती पोलिसांकडे , शूर तुकाराम ओंबळेंनी आपला जीव पणाला लावला त्या हरमखोराला पकडायला , किती ते काँग्रेस ची चापलुसी करायांची ह्याची काही मर्यादा ..जर एवढीच हिम्मत होती तर का नाही त्यावेळस पाकिस्तान ला धडा शिकवला , का भोपाळ गॅस दुर्घटनेचा हत्यारा अँडरसन ला सोडले , का पाकव्याप्त काश्मीर बनून दिला , का ३७० कलम लागू करून दिले , का काश्मिरी पंडितांना स्थलांतरित होऊन दिले. अहो साधं १० दिवस पुरेल एवढा पण दारुगोळा साठवण्याचे कष्ट घेतले नाहीत काँग्रेस ने ..तरी सुद्धा आम्ही हे केले आणि ते केले..
12 विमानं एकट्याने उडवत
12 विमानं एकट्याने उडवत मोदींनी जसा पुलवामा हल्ला केला तसंच कसाबलापण काँग्रेसनेच पकडला.
१. तुकाराम ओंबळे बंदोबस्तावर
१. तुकाराम ओंबळे बंदोबस्तावर असलेले साधे पोलिस होते. कमांडो नाही. साध्या पोलिसांकडे अशी हत्यारे नस्तात. कारण ही अमेरिका नाही. इथे सामान्य नागरिकांकडे बंदुकी नसतात. दहशतवादी हल्ले, युद्ध , हत्यारबंद दंगेखोरांच्या दंगली सांभाळण्याचे काम साध्या पोलिसांचे नसते. ह्या कामासाठी वेगळी युनिट्स (पोलिस, सेना- निमलष्करी दले) असतात. काय की लहानपणापासून सुरक्षित कोषात जगलेल्या पोटभरु जमातीला चुरु चुरु बोलता येते मात्र मूलभूत माहितीच्या अभ्यासाच्या नावाने बोंब असते. कारण त्या माहितीचा पोट भरण्यासाठी काही उपयोग नसतो ना!
२. दहा दिवस पुरेल इतका दारुगोळा वगैरे बातम्या कोणाच्या काळात येत आहेत? मागच्या पाच वर्षात सैन्यासाठीचे बजेट कमी कोणी केले? पाकिस्तानला तीन मोठ्या फुलफ्लेज युद्धात कोणी हरवले? ते असेच हरवले का शाखेतल्या लाठीकाठीवर..
३. काश्मिरी पंडीत प्रश्न: फक्त ब्राह्मण पंडीत आहेत म्हणून पुळका येतो विशिष्ट लोकांना. मागच्या पाच वर्षात एकाचे तरी पुनर्वसन केले आहे का भाजपने? फक्त त्यांच्या नावावर सामान्य हिंदूंना भडकावून मतांची टोपली भरायची अस्ते?
४. पाकिस्तानला योग्य वेळी योग्य धडे शिकवले आहेत. चार वेळा युद्धात धूळ चारली आहे. दोन तुकडे केलेत. तुमच्या पर्यंत फक्त काँग्रेस कशी चुकीची एवढीच माहिती येत असेल तर तुमच्या सर्कलचा दोष. २६-११ नंतर योग्य तो बदला घेतला सरकारने आणि सैन्याने. आता तुम्ही त्याचे पुरावे मागा फक्त मग बघतो तुमची सैन्यावरची निष्ठा आणि विश्वास.
उगाच भाजपची तळी उचलायची म्हणून काँग्रेसवर आगपाखड करायची म्हणजे खाल्ल्या घराचे वासे मोजण्याचा कृतघ्न प्रकार आहे. पण काय की काँग्रेसनेच सामान्य जनतेला बोलण्याचा, व्यक्त करण्याचा हक्क मिळू दिला म्हणून तुमची चर्पटपंजरी चालून जाते.
