काही दिवसांपूर्वी एक जवळच्या मैत्रिणीचा फोन आला,'अगं अगदी सहज केला ,बोलू पाचेक मिनिटं ' असं म्हणाली. ख्यालीखुशाली विचारून झाली,इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि गाडी मुख्य मुद्द्यावर आली.
तिला कोणीतरी whattsapp वर एक पोस्ट फॉरवर्ड केली होती. त्यात हे पटवून दिलं होतं की,बायका कशा घरदारासाठी झिजत राहतात ,स्वतःकडे मुळीच लक्ष देत नाहीत,स्वतःची तब्येत जपत नाहीत, सगळं आयुष्य नवरा मुलं यांच्याभोवती घालवतात वगैरे वगैरे...... आणि शेवटी लेखिकेने एक महत्वाचा मूलमंत्र दिला होता कि रोज स्वतःसाठी 10 मिनिटं काढा व मन प्रसन्न होईल असं काहीतरी करा..... मैत्रिणीने हे follow करायला सुरुवात केली आणि तिच्यात किती बादल झाला,तिला किती छान वाटतंय असं ती सांगत होती. शेवटी तिची पाचेक मिनिटं82 मिनिटांनंतर तीच बाळ उठल्यामुळे नाखुषीनेच संपली आणि आमच्या डोक्यात 'स्वतःसाठी 10 मिनिटं' ह्या वळवळणार्या किड्याने प्रवेश केला. मैत्रिणीने ती पोस्ट फॉरवर्ड केली पण एवढं मोठं कोण वाचत बसणार ,असा विचार करून ते राहूनच गेलं.
आता स्वतःसाठी रोज 10 मिनिटं द्यायचीच असा निश्चय केला, त्यामुळे आपल्या आयुष्यात खूप बादल होईल, घर स्वच्छ राहील, मुलं शहाण्यासारखी वागतील, नवरा surprise गिफ्ट्स देईल, केलेल्या स्वयंपाकाचं घरचे कौतुक करतील,अशी गोड गुलाबी स्वप्नं मला पडू लागली, त्या विचारांच्या नादात असल्यामुळे घरकामात काहीबाही चुका होऊ लागल्या ,नवरोबांच्या लवकरच लक्षात आलं.
विषय सुरू करतानाच म्हणाला, अमुक तमुक मैत्रिणीचा फोन आला होता वाटतं(ह्याला कसं कळलं???)
मी- नाही तसं काही नाही....(mobile लॉक चा पॅटर्न आजच बदलते)
नवरा- कसलातरी खूप विचार करतीयेस म्हणून विचारलं...
शेवटी न राहवून त्याला पोस्टचा किस्सा सांगितला.
नवरा- बरं मग???
मी- बरं मग म्हणजे????(व्हाट्स अँप वर आलेल्या प्रत्येक गोष्टीचं पालन करणे हे एक जबाबदार नागरिक म्हणून आपलं आद्य कर्तव्य आहे,हे कसं कळत नाही ह्याला??)
नवरा- अगं मग तुझी ओढाताण होत असेल तर लावूया 'अजून एखादी'बाई कामाला....
(त्याच्या 'अजून एखादी' वर जोर देण्यावरून मी समजले त्याला काय म्हणायचंय ते)
मी- तसं नाही रे, स्वतःसाठी वेळ देणं महत्वाचं असं म्हणायचंय लेखिकेला.
नवरा- अजून काय स्वतःसाठी वेगळा वेळ द्यायचाय, Beauty parlour च्या वाऱ्या, तासन् तास फोनवर गप्पा, दर आठवड्याला शॉपिंग हे तर चालूच असतं.
(असं नवरा म्हणाला आणि त्याच्या प्रत्येक शब्दगणिक माझ्या चेहऱ्यावर सरसर बदलत जाणारे भाव बघून त्याने सावध पवित्रा घेतला) म्हणजे.......दे ना .... तू स्वतःसाठी वेळ .... असं म्हणायचं मला( तुझ्याकडे काय वेळच वेळ आहे अश्या आविर्भावात)
मी- ते झालंच, पण मन प्रसन्न होईल असं काय करावं तेच कळत नाहीये
नवरा- मग आधी तुला कशात आनंद वाटतोय ते शोधून काढ.
