म्हैसूरजवळ रंगनथिट्टू नावाचं पक्षी अभयारण्य आहे. अरण्य म्हणण्यापेक्षा कावेरी नदीच्या पात्रातल्या बेटांवर वसलेलं स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांचं आश्रयस्थान आहे. बर्ड फोटोग्राफी शिकण्याच्या उद्देशाने एका फोटोग्राफी ग्रुपबरोबर मी तिथे गेले होते. बरेच फोटो काढले. काही चांगलेही आले. त्यापैकी काही फोटो इथे देत आहे. कॅमेरा निकॉन डी३०००. लेन्स टॅमरॉन ७०-३०० एमएम.
हा आहे पेलिकन. स्थलांतरित पक्षी. आम्ही होडीत बसून जात असताना आमचा नावाडी कम लोकल गाईड मधूनमधून उत्साहाने सांगायचा, पेलिकन येतोय, पेलिकन येतोय.. आम्ही घाईघाईने त्याने दाखवलेल्या दिशेकडे कॅमेरे रोखून फोटो काढण्याच्या गडबडीत. पेलिकन मात्र रुबाबात उडत येऊन चटकन पाण्यातला एखादा मासा पकडून चोचीखालच्या झोळीत टाकून उडूनही जायचा. एका पेलिकनने तर एकाच झेपेत लागोपाठ ४-५ वेळा पाण्यावर चोची मारून मासे पकडले.
या पेलिकनच्या झोळीत बरेच मासे जमलेले दिसतायत.
हे सगळे मासे कशासाठी पकडायचे? स्वत:ला खायला नाही काही, पिल्लांना भरवायला!
आईने ( किंवा बाबाने) काय बरं खाऊ आणलाय पिशवीत भरून?
हे पेंटेड स्टॉर्क म्हणजेच चित्रबलाक. रोहित पक्ष्यांसारखीच गुलाबी झाक पंखांवर मिरवणारे.
हे अजून थोडे
हा ओपन बिल्ड स्टॉर्क. याची चोच पूर्ण बंद होत नाही. थोडी फट राहते.
ही मगर. अशा २-३ तरी होत्या. ही आत्ता निवांत दिसली तरी नंतर २ च मिनिटांत तिने धपकन पाण्यात उडी टाकली आणि आम्ही चांगलेच दचकलो.
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसे मगरीच्या बाळाचे दात पाण्यात दिसतात
स्पून बिल्ड स्टॉर्क किंवा चमचचोच्या. याच्या चोचीचा आकार पुढच्या टोकाला चमच्यासारखा पसरट असतो.
याशिवायही दयाळ, बुलबुल, ऑरेंज-ब्लू फ्लायकॆचर, पाइड किंगफिशर,विविध प्रकारचे बगळे, पाकोळ्या असे अनेक पक्षी दिसले.
वाह!
वाह!
भारीच गं !! एकदम सुरेख ..
भारीच गं !! एकदम सुरेख ..
पहिला आणि दुसरा प्रचि विशेष आवडले . उडत्या पक्षांचे (न हललेले) फोटो काढणं तसं कठीण असणार
मस्त फोटो . मला ही पहिला
मस्त फोटो . मला ही पहिला विशेष आवडला.
कसले भारी फोटो आहेत. पहिले
कसले भारी फोटो आहेत. पहिले दोन तर भारीच.
सुंदर फोटो... पहिला क्लासच...
सुंदर फोटो...
पहिला क्लासच...
छान जमलेत.
छान जमलेत.
डिपीतला काळापांढरा धोबी आहे का?
हर्पेन, अंजली, शाली, शशांक
हर्पेन, अंजली, शाली, शशांक पुरंदरे, ममो, srd, मनापासून धन्यवाद!!
पक्षी निरीक्षण आणि फोटोग्राफी, दोन्हीत मी नवीन आहे. तुमच्या प्रतिसादांनी नक्कीच हुरूप आला.
Srd, माझ्या माहितीप्रमाणे तो दयाळ आहे. आत्ता नेटवर फोटो पाहिल्यानंतर लक्षात आलं की दयाळ आणि धोबी या दोन्ही पक्ष्यांमधे बरंच साम्य आहे. इथले जाणकार सांगतील नेमका कुठला आहे ते. आमच्या गच्चीवर काढलेला फोटो आहे.