<12 विमानं एकट्याने उडवत
<12 विमानं एकट्याने उडवत मोदींनी जसा पुलवामा हल्ला केला तसंच कसाबलापण काँग्रेसनेच पकडला.>
मोदींनी नेमकी हीच गोची करून ठेवली आहे काँग्रेस ची..भाजप जर म्हणत आहे कि मोदी मुळे हे करू शकलो तर काँग्रेस ला जड जाणारच आहे ते , कारण जेंव्हा काँग्रेस ची वेळ होती तेंव्हा काँग्रेस बिळात लपून बसली होती, मुख्यमंत्री स्वतःच्या मुलाला सिनेमाचे स्क्रिप्ट व लोकेशन दाखवत होते आणि देशाचे गृहमंत्री म्हणत होते कि ऐसे बडे बडे देशों मैं छोटी छोटी बाते होती रेहती है , आणि प्रधानमंत्री तर मौनात सार्वम साधनं ..
देशाचे गृहमंत्री म्हणत होते>>
देशाचे गृहमंत्री म्हणत होते>>
देशाचे नाही राज्याचे.
बरं त्यांनी शेण खाल्ल्यानं ह्यांना आणलं ना निवडून लोकांनी मग हे काय खात आहेत ते पहायचं सोडून त्याच शेणात लोळत राहण्याचे प्रयोजन काय? (साडी गिफ्ट मिळाली का?)
भाजपचे एक नेते हेमंत बिस्व
भाजपचे एक नेते हेमंत बिस्व सर्मा म्हणालेत की २०१९ मध्ये भाजप सरकार नाही आलं तर पाकिस्तान आपल्या संसदेवर हल्ला करेल.
Nmate, याआधी आपल्या संसदेवर कधी हल्ला झाला होता का? असेल तेव्हा कोणाचं सरकार होतं?
तुम्ही २००८ मुंबई हल्ल्यांच्या नावाने कितीही हातपाय आपटा. मोदींनी हल्ला चालू असताना मोदींनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली, भाजपने पान पान भर जाहिराती दिल्या तरी २००९ च्या निवडणुकांत काँग्रेसच्या जागा वाढल्या होत्या. ज्या मुंबईत हल्ला झाला तिथल्या सहाही जागी कॉ- रा काँचे उमेदवार निवडून आले. तेव्हा काँग्रेस बिळात लपून बसली की मोदी आर्म्ड फोर्सेसच्या मागे लपतात, ते जनतेला नक्की कळतं.
नरेंद्र मोदींनी अमेठीच्या
नरेंद्र मोदींनी अमेठीच्या ऑर्डनन्स फॅक्टरीबद्दल चुकीची माहिती दिली
लष्करी उत्पादन करणाऱ्या एका फॅक्टरीवरून भाजप आणि काँग्रेस यांच्यात सुंदोपसुंदी सुरू झाली आहे. अमेठी जिल्ह्याचं मुख्यालय गौरीगंजपासून 12 किलोमीटर दूर अंतरावर कोरवा गावात हिंदुस्तान एअरोनॉटिकल लिमिटेड म्हणजेच HAL कंपनी आहे.
कंपनीच्या भव्य प्रांगणात देशाच्या सुरक्षेशी निगडीत उत्पादनं आणि उपकरणांची निर्मिती करणारी फॅक्टरी आहे. या फॅक्टरीचं नाव आहे आयुध निर्माणी प्रोजेक्ट कोरवा.
ऑर्डनन्स फॅक्टरीचा कोनशिला समारंभ 2007 सालीच झाला होता. गेल्या सहा वर्षांपासून या कंपनीद्वारे उत्पादन होतं आहे. मात्र रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या कंपनीचा उल्लेख करत युपीए सरकार आणि राहुल गांधींवर टीका केली. या आरोपांच्या निमित्ताने ही फॅक्टरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
कोरवापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या अमेठीतल्या रॅलीत बोलताना पंतप्रधान म्हणाले, रशियाच्या सहकार्याने अत्याधुनिक एके 203 बंदूक कोरवाच्या ऑर्डनन्स फॅक्टरीत तयार करण्यात येणार आहेत. ही फॅक्टरी गेले 20 ते 30 वर्षं तिथे अशीच पडून आहे. तिथं काहीच काम होत नाही.
