http://www.misalpav.com/node/44082
हे दामोदरच्या सुता तुला कमळाचं वरदान
एकमुखाने बोला बोला नमो जयजयगान //
दिव्य तुझी संघभक्ती धन्य दाढी काया
बालपणी गेलासी तू शाखेसी धराया
हादरली ती जननी, थरथरले घरचे जन//
भाजपास येई मुर्छा लागे इलेक्शन
अडवानीच्या रथावरती तुझे कलाकाम
मंदिर प्रश्न उठवला, मिळे कमळा पंचप्राण//
मेक इंडियाच्या नावे रोम कधी लंका
कुठे पिप्पाणी वाजवी, ड्रम कधी डंका
सेल्फीची भरवी जत्रा अन हसती सर्व जन//
कोट तुला नऊ लाखांचा कुणी कधी घातला ?
मश्रूमाचे सूप पिऊनी, झोला कुठे टाकला?
खिशामध्ये अंबानी, अन अडाणी हे भगवान//
आले किती गेले किती संपले भरारा
नेहरू गांधी सोडून काही उच्चारी चकारा
गुलाबी आणल्या नोटा आम्ही झालो रे हैराण//
धन्य तुझे रामराज्य , धन्य संघसेवा
पंधरा लक्ष बघता सारे उपाशी का देवा
राहुल प्रियंका आले, आता काँग्रेसला मतदान//
****************************
ओरिजिनल :
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया
बालपणी गेलासी तू सूर्याला धराया
हादरली ही धरणी, थरथरले आसमान
लक्ष्मणा आली मुर्च्छा लागुनिया बाण
द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण
तळहातावर आला घेऊनी पंचप्राण
सीतामाई शोधासाठी गाठलीस लंका
तिथे रामनामाचा तू वाजविला डंका
दैत्य खवळले सारे परि हसले बिभिषण
हार तुला नवरत्नांचा जानकीने घातला
पाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला
उघडुनी आपली छाती दाविले प्रभु भगवान
आले किती गेले किती संपले भरारा
तुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा
धावत ये लवकरी आम्ही झालो रे हैराण
धन्य तुझे रामराज्य धन्य तुझी सेवा
तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा
घे बोलावून आता कंठाशी आले प्राण
--------------------------------------
**********************
भन्नाट!
तिकडे सोनीयाच्या सुता वाचले. तेही भारीच.
काळीमाऊ चांगली जमली आहे.
काळीमाऊ चांगली जमली आहे. मिपावरची "सोनियाच्या..." हे स्फुर्तिस्थान असण्याची शक्यता वाटतेय, पण विडंबन आवडलं. कंपुतील इतरांच्या रोजच्या उथळ थयथयाटा पेक्षा हे बेस्ट!..
हो, ते पाहूनच सुचले , कोट
हो, ते पाहूनच सुचले , कोट तुला नऊ लाखांचा , हे लगेच सुचले , मग ओरिजिनल कविता पाहून लगेच सगळे करून टाकले
(No subject)
छान जमलं आहे.
छान जमलं आहे.
सोनियाच्या सुताची पण कृपया लिंक द्या कोणी.
राहुल प्रियंका आले, आता
राहुल प्रियंका आले, आता काँग्रेसला मतदान
केलं का काँग्रेसला मतदान?
मग पुढे काय झालं?
सोनियाच्या सुता
सोनियाच्या सुता
मिसळपाव
http://www.misalpav.com/node/44075
ते स्पार्टाकस ह्यांनी लिहिले आहे, मायबोलीवरील एका भयाण महायुद्धाचे ते एक घटक होते ना?
हम.
हम.
शब्द, मात्रा, गेयता बघता तुमचे विडंबन तुलनेत छान जमलंय.