Submitted by बेफ़िकीर on 8 February, 2019 - 13:31
गझल - मूर्तीपूजा त्यागावी
=====
मूर्तीपूजा त्यागावी हा विचार करतो आहे
घरातल्या साऱ्या मूर्तींना अभय मागतो आहे
प्रचंड प्रस्तावना, पुढे आकांत देहबोलीचा
कविता ह्या शब्दाचा हल्ली अर्थ बदलतो आहे
जे न स्वतःला कळते ते कळते हे जग भासवते
भले कळो ना कळो मला मी, जगास कळतो आहे
उबग येत आहे त्याचा, जो हयात आहे सध्या
मेलेल्यांच्या जगण्याचा तिटकारा करतो आहे
एकेकाळी वाट जायची तिकडे चालत होतो
आता जेथे पाय टाकतो, वाट काढतो आहे
'बेफिकीर' होण्यासाठी बस गझल पुरेशी नसते
हो सच्चा माणूस, एक माणूस विनवतो आहे
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मूर्तीपूजा त्यागावी हा विचार
एकेकाळी वाट जायची तिकडे चालत होतो
आता जेथे पाय टाकतो, वाट काढतो आहे>> मस्तच!
होय, मूर्तींना हवे आहे
होय, मूर्तींना हवे आहे
संपादित करत आहे
खूप आभार शाली
'वाट' हा शे'र आवडला
'वाट' हा शे'र आवडला
सुंदर...
सुंदर...
मल शेर शायरी कळत नाही.
मल शेर शायरी कळत नाही. त्यामुळे खालील शेरात काय काव्य, वगैरे आहे ते कळले नाही.
पण ते वाचून वाईट वाटले. असे होऊ नये.
मूर्ती नि पुजा महत्वाची नाही, पण लोक आहेत त्यांना सहन करावे, घरी बसून चिंतन करावे, चांगल्या कविता, गद्य वाचावे. मुख्य म्हणजे विनोदी लिखाण वाचावे. मन शांत होत. राग, तिटकारा वगैरे कशाचाहि रहात नाही.
उबग येत आहे त्याचा, जो हयात आहे सध्या
मेलेल्यांच्या जगण्याचा तिटकारा करतो आहे
मेलेल्यांचा तिटकारा आणि
मेलेल्यांचा तिटकारा आणि हयातांचा उबग? पास्ट आणि प्रेज़ेन्ट दोन्ही नाकारायचे? इतका सिनिसिझ्म? स्वतःची वाट स्वतः शोधणे हे ठीकच आहे; सकारात्मक आहे, पण त्यासाठी सारे जग लाथाडायला नको ना? सगळ्यांच्या बरोबर जाणे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाणे असे दोन मार्ग असतात आपल्यापुढे. मग हे 'अॅक्ला चालो रे' कशासाठी? अर्थात तुमची हाक ऐकून कोणीच नाही आले, (जोदी तोर डाक शुने केवु ना आशे तोबे)तरच अॅक्ला चालो रे ठीक आहे. पण आधी साद घालायला हवीच ना? साद प्रतिसाद यांची देवाणघेवाण व्हायलाच हवी ना?
कविता आवडली म्हणून थोडेसे विरोधी लिहिले. माफी असावी.