पंतप्रधानांनी या रॅलीत भारत-रशिया प्रायव्हेट लिमिटेड या संयुक्त उपक्रमाचं उद्घाटन केलं. या उपक्रमाअंतर्गत अत्याधुनिक एके 203 रायफल्सची निर्मिती भारत सरकारच्या संरक्षण विभागाचा आयुध निर्माणी बोर्ड आणि रशियाच्या रोसोबोरोन एक्सपर्ट आणि कंसर्न कलानिश्कोव्ह या दोन कंपन्यांच्या सहकार्याने होणार आहे.
प्रतिमा मथळा
आयुध निर्माणी प्रोजेक्ट कोरवा
सगळी उत्पादन प्रक्रिया ऑर्डनन्स फॅक्टरीतच होणार आहे. 2013 पासून या फॅक्टरीत सुरक्षाविषयक उपकरणं आणि अत्याधुनिक रायफल्सची निर्मिती होत आहे.
"2007 मध्ये लष्कराला हव्या असलेल्या कार्बाइन्स गन्सच्या निर्मितीसाठी ही फॅक्टरी उभारण्यात आली. 2013 पासून पंप अॅक्शन गन उर्फ पीएजी आणि सुरक्षाविषयक अन्य उपकरणांची निर्मिती करण्यात येते. आता इथे उन्नत श्रेणीच्या एके 203 रायफल्सची निर्मिती होणार आहे. यासाठी आवश्यक मशीन्स फॅक्टरीत आधीपासून उपलब्ध आहेत. रशियन कंपन्यांकडून आम्हाला तांत्रिक मदत मिळेल," असं या फॅक्टरीचे प्रमुख एससी पांडेय यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
प्रतिमा मथळा
अमेठीनजीकच्या ऑर्डनन्स फॅक्टरीचे प्रमुख एससी पांडेय
या फॅक्टरीत तयार झालेल्या पीएजी रायफल्स उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल या राज्यातील पोलीस वापरत आहेत. गेल्या आर्थिक वर्षात 17 कोटी रुपयांचा व्हॅल्यू ऑफ इश्यूही मिळाला आहे. त्यांच्या मते अन्य वर्षांमध्येही एवढाच महसूल मिळाला आहे.
काँग्रेसला आक्षेप
पंतप्रधानांनी ज्या पद्धतीने या योजनेला आपल्या सरकारचं यश आहे, असं सांगितलं. काँग्रेस पक्ष सैन्याशी निगडीत उपकरणांबाबत उदासीन आहे असंही त्यांनी सांगितलं. यावरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. यावरून काँग्रेस पक्षात खळबळ माजली.
राहुल गांधी यांनी अत्यंत कठोर शब्दांत पंतप्रधानांना सुनावलं. "अमेठीजवळच्या या फॅक्टरीत आधीपासून लष्कराला आवश्यक उपकरणांची निर्मिती होत आहे. त्याचं उद्घाटन मीच केलं आहे," असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं.
राहुल गांधी अमेठीतून तीनवेळा खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले आहेत. अमेठीतील प्रतिनिधी चंद्रकांत दुबे म्हणतात, "पंतप्रधानांनी खरं तर राहुल गांधी आणि युपीए सरकारचे आभार मानायला हवेत. त्यांना पायाभूत यंत्रणा आयती मिळाली आहे. इथे कोणत्याही स्वरुपाची अत्याधुनिक उपकरणांची निर्मिती होऊ शकते."
प्रतिमा मथळा
राहुल गांधी यांच्या हस्ते अमेठीतील ऑर्डनन्स फॅक्टरीचं उद्घाटन झालं होतं.
ते पुढे म्हणतात, ''सरकारने काहीही नवं केलेलं नाही. सुरक्षा उपकरणांच्या निर्मितीत खाजगी क्षेत्राला परवानगी देण्यात आली आहे. बाकी सगळं आधीपासूनच तयार होतं आणि कामही सुरू होतं''.