अंजली, कठीण तर आहेच. म्हणून तर एवढेच फोटो
सुंदर फोटो. पहिला तर कातील.
सुंदर फोटो. पहिला तर कातील.
सुपर्ब क्लिक्स
सुपर्ब क्लिक्स
सुंदर फोटो!
सुंदर फोटो!
रंगनथिट्टूला जायला पाहीजे.
अहाहा !! मस्त ! वरचे पहिले
अहाहा !! मस्त ! वरचे पहिले दोन फोटो जबरी आहेत. पाण्याचे वर उडालेले थेंब खड्यांसारखे चमकतायत. खूप सुरेख फोटो आलेत वावे.
मगरीचे फोटो पण छान.
मस्त आहेत फोटोज
मस्त आहेत फोटोज
माधव, मानव पृथ्वीकर, जाई,
माधव, मानव पृथ्वीकर, जाई, रश्मी, डूडायडू, धन्यवाद
मानव, नक्की जा रंगनथिट्टूला. पण सीझन बघून जा. आत्ता १-२ महिन्यांत गेलात तर स्थलांतरित पक्षी बरेच दिसतील.
ओके, कुठले सिझन्स योग्य आहेत
ओके, कुठले सिझन्स योग्य आहेत जाण्यासाठी?
सुरेख!
सुरेख!
खूपच सुंदर आणि रेअर फोटोज
खूपच सुंदर आणि रेअर फोटोज
सुन्दर आहेत पक्षी आणि प्रचि
सुन्दर आहेत पक्षी आणि प्रचि
सुंदर फोटो!
सुंदर फोटो!
रावी, समई, किल्ली आणि स्वाती२
रावी, समई, किल्ली आणि स्वाती२, धन्यवाद!
मानव, तसे तुम्ही वर्षभरात कधीही गेलात तरी कुठले ना कुठले पक्षी असतातच. स्थलांतरित पक्षी मार्च एप्रिलपर्यंत असतात असं आमचा फोटोग्राफी गाइड म्हणाला. पावसाळ्यापासून ते असतात, पण तेव्हा जर जास्त पाऊस पडला, तर बोटिंग बंद करतात. शिवाय फोटो काढण्यासाठी चांगला प्रकाश मिळेल याची खात्री नसते.
फोटो छान आहेतच पण त्याला जे
फोटो छान आहेतच पण त्याला जे पूरक लिहिले आहे ते सुद्धा छान आहे
ओके, धन्यवाद वावे.
ओके, धन्यवाद वावे.
मस्त फोटो!
मस्त फोटो!
बापरे मगर :-O
बापरे मगर :-O
धन्यवाद गजानन!
धन्यवाद गजानन!
ॲमी, देखो मगर प्यार से
सुरेख फोटो. पेंटेड स्टॉर्क्स
सुरेख फोटो. पेंटेड स्टॉर्क्स फार सुंदर दिसतात.
वर्षा आणि प्राचीन, धन्यवाद
वर्षा आणि प्राचीन, धन्यवाद
दुसरा भागही टाकलाय.
https://www.maayboli.com/node/69134
मी गेलो होतो येथे...
मी गेलो होतो येथे...
सुंदर फोटोग्राफ...
छान प्रचि
छान प्रचि
पहिले दोन प्रचि झूम न करता किंवा झुम कमी ठेऊन काढले असते तर आणखीन सुंदर दिसले असते.
दत्तात्रय साळुंके, धन्यवाद!
दत्तात्रय साळुंके, धन्यवाद!
इंद्रधनुष्य, पहिले दोन प्रचि झूम न करता किंवा झुम कमी ठेऊन काढले असते तर आणखीन सुंदर दिसले असते. ओके, लक्षात ठेवते पुढच्या वेळी. पण असं का ?
Adult openbill stork असा
Adult openbill stork असा दिसतोय म्हणजे मी पाहीलेले पिल्लूच असावे. त्याची चोच पुर्ण बंद होती.
Pages