शालींच्या मैत्रचे भाग वाचताना त्यातील पात्रांच्या तोंडात अनेक ग्रामीण शब्द वाचले. काही मजेशीर वाटले. प्रत्येक प्रांताची जशी आपली एक खाद्यसंस्कृती असते तशी एक भाषाही असते. त्यातल्या त्यात ग्रामीण भाषा तर अतिशय गोड असते. त्यात वापरले जाणारे शब्द रोजच्या व्यवहारात वापरले जात असले तरी ते प्रमाण मराठी भाषेत नसल्याने सहसा लिखानात येत नाही. शहरांमधे तर ते बोलण्यातही येत नाही. तर असेच वेगवेगळ्या प्रांतातील ग्रामीण भाषेतील मजेदार, वेगळे शब्द वाचायला मजा येईल. सांगली, कोल्हापुर, नागपुर, नगर, कोकण आणि महाराष्ट्रातील अनेक भागात वेगवेगळे शब्द वापरले जातात ते येथे लिहिले तर सर्वांना ते वाचण्यातला आनंद मिळेल तसेच त्यांचे अर्थही कळतील. उदा. आमच्या जुन्नर भागात वापरले जाणारे काही शब्द:
यळोमाळ: येथे तेथे किंवा दिवसभर
कव्हर: किती वेळ
उलसक किंवा उलीशीक: अत्यंत थोडे.
फिंद्री: खोडकर मुलगी
पाठ: शेळी
तुमच्याकडेही असे काही शब्द असतील तर अर्थासहीत व जमल्यास वाक्यासहीत येथे लिहा.
मालवणीत आजारपणाची दिसणारी
मालवणीत आजारपणाची दिसणारी लक्षणे अशी सांगितली जातात --
१ जिवाक थरमरी सुटताहा
२. पाय इरइरतहत
३. जीव कसो कलकलताहा
४. हावाळी लागता
५. पोटात डचमाळता
६. हगीर मुतीर होवक झाला
७. डोक्या फुटताहा
आज काय मंगखिसडी का शाबुच्या
आज काय मंग
खिसडी का शाबुच्या तांदळाची गंजी
का वरयाच्या तांदळाच्या भातावंच भागलं
एकादस ह्ये कनी आज
योवैभूमा मस्त शब्द.
योवैभूमा मस्त शब्द.
प्रचारक कित्ती वर्षांनी गंजी हा शब्द ऐकला. हा शब्द नाहीसा झालाय आता. कांजी क्वचित ऐकायला मिळतो.
कांजी कसलीही असु शकते पण गंजी फक्त साबुदाण्याचीच. भारी वाटले हा शब्द ऐकून.
योवैभूमा, अलिबागपासुन मालवणपर्यंत नेहमी भटकत असतो पण वर उल्लेखलेल्या बोली ऐकल्या नाही कधी. नेहमी मराठीच ऐकायला आली आहे. असे का?
अरे आज खरच एकादशीच आहे की!
अरे आज खरच एकादशीच आहे की!
''अगदी नजा जालां हा. निस्ती
''अगदी नजा जालां हा. निस्ती पाणयां पडतहत." हे कोणी ऐकले आहे काय? ''धापू जालां'' हा वाक्प्रचार? "आशे कोळी मेलो त्येकां जित्तो जाळूंक न्हेलो" ही म्हण? 'मेर' हा शब्द? कुणगो(खाचर)? पांचफाटे ?(हे म्हणजे पंचप्रभाती म्हणजे भल्या पहाटे.) सामकें आणि सॉमकें हे शब्द गोव्यात ऐकू येतात. तिथे रांधपाची कुडी (स्वयंपाकघर) असते. केस 'उगवले'(विंचरले) जातात. होळीच्या सोंगांना रोंबाट म्हणतात.
ठाणे जिल्ह्यात मूळ रहिवाश्यांमध्ये मोठ्या होळीला कोंबडहोळी म्हणतात. कारण मुख्य काठीला (हे नारळ किंवा पोफळीचे उंच खोड असते) एक कोंबडा बांधलेला असतो.