या कारखान्यात काहीच होत नाही असं संरक्षणमंत्र्यांनी म्हटलं असलं तरी या कारखान्यात अ आणि ब श्रेणीच्या अधिकाऱ्यांसह दोनशेहून अधिक कायमस्वरुपी आणि तेवढ्याच संख्येने हंगामी कर्मचारी कार्यरत आहेत.
अमेठीतील राहुल गांधी यांचे प्रतिनिधी चंद्रकांत दुबे
संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांच्या मते या फॅक्टरीचं लक्ष्य दरवर्षी 45 हजार कार्बाइन बंदुकांची निर्मिती करणं हे होतं. मात्र हे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकलं नाही. कोणत्या गुणवत्तेचं कार्बाइन हवं हे लष्करच ठरवू न शकल्याने उद्दिष्टाची पूर्तता झाली नाही.
शंकाकुशंका आणि विरोध
जाणकारांच्या मते ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डच्या देशभरात 41 फॅक्टऱ्या आहेत. ऑर्डनन्स फॅक्टऱ्या या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत येतात. कोणत्या फॅक्टरीमध्ये कोणत्या उत्पादनाची निर्मिती करायची हे बोर्ड ठरवतं. यापैकी चार आस्थापनांमध्ये छोटी हत्यारं आणि उपकरणं तयार होतात.
भारत सरकारच्या 'मेक इन इंडिया' धोरणाअंतर्गत संयुक्त उपक्रमाची स्थापना करण्यात आली. याअंतर्गत 7.5 लाख रायफल्सचं उत्पादन केलं जाणार आहे. रायफल उपलब्ध झाल्यानंतर लष्कर, हवाई दल आणि नौदल तसंच केंद्रीय सुरक्षा दलाची ताकद वाढणार आहे. रायफल विकास हळूहळू स्वदेशी होणार आहे.
रशियाची कंपनी एके 203शी निगडीत छोटी उपकरणं आपल्या देशात आणणार आहे आणि इथं फक्त असेंब्लिंग अर्थात जुळवणीचं काम होईल, अशी टीका करण्यात येते आहे.
कॅगच्या अहवालातील उल्लेख
संरक्षण मंत्रालयातील ऑर्डनन्स विभागाच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की रशियाच्या कंपनीकडून भारताला कोणत्याही स्वरुपाच्या तांत्रिक तपशीलाचं हस्तांतरण होणार नाही.
जाणकारांच्या मते संरक्षण क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला मान्यता देण्यावरून सगळा गदारोळ सुरू आहे. हे प्रकरण वाढू नये यासाठी एके203 च्या उत्पादनासंदर्भात केवळ योजना तयार झाली आहे. मात्र तरीही त्याचा जोरदार प्रचार केला जात आहे.
विदेशी गुंतवणुकीसह नोकऱ्यांवर कुऱ्हाड येते की काय अशी साशंकता फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांना वाटते आहे.
फॅक्टरीतील कर्मचारी संघटना संयुक्त संघर्ष समितीने 25 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत काळी पट्टी बांधून विदेशी गुंतवणुकीला विरोध केला होता. कर्मचाऱ्यांनी फॅक्टरी अधिकाऱ्यांना एक निवेदनही सादर केलं. मात्र यासंदर्भात अधिकृतपणे बोलण्यास सगळे टाळाटाळ करत आहेत.
दरम्यान रशियाची कंपनी आणि ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड यांच्यात संयुक्त उपक्रम निश्चित झाला आहे. एके 203चं उत्पादन प्रक्रिया अजून खूप दूर आहे. या उपक्रमाचं स्वरुपाविषयी अद्याप स्पष्टता नाही.