आता ही मात्र खरी कसोटी होती, आपल्याला दुःख देणाऱ्या गोष्टींची लिस्ट लवकर होऊ शकते पण आनंद देणाऱ्या गोष्टी काही लवकर सुचेनात, पण ते ही पार पडलं आणि ' उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही' अशी प्रार्थना करून स्वतःसाठी10 मिनिटं ह्या व्रताला सुरुवात केली.
कधी एकटीने जाऊन पाणीपुरी खाऊन झाली, कधी आवडीची गाणी ऐकून झाली, कधी जुने फोटो बघून झाले, तर कधी आवडत्या पुस्तकांची पारायणं झाली, 10-12 दिवस छान गेले पण नंतर मात्र हळूहळू मन प्रसन्न करण्यासाठी आज काय करायचं हे भूत मानगुटीवर बसू लागलं, आजचं व्रत पार पडलं तरी उद्याची 10मिनिटं कशी भरून काढायची हा प्रश्न सतावू लागला, मी सतत त्याच गोष्टीचा विचार करू लागले, नवरा तर ऑफिसमधून आल्याआल्या माझ्या चेहऱ्यावरून आजची' 10 मिनिटं' झाली आहेत की नाही हे ओळखू लागला (ह्याला कसं सगळं कळतं, देव जाणे)
बरं ह्या व्रताचे side effects ही मला लवकरच जाणवू लागले. माझ्याप्रमाणेच संपूर्ण घरादाराने ह्या व्रताचा स्वीकार केला. नवरा ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा उठू लागला, जाब विचारल्यावर 'स्वतःसाठी 10 मिनिटं' असं उत्तर माझ्या तोंडावर धडकू लागलं, कामवाली नेहमीपेक्षा उशिरा येऊन ' ताई, ते 10 मिनिटं' असं डोळ्यांनीच मला खुणावू लागली, मुलांनी तर परिस्थितीचा पूर्णपणे गैरफायदा घेतला.....थाटात I pad घेऊन येऊ लागली आणि ' आई आमची 10 मिनिटं चालू आहेत , डिस्टर्ब करू नकोस' असं मलाच सांगू लागली. आता मात्र ह्या व्रताचे चटके मला चांगलेच जाणवू लागले. सरळ सरळ मी घरात केलेले नियम तोडले जात होते आणि मी काहीच करू शकत नव्हते. शिवाय मी पाहिलेली ती गोड गुलाबी स्वप्नं, त्यातलं तर काहीच खरं होत नव्हतं. मन प्रसन्न होण्या ऐवजी मी दुःखी होऊ लागले.
आणि एक दिवस अचानक तो दिवस उजाडला. एका दुसऱ्या मैत्रिणीने तीच मूळ पोस्ट मला पाठविली होती,आता मात्र कंटाळा ना करता संपूर्ण पोस्ट एका दमात वाचून काढली. लेखिकेचं असं म्हणणं होतं की, जर तुम्ही फक्त आणि फक्त इतरांचा विचार करत असाल, त्यात तुमची घुसमट होत असेल, तुम्हाला नैराश्य वाटत असेल, परिस्थिती बदलावी असं वाटत असेल, इतरांच्या वागण्याचा त्रास होत असेल तर स्वतःच्या मनातील स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी हा उपाय करावा. (अरे देवा, असं होतं होय ते)
मग मात्र एका जागेवर बसून शांत डोक्याने विचार केला आणि मन आनंदी करणाऱ्या गोष्टींची लिस्ट मला अचानकच सापडली. मन प्रसन्न करण्यासाठी खरंतर वेगळं काही करण्याची गरज नव्हती, गरज होती ती फक्त रोजच्या धावपळीत घडणाऱ्या काही गोष्टींकडे लक्ष देण्याची. कुंडीतल्या गुलाबाचं टपोरं फूल, मुलांनी त्रास देण्यासाठी काढलेल्या खोड्या आणि त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आलेलं मिश्किल हसू, माहेरी गेल्यावर आईने स्वतःच्या हाताने बनवलेलं थालीपीठ, स्वयंपाक करायचा आज कंटाळा आलाय हे ओळखून नवऱ्याने मागावलेलं पार्सल ह्याच गोष्टी मला पुरेश्या होत्या.
तर मंडळी, ह्या व्रताचे पालन केल्यामुळे ना माझं घर स्वच्छ झालं, ना मुलं शहाणी झाली, ना नवऱ्याकडून surprise गिफ्ट मिळालं, पण आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मात्र नक्कीच मिळाला.