मुडगा = केरसुनी वापरून वापरून
मुडगा = केरसुनी वापरून वापरून तिचा पुढचा झुपकेदार भाग झडून जातो आणि केर लोटण्यासाठी मुठीजवळ केरसुनीतला थोडासा भाग शिल्लक राहतो तेंव्हा अशा केरसुनीला मुडगा म्हणतात.
यो वैभूमा, तुम्ही लिहिलेल
यो वैभूमा, तुम्ही लिहिलेल अनेक शब्द माझ्या कानावर पडलेले आहेत.
माझी आई धोंडस-ला टोपातलेच म्हणते.
काईलतो -- आम्ही इथे काविलटा म्हणतो.
बारदान - मला वाटतं, हे तागाच्या पोत्याला म्हणतात. त्याचा पायपोस म्हणून वापर होतानाही पाहिलाय.
*व्हकाल शब्दावरून एक फार
*व्हकाल शब्दावरून एक फार पूर्वी ऐकलेली मालवणी म्हण आठवली. * - याच शब्दावरून आणखी एक म्हण- ' जवळची व्हकाल खुरडी ' . अर्थ - लहानपणासून पहाण्यात असलेली मुलगी नवरी म्हणून नजरेत भरत नाही. ( ' अति परिचयात अवज्ञा ' ह्या म्हणीशी जवळीक वाटते )
अगदी नजा जालां हा>>> आजी
अगदी नजा जालां हा>>> आजी म्हणायची.पण नजा झालासा(बरं वाटत नाही).
निस्ती पाणयां पडतहत>>> हे नाही ऐकले तिच्या तोंडातून.
आताच आईला विचारले ,म्हणाली पाण्यासारखे ढाळ होणे.
धापू जालां= हरवणे, गायब होणे.नक्की माहित नाही.
पांचफाटे== फाटफाटे(आजीचा उच्चार)
मेर= शेतामधला बांध.
रोंबाट = खूप पसारा असेल,गोंधळ असेलतर हा शब्द ऐकला आहे. विशेषतः स्वयंपाकाबाबत्,जसे की खूप रोंबाट झालेल्ला. ( झाले होते )
काईलतो ==आमच्याकडे काविलतो
काईलतो ==आमच्याकडे काविलतो म्हणतात.
वर नदी आणि समुद्राच्या भरती
वर नदी आणि समुद्राच्या भरती ओहोटीबद्दल उल्लेख आला आहे. तुंबाडचे खोत या पुस्तकात श्री ना पेंडसे यांनी जेव्हा नदीचं पाणी अल्पकाळासाठी स्थिर होतं ( भरती पूर्ण होते तेव्हा बहुतेक) त्या क्षणाला ' समा' हा शब्द वापरलाय.
'पहार' ला पारय आमच्याकडेही ( दक्षिण रायगड जिल्हा ) म्हणतात.
सापाला मारण्यासाठी, तो पळून जाऊ नये म्हणून त्रिशूळाच्या आकाराचं खास आयुध असतं. लांब काठीच्या टोकाला बसवतात. त्याला ' खोचेरा' किंवा ' खोचेरू' म्हणतात.
अंगण चोपायला चोपणं. मोगरीसुद्धा असते बहुतेक. लक्षात नाही. खळं करणे या कृतीला ' वलई करणे'.
>>देवगड ,मालवण आणि वेंगुर्ला
>>देवगड ,मालवण आणि वेंगुर्ला या तालुक्यांना समुद्रकिनारपट्टी लाभल्याने भौगोलिकदृष्ट्या त्यांना खालाटी (खालच्या बाजूचे) व इतर तालुक्यांना वलाटी (वरच्या बाजूचे) म्हटले जाते. <<
बरोबर आहे, पण इथे खालचे-वरचे म्हणजे पश्चिम-पुर्व, दक्षिण-उत्तर नव्हे. खलाटी म्हणजे किनार्या लगतचे. हे शब्द लक्षात रहाण्याचं कारण कि माझं गाव अगदि समुद्रा लगत नसलं तरिहि खाडी गावातुन जाते. खाडीलगत्च्या जमिनीतले कुळिथ चविला बेस्ट. याउलट आजोळ किनार्यापासुन बरंच लांब. तेंव्हा आजोळावरुन कुळथाचं पिठ आलं कि वडिल हा चवितला सटल फरक मस्करीतुन नेहेमी सांगायचे...