एके203 योजनेच्या माध्यमातून भाजप अमेठी हा काँग्रेसचा बालेकिल्ला उद्धस्त करणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे
https://www.bbc.com/marathi/india-47450999
चांगली माहिती
चांगली माहिती
Submitted by BLACKCAT on 5 March, 2019 - 21:45
१. तुकाराम ओंबळे बंदोबस्तावर
१. तुकाराम ओंबळे बंदोबस्तावर असलेले साधे पोलिस होते. कमांडो नाही. साध्या पोलिसांकडे अशी हत्यारे नस्तात. कारण ही अमेरिका नाही. -- कदाचित म्हणूनच त्यांनी दाखवलेलं शॉर्य खूप मोठे आहे , त्याला काँग्रेस ने पकडले असे म्हणणारे खरंच चापलुसी चे मोठे उधाहरण आहे .
२.पाकिस्तानला तीन मोठ्या फुलफ्लेज युद्धात कोणी हरवले? - माझ्या माहिती नुसार आपली फुलफ्लेज फक्त २ युद्ध झाली आहे एक १९६५ आणि दुसरे १९७१ चे, ह्याच काँग्रेस च्या काळात आपण चीन बरोबर युद्ध हरलो पण आहे हे सोईस्कर विसरणार का ..
३. काश्मिरी पंडीत प्रश्न: फक्त ब्राह्मण पंडीत आहेत म्हणून पुळका येतो विशिष्ट लोकांना. - लोक सोयीस्कर हिंदूंना दोष देणार कारण हिंदूंनी सहन करायचा विडाच घेतला आहे , भाजप जर त्यांची बाजू घेत असेल तर टोपी वाल्याना त्रास होणारच ना. अहो काँग्रेस ने किती शीख लोकांचा पुनर्वसन केला ते पण सांगा मग.
४.पाकिस्तानला योग्य वेळी योग्य धडे शिकवले आहेत. चार वेळा युद्धात धूळ चारली आहे. दोन तुकडे केलेत. - जर त्या वेळेस तुम्ही सैन्याने दाखवलेल्या शौर्याचे क्रेडिट काँग्रेस ला देत असला तर आत्ता भाजप ला देण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे ..जणू काय इंदिरा गांधी स्वतः गेल्या होत्या लढायला, तेंव्हा पण सैन्यांचेच कर्तृत्व आहे कि अतिशय कमी साधनांनी ते लढले आणि जिकंले . माझ्या मनात आपल्या देशाच्या सैनिकांच्या शूर ते बद्दल अजिबात शंका नाही , पण काँग्रेस ने नेहमी युद्धात जिंकले आणि तहात हरले अशीच परिस्तिथी होती.
५. मागील ५ वर्ष मध्ये डिफेन्स बजेट कमी केले असे जे म्हणत आहेत त्यांच्या साठी खालील लिंक बघा म्हणजे कळेल कि किती खोट बोलतात काँग्रेस वाले
१) https://tradingeconomics.com/india/military-expenditure
२) भारताचा GDP २०१२ साली १.८ ट्रिलियन डॉलर होते आणि डिफेन्स बजेट GDP च्या २.५% आणि २०१७ साली २.६ ट्रिलियन डॉलर होते आणि बजेट GDP च्या २.५% , आता कमी झाले कि वाढले ते सांगा,
whataboutery आपल्यावर शेकू
whataboutery आपल्यावर शेकू लागली की कसे भलतीकडे सैरावैरा पळायला लागतात? हे शिखांचे प्रकरण काय मध्येच? भाजप ला जाम पुळका आहे ना कापं चा? केंद्रात राज्यात सत्ता पूर्ण हाती असून मग काय केले मागच्या पाच वर्षात? त्याचे बोला ना? ते सोडून शिखांचे प्रश्न ? हां हां हां हां हा हां
नेमके २०१७ ला थांबलात ना
नेमके २०१७ ला थांबलात ना?
https://economictimes.indiatimes.com/news/defence/defence-budget-may-app...
n the Union budget, the government had allocated Rs 2.95 lakh crore to defence forces which is estimated to be around 1.58 per cent of the country's GDP. A separate allocation of Rs 1.08 lakh crore was set aside for defence pensions.