संध्याकाळी जेव्हा तोंडभर हसू घेऊन नवर्यासाठी दार उघडलं तेव्हा ' 10 मिनिटांच खूळ गेलं वाटतं डोक्यातून' असं आत येतायेताच म्हणाला. (ह्याला कसं सगळं मनातलं कळतं, ह्याचा छडा लावायलाच हवा)
स्वतःसाठी 10 मिनिटं
Submitted by कुलमुखत्यार on 21 February, 2019 - 02:44
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
नवरा ठरलेल्या वेळेपेक्षा
नवरा ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा उठू लागला, जाब विचारल्यावर 'स्वतःसाठी 10 मिनिटं' असं उत्तर माझ्या तोंडावर धडकू लागलं<<<<<<<<

(No subject)
सुरेख...
सुरेख...
खरच तुमची गोष्टही आनंददायी आहे.
>>>>कुंडीतल्या गुलाबाचं टपोरं फूल, मुलांनी त्रास देण्यासाठी काढलेल्या खोड्या आणि त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आलेलं मिश्किल हसू, माहेरी गेल्यावर आईने स्वतःच्या हाताने बनवलेलं थालीपीठ, स्वयंपाक करायचा आज कंटाळा आलाय हे ओळखून नवऱ्याने मागावलेलं पार्सल ह्याच गोष्टी मला पुरेश्या होत्या.>>>>
आपण ब-याच गोष्टी एक परिपाठ म्हणून करतो. ते सोडले तर छोटया, छोटया गोष्टीतला आनंद मिळतो.
sahich
छान लिहिलंय...
छान लिहिलंय...
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
घरातल्या सगळ्यांनीच १० मिनिटाच्या व्रताचं पालन सुरु केलं>>
वेगळी सुरुवात करून गाडी त्याच
वेगळी सुरुवात करून गाडी त्याच वळणावर आली.
छान लिहिलंय !
छान लिहिलंय !
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.....
गेल्या 2-3वर्षांपासून मी मायबोलीची मूक वाचक होते......लेखनाचा हा पहिलाच प्रयत्न.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
मला पण घरात 'सगळं तुझ्या मनाप्रमाणे करतेस, नाही झालं, तुझ्या कुटुंबाने जरा सांगितलेली कामं न करता मी टाइम घेतला तर आकांड तांडव करतेस, अजून वेगळा मी टाइम काय हवाय तुला ' म्हणून आहेर मिळत असतो ☺️☺️
पण मी न डगमगता सगळ्यांना शाळा आणि ऑफिस मध्ये पाठवून स्वतः अर्धा तास मी टाइम घेऊन मगच ऑफिस ला जाते.
आवडले लिखाण,
आवडले लिखाण,
लेखनाचा हा पहिलाच प्रयत्न चांगलाच जमलाय.
घरातल्या सगळ्यांनीच १०
घरातल्या सगळ्यांनीच १० मिनिटाच्या व्रताचं पालन सुरु केलं>>

पण मी न डगमगता सगळ्यांना शाळा
पण मी न डगमगता सगळ्यांना शाळा आणि ऑफिस मध्ये पाठवून स्वतः अर्धा तास मी टाइम घेऊन मगच ऑफिस ला जाते.>> कीप इट अप
आवडले!
आवडले!
छान लिहिलयं.....
छान लिहिलयं.....
किती सहज सापडला आनंद तुम्हाला
किती सहज सापडला आनंद तुम्हाला .... तशी द्रुष्टी पाहिजे..
मला तर या टाइपच्या व्हॉट्सॅप मेसेज पाठवणार्यांना काठी हाणाविशी वाटते... आपल्या डोक्यात उगाचच हे भरून देतात कि तुम्ही किती दु:ख्खी आहात !
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
(No subject)
छान लिहिलय
छान लिहिलय
स्वतः साठी दहा मिनिटे काढून
स्वतः साठी दहा मिनिटे काढून वाचलं हुश्श
छान लिहिले आहे
भारीये पुलेशु
भारीये
पुलेशु
मस्तच लिहिले आहे...पू ले शु
मस्तच लिहिले आहे...पू ले शु
chan lihilay
chan lihilay
मस्तच जमलंय.. दुःख देणार्या
मस्तच जमलंय.. दुःख देणार्या गोष्टी पटकन आठवतात म्हणुनच का दुःख चिरंतन असतं असं म्हणतात?
D
मस्त लिहिलंय
मस्त लिहिलंय