शालींच्या मैत्रचे भाग वाचताना त्यातील पात्रांच्या तोंडात अनेक ग्रामीण शब्द वाचले. काही मजेशीर वाटले. प्रत्येक प्रांताची जशी आपली एक खाद्यसंस्कृती असते तशी एक भाषाही असते. त्यातल्या त्यात ग्रामीण भाषा तर अतिशय गोड असते. त्यात वापरले जाणारे शब्द रोजच्या व्यवहारात वापरले जात असले तरी ते प्रमाण मराठी भाषेत नसल्याने सहसा लिखानात येत नाही. शहरांमधे तर ते बोलण्यातही येत नाही. तर असेच वेगवेगळ्या प्रांतातील ग्रामीण भाषेतील मजेदार, वेगळे शब्द वाचायला मजा येईल. सांगली, कोल्हापुर, नागपुर, नगर, कोकण आणि महाराष्ट्रातील अनेक भागात वेगवेगळे शब्द वापरले जातात ते येथे लिहिले तर सर्वांना ते वाचण्यातला आनंद मिळेल तसेच त्यांचे अर्थही कळतील. उदा. आमच्या जुन्नर भागात वापरले जाणारे काही शब्द:
यळोमाळ: येथे तेथे किंवा दिवसभर
कव्हर: किती वेळ
उलसक किंवा उलीशीक: अत्यंत थोडे.
फिंद्री: खोडकर मुलगी
पाठ: शेळी
तुमच्याकडेही असे काही शब्द असतील तर अर्थासहीत व जमल्यास वाक्यासहीत येथे लिहा.
मधली बरीच पानं वाचली नसल्यानं
मधली बरीच पानं वाचली नसल्यानं काही शब्द रिपिट होत असणार..
इरवाड = बाजरीचे पीक निघाल्यानंतर शेतात मठ,मुगाचे आंतरपिक शिल्लक राहतं. जे उशिरा पक्व होते.
शिकारा = पाठीवरचा फवारणी पंप
भोरकडी
भोरकडी
>> इंग्रजी आठ आकाराची लोखंडी कडी. दोन वर्तुळं असे जोडलेले असतात की दोन्ही पैकी एक फिरु शकेल. जनावराच्या गळ्यातील गोलाकार दोर आणि खुंटीला बांधलेला दोर/ साखळी भोरकडीनं जोडलेली असते, जेणेकरून दोराला पिळ पडला तरी जनावराला फाशी लागू नये.
माझ्या आईचे कन्नड वळणाचे शब्द
माझ्या आईचे कन्नड वळणाचे शब्द व म्हणी -
1. तांडक्या- छोट्या ताटल्या
2. भरे - फक्त
3. वट्ट - फक्त
4. गंडा ह्यांती सुडगाड - ( नवरा बायको आणि पप्पी (सुडगाड म्हणजे फालतुक)
5. उ अंद्र आर तिंग्ळ होगतद - (हो म्हटलं की सहा महिने निघून जातात, म्हणजे वाद टाळण्यासाठी तात्पुरते हो म्हणणे नक्कीच चांगले!)
6. सुमकडू , एन माताड ब्याड ! (शांत बस, काहीही बोलू नकोस.)
7. सुडगाड - फालतू असे बोलणे .
छान. हे कन्नड थोडे मराठी
छान. हे कन्नड थोडे मराठी वळणाचे वाटते आहे. उत्तर कर्नाटक का?
Yes. @ हरचंद
Yes. @ हरचंद
वट्ट हा शब्द पुलंच्या लिखाणात
वट्ट हा शब्द पुलंच्या लिखाणात वाचलाय
कन्नडमधला हा शब्द माहिती नाही. 'बरी' म्हणजे फक्त, हा शब्द फक्त माहिती आहे! 'भरे' त्यासारखा आहे.
Pages