This defence budget, in terms of percentage of the GDP, was lowest since 1962.
Replying to a question in Rajya Sabha, Minister of State for Defence Subhash Bhamre said the defence budget, including allocation for miscellaneous expenditure and pen ..
इथे काश्मिरी पंडितां ना घाटी
इथे काश्मिरी पंडितां ना घाटी सोडावं लागण्याबद्दल लिहिलंय.
पहिल्यांदा मोठ्या संख्येने जावं लागलं तेव्हा केंद्रात व्हीपी सिंग सरकार होतं.- भाजपच्या पा ठिंब्यावर
anuary 1990
Massive crowds assemble in mosques across valley, shouting anti-india, anti-pandit slogans. The exodus of Kashmiri Pandits begins. In the next few months, hundreds of innocent Pandits are tortured, killed and raped. By the year-end, about 350,000 Pandits have escaped from the Valley and taken refuge in Jammy and elsewhere. Only a handful of them stay back.
यावेळी भाजप च्या आग्रहावरून व्ही पी सिंग यांनी जगमोहन यांना राज्यपाल नेमलेले, राष्ट्रपती राजवट होती. जगमो हन पुढे वाजपेयींच्या मंट्रीमंडळातही होते आणि मोदींनी त्यांना २०१६ मध्ये पद्मविभूषण दिले.
March 1997 - Terrorists drag out seven Kashmiri Pandits from their houses in Sangrampora village and gun them down. देवेगौडा
January 1998 - 23 Kashmiri Pandits, including women and children, shot in cold blood in Wandhama Village. इंदर कुमार गुजराल
March 2003 - 24 Kashmiri Pandits, including infants, brutally shot dead in Nadimarg Village. अटलबिहारी वाजपेयी
अहो काँग्रेस ने किती शीख
अहो काँग्रेस ने किती शीख लोकांचा पुनर्वसन केला ते पण सांगा मग.
>>
पंजाबात काँग्रेस ला का बरे निवडून देत असावेत?
हिंदूंवर अश्लाघ्य भाषेत टीका
हिंदूंवर अश्लाघ्य भाषेत टीका करणाऱ्या मंत्र्यास इम्रान खान ने डच्चू दिला. इथे प्रतिमा संवर्धन प्रयत्न असला तरी पाकिस्तानचा सीमेवर गोळीबार सुरूच, पुलावमा झलयापासून अजूनही सैनिकांच्या शाहिद होण्यास प्रतिबंध नाही. देश सुरक्षित हातात असल्याचा मोदी यांचा दावा.
१. नेमके २०१७ ला थांबलात ना?
१. नेमके २०१७ ला थांबलात ना? पुढे वाचा मग हे
https://indianexpress.com/article/explained/the-problem-with-raising-ind...
At 1.49%, India’s defence expenditure as percentage of GDP is stated to be at its lowest ever, lower than what it was prior to the disastrous 1962 war with China. But this figure of 1.49% — or Rs 2,79,305 crore — does not include defence pensions and MoD spending. If both are included, the total defence expenditure rises to Rs 4,04,364 crore, or 2.16% of GDP. हि किंमत सुद्धा २०११-२०१४ च्या पेक्षा जास्त आहे ..
२. पंजाबात काँग्रेस ला का बरे निवडून देत असावेत? हा खरंच प्रश्न पडतो मला पण त्याला एकाच उत्तर आहे की आपण लोक लवकर विसरतो , जसे आपण हे विसरलो कि काँग्रेस ला का २०१४ ला पायउतार होवा लागले, त्यांनी केलेली भ्रष्टाचाराची प्रकरणे आपण विसरलो का ?