वावे साप मरायला वापरतात
वावे साप मरायला वापरतात त्याला कामेरु देखील म्हणतात ना?
>>योवैभूमा मस्त शब्द.<< +१
>>योवैभूमा मस्त शब्द.<< +१
अजुन एक शब्द त्याच्या वेगळेपणामुळे लक्षात राहिलेला - निंबार; म्हणजे दुपारचं कडक ऊन. दुपारी भटकायला जाण्यापुर्वि काकुची सूचना असायची - सावल्येत र्हव, न्हायतर निंबार बाधत...
कामेरू नाव वाचलंय, पण नेमकं
कामेरू नाव वाचलंय, पण नेमकं कुठे ते लक्षात नाही. तुंबाडचे खोतच का?
"आशे कोळी मेलो त्येकां जित्तो
"आशे कोळी मेलो त्येकां जित्तो जाळूंक न्हेलो" ही म्हण? >>>
ही म्हण मी तरी 'आशे मेलो कोळी तेका जितो दिलो सुळी' अशी ऐकलीय.
कामेरु तुंबाडचे खोत मध्ये आहे
कामेरु तुंबाडचे खोत मध्ये आहे आणि श्रीनांची कामेरु नावाची कादंबरी देखील आहे.
साप मरायला वापरतात त्याला
साप मरायला वापरतात त्याला कामेरु देखील म्हणतात ना?.. .ho
मेल्या, गांवच्या या खेपेक
या धाग्यामुळे माबोकरांच्या गांवाच्या खेपा मात्र वाढणारसं वाटतंय ! -
गांवच्या तुझ्या या खेपेक माकांच उलट हंयले
शब्द इचारतस ! काय भानगड आसा हीem> !!
अगदी अगदी भाऊ!
अगदी अगदी भाऊ!
या वेळी असेच होणार. “तिकडचे सांगायच्या ऐवजी ईकडचे काय विचारतोस या वेळी? याला काय म्हणतात अन् त्याला काय म्हणतात?” असा प्रश्न पडणार गावाकडील मंडळींना.
चित्र भारी जमले आहे.
मस्त चित्र आणि भाष्य भाऊ!
मस्त चित्र आणि भाष्य भाऊ!
*चित्र भारी जमले आहे.* -
*चित्र भारी जमले आहे.* - पूर्वी 'माबो'वरच पोस्ट केलेलं. तसंच आणखी एक, ज्यात नदी/ खाडीवरील होडयांच्या प्रकारांची स्थानिक नांवं दिलीं आहेत -
शिवाय, पूर्वी कोकणात बोटसेवा सुरू असतांना बोट ते किनारा अशी प्रवाशांची वहातूक करायला अतिशय रूंद, जड व पसरट मोठ्या मजबूत होड्या असत. त्याना सिंधुदुर्गात ' पडाव' व रत्नागिरी भागात ' खपाटं' म्हणत. बोट हाच कोकण मुबै मधला मुख्य दुवा असतानाच्या काळात या दोन शब्दांना कोकणी माणसाच्या मनात मानाच स्थान होतं.
देशावरील शेतकरी आणि कोकणातील
देशावरील शेतकरी आणि कोकणातील कोळी यांच्या व्यवसायाची साधनांची ओळख होतेय. भाऊ होड्यांची माहिती मस्त. होड्यांच्या भागांची नावं आहेत का?
Sail, mast, stern, bow ह्यांना काय म्हणतात? होडीतल्या विविध दोरांना देखील वेगवेगळी नावे आहेत.
*होडीतल्या विविध दोरांना
*होडीतल्या विविध दोरांना देखील वेगवेगळी नावे आहेत.* खरंय. इंग्लिशमधे तर शीडाचया प्रतेक प्रकाराला, दोरखंडाच्या वेगवेगळ्या प्रकारे मारायचया गांठीनाही विशिष्ठ नांवं आहेत. पण तें मोठया गलबतांसाठी. आपल्याकडेही असतील पण तीं खलाशी वर्गालाच माहित ! ( इंग्लंडमधे होडीला दोरी बांधून नदीच्या कांठावरून ती ओढत नेणंही चालायचं . Ref. - ' Three men and a boat ' by Jerom K Jerom. पण आपलयाकडे तसं क्वचितच)
छोटया होडयांचया पुढच्या टोकास नाळ, मागच्यास सुकाणू असंच म्हणतात. वरतीं तरीच्या होडीला जोड दिलेली दाखवलीय त्याला 'उलांडी' म्हणतात. होडी वळवण्यासाठी 'सुकाणूं' मोठया होड्यानाच असतं. छोटया होड्या वल्हंच वापरून वळवतात.
देवकी, धन्यवाद.
देवकी, धन्यवाद.
भाऊ , चित्रे नेहेमीप्रमाणे सुंदर. राहाळ म्हणजे बहुतेक रहिवास असावा असे पिंग्यांच्या लेखनातील संदर्भांवरून वाटले होते.
शाली आपली चित्रे आणि इन्पुट्स (नेहमीप्रमाणेच) उत्तम.
मस्त चित्रे आणि माहीती.
मस्त चित्रे आणि माहीती.
स्वयंपाकात वापरलीं जाणारीं
स्वयंपाकात वापरलीं जाणारीं आमसोलं रतांब्यापासून बनवतात. त्या संदर्भातील शबद -
आगूळ- सालं व बीया बाजूला काढून उरलेला रस ;
डोणकं - लांकडी 'टब' ज्यात आगूळ साठवून त्यात सालं मुरवतात;
मुठलं - बीयांचं तेल टिकून राहील असा शंखाच्या आकाराचा गठ्ठा जो थंडीत क्रीमसारखा हाता-पायांना चोळत.( या बीया आतां काॅसमेटीक उद्योगात मोठ्या प्रमाणात वापरतात व त्यामुळे त्याना बाजारात दरही चांगलाच मिळतो. 'मुठलं' आतां दुर्मिळच )..
भाऊ, हीरा, योवैभूमा आणि मंडळी
भाऊ, हीरा, योवैभूमा आणि मंडळी तुमच्यामुळे कोकणातले वेगवेगळे शब्दच नाही तर त्या शब्दांना चिकटून असलेल्या दैनंदिन व्यवहाराची, संस्कृतीचीच झलक बघायला मिळतेय.
मस्तच.
*कोकणातले वेगवेगळे शब्दच नाही
*कोकणातले वेगवेगळे शब्दच नाही तर त्या शब्दांना चिकटून असलेल्या दैनंदिन व्यवहाराची, संस्कृतीची झलकच बघायला मिळतेय.* - लिहीताना त्या शब्दांना चिकटलेल्या रम्य आठवणींवरून हंळूवार मोरपीस फिरतं, हेही या धाग्याचे माझ्यावरचे उपकारच !
लहान ओढ्याला पर्ह्या >>>
लहान ओढ्याला पर्ह्या >>> माहेरी रत्नागिरी जिल्ह्यात हेच म्हणतात आणि वहाळ सासरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणतात.
अहो, देवगडची बोली अशी काही वेगळी बोली नाहीये , देवगडात मालवणीच बोलली जाते. >>> हो पण ती मला प्रॉपर मालवणी वाटत नाही ऐकताना, जी कणकवली, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी भागात बोलतात तिच्याजवळ जाणारी वाटते.
Pages