३.इथे काश्मिरी पंडितां ना घाटी सोडावं लागण्याबद्दल लिहिलंय.- काँग्रेस ने कसे खेळ खेळलेत मत पेटी साठी हे बघा ,
https://en.m.wikipedia.org/wiki/Exodus_of_Kashmiri_Hindus
During the period of exodus, there was government of Farook Abdullah with the support of Congress party. They both didn't show strong desires and courage to fight extremists. They both remained silent and didn't make any plan to capture the convicts, Prime Minister VP Singh to appoint Jagmohan as Governor because he was very strict against separatist. But Farook Abdullah never wanted Jagmohan as Governor. Abdullah had earlier declared that he would resign if Jagmohan was made the Governor. However, the Central government went ahead and appointed him as Governor on 19 January 1990. In response, Abdullah resigned on the same day. आणि पुढे जे झाले ते खूप वाईट होते..तुम्ही त्याला जस्टीफाय करत आहेत का ?
५. नरेंद्र मोदींनी अमेठीच्या ऑर्डनन्स फॅक्टरीबद्दल चुकीची माहिती दिली- जरा फॅक्ट चेक करत जावा ..
https://www.indiatoday.in/fact-check/story/fact-check-rahul-gandhi-s-cla...
राहुल गांधी असेच फसतात , कधी म्हणतात ३० कोटी मित्राला दिले, अरे बाबा तूम्ही तर हजारो कोटी चे कर्ज दिले सोबत मुंबई वन मेट्रो, पुणे सातारा महामार्ग सारखे अनेक प्रोजेक्ट दिले , एवढेच काय स्वस्तात २जी स्पेक्ट्रम पण दिले होते ह्याच मित्राला ..
तुम्ही वर ३ साठी जी लिंक
तुम्ही वर ३ साठी जी लिंक दिलीत त्यात तुम्ही दिलेला मजकूर दिसला नाही. मात्र हा मजकूर त्याच लिंकवर आहे.
n order to undermine his political rival Farooq Abdullah who at that time was the Chief minister of Jammu and Kashmir, the Minister of Home Affairs Mufti Mohammad Sayeed convinced Prime Minister V.P. Singh to appoint Jagmohan as the governor of the state. Abdullah resented Jagmohan who had been appointed as the governor earlier in April 1984 as well and had recommended Abdullah's dismissal to Rajiv Gandhi in July 1984. Mufti was convinced that such a move will irritate Abdullah and make him quit. Abdullah had earlier declared that he would resign if Jagmohan was made the Governor. However, the Central government went ahead and appointed him as Governor on 19 January 1990. In response, Abdullah resigned on the same day and Jagmohan suggested the dissolution of the State Assembly. On 21 January 1990, two days after Jagmohan took over as governor, the Gawkadal massacre took place in Srinagar, in which the Indian security forces had opened fire on protesters, leading to the death of at least 50 people, and likely over 100. These events led to chaos. Lawlessness took over the valley and the crowd with slogans and guns started roaming around the streets. News kept coming of violent incidents and those Hindus who survived the night saved their lives by traveling out of the valley.
Most of the Kashmiri Hindus left Kashmir valley and moved to other parts of the country, majorly to the refugee camps in Jammu region of the state.
मी का श्मीरमध्ये जे झालं ते अजिबात जस्टिफाय केलेलं नाहीए. पण काश्मिरी पंडितांना तिथून निघावं लागलं तेव्हा केंद्रात काँग्रेसचं सरकार नव्हतं, तरीही त्याचं खापर काँग्रेसच्याडोक्यावर फोडण्याचा खोटारडेपणा उघड करतो आहे.
१.पेन्शनसाठी खर्च केले ल्या रकमे ने सुरक्षा व्यवस्थेत कसा फरक पडतो. मी दिलेल्या बातमीत संरक्षण रा ज्यमंत्र्यांनी स्च त च संसदेत सांगितलंय की वाढत्या जीडीपीच्या तुलनेत संरक्षण खर्चाची टक्केवारी कमी झाली आहे.
नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचं युती सरकार काश्मीरमध्ये कधी होतं ते स्पष्ट कराल का? उलट ओमार अब्दुल्ला वाजपेयी मंत्रीमंडळात होते.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना सुद्धा नर्मदा परिक्रमा करायला हवी. त्यांनी ही पुलवामा हल्ल्याला बडी दुर्घटना म्हटलंय.
